गुंतवणुक
गुंतवणूक – तुमच्या आजूबाजूला लोकांना तुम्ही श्रीमंत होताना पहिले आहे का ?
२ मिनिट लेख वाचणे थांबवून त्या लोकांबद्दल विचार करा. ते लोक श्रीमंत होण्याच्या १ वर्ष आधी काय करत होते ? २ , ३, ५, किंवा १० वर्ष अगोदर काय करत होते ? ते काय वेगळं करत होते ?
जर मोठे लेख वाचणे तुम्हाला कंटाळवाणे वाटत असेल, तर या लेखाचा सारांश तुम्ही फेसबुक किंवा Youtube वर ऐकू शकता.
केला विचार ?
काय फरक दिसून आला तुम्हाला त्या लोकांच्या वागण्यात ?
मला त्या लोकांमध्ये एक फरक दिसून आला. ते योग्य ठिकाणी गुंतवणुक करत होते.
गुंतवणुक म्हणजे काय ?
गुंतवणुक म्हणजे काय बुवा ? गुंतवणुक म्हणजे आज हातातील पैसा अशा जागी लावणे जो भविष्यात वाढून मिळेल. तुम्ही नोकरी, व्यवसाय अथवा नशिबाने श्रीमंत व्हा. पण जर तुम्ही गुंतवणुक नाही केली तर तुम्ही जास्त काळ श्रीमंत राहू शकणार नाही आणि आयुष्यभर तुम्हाला काम कराव लागेल.
उदाहरण क्र.१-
समजा आज सकाळी तुम्हाला जुन्या पॅन्ट मध्ये एक १०० ची नोट सापडली. तुम्हाला आठवल कि अरे ! आपण तर हि नोट आईसक्रिम विकत घ्यायला ठेवली होती. तुम्ही ठरवल कि आज त्या नोटेने आईसक्रिम विकत घेणार. तुम्ही दुकानात गेलात, १०० ची नोट दिली आणि आईसक्रिम मागितली. पण तुम्हाला आईसक्रिम मिळणार नाही. कारण मागच्या वर्षी १०० ची असलेली आईसक्रिम आता १०६ ची झाली, महागाईमुळे. मग जर तुम्ही तुमचे पैसे अशा जागी नाही लावले जिथे ते १०० चे १०६ होतील तर तुम्हाला आईसक्रिम मिळणार नाही. जेव्हा तुम्ही १०० चे १०६ होण्यासाठी जो प्रयत्न करता त्याला म्हणतात गुंतवणुक.
उदाहरण क्र. २
समजा एक शेतकरी आहे, त्याने उत्पादन केलेल्या धान्यापैकी काही धान्य त्याने स्वतःसाठी काढून ठेवले. आता हे धान्य गुंतवणुक झाली का ? जर त्याने ते धान्य पेरणी साठी वापरले तर, हो आणि जर त्याने हे धान्य घरी खाण्यासाठी वापरले तर नाही. जमा करणे म्हणजे झाली बचत, खाणे म्हणजे झाला खर्च आणि पेरणे म्हणजे झाली गुंतवणुक. जर तुमचा पैसा वाढत असेल तरच ती गुंतवणुक आहे. कपाटात पैसे ठेवणे म्हणजे गुंतवणुक नाही.
आपण गुंतवणुक का करत नाही ?
१. अज्ञान
२. भीती
३. संयमाचा अभाव
या तिन्ही गोष्टी वर काम करण्याचा आपण इथे प्रयत्न करू.
१. अज्ञान
अज्ञान फक्त याचे नाही कि मी गुंतवणुक कशी करू, तर मी गुंतवणुक का करू ?
वरिल तक्ता पाहून आपल्याला असा दिसून येईल कि १९९१ साली गुंतवलेले १०,००० रुपये, २०१५ साला मध्ये म्हणजेच २४ वर्षांनी विविध गुंतवणुकीमध्ये किती झाले.
