मारवाडी – भारतीय व्यवसायाची कथा, हा लेख Thomas A. Timberg यांच्या The Marwaris या पुस्तकावर आधारित आहे. जगतशेठ ते बिर्लापर्यंतच्या भारतीय व्यवसायाची कथा.
मारवाडी – भारतीय व्यवसायाची कथा
यशस्वी व्यापाऱ्याला पाहून नेहमीच लोकांना हेवा वाटतो. यात काही आश्चर्य नाही की मारवाडींना तीव्र नाराजी आणि रागाला सामोरे जावे लागले. विशेषत: बंगालमध्ये जिथे त्यांनी मोठे यश मिळवले.
बंगालमध्ये १९७० साली, जेव्हा नक्षलवादी बंडखोरी सुरू होती. तेथे दोन भाडेकरू राहत होते, एक मारवाडी आणि एक बंगाली. मारवाडी हा बीकानेरचा एक विमा विक्रेता होता, जोमदार, उत्साही आणि उंच स्वराचा. त्याच्या उल्हसित वृत्तीने चिडलेला बंगाली भाडेकरू त्याच्यावर ओरडला.
‘मारवाड्यांनो, एक दिवस नक्षलवादी तुम्हाला नक्कीच पकडतील!’.
त्यावर मारवाडी शांतपणे उत्तरला, ‘नक्षलवादी तसे करण्यापूर्वी आम्ही त्यांना सामील होऊ.’
हे उत्तर, मारवाडी आणि जवळजवळ सर्वच व्यावसायिक समुदायांचे लवचिक स्वरूप दाखवतं. परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता आणि मनाची लवचिकता ही त्यांच्या यशासाठी जबाबदार असणारी वैशिष्ट्ये आहेत.
फोर्ब्सच्या २०११ च्या भारतीय अब्जाधीशांच्या यादीत ६७ टक्के लोक, पारंपारिक व्यापारी समुदायाचे होते.
व्यवसाय जगत जोखीम घेणाऱ्यांना पुरस्कृत करते.
‘तुम्हाला मारवाड्याशी स्पर्धा करायची नसते!’ हे बाजाराचे शहाणपण आहे.
रामकृष्ण दालमिया यांचे बालपण गरिबीत गेले. वडिलांचे निधन झाले तेव्हा दालमिया बावीस वर्षांचे होते. दरमहा १३₹ रुपयात भाड्याने घेतलेल्या एका खोलीत त्यांची आई, आजी, तीन बहिणी, ते आणि त्यांची पत्नी राहत होते.
दालमिया तरूण आणि साहसी होते. त्यांना लवकर श्रीमंत व्हायचे होते. दालमिया यांनी चांदी मध्ये व्यापार केला होता. त्यात त्यांना नुकसान झाले. ते कर्जबाजारी झाले.
त्यांना लंडन वरून टेलिग्राम आला की चांदीच्या किंमती आता वाढणार आहेत. तेव्हा त्यांनी मित्रांना गुंतवणूक करण्याचे सांगितले. पण लोक त्यांच्यावर हसले. मग ते एका श्रीमंत ज्योतिष्याकडे गेले. त्या ज्योतिष्याने भविष्यवाणी केली होती की दालमिया एक दिवस श्रीमंत व्यक्ती होतील. त्यांनी त्या ज्योतिष्याला चांदी मध्ये गुंतवणूक करण्यास पटविले. पुढे त्यांना त्यात नफा झाला.
पुढे रामकृष्ण दालमिया यांनी त्यांच्या पत्नीचा एकमेव दागिना चोरला आणि २००₹ मिळविले आणि चांदी मध्ये गुंतवणूक केली. त्यांचे पैसे १५ पट वाढले. दालमियांच्या आईंना दागिने चोरीबद्दल जेव्हा कळले तेव्हा त्यांनी ते दागिने परत सोडवून आणण्यास सांगितले.
बाजारात नशीब मोठी भूमिका बजावते. दालमिया एक जुगारी वाटत होते.
विश्वास
मारवाडी आणि बनियांच्या विश्वात विश्वासाला शब्द आहे साख. साख हा सन्मानाशी जोडलेला आहे. साख व्यापाऱ्याच्या स्थितीचे महत्त्वपूर्ण सूचक आहे. साख पत आणि व्यवसायाच्या अखंडतेच्या केंद्रस्थानी आहे. साख याचा अर्थ संपत्ती आणि आर्थिक सामर्थ्यापेक्षा बरेच काही आहे.
जवाबदऱ्यांचा आदर करणे, गरजूंसाठी उदार असणे आणि परोपकारी दृष्टिकोन ठेवणे असे जीवन जगून साख मिळविल्या जाते.
तुम्ही यशस्वी होऊ इच्छित असल्यास लोकांवर विश्वास ठेवा.
G.D. Birla
साखचे दिसणारे स्वरूप म्हणजे हुंडी. हुंडी हे चेक सारखे होते. त्यामुळे दुर्गम खेड्यातील व्यापारीही विश्वासार्हतेच्या आधारे मोठ्या प्रमाणात पैसे पाठवू किंवा मिळवू शकत होता.
