मनावर ताबा कसा मिळवावा ? हे श्रीमंत होण्यासाठी का आवश्यक आहे ?
हजारो वर्षांपूर्वी जेव्हा मनुष्य जंगलात राहत होता, तेव्हा त्याच्या जीवला फार धोका होता. कोणतीही छोटी गोष्ट त्याचा जीव घेऊ शकत होती. आजू-बाजूला सगळीकडे धोकाच धोका होता. कोणत्याही बाजूने मृत्यू येऊ शकत होता.
झाडात थोडीशी जरी हालचाल झाली, तरी आपल्याला वाटे कि कोणी प्राणी तर हल्ला करणार नाही ना ? प्रत्येक गोष्टीकडे मनुष्य सावधतेने पाहू लागला. प्रश्न जीवन मरणाचा होता. जेव्हा दुसरे प्राणी हल्ला करतात तेव्हा जीवन आणि मरणात १ सेकंदाचा फरक असतो . पळून जाणे आपले शस्त्र उचलणे, प्रतिहल्ला करणे यात आपण जास्त उशीर करू शकत नव्हतो.
त्यामुळे आपल्या मेंदूचा विकास असा झाला कि लगेच प्रतिक्रिया करणे.
आपण जेव्हा नवीन सायकल चालवतो तेव्हा आपण विचार करतो, हँडल कसे पकडू ? पायडल किती मारू ? मी पडतोय का ? पडू नये म्हणून काय करू ? पडतोय तर सायकल सोडून देऊ का ?
असे अनेक प्रश्न मनात येतात, म्हणून सायकल चालवणे कठीण काम होऊन जात. पण सरावाने जेव्हा आपण सायकल चालवतो तेव्हा तर आपण सायकल चालवताना विचार करत नाही. याउलट सायकल चालवताना आपण दुसरेच विचार करतो. जुने संवाद आठवणे किंवा होणाऱ्या संवादाची कल्पना करणे, असे अनेक काम आपण सायकल चालवताना करतो. आपल्या मेंदूला सवय झाली आहे, काही काम विचार न करता करण्याची. आपल अवचेतन मन ( Subconscious Mind) हेे निर्णय घेत, आपल्याला न कळता.
जसे कोणी तुमच्याकडे बॉल फेकला तर लगेच तुमचा हात तो बॉल कुठे जाईल हा अंदाज लावतो आणि पकडतो. पण ह्या सर्व गोष्टी नकळत होतात.
म्हणजे अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपण आपोआप करतो आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण विचार करून करतो.
सध्याचा जगात आपल्या जीवाला येणारे धोके अन्य प्राण्यांमुळे कमी झाले आहेत. म्हणजे अचानक हल्ला होणे, चौकस राहणे या गोष्टींची आता आपल्याला एवढी जास्त आवश्यकता नाही.
आता आपल्याला गरज आहे, विचारपूर्वक वागण्याची.
निवड
काही घटना होणे आणि त्यावर प्रतिक्रिया करणे यांमध्ये एक गोष्ट आहे, निवड.
कोणत्या घटनेला, कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया द्यावी ही निवड आपल्या हातात असते. ज्या माणसाला या गोष्टीची जाणीव आहे, त्याचा त्याच्या मनावर चांगला प्रकारे ताबा राहू शकतो.
म्हणून आपल्याला गरज आहे जाणीवपूर्वक आपल्या विचारांमध्ये बदल घडवून आणण्याची.
प्रकरण क्र. १
तुम्ही हॉटेलमध्ये बसला आहात. थोडा वेळात तुमची महत्त्वाची मीटिंग आहे. वेटरने तुमच्या पांढऱ्या शुभ्र शर्ट वर भाजी सांडवली. तुम्ही रागात त्याच्या कानाखाली लावली.
तुम्ही त्याच्या कानाखाली लावली मग त्यानेही तुमच्या कानाखाली लावली.
तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मिळून त्याची धुलाई केली. इतर वेटरने मिळून तुमची धुलाई केली. महत्त्वाची मीटिंग राहिली बाजूला, पोलिस स्टेशन ची भेट घ्यावी लागली
प्रकरण क्र. २
तुम्ही हॉटेलमध्ये बसलात. आता थोडा वेळात तुमची महत्त्वाची मीटिंग आहे. वेटरने तुमच्या पांढऱ्या शुभ्र शर्ट वर भाजी सांडवली.
