भाग्यवान कसे व्हावे ? चांगल्या संधी शोधण्याच्या १३ टेक्निक

भाग्यवान कसे व्हावे ? हा लेख Max Gunther यांच्या How To Get Lucky ? या पुस्तकावर आधारित आहे.

भाग्यवान कसे व्हावे ?

“जर तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला नशिबाची गरज नाही.”

काय मूर्खपणा आहे.

नक्कीच तुम्हाला नशिबाची गरज असते. तुम्ही कितीही चांगले फुटबॉल खेळाडू असला पण मोठ्या खेळाच्या आधी तुमचा पाय मुरगळला तर तुम्ही आधी केलेली मेहनत, सराव सर्व वाया जाईल.

फक्त चांगले असणे पुरेसे नाही. तुम्हाला भाग्यवान देखील असावे लागते.

चांगले नशीब हा यशाचा मूलभूत घटक आहे, तुमची “यशाची” वैयक्तिक परिभाषा काहीही असली तरी.

दुर्दैव असेल तर मनुष्याची भव्य आणि अत्यंत सावध डिझाईन्सही अपयशी ठरतील, परंतु चांगले नशीब असेल तर मूर्ख उपक्रमही यशस्वी ठरतील.

असा घटक ज्याबद्दल कुणीही बोलत नाही.

नशीब (संज्ञा): तुमच्या जीवनावर प्रभाव पाडणार्‍या, परंतु तुम्ही तयार न केलेल्या घटना.

तुमचा तुमच्या जीवनावर परिपूर्ण ताबा आहे, असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही स्वत:ची चेष्टा करत आहात.

लोक नशीबाची भूमिका का नाकारतात?

आपण यादृच्छिक (Random) घटनेच्या दयेवर अवलंबून आहोत असे आपल्याला वाटत नाही. आपण स्वतःच्या नशिबावर नियंत्रण ठेवतो, या भ्रमात  गुंतून रहाणे आपण पसंत करतो.

जेव्हा मी स्वत:ला सांगतो की “भविष्य मी योजल्याप्रमाणे असेल”, जीवन सुरक्षित वाटते. असे होणार नाही, हे आपल्यालाही माहीत असते. पण चिंतन करण्यास सत्य फार भयावह असते.

आपण नशिबाच्या भूमिकेबद्दल चर्चा करण्यास नकार देण्याचे आणखी एक कारण म्हणजे नशीब आपले महत्त्व कमी करते आणि आपली प्रतिष्ठा चोरुन टाकते. कारण आपण केवळ नशिबामुळे यशस्वी झालो हे कोणालाही सांगणे आवडणार नाही.

कोणत्याही तारकाची जीवनी वाचली तर त्यात नशिबाला किती महत्त्व दिलेले असते ?

कधी कोणता नेता झालेल्या चांगल्या गोष्टींबद्दल नशिबाला धन्यवाद देतो का ?

तुमच्यात कितीही प्रतिभा असली, पण एखाद्या दारुड्या चालकाने तुमचा जीव घेतला तर ?

तुम्ही ज्या कंपनीत काम करता ती दिवाळखोर झाली. यात तुमची काहीही चूक नव्हती; हे फक्त दुर्दैव होते. पण हे तुम्ही तुमच्या बेरोजगारीचे हे कारण लोकांना सांगितले तर लोक तुम्हाला रडका बोलतील. लोकांना तुमच्या बेरोजगारीचे कारण तुमच्यातील काही दोष वाटतील, नशीब नाही.

योजना आणि नशीब यामध्ये कधीही गफलत करू नका.

कॅसिनोला हरविणे शक्य आहे, अशा प्रणाली अस्तित्वात आहेत, या मिथकांना कॅसिनो प्रोत्साहित करतात. ज्यामुळे लोक आणि त्यांचे पैसे कॅसिनोकडे आकर्षित होतात.

नशिब बदलू शकते. नशीब आज मला वर आणत आहे. उद्या ते मला खालीही नेऊ शकते.

दुर्दैवी व्यक्तिमत्त्व, दुर्दैवाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून अपयशाचा दोष स्वतःला देतात.

तुमच्या नशिबावर नियंत्रण ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे त्याचे अस्तित्व स्विकारणे.

लोकांना भेटा, जिथे घटना घडत आहेत तिथे हजर रहा.

भाग्यवान व्यक्ति प्रत्येकाला ओळखतो: श्रीमंत आणि गरीब, प्रसिद्ध नम्र, मिलनसार आणि अगदी मित्रहीन आणि विक्षिप्त लोकांनाही.

लोकांशी संपर्क साधा.

जीवनात जवळजवळ निश्चितपणे पराभूत होण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे मूर्खपणे जोखीम घेणे; आणि दुसरा म्हणजे कोणतीही जोखीम न घेणे.

भाग्यवान कसे व्हावे ?

फ्री pdf शोधणारे पूर्ण पुस्तक क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते. वरील लिंक वरून पुस्तक विकत घ्या.

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.