सोन | ७२००० |
बँक fd | ९९,५३० |
पोस्टल td | १.०७ लाख |
सेन्सेक्स | २.३८ लाख |
यावरून आपल्याला दिसून येईल कि योग्य गुंतवणुकीचा किती फायदा होतो. गुंतवणुक कुठे करावी हे आपण सविस्तर पुढील येणाऱ्या लेखात पाहूच. आपण सध्या फक्त गुंतवणुकीचे फायदे पाहत आहे. १०,००० कपाटात ठेऊन फक्त १०,००० च राहिले असते आणि महागाईमुळे त्यांची किमत पण कमी झाली असती. पण ते गुंतवले असते तर पहा किती फायदा झाला असता.
२. भीती
भीती कि माझ्याकडे जे पैसे आहे ते पण मी गमवून बसेल. ज्ञान असेल तर भीती नाहीशी होते. भीती वाटत असेल तर गुंतवणुक करू नका आणि भीती वाटते म्हणून तसेच बसून पण राहू नका. ज्ञानार्जन करा. स्वतः शोधा तुम्हाला हि माहिती कुठे मिळेल? शाळेचा पहिला दिवस आठवा. जवळपास सर्वच रडतात, भीतीमुळे कि आपण कोणत्या ठिकाणी आलो ? इथे काय होईल ? आपल्याला काही दुखः मिळेल का इथे ? हे कोण लोक आहेत ? वगैरे वगैरे. म्हणजे पुढे काय होईल याची भीती वाटते. गुंतवणुक करताना पण हीच भीती वाटते. पुढे काय होईल माझ्या पैश्याचं ? पण जस जस आपण शाळेत जात जातो आपली हि भीती हळू हळू नाहीशी होत जाते. कोणी कॉलेज मध्ये जाऊन रडते का ? मग तसेच गुंतवणुक करता करता तुम्ही शिकू लागाल आणि तुमची भीती नाहीशी होईल. भीती वाटते म्हणून सुरूच करणार नाही हे सोडून द्या. लहान सुरवात करा. अश्या रक्कमेने सुरवात करा जी गमावली तरी तुम्हाला फरक पडणार नाही.
विभाजन करणे
आपण गावाला जाताना जसे सर्व पैसे एका bag मध्ये ठेवत नाही. थोडे थोडे पैसे सर्व bag मध्ये ठेवतो जेणेकरून जर bag चोरीला गेली तर फक्त काही पैसे चोरीला जातील. आपण तसच करायच, पैसे थोडे थोडे वेगवेगळ्या जागी गुंतवावे. म्हणजे सुरवातीला तुम्ही काही चूक केली तरी तुमच होणार नुकसान हे कमी असेल. विभाजन केल्यामुळे धोका कमी होतो. पण एवढेही जास्त विभाजन करू नका कि तुम्हाला येणारा परतवावा फार कमी होऊन जाईल.
३. संयमाचा अभाव
गुंतवणूक करणे साध आहे सोप नाही
– वारेन बफे
वारेन बफे यांनी असा का म्हटलं असेल ? कारण गुंतवणुकीचे फायदे आज नाही, अनेक वर्षांनी मिळतात. गुंतवणूक करायला माणसाला शिस्त लागते. आपल्याला शाळेत कधी श्रीमंत कसे व्हावे हा विषय शिकवला का ? मग शाळेतून बाहेर पडल्यावर आपण गुंतवणुकीबद्दल शिकायला काय मेहनत घेतली ? पैसे कसे कमवायचे यासाठी आपण बहुतेक लोक किमान १५ वर्ष तरी शिकलो. पण कमावलेले पैसे कसे गुंतवूण मोठे करावे, ह्याचा किती दिवसांचा अभ्यासक्रम आपण केलाय ?
ब्लॉग मध्ये मी योग्य गुंतवणुक कशी करावी हे शिकत असतानाचा माझा अनुभव सादर करत आहे. फक्त हा ब्लॉग वाचून तुम्ही श्रीमंत होणार नाही. गुंतवणूकदार व्हायला तुम्हाला स्वतःला, स्वतःवर काम कराव लागेल. स्वतः काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. काही चुकीच्या गोष्टी सोडून द्याव्या लागतील. ह्या गोष्टी सर्व लोक करू शकतात. पण करत नाही, त्यामुळेच फक्त थोडे लोक श्रीमंत आहेत.