रोख मध्ये व्यवहार करण्याऐवजी मारवाडी हुंडी मध्ये व्यवहार करत. हुंडीमुळे, मारवाडी त्याच्या गावातल्या एजंटकडून पैसे घेऊ शकत होता आणि तिथे पैसे जमाही करू शकत होता. हुंडीमुळे नगदी इकडची तिकडे न नेताही व्यवहार करणे शक्य झाले.
जो व्यावसायिक त्याच्या ग्राहकांशी, पुरवठादारांशी व कर्मचार्यांशी प्रामाणिकपणे वागतो त्याचावर बाजाराचा विश्वास बसतो. यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढते.
‘मालकाच्या पायाचा ठसा हे उत्तम खत असतं’.
गद्दी म्हणजे अक्षरशः एक मोठी गादी असते. त्याला चांदणीने (पांढरा कपड्याने) झाकलेले असते. जेथे सेठ किंवा व्यापारी आपल्या दैनंदिन पूजेनंतर सकाळी बसतात. त्यांच्या बाजूला त्याचा मुनीम, जमाखर्च ठेवणारा आणि विश्वासू सल्लागार बसलेला असतो.
तुमच्या कुटुंबाकडे शंभरहून अधिक वर्षे पैसा असतो, तेव्हा अधिक पैसा कमावण्याची भूक कमी होते. जेव्हा अनुभवी आणि विश्वासू मुनिम्स स्वतंत्रपणे आणि यशस्वीरित्या व्यवसाय करतात तेव्हा समजूतदारपणाची गोष्ट म्हणजे त्यांना नियुक्त करणे आणि त्यांना एकटे सोडणे.
पण पुढे काही मारवाड्यांनी भव्य बंगले विकत घेतले. ते बंगाली जमींदारांसारखे वागायला लागले तेव्हा ते विसरले की ‘मालकाच्या पायाचा ठसा हे उत्तम खत असतं’. त्यांनी त्यांच्या कारभाराकडे दुर्लक्ष केले आणि त्यांचा व्यवसायचा हळूहळू अंत झाला.
मारवाडी कोण आहेत आणि त्यांचा ऐतिहासिक वारसा काय आहे?
मरुदेश (मारवार), पश्चिम राजस्थानमधील कोरडे व वाळवंटी क्षेत्र. सामान्यत: या भागातून येणाऱ्या पारंपारिक व्यापाऱ्यांना ‘मारवाडी’ म्हणून संबोधल्या जाते.
आज भारतातील मोठे कौटुंबिक व्यवसाय हे मारवाडी, पारशी आणि गुजराती अशा पारंपारिक व्यावसायिक कुटुंबातून आले आहेत. हे ‘समुदाय’ मुस्लिम, ख्रिश्चन किंवा झोरोस्ट्रियन लोकांप्रमाणेच हिंदू जाती व्यवस्थेचे तंतोतंत पालन करत नाहीत. त्याऐवजी हे व्यावसायिक समुदाय एकाच प्रदेशातून येणारे आणि व्यापारात पारंपारिक सहभाग असलेल्या जातींचे गट आहेत. त्यांची नावे विशेषतः भौगोलिक किंवा काही प्रकरणांमध्ये भाषिक मूळ दर्शवितात (उदाहरणार्थ गुजराती, पंजाबी, मारवाडी, सिंधी).
‘आमचा जन्म व्यावसायिकांच्या कुटुंबात झाला आणि पैसा आमच्या रक्तात होता, ज्याप्रमाणे पराक्रम हा राजपूत, मराठा, गुरखा, शीख किंवा जाट यांच्या रक्तात असतो.’
K.K. Birla
मारवाडी नसलेले इतर प्रमुख व्यावसायिक समुदाय गुजराती आणि पंजाबी आहेत.
मारवाड्यांच्या एक गट पूर्वेकडे मुघलांच्या संगतीने गेला आणि त्यांनी बंगालमध्ये गंगा-जमुना खोऱ्यात व्यापार मुख्यालय स्थापन केले.
फतेहपूर, झुंझुनू आणि सिंघाना या शेखावती शहरांवर अठराव्या शतकापर्यंत कैमखानी नवाब (इस्लाम धर्म स्वीकारलेले राजपूत) यांनी राज्य केले. याच कारणास्तव बर्याच मारवाडय़ांना ‘झुंझुनवाला’ आणि ‘सिंघानिया’ ही नावे आहेत.
फॅमिली फर्म
मोठा व्यवसाय गट चालवणारी बिर्लाची ही सातवी पिढी आहे.
जवाबदारी द्या, पण निरीक्षण करा.
यशस्वी उद्योजकांनी जवाबदारी कशी द्यावी हे शिकले पाहिजे.
मारवाडी लोकांबद्दल अजून शिकायचे असेल तर हे पुस्तक आताच खालील दिलेल्या लिंक वरून विकत घ्या.
मारवाडी – भारतीय व्यवसायाची कथा
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.