कॅडबरी डेअरी मिल्क देश स्वतंत्र झाल्याच्या एक वर्षानंतर भारतात आले. सुरुवातीच्या काळात कॅडबरी फक्त त्याच लोकांवर लक्ष देत होते ज्यांना पश्चिमी संस्कृतीची माहिती आहे. ह्या लेखातील माहिती ही How a Foreign Chocolate won Indian Hearts: The Cadbury Story या पुस्तकातून घेण्यात आली आहे.
पण १९८४ मध्ये सरकारी योजनांमुळे दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायला लागले. कॅडबरीने ह्या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दूध पॉवडर पासून बनणारे डेअरी मिल्क चॉकलेट ताज्या दुधापासून बनविणे सुरू केले. त्यामुळे हे चॉकलेट पूर्वीपेक्षा अधिक रुचकर, अधिक नैसर्गिक आणि मोहक बनले.
फक्त उत्पादन सुधारणे पुरेसे नव्हते ग्राहकांना हा बदल दिसणे आवश्यक होते. त्यासाठी चॉकलेटची पॅकेजिंग बदलण्यात आली, त्यावर दूध हे मुख्य घटक आहे हे दाखवण्यात आले. आपल्याला आजकाल जे काचेचे हे युनिट दिसतात ज्यात कॅडबरीचे चॉकलेट ठेवलेले असतात ते सुरू करण्यात आले. जेणेकरून चॉकलेट ग्राहकांना सहज दिसतील.
‘फक्त मुलांसाठी’ पासून ‘आपल्या सर्वांमधील मुला’ पर्यंत
पुढील सहा वर्षे चांगली वाढ झाली पण १९९० चे वर्ष येता – येता कंपनीची वाढ सुस्त व्हायला लागली. सुरुवातीला कंपनी ने विचार केला की नवीन चव लहान मुलांमध्ये विकणे सोपे जाईल, वयस्क लोकांपेक्षा ज्यांना इतर चवींचा अनुभव आहे.
पण जे लहान मुलं आता मोठे झाले होते त्या ग्राहकांना कॅडबरी आता गमावत होते. म्हणून त्यांनी नवीन मोहीम सुरू केली. तुमच्यातील मुलासाठी.
या मालिकेतील सर्वात संस्मरणीय क्रिकेटची जाहिरात होती, ज्यात एक मुलगी क्रिकेटच्या खेळपट्टीवर उडी मारते. जेव्हा तिचा बॉयफ्रेंड षटकार मारतो, तेव्हा ती नृत्य करते.
‘चॉकलेट’ वरून ‘मीठा’ मध्ये बदल
१९९६ ते २००४ च्या काळात परत कॅडबरी डेअरी मिल्क ची वाढ कमी झाली. मार्केटवर ६५% कॅडबरीचाच ताबा होता, तसेच प्रतिस्पर्धी कंपन्या चॉकलेटचे आवरण असलेले बिस्कीट वेफर्स विकत होते. त्यामुळे त्याच किंमतीत त्यांचे चॉकलेट मोठे वाटत होते. जाहिरात करणे खर्चिक होते तसेच दिर्घकाळात याने वाढ टिकवणे शक्य नव्हते.
भारतात दोन प्रकारचे लोक होते.
१. आधुनिकतावादी ज्यांना पश्चिमी संस्कृतीचे ज्ञान होते. कॅडबरी ची वाढ याच लोकांपासून आली होती.
२. परंपरावादी जे विचारांनी आणि जीवनशैलीने पुराणमतवादी होते, पण भारताच्या लोकसंख्येचा मोठा भाग होते.
भारतात मिठाईचे मार्केट ४.२ बिलियन डॉलरचे होते तर चॉकलेटचे मार्केट फक्त २१५ मिलियन डॉलरचे, म्हणजेच मिठाईचे मार्केट चॉकलेटच्या मार्केटपेक्षा १९ पट मोठे होते.
चॉकलेट एक सांस्कृतिक विरोधी उत्पादन होते. जुन्या वापराच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करणारी ही परदेशी गोड-ट्रीट होती.
पूर्व आणि पश्चिम संस्कृती मधील फरक. पश्चिमेकडे व्यक्ति स्वातंत्र्याला आणि त्याच्या स्वायत्ततेला जास्त महत्त्व दिले जाते. व्यक्ती हा तेथील विचारांचा मध्यबिंदू आहे आणि व्यक्ती स्वतःच्या इच्छा पूर्ण करून आनंद मिळवू शकतो.
पण पूर्वेच्या संस्कृतीमध्ये एकत्रितपणा महत्त्वाचा आहे. इथे आनंद एकत्रितपणे साजरा केला जातो. एकत्रितपणा हा येथील विचारांचा आणि आनंदाचा मध्यबिंदू आहे.
चॉकलेट = आत्म-भोग
मीठा = सामायिक आनंदाचा विधी
प्रथम कॅडबरीने छोटे आनंद यावर भर दिला. पण त्यात त्यांना यश आले नाही.
म्हणून मग त्यांनी पुढे, मोठे आनंद जे इतरांबरोबर साजरे केले जातात त्यावर भर दिला.
शुभारंभ कॅडबरी डेअरी मिल्क
भारतीय संस्कृतीशी जुळून राहण्याचा प्रयत्न कॅडबरीने सुरु ठेवला.
मीठे में कुछ मीठा हो जाये
जसे मिठाई घरी साठवून ठेवण्याची लोकांना सवय आहे, तशी कॅडबरी ठेवण्याची नव्हती. जेवणानंतर भारतीय लोक काहीतरी गोड खातात. त्यासाठी मीठे में कुछ मीठा हो जाये, ही मोहीम सुरु करण्यात आली.
कॅडबरी डेअरी मिल्क प्रवासाचा सारांश
- लहान मुलांपासून ते मोठ्या माणसातील लहान मुलांपर्यंत
- आधुनिकतावादी पासून ते परंपरावादी पर्यंत
- चॉकलेट पासून ते मीठा पर्यंत
- एकट्यासाठी पासून ते सर्वांसाठी पर्यंत
- अधूनमधून पासून ते सहज पर्यंत ते विधीवादी मीठा पर्यंत
धडा
- वाढीकरिता नवीन ग्राहक शोधा.
- स्थानिक ग्राहकांसाठी उत्पादन न बदलताही वाढ करणे शक्य आहे. उत्पादनाला अशा प्रकारे प्रदर्शित करा की ते स्थानिक लोकांच्या परंपरांशी जोडले जाईल.
- लोकांशी भावनिक जवळीक ठेऊन नेतृत्व करा.
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.