समजा आज तुम्ही २०,००० चे जागी ३०,००० चा tv घेतला तर तुम्हाला वाटेल काय झाल ? फक्त १०,००० च जास्त गेले ना ? पण वारेन बफे असा विचार करत नाही तर ते असा विचार करतात कि, हे १०,००० भविष्यात किती झाले असते? माझ नुकसान तेवढ झाल आहे. म्हणजे आज गमावलेले १०,००० हे भविष्यातील सोन्यात गमावलेले ७२,०००, F.D मध्ये ०.९९ लाख, POST T.D मध्ये १.०७ लाख, तर सेन्सेक्स मध्ये २.३८ लाख आहेत. पैसे खर्च करताना जर का विचार केला कि हे पैसे गुंतवले तर किती मोठे होतील तर फालतू खर्च करणे बंद करणे सोपे होईल.
आपण नको असलेल्या गोष्टी घेतो, आपल्याकडे नसलेल्या पैश्यातून, आपल्याला नको असलेल्या लोकांना प्रभावित करण्यासाठी
– विल स्मिथ
हि गोष्ट आपल्याला जर थांबवायची असेल तर आपल्याला हाच विचार करावा लागेल कि आपण जो वायफळ खर्च करतोय त्याची गुंतवणुकीनंतर काय किमत होईल ? गुंतवणूक दारामध्ये काय गुण हवे ? त्यावरील लेख तुम्ही इथे वाचू शकता.
गुंतवणूक करणे आपण कसे शिकू शकतो?
आजच्या माहितीच्या जगात ह्या प्रश्न्याच उत्तर फार सोप आहे. आज सर्व माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, जास्त माहिती इंग्लिश मध्ये आहे. पण बरीच माहिती मराठी मध्ये पण आहे. इंग्लिश येत नाही म्हणून कोणी आपल्याला श्रीमंत बनवणार आहे का ? नवीन काय शिकण्याची तयारी असल्याशिवाय आपण श्रीमंत बनू शकत नाही. शिवाय आपल्याकडे शब्दकोश, इंटरनेट आहे. त्यांचा वापर करून आपण बरेच काही शिकू शकतो इच्छा पाहिजे ती स्वताला बदलण्याची. अशे लोक शोधा आजूबाजूला ज्यांना काही माहित आहे, हळू हळू ज्ञानात भर पडत जाईल. वेळ लागेल पण काम केले तर नक्कीच बदल घडून येईल. जेव्हा विद्यार्थी तयार होतो शिक्षक हाजीर होतो- झेन
गुंतवणूक म्हणजे विमा नाही.
गुंतवणूक आपण पैसा वाढवण्याकरिता करतो. विमा आपण काही वाईट झाल तर पैसे मिळावे याकरिता काढतो. अनेक लोक विमा पॉलीसी काढून दोन्ही गोष्टी एकत्र करू पाहतात. पण त्यामुळे ना चांगला विमा मिळतो, ना गुंतवणूक होते. म्हणून समजून घ्या विमा हा गुंतवणूक नाही, विम्याचे काम वाईट वेळी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे आहे. विमा काढणे पण आवश्यक आहे, गरज आहे ती, विमा आणि गुंतवणूक योग्य प्रमाणात करण्याची. त्याकरिता त्यांना वेगळ करणे ठीक राहील.
गुंतवणूक आणि जुगार.
दोन्ही गोष्टीमध्ये आपण पैसा लावतो, अधिक पैसा मिळवण्यासाठी. दोन्ही मध्ये पैसा गमावण्याचा धोका असतो, पण दोन्ही मध्ये फरक काय ? गुंतवणूक ज्ञानाच्या आधार केली जाते, जुगार नशिबाने खेलला जातो. गुंतवणुकीमध्ये अभ्यास केला जातो, मी हे केले तर काय होईल ? ते केले तर काय होईल ? किती फायदा होईल ? किती नुकसान होईल ? जेव्हा कमी धोक्या मध्ये जास्त फायदा होत असेल, तेव्हा गुंतवणूक करावी पण जुगार याउलट असतो. जुगारात जास्तीत जास्त धोका घेतला तरच फायदा होतो. जुगारात फक्त नशिबच असते. गुंतवणूक डोक्याने केली जाते, गणित करून. तर जुगार भावनेने खेळला जातो.
गुंतवणूक एक कला.