तुम्हाला राग आला. पण तुम्हाला माहित आहे, कशी प्रतिक्रिया करावी ? हा निर्णय घेण्याची शक्ती तुमच्याकडे आहे.
तुम्ही फ्लॅशबॅक मध्ये गेले. माझ्याकडून कधी काही सांडलं का ? माझे मुल, आईवडील यांच्याकडून कधी काही सांडलं का ? माझा आदर्श व्यक्ती त्याच्याकडून कधी काही सांडल नसेल का ? हि चूक आहे का मुद्दाम हे केलं ? अशी चूक कोणाकडून पण होऊ शकते का ? तुम्हाला राग येईल. पण वाटेल जाऊ द्या, चूक झाली मी पण करू शकतो. तुम्ही कानाखाली नाही लावणार तर स्माईल करणार आणि बोलणार माझी मीटिंग आहे. पण माझा शर्ट आता खराब झाला.
मॅनेजरने ते पाहिलं आणि विचार केला हा माणूस रागावला नाही. पण याच नुकसान तर झाल आहे. तो दुसऱ्या वेटरला सांगतो, दुसरं शर्ट घेऊन ये. जेवण होईपर्यंत तुम्हाला नवीन शर्ट मिळाल आणि तुम्ही मीटिंगला जाऊ शकले.
हो बरोबर आहे, हॉटेल वाले एवढे चांगले कदाचित वागणार पण नाहीत.
समजा हॉटेलकडून तुम्हाला नवीन शर्ट नाही मिळाला. तरी तुम्ही तुमच्या मित्राला विनंती करू शकता, ” बाबा रे ! तुझा शर्ट दे”. मित्र नसेलच तर मीटिंगला जाताना पटकन दुसरा शर्ट विकत घेतला. शर्ट घ्यायला पैसे नसले तर तुम्ही मीटिंग मध्ये किती संयमाने वागले, हे सिद्ध करू शकता. तुमची मीटिंग शांत मनाने पार होऊ शकते.
सांगण्याचं तात्पर्य इथे हे नाही, की तुम्ही चांगलं वागलात, तर तुमच्याशी चांगलंच होईल. तर इथे सांगण्याचा मुद्दा हा आहे की, ‘ काय होईल हे तुमच्या हातात नाही, पण जे घडलं आहे त्यावर प्रतिक्रिया कशी द्यायची हे मात्र तुमच्या हातात नक्कीच आहे ‘.
तर ही आहे मनावर ताबा असण्याची ताकत. मनावर ताबा असणे म्हणजे जीवनावर ताबा असणे. आपल्या जीवनात काय घडत आहे, यापेक्षा आपण जीवनात कशा प्रकारे प्रतिक्रिया करतो, याने आपण सुखी आहोत कि नाही हे ठरत.
मनावर ताबा असण्याचा श्रीमंत होण्याशी काय संबंध ?
मनावर ताबा असण्याचा तुमच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीशी संबंध आहे.
असे किती वेळा झाले तुम्ही कोणती गोष्ट विकत घेऊन नंतर पश्चाताप केलाय ? मी हे का विकत घेतल ? माझ्या हे काय कामच ?
असा व्यक्ती तुम्ही पाहिलाय जो फोन फक्त बोलण्यासाठी वापरतो. पण फोन त्याने २०,००० चा घेतलाय ?
असा मित्र पाहिलंय जो घ्यायला जातो रुमाल आणि घेऊन येतो शर्ट.
असे लोक पाहिलेत जे विमा काढत नाहीत, पण कपडे मात्र ब्रांडेड वापरतात ?
हे अस का ? ह्या लोकांचा त्यांच्या मनावर ताबा आहे का ?
माझा माझ्या मनावर ताबा आहे का ? असा कोणी आहे का ? ज्याचा स्वतःच्या मनावर पूर्ण ताबा आहे ?
मला नाही वाटत संपूर्णपणे मनावर ताबा राहू शकतो, तसं झालं तर आपली कल्पना शक्तीच संपून जाईल.
पण माझ्यासारखी तुम्हीही एका गोष्टीच निरीक्षण केल आहे का ? मनावर जास्त वेळा ताबा असणारे लोक, हे मनावर कमी वेळा ताबा असणाऱ्यांपेक्षा जास्त यशस्वी, सुखी आहेत ?
