लहान व्यवसाय जाहिरात मॅन्युअल The Unfair Advantage : Small Business Advertising Manual By Claude Whitacre. ह्या पुस्तकात तुमच्या रिटेल किंवा सेवा व्यवसायामध्ये वृत्तपत्रे, डायरेक्ट मेल, रेडिओ, केबल टीव्ही, यलो पेजेस आणि इतर वापरून अभूतपूर्व नफा कसा मिळवावा, हे सांगितले आहे.
लहान व्यवसाय जाहिरात मॅन्युअल
या पुस्तकाचा फायदा कोणाला होईल?
उद्योजक. स्वयंरोजगार करणारे यांना या पुस्तकातून सर्वाधिक फायदा मिळेल.
कळप
लोकांचा समूह ज्याला तुम्ही आवडता, जे तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि नियमितपणे तुम्हाला पैसे देतात. तुमचा कळप.
संपत्तीचे रहस्य आहे तुमचा समूह तयार करा, आणि नंतर त्या समूहाला विक्री करा. तुमचा कळप तुमचा आधारस्तंभ आहे, जो महागडे उत्पादन विकत घेतो.
आधी आम्ही फक्त विक्रीसाठी जाहिरात करायचो. आता आम्ही ग्राहक मिळविण्यासाठी जाहिरात करतो. विक्री फक्त एक घटना आहे. एखादा ग्राहक जो तुमच्या कळपाचा भाग बनतो, तो वारंवार खरेदी करेल. कारण तुम्ही त्यांना चांगली वागणूक द्याल आणि वारंवार खरेदी करण्याची त्यांना आठवण द्याल. तुम्ही त्यांना तुमच्याकडून खरेदी करण्याचे कारण देता.
नफा पहिल्या विक्रीमध्ये नाही. नफा सोन्याची खाण खोदण्यात आहे, तुमच्या ग्राहकांच्या यादीतून पुन्हा पुन्हा.
जर तुम्ही खरे मूल्य दिले तरच तुमच्या कळपाचे विपणन (मार्केटिंग) कार्य करते. जर तुम्ही असे उत्पादन दिले जे तुमच्या ग्राहकांच्या कामाचे नाही, तर ते खरेदी करणार नाहीत. त्यांना तुमच्या सल्ल्यावर विश्वास नसेल तर ते पुन्हा खरेदी करणार नाहीत.
“तुमचे ग्राहकांसोबत असलेल्या संबंधात मूल्य असते.”
हेडलाईन
तुमच्या कंपनीचे नाव हेडलाइन नाही.
जर तुमच्या स्टोअरचे नाव तुमच्या जाहिरातीच्या शीर्षस्थानी असेल तर तुमच्याकडे कोणतेही शीर्षक (हेडलाइन) नाही.
नावामुळे कोणतीही आवड निर्माण होत नाही. नावामुळे कोणतीही मागणी तयार होत नाही. शीर्षकाने वाचकाचे लक्ष वेधून घेणे आणि त्वरित स्वारस्य निर्माण करणे आवश्यक आहे. नाहीतर वाचक जाहिरात वाचणार नाहीत. घोषणा ह्या हेडलाइन नसतात. वाचकाला तुमची हेडलाईन वाचण्यात रस नाही आला, तर त्याला तुमची जाहिरात वाचण्यात रस येणार नाही.
कधी नवरा बायकोला बोलतो का ? “प्रिये ह्या स्टोअरची जाहिरात पहा. चल आत काय आहे ते पाहण्यासाठी जाऊया”.
विशिष्ट उत्पादनांची जाहिरात करा आणि त्या उत्पादनाची इच्छा वाढवा. ह्याने लोक तुमच्या दुकानात येतील.
ग्राहकाला आकर्षक ऑफर दिल्याने विक्री होते.
जाहिरातीचे बजेट
एखादी जाहिरात त्याच्या किंमतीपेक्षा दुप्पट उत्पन्न देत असल्यास आपण पुढे काय करावे? आणखी चालवा. जर जाहिरात नफा देत नसेल तर ती चालविणे बंद करा.