चित्र काढणे जशी एक कला आहे. तसेच, गुंतवणूक करणे हि पण एक कला आहे. तुमचे गुरुजी महत्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकवतील, ब्रश कोणता वापरायचा, कसा पकडायचा, रंग कोणता वापरायचा, कसा तयार करायचा शिकवतील. पण तुमच चित्र तुम्हालाच काढव लागत, तसेच गुंतवणुकीचे आहे. दुसरे तुम्हाला महत्वाच्या मुलभूत गोष्टी सांगू शकतात. पण गुंतवणुकीचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. फसवणारे लोक तुम्हाला दाखवतात कि पैसा कमावणे फार सोपे , काही काम करायची गरज नाही, चिंता नाही, आरामात पैसा बनेल. पण तस नाही तुम्हाला शिकत रहाव लागेल. लक्ष्य ठेवाव लागेल तुमच्या गुंतवणुकीबद्दल काय सुरु आहे, काय नाही. दुसऱ्यान पैसे कमावले ते आपल्याला दिसते, त्याने काय मेहनत केली, ते पाहणे आवश्यक आहे.
गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत यातील फरक.
संपत्ती (Asset) – म्हणजे अशी गोष्ट जेथे पैसा लावून तुमचा पैसा वाढेल.
दायित्व (Liability) – जेथे पैसा लावल्यावर कमी होत जाईल.
वरील चित्र पहा, यात तुम्हाला असे दिसून येईल गरीब जेवढे कमावतो. तेवढे खर्च करतो. काहीच बचत करत नाही. गुंतवणूक नाही.
मध्यमवर्गीय चा पहा, ते काही पैसे वाचवतात, त्यापासून ते दायित्व विकत घेतात. महाग कपडे, घड्याळ, मोबाईल, गाड्या अश्या गोष्टी ज्या पासून पैसा वाढत नाही.
आता श्रीमंतांचे पाहू, श्रीमंत माणूस काय करतो ? तो जागा विकत घेतो, stock घेतो, FD करतो, अश्या गोष्टी विकत घेतो ज्यापासून पैसा वाढत जातो. साहजिकच आहे कि, श्रीमंत पण खर्च करतात, पण त्यांचा खर्च, त्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणात इतरांशी तुलना करता कमी असतो. गुंतवणूक जास्त असते. असे नसेल तर ते पण काही काळाने गरीब होतील.
गुंतवणूक करताना आपण हा विचार नाही केला पाहिजे, कि खर्च करून किती उरेल ? गुंतवणूक करताना आपण पाहिले पाहिजे कि आपल्याला किती पैसे लागणार आहेत? त्यासाठी आज किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
लक्ष्य
प्रत्येक माणसाच्या जीवनात काही मुख्य गोष्टी असतात ज्या त्याला कराव्या लागतात.
१. निवृत्ती ची सोय
२. मुलांच लग्न
३. मुलांचे शिक्षण
४. आजारपणाची सोय
५. घर
वरील गोष्टींसाठी तुम्हाला किती पैसे लागतील ते लिहा. हि झाली तुमची आर्थिक उद्दिष्टे. हि पूर्ण करायला तुमच्याकडे किती वेळ आहे ? त्यानुसार प्रत्येक उद्दिष्टासाठी तुम्ही एक गुंतवणूक केली पाहिजे. याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही या लेखात पाहू शकता.
यशस्वी गुंतवणुकीला वेळ. शिष्ट आणि धैर्य लागते. कोणी एका उत्पन्नावर अवलंबून राहू नये.
आपण जेव्हा फक्त एका उत्पन्नावर अवलंबून राहतो तेव्हा आपण फार जास्त धोका घेतो. त्यामुळे गुंतवणूक करणे फार आवश्यक आहे. अश्या प्रकारे आपण एक दुसरा उत्पन्नाचा स्त्रोत तयार करतो आणि धोका कमी करतो. आपल्या उत्पन्नाचा एक स्त्रीत काही दिवस बंद झाला तर दुसऱ्या स्त्रोताच्या साहाय्याने काही दिवस काढू शकतो. नौकरी करणाऱ्यांना गुंतवणूक करणे आवश्यक आहे. नाहीतर त्यांना नेहमी दबावाखाली जगाव लागेल कि मला कामावरून काढल जाऊ शकते.
गुंतवणुकीची सुरवात कधी करावी ?
