लाईफ ऍट लाईफ हाय – शेयर मार्केट उच्चांकावर असताना तज्ञांचे मत

लाईफ ऍट लाईफ हाय – शेयर मार्केट उच्चांकावर असताना तज्ञांचे मत

रामदेव अग्रवाल – Motilal Oswal

अनेक लोक मार्केट खाली येण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे होऊ शकते की मार्केट आता खाली येणार नाही. पण मार्केट हे खाली जातच असते आणि गेले तर सध्या ते जास्त वेळ खाली राहण्याची अपेक्षा नाही. बाजारात धोका हा कुठूनही येऊ शकतो. १० % मार्केट कधीही खाली जाईल हा विचार करून गुंतवणूक करावी. तज्ञ लोक तर मार्केट २०% खाली जाऊ शकते ही अपेक्षा करून गुंतवणूक करतात. GST मुळे लहान कंपनींना समस्या येतील. दीर्घकालीन गुंतवणूक असेल तर प्रॉफिट बुक (profit book)* करू नका. कोणीच भविष्यवाणी करू शकत नाही की मार्केट कुठे जाईल. हा उच्चांक मागील ६० वर्षासाठी होता, पुढील ६० वर्षात दुसरा उच्चांक असेल.

*Profit book करणे म्हणजे ज्या शेयर मध्ये नफा झाला आहे ते पूर्ण वा थोडे विकणे.

नवनीत मुनोत – sbimf

मार्केट मध्ये नेहमी सावधान राहून गुंतवणूक करा. बंद डोळ्याने कधीच मार्केट मध्ये गुंतवणूक करू नका. मार्केट रोजच वर जाणार नाही. ३०००-२१००० होताना मार्केट अनेक वेळा १०% खाली आलेले आहे. २००८ मध्ये तर ते ६०% खाली आलेले आहे