जे मोजल्या जाते, ते सुधारल्या जाते.
जर तुमच्या जाहिरातीमधून नफा येत असेल तर बजेट काय आहे याचा काय फरक पडतो ?
जर तुमच्या जाहिरातीमधून नफा होत नसेल तर बजेट काय आहे याचा काय फरक पडतो ?
जाहिरात करणे हा खर्च नाही. परतावा देणारी गुंतवणूक आहे.
गोंडस जाहिरात असल्याने उत्पादनाची इच्छा निर्माण होत नाही. जाहिरातीमध्ये तुम्ही कुत्र्याचे पिल्लू टाकले तर लोकांना कदाचित तुमचे पिल्लू गोंडस वाटेल, परंतु यामुळे त्यांना खरेदी करण्याची इच्छा निर्माण होणार नाही.
ग्राफिक डिझाइन तुमच्या उत्पादनाची इच्छा निर्माण करीत नाही. ते आताच खरेदी करण्याची कोणतीही मागणी किंवा निकड निर्माण करत नाहीत. तुमची ऑफर ते करते.
प्रतिस्पर्ध्याचा उल्लेख
तुमच्या जाहिरातींमधे प्रतिस्पर्ध्याचा उल्लेख कधीही करु नका. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याबद्दल काही वाईट बोलले तर तुम्ही तुमचे पैसे वाया घालवले समजा, कारण कोणालाही त्याची पर्वा नसते. तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या उत्पादनास वाईट सिद्ध केल्याने, तुमचे उत्पादन खरेदी करण्याची इच्छा निर्माण होत नाही. इतर कोणत्याही प्रकारे प्रतिस्पर्ध्याचा उल्लेख करणे ही स्पर्धकासाठी विनामूल्य जाहिरात आहे. मूर्खा, ग्राहकांना पर्याय उपलब्ध आहे याची जाणीव, तु त्यांना का करून देणार ?
फक्त कमी किमतीची जाहिरात करणे
फक्त २०% लोक किंमतीवर निर्णय घेतात. मार्केटच्या २०% ग्राहकांसाठी जिथे नफा कमीत कमी आहे, तुम्ही प्रत्येकाशी स्पर्धा करू इच्छिता का ? अनन्यता (exclusivity) , गुणवत्ता, वितरणाची गती, विक्रीनंतरची सेवा,कमी किंमत सोडून कशाचीही जाहिरात करा.
बातमीपत्र
वृत्तपत्र जाहिराती जलद मरतात.
लोक जुनी वर्तमानपत्रे पाहत नाहीत आणि नंतर जाहिराती वाचत नाहीत. जर तो दररोजचा पेपर असेल तर दुसर्या दिवशी तुमची जाहिरात संपली समजा.
तुमची वृत्तपत्र जाहिरात किती फायदेशीर आहे कसे कळणार ?
एकतर जाहिरातीमध्ये नेहमीपेक्षा वेगळा नंबर द्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की कॉल जाहिरातीमुळे आला आहे. किंवा जाहिरातीमध्ये लिहा ‘सागर’ ला संपर्क करा, मग जे पण कॉल सागर साठी येतील ते जाहिरात पाहून आले आहेत समजा.
मोफत जाहिरात
प्रत्येक नवीन व्यवसायाला वृत्तपत्रात एक विनामूल्य फोटो आणि लेख मिळतो. शहरात एक नवीन व्यवसाय सुरू होतोय म्हणजे ही बातमी आहे. वृत्तपत्रांना बोलवा. वृत्तपत्रांना बातमी सामग्रीची भूक असते. त्यांना दररोज संपूर्ण वृत्तपत्रात काहीतरी भरायचे असते.
एक लेख लिहा. लेख विनामूल्य जाहिराती असतात. सशुल्क जाहिरातींपेक्षा ते अधिक विश्वासार्ह असतात. लेखात माहितीत्मक मूल्य असणे आवश्यक आहे. “आमच्याकडे विक्री आहे” ही बातमी नाही. “घरातील वायू प्रदूषणाशी लढण्याचे ५ मार्ग” हा एक लेख आहे.