जेव्हा तुम्हाला गुंतवणुकीचे महत्व कळेल तेव्हापासून. मग तुमच वय काहीही असो. १० किंवा ६० जस जस विज्ञान प्रगती करत आहे, माणसाचा आयुष्य वाढत आहे. कोणालाच माहित नाही आपण किती वर्ष जगू. मग ६० वयाच्या माणसाने पण गुंतवणूक केली पाहिजे आणि १० वर्ष्याच्या पण. मग ह्या दोघानी सारखी गुंतवणूक केली पाहिजे का ? उत्तर आहे, नाही! १० वर्षाच्या मुलाकडे खूप वेळ आहे. तो जास्त धोका पत्करू शकतो, आणि ६० वर्षाचा माणूस कमी. म्हणून गुंतवणूक सर्वांनी करावी. पण आपल्या वयानुसार धोका पत्करून. समजा तुमचे वय x आहे तर तुम्ही (१००-x) एवढी गुंतवणूक equity मध्ये केली पाहिजे, equity म्हणजे काय, ते आपण पुढील येणाऱ्या लेखांमध्ये पाहूच. साध्या भाषेत म्हटलं तर अशी गुंतवणूक ज्यात इतरांपेक्षा जास्त धोका आहे.
गुंतवणूक ? छे ! मी तर तरुण आहे.
५ वर्ष उशिरा गुंतवणूक म्हणजे ५७ लाखांचं नुकसान.
२,००० दरमहा ३० वर्ष गुंतवणूक केली आणि १५% वार्षिक परतावा पकडला, तर जमा होणारी रक्कम आहे १ करोड १२ लाख.
२,००० दरमहा २५ वर्ष गुंतवणूक केली आणि १५ % वार्षिक परतावा पकडला, तर जमा होणारी रक्कम आहे ५५ लाख.
म्हणजे ५ वर्षांत ५७ लाखांचे नुकसान.
म्युच्युअल फंड बद्दल सविस्तर माहिती हवी आहे ? आमचा हा लेख वाचा.
म्युच्युअल फंड बाजार जोखिमेच्या अधीन आहेत, योजनेसंबंधी सर्व दस्तावेज वाचून गुंतवणूक करावी.
महिला आणि गुंतवणूक
गुंतवणूक करण्यासाठी लागणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत, दुरचा विचार करणे आणि संयम राखणे. ह्या दोन गोष्टी महिलांमध्ये दिसून येतात. त्यामुळे त्या चांगल्या गुंतवणूकदार होवू शकतात. पण याउलट चित्र आपल्याला आपल्या समाजात दिसून येते. महिलांना गुंतवणूकीचे निर्णय घेताना जास्त प्राधान्य दिल्या जात नाही.
जर तुम्ही एका माणसाला शिकवलं तर तुम्ही एका व्यक्तीला शिकवता, जर तुम्ही एका स्त्रीला शिकवला तर तुम्ही पूर्ण घराला शिकवता
– रुडी मानिकन
Fidelity च्या सर्वेक्षणानुसार, महिला पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे पैशाचं व्यवस्थापन करतात. महिला उद्देशानुसार गुंतवणूक करतात. कमी धोका घेतात. संयम राखतात.
गुंतवणूकदाराच काम भविष्याला आज पाहणे आहे.
गुंतवणूक करताना तुम्हाल फार हुशार असायची गरज नाही. बस सामन्य ज्ञान असले, साधे गणित आले, व्यवसाय समजता आला झाले. सर्वात जास्त महत्त्वाची कोणती गोष्ट पाहिजे असेल तर ? संयम . व्यापारात अनेक उतार चढाव येतात, म्हणून नुकसान हे अल्पकालीन आहे कि दीर्घकालीन ? हा विचार करावा, आणि त्या नुसार निर्णय घ्यावे. संयमाचा अर्थ काहीच करू नये असा नसून, संयमाचा अर्थ आहे कि फार कमी वेळा तुमचा निर्णय बदलणे.