तुमचा आदर्श व्यक्ती पहा, त्याचा त्याच्या मनावर ताबा आहे का ?
जर आपला मनावर ताबा नसेल, तर आपण दायित्व विकत घेतो. संपत्ती नाही. दोघांमध्ये काय फरक आहे ? जाणण्यासाठी इथे क्लिक करा.
दायित्व हे आज लगेच सुख देतात.
तुम्हाला कोणी सांगितलं आज तुम्हाला खालील कार देतो.
पण १० वर्ष संयम ठेवला, तर अशा १० कार देतो. तुम्ही काय कराल ? तुमचा मनावर ताबा असेल तर १० कार तुमच्या होऊ शकतात. पण तुम्ही आज जी मिळतेय ती घेऊन खुश होणार ना ?
दायित्व आपल्याला लगेच आनंद देतात. चटपटीत खाणे पाहूनच तोंडाला पाणी येत.
आल ना ?
पण वजन कमी झाल्यावर चांगल्या बॉडी ची तारीफ करायला ६ महिने लागतील.
आपला आपल्या मनावर ताबा असला, तर आपण वेगळ्या गोष्टींची निवड करू हे नक्कीच आहे. दायित्व न घेता संपत्ती ची निवड करावी, म्हणून मनावर ताबा हवा.
ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही, त्या स्वीकारण्याची शांती दे.
ज्या गोष्टी मी बदलू शकतो, त्या बदलण्याच धैर्य दे.
आणि या गोष्टींमधील फरक ओळखण्याच ज्ञान दे.
-Reinhold Niebuhr
इच्छा vs गरजा
आपल्या इच्छा कुठे जन्माला येतात ? मनात.
इच्छा आणि गरजा मधला फरक ओळखणे, आवश्यक आहे. मनावर ताबा असेल तर आपण गरजांवर पैसे खर्च करणार, इच्छांवर नाही. इच्छा काहिही असू शकतात, त्या अमर्याद असतात. पण गरजा नाही. आपण जेव्हा गरजांवर खर्च करतो, तेव्हा आपल्याकडे गुंतवायला पैसे राहतात. गुंतवणूक करणारा, श्रीमंत का होतो ? हे तुम्ही इथे पाहू शकता. जर आपला मनावर ताबा नसेल तर आपण आधी इच्छांवर खर्च करू. अशाने गरजांसाठी आपल्याकडे पैसेच उरणार नाही.
जे लोक महाग मोबईल घेतात, ब्रांडेड कपडे घेतात, महाग गाड्या घेतात. त्यांनी टर्म इन्शुरन्स काढला आहे का ? अशा लोकांचा जर मृत्यू झाला तर ते, मागे काय सोडून जातील ? टर्म इन्शुरन्स इच्छा का गरज ? मोबईल, ब्रांडेड कपडे, महाग गाड्या , इच्छा का गरजा ?
Blueprint
घर तयार करताना आपण आधी नकाशा तयार करतो. मग त्यानुसार आपले घर बांधतो. आधी आपण कोणत्या गावाला जायचे हे ठरवतो, मग कसे जायचे हे.
तसेच आपल्या जीवनाचे आहे. आपण आधी ठरवलं पाहिजे मला जीवनाच्या शेवटी काय हव आहे ? मरण्याच्या आधी मला काय करायचं आहे ? मी काय मिळवेल ? मी काय-काय देऊन जाईल, असा विचार केला पाहिजे.
मग हि झाली आपल्या आयुष्याची Blueprint किंवा आपल्या प्रवासाचा मुक्काम.
आपल्याला कुठे जायचे आहे हे माहित झाले, तर त्यासाठी काय करावे लागेल ? काय नाही हे आपल्याला माहित होईल.
आपल्याला काय हव आहे ? कुठे जायचं आहे ? याचं उत्तर हे फक्त आपलं असलं पाहिजे. दुसऱ्यांच कॉपी केलेलं नको.
सर्व मुल विज्ञान शाखेत चाललेत, मग मी पण विज्ञान शाखेत जातो. सर्वजण इंजिनिर होत आहेत, मग मी पण होतो. सर्व क्रिकेटर होत आहेत, मग मी पण होतो.
सर्व लोक नोकरी शोधात आहेत, मग मी पण शोधतो. सर्व लोक नवीन व्यवसाय चालू करत आहेत, मग मी पण करतो.
