खालील मजेदार video पहा.
किती शेयर घ्यावे ? याच उत्तर काही आकड्यात देता येणार नाही. जेवढे शेयर वर तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष्य देऊ शकता, तेवढे घ्यावे. चांगले लक्ष्य देणे म्हणजे, त्या कंपनीबद्दल माहिती होऊ शकणारी, सर्व बारीकसारीक आवश्यक माहिती मिळवणे. त्यात होणाऱ्या बदलांवर लक्ष्य देणे.
फार कमी शेयर जर तुम्ही घेतले तर तुमचा धोका वाढेल. म्हणजे तुमचे पैसे जर फक्त २ कंपनींमध्ये आहेत आणि त्यातला एका मध्ये काही समस्या आली, तर तुमच्या ५०% गुंतवणुकीवर समस्या येईल.
अनेक शेयर मध्ये जर तुम्ही व्यवहार कराल, तर तुम्हाला नीट लक्ष्य देता येणार नाही. मग हा विकतो, तो विकत घेतो. नको तो विकतो, हा घेतो असे होईल. मराठीत म्हण आहे ना, एक ना धड भराभर चिंध्या. संयम असणे फार आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. वॉरेन बफे यांचे म्हणणे आहे, कमी निर्णय घ्या. म्हणजे ते बरोबर असण्याची शक्यता जास्त असेल. कारण तो निर्णय तुम्ही सर्व बाजुंनी विचार करून, संशोधन करून घेतला असेल. जितके निर्णय जास्त, तितके ते चुकण्याची शक्यता जास्त. कमी काम करा, पण चांगलं काम करा.
संयम बद्दल अधिक माहिती इथे पहा.
लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
इतर सर्वेक्षण पाहण्यासाठी इथे क्लिक करा.