बस ची मासिक पास काढली ना तुम्ही ? त्यात कस असते कि तुम्हाला ३० वेळा प्रवास करता येईल. तस समजा कि एक गुंतवणुकीचा पास भेटला आहे. त्याचावापर जीवनात तुम्ही फक्त २० वेळा वापरू शकता. तुम्ही जीवनात २० च गुंतवणूक करणार आहात. असे का ? तर यामुळे तुम्ही फार कमी निर्णय घ्याल. कमी निर्णय घ्याल तर तुम्हाला विचार करायला जास्त वेळ मिळेल. जास्त वेळ मिळाला तर, तुमचा तो निर्णय बरोबर असण्याची शक्यता फार जास्त असते. कारण तुम्ही वेळ देऊन, संशोधन करून निर्णय घेतला आहे.
नाही म्हणणे.
गुंतवणूकदाराला ‘हो’ पेक्षा ‘नाहीच’ जास्त वेळा बोलावं लागतं. कारण चांगल्या गुंतवणुकीच्या संधी फार कमी उपलब्ध असतात. महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतील, तर महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींना नाही म्हणावेच लागेल. तुमचा वेळ हा कसा ? कुठे ? व्यतीत व्हावा हे तुम्ही ठरवल पाहिजे. तसेच तुमचा पैसा कुठे गुंतवला जाईल ? हे सुद्धा तुम्ही ठरवलं पाहिजे. नाही म्हणायला शिका. उधार द्यायला आणि घ्यायला पण, नाही म्हणायला शिका. उधार दिल्यामुळे पैसा आणि नाते कसे खराब होतात ? आणि द्यायचेच असल्यास आधी काय विचार करावा ? याचे वर्णन, खालील पुस्तकात केले आहे.
तुम्हाला नेहमी गर्दीच्या दूर राहावे लागेल. जे सर्वच करतात ते करून, पैसे बनत नाही. इतर करत आहेत त्यापेक्षा वेगळं केल नाही, तर तुम्ही इतरांपेक्षा जास्त पैसे बनवू शकणार नाही.
तुम्ही काय करताय ? हे जेव्हा तुम्हाला माहीत नसतं, तेव्हा ते धोकादायक असत. निवडक गोष्टींवर लक्ष्य केंद्रित करून त्यांचा अभ्यास केला तर धोका कमी करता येतो. लक्ष्य केंद्रित करण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टींना नाही म्हणावेच लागेल.
समजा तुम्हाला एक कार विकत घ्यायची आहे. जीवन भर तुम्हाला फक्त हीच कार चालवायची आहे. कोणत्या कंपनीची कार घ्यायची ? कोणत्या रंगाची? कोणते इंजिन? असे हजारो प्रश्न तुमच्या मनात येतील. तुम्ही त्या कार ची काळजी घ्याल. काळजी पूर्वक चालवणार. ऑईल देणार. आता आपल्या जीवनाकडे पहा आपल्याला फक्त एक शरीर आणि एक मन मिळाल आहे. तेेही पूर्ण जीवन भरासाठी एकच.
– वारेन बफे
सर्वात मोठी गुंतवणूक जी तुम्ही करू शकता ती स्वतःच्या ज्ञानातच.
हा लेख लिहिताना मी वाचलेली काही पुस्तके, जी तुम्ही पण वाचू शकता. पुस्तक विकत घेण्यासाठी नावावर क्लीक करा.
गुंतवणुकीचे प्रकार जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या, चला संपत्ती निर्माण करूया
Nice Keep it up
Thanku Sir, It was very helpful for newcomers like Mi.
Nice information… Very useful.
I am regular follower of this site and this help me a lot. Thank you…. Admin… For helping me and making my life better.
Its important blog,thanks sirji,
खुपच सुंदर लेख लिहिलाय तुम्ही सर ……..
धन्यवाद, please share.
Very useful immense information for New comer.
I got what I exactly needed.thanks a lot
Good, subscribe to email alert for future post. Also start investing in mutual funds, you can get help of expert by feeling the form on right side.
Great job…. Must read article for beginners keep it up
Thank you very much.
कृपया गुंतवणूक संबंधी अधिक माहिती पाठवा.
काय माहिती हवी ?
खूपच उपयुक्त लेख आहे, धन्यवाद !
यापुढेही असेच लेख वाचण्यासाठी email alert ला subscribe करा. तसेच फेसबुक पेज ला like करा. http://www.facebook.com/guntavnukdar आमचे Youtube Channel https://youtu.be/dSomnujDyaU