तर असं आपल मुक्काम ठरत कामा नये. सर्व गोष्टींचा विचार करूनच हे मुक्काम ठरल पाहिजे. आपल ध्येय, हे जीवनात फक्त आपलच असलं पाहिजे, दुसऱ्याच नाही. ध्येय शोधताना फक्त सुरक्षा हा विचार मनात नसावा. सुरक्षा आणि स्वातंत्र्य अशा दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्य असावा.
तुमचं मुक्काम ठरल कि तुम्हाला कळेल काय करायचं आहे. जसे कि ज्याला वजन कमी करायचं आहे, त्याला चटपटीत जेवावं कि आरोग्यदायक अन्न खावं ? यात निवड करणे सोपे जाते. चांगली नोकरी हवी असणाऱ्याला, क्रिकट कि अभ्यास निवड करणे सोप होत.
अनेक वेळा असं होत की, ‘आपल्याला माहित असतं आपल्याला हेच करायचं आहे,’ तरी आपण का करत नाही ?
माहित आहे, वजन कमी करायचं, तरी चटपटीत खातो. पास व्हायचं, तरी अभ्यास करत नाही. श्रीमंत व्हायचं तरी गुंतवणूक करत नाही.
आपण जे करतो त्यामुळे यश मिळते का नाही ? हा दुसरा भाग. पण काम करणे आवश्यक आहे, हे माहित असूनही आपण ते काम करत नाही . मग मात्र अशा वेळेस आपल्याला वाटतं, आपला आपल्या मनावर ताबा नाही .
अशा वेळेस आपण परत एकदा विचार केला पाहिजे, खरचं मला हि गोष्ट पाहिजे आहे का ? खरचं हेच माझ्या जीवनाच मुक्काम आहे का ? Blueprint हीच आहे का ? आणि तरीही तुम्हाला उत्तर मिळत असेल की, ‘हो, मला जीवनात हेच हवं आहे’. मग होऊ शकत तुमचा मार्ग चुकीचा आहे.
मी माझे उदहरण सांगतो. मला श्रीमंत व्हायचं, हे तर माझं नक्की ठरलं होतं. पण त्यासाठी मी विचार करत होतो की, चांगला अभ्यास करा, चांगली नोकरी मिळेल मग श्रीमंत बनू. पण चांगला अभ्यास करण्याची जेव्हा वेळ येत होती, तेव्हा मी तो फार चांगला करू शकत नव्हतो.
शालेय पुस्तक वाचण्यात जास्त रस येत नव्हता. पण, इतर पुस्तक वाचण्यात वेळ विसरून जात होतो.
अभ्यासक्रमाच्या गोष्टीमध्ये मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकत नव्हते. आपण हे का शिकतोय ? याचे उत्तर देणारे गुरुही मिळत नव्हते. नुसती भोकमपट्टी सुरु होती. हे करा, हे परीक्षेत येईल. ते आवडत ? समजत का ? आणि का करायचं ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. त्यामुळे त्यात मन जास्त रमत नव्हतं.
पण जेव्हा शेयर मार्केट बद्दल अभ्यास करायचो, तेव्हा मजा यायची. वेळ कुठे जायचा कळायचा नाही. मग स्वत:ला विचारलं हे काम आपण जन्मभर करू शकतो का ? काही वर्ष हे काम करून पाहिलं. जेव्हा मनातून वाटू लागलं, आपला जन्म फक्त हेच काम करण्यासाठी झाला आहे, दुसर काहीच नाही. मग दिलं सगळं सोडून आणि यातच आपल आयुष द्यायचा हा निर्णय घेतला.
टिप- मी अजून तरी आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करू शकलो नाही आहे. मी एक प्रवाशी आहे, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी निश्चयी असलेला.
सांगण्याचा मुद्दा हा, कि होऊ शकतं तुमचं लक्ष्य योग्य असेल, पण तुमचा मार्ग चुकीचा असेल. प्रत्येकाचा मार्ग हा त्याचा स्वत:चा मार्ग असतो. आपलं ध्येयं कोणतं ? आणि आपला मार्ग कोणता ? याचं योग्य उत्तर मिळालं की, जीवनात काय करावं ? आणि काय नाही ? याचं उत्तर फार सोपं होऊन जातं. आता माझा, माझ्या मनावर पूर्ण ताबा आहे का ? नक्कीच नाही. आता मला शेयर मार्केट च काम करताना कधीच कंटाळा येत नाही का ? येतो.