Classified जाहिराती
क्लासिफाइड्समध्ये मोठ्या जाहिरात टाकू नका. वाचकवर्गाचा केवळ एक छोटा भाग Classified वाचतो. पण Classified लोक खरेदीदार असतात. वापरलेली किंवा पुनर्निर्मित वस्तूंची विक्री येथे चांगल्या प्रकारे होते.
रेडिओ
रेडिओवर विक्री करणे फोनवर विक्री करण्यासारखे आहे.
जर तुम्ही फोनद्वारे विक्री करीत असाल तर तुम्ही गाणे गाल का? विनोद सांगाल? नाही. तुम्ही तुमचे उत्पादन शक्य तितक्या आकर्षक मार्गाने सादर कराल.
तुम्हाला रेडिओवर “करमणूक” करावी लागेल, अशा विचारांच्या जाळ्यात अडकू नका. तुम्हाला तसे करायची गरज नाही. एका उत्पादनाची इच्छा निर्माण करा आणि लोकांना तुमच्या दुकानावर बोलवा. शक्य असल्यास रेडिओवरील प्रसिद्ध व्यक्तीचा वापर करा, कारण त्यांचा एक चाहता वर्ग असतो.
तुमच्या स्टोअरची जाहिरात करू नका! फक्त एक उत्तम ऑफर द्या.
तुमच्या उत्पादनाची इच्छा निर्माण करा. त्यामुळे लोक खरेदी करतील.
“रॉक संगीत वाजविणार्या रेडिओ स्टेशनवर, सेवानिवृत्तीच्या योजनांची जाहिरात करू नका.” तुमचे ग्राहक जेथे आहेत तेथे तुम्हाला जाहिरात करावी लागेल.
केबल टीव्ही
तुम्ही उत्पादन प्रदर्शित करू शकत असल्यास केबल टीव्ही उपयुक्त आहे.
मनोरंजन विक्री नाही. विनोद सांगणे, हुशार दिसणे किंवा जिंगल्स गाणे, याने विक्री होत नाही. जोरदार आवाहन करणे, विक्री आहे!
तुमच्याशिवाय कोणालाही तुमच्या स्टोअरशी घेणं देणं नाही. कोणालाही तुमच्या स्टोअरला भेट द्यायची नसते. तुम्ही त्यांना पुरेसे चांगले कारण दिल्यास कदाचित तुमच्या स्टोअरमध्ये काय आहे, हे त्यांना जाणून घ्यायचे असते.
Your UBA
(Unique Buying Advantage) (तुमच्यापासून विकत घेण्याचा अनोखा फायदा)
“ तुम्ही काय करता?” या प्रश्नाचे तुमच्याकडे एक साधे, लहान उत्तर असावे.
“मी तुमच्याकडून खरेदी का करावे?” याचे उत्तर असे काहीतरी असावे की तुमच्या व्यवसायातील इतर कोणीही ते कधीच बोलणार नाही.
एक उदाहरण. “आम्ही 24 तासांत व्हॅक्यूम क्लीनर दुरुस्त करतो – नाहीतर फ्री.”
“ताजा, गरम पिझ्झा ३० मिनिटांत किंवा फ्री”
शब्द जे विकतात
फ्री
नवीन
आश्चर्यकारक
यश
सुधारित
अंतिम संधी
मर्यादित
संधी
पहिल्यांदा
घोषणा
आत्ताच
क्रांतिकारी
बचत
Guarantee
Discount
बोनस
स्पेशल
गिफ्ट
चमत्कारी
सुलभ
त्वरीत
आज
कसे करावे
यापूर्वी कधीही नाही
अनोखे
सत्य
शोध
लगेच
महत्वपूर्ण
हे शब्द कसे वापरायचे याचे उदाहरण पुस्तकात दिले आहे.
लहान व्यवसाय जाहिरात मॅन्युअल
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.
2 thoughts on “लहान व्यवसाय जाहिरात मॅन्युअल”