मग हे सर्व करूण फायदा काय ? फायदा हा कि याच प्रमाण आता फार कमी झाल आहे. आधी जास्त वेळ स्वत:ला दोष देण्यात जात होता. मला हे करायला पाहिजे, मी हे का करत नाही आहे ? आता त्याच प्रमाण कमी झाल आहे. तो वेळ आता दोष देण्यात नाही तर कामात जातोय. आता असे वाटत नाही की, मनावर ताबा नाही. कारण मनाला आवडत तेच आज माझ काम झाल आहे.
‘ चुका करणे ‘ म्हणजे मनावर ताबा नाही, हे चूक आहे.
आपण मनुष्य आहोत आपण चुका करूच. सर्वच गोष्टी ह्या आपल्या आवाक्यात नसतात. काही गोष्टींबद्दल आपण काही करू शकतो, काहींबद्दल काहीच नाही. आपण आपले लक्ष्य ज्या गोष्टी आपण बदलू शकतो, त्यावर असले पाहिजे.
आपल्या मनावर आपण बऱ्याच प्रमाणात ताबा मिळवू शकतो. आपण जो पर्यंत जिवंत आहोत तो पर्यंत हि लढाई चालूच राहणार. कधी आपली सदबुद्धी जिंकेल तर कधी आपली दुर्बुद्धी .
आपण मनुष्य आहे, यंत्र नाही. मशीन न थकता, एकच काम तास न तास करू शकते न चुकता. आता तर कारखान्यात असे रोबोट आले आहेत जे लाखात एकदा चूक करतात. चुका होतीलच पूर्ण वेळ मनावर ताबा नाही, यामुळे निराश होऊ नका.
आपण आणि मोबईल
आपला मेंदू म्हणजे मोबईल आणि आपल मन म्हणजे सॉफ्टवेयर.
आपल्या मोबईल मध्ये जेव्हा अनेक अँप सुरु असतात तेव्हा काय होत ?
मोबईल हँग होतो. स्लोव होतो. तसच आपल्या मनाच आहे. एकाच वेळेस आपण अनेक काम करत असलो, तर कोणतच काम निट होत नाही. सर्व कामाचा दर्जा खालावत जातो.
आपल्या मोबईला जशी मेमरी असते, तशी ती आपल्या मनाला देखील असते. जास्त गाणे, movie आणि फोटो save केले कि दुसरे काहीतरी delete कराव लागत. तसच आपल्या मनाच आहे. तुम्ही जर अनेक काम एका वेळी करण्याचा प्रयत्न कराल, तर तुमच्या कामाचा दर्जा खालावत जाईल. मराठीत म्हण आहे ना, ‘एक ना धड भराभर चिंध्या. मग यावर उपाय काय ? Clean Master जसे मेमरी Clear करून टाकते. तेच तुम्हाला कराव लागत. जीवनात तुमचा Clean Master आहे, ध्यान करणे.
आपल्या प्रत्येकाकडे २ मन आहेत. एक मन, जे सतत तुमच्या डोक्यात कॉमेंट्री करत असत. जसे कि तुमच्या मनात हे वाचताना सुरु असेल. तुम्हाला काही सांगत असेल. एक दुसर मन असत जे शांतपणे सर्व पाहत असत. सतत बडबड करणाऱ्या मनाला आपल्याला शांत कराव लागत. तेव्हा आपण सखोल विचार करू शकतो. स्वत:ला बदलू शकतो.
मग ह्या बडबड मनाला शांत करायच कसं ? त्याला दुसर काम देऊन. हे भन्ते त्याला Monkey Mind म्हणतात.
या माकडाला व्यस्त त्याला ठेवण्यासाठी ते केळ देतात. केळ म्हणजे, ध्यान करताना श्वासावर लक्ष्य देण्याच काम. मग Monkey Mind श्वासावर लक्ष्य देत. त्यावेळेस तुमच शांत असणार मन, तुमच्या जीवनाबद्दल विचार करू शकत. तुम्हाला जीवनात काय बदल करावे लागतील ? तुमच काय चुकल ? तुम्ही काय सुधार करायला हवा ? तुम्ही इतरांचा दृष्टीकोन समजून घेऊ शकता. कारण बडबड मन (Monkey Mind) आपला वकील असतं. आपणच बरोबर अस ते नेहमी बोलत असत.
व्यस्त नाही उत्पादक
खूप लोक व्यस्त होऊ पाहतात. व्यस्त असणे म्हणजे मोठं होण, अस त्यांना वाटत. पण व्यस्त असताना ते फक्त बडबड मनाला काम करू देतात. आपण मोबईल प्रमाणे अनेक काम करून आपल्या कामाचा दर्जा खालावतो. म्हणून कमी काम करा चांगल काम करा. बडबड मनाला शांत करून जीवनाबद्दल सखोल विचार करा. हा सखोल विचार करताना तुम्ही भविष्यात घडणाऱ्या घटनांची कल्पना तुमच्या डोक्यात आधीच कराल.
समजा तुम्ही मॉल मध्ये जात आहात. तुम्हाला डिस्काउंट चे काय काय प्रलोभन मिळू शकतात, याचा अंदाज तुम्हाला आधीच येईल. माझी आवडती वस्तू थोड्या सूट मध्ये मिळत आहे. पण ती गोष्ट संपत्ती नसून दायित्व आहे.
त्यानुसार तुम्ही कशाप्रकारे प्रतिक्रिया करणार याचीही कल्पना तुम्ही आधीच करू शकता. यामुळे तुम्हाला अशी मदत होते कि, जीवनात भविष्यात ज्या घटना घडू शकतात त्यांचं एक व्हिडीओ तुम्ही आधीच मनात पाहू शकता. त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया करू शकता हे तुम्ही आधीच ठरवू शकता. अशा प्रकारे तुम्ही जीवनात भविष्यात घडणाऱ्या गोष्टींसाठी आधीच तयार राहता. त्यामुळे तुमचे निर्णय हे भावनिक नाही तर तार्किक होतात. म्हणून मनावर ताबा हवा असेल तर, व्यस्त नाही उत्पादक बना.
कोणी उधार मागायला आले तर तुम्ही कशाप्रकारे उत्तर द्याल ? कोणी तुम्हाला गुंतवणुकीची चांगली संधी देली तर तुम्ही कशी प्रतिक्रिया द्याल ? काय घेतल पाहिजे ? काय नाही ? आपण कोणत काम केल पाहिजे कोणत नाही ? ह्या सर्व गोष्ठी आपण आधीच ठरवू शकतो. त्यामुळे आपण भावनिक निर्णय न घेता तार्किक निर्णय घेतो.
पुनरावृत्ती
ज्या चांगल्या सवयी तुम्हाला लावून घायच्या आहेत, त्या तुम्ही सतत स्वत:ला छोट्या आणि सोप्या शब्दात सांगत राहा. अशा प्रकारे तुम्ही त्या गोष्टींवर विश्वास ठेवाल आणि तसे करत रहाल.
खोटं सोप करा, ते वारंवार बोलत राहा. अंततः लोक त्यावर विश्वास ठेवतीलच.
-हिटलर
जर हे खोट्या गोष्टीच्या बद्तीत घडू शकत मग खऱ्या का नाही ?
जर तर चा वापर करा.
जर मला चटपटीत खाऊ वाटलं तर मी माझ्या पोटाकडे पाहिलं.
जर मला दायित्व घेऊ वाटले तर मी माझे आर्थिक लक्ष्य काय ? यांचा विचार करेल.
अशा छोट्या आणि सोप्या वाक्यांची यादी करा आणि त्यांची पुनरावृत्ती करा. आधीच काय करायचं ठरवलं असल्यामुळे आपण अशा प्रकारे भावनिक निर्णय टाळू शकतो. त्या भावनांना आपण दुसऱ्या चांगल्या भावनांकडे वळवतो.
तुमच्या भावनांवर ताबा नाही, तर त्या तुमच्यावर ठेवतील
-चीनी म्हण
जर तुम्ही तुमच्या भावनांवर ताबा ठेऊ शकत नाही, तर तुम्ही तुमच्या पैशावर ताबा ठेऊ शकणार नाही.
-Warren Buffet
इतर लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा
हा लेख लिहताना मला खालील पुस्तकांचा उपयोग झाला.
तुम्ही देखील हे पुस्तक वाचू शकता.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या चला संपत्ती निर्माण करूया
खूप छान लेख होता खूप अनुभव देऊन गेला तुम्ही दिलेली उदाहरणे खूप सोपी पण खूप बोलकी होती Best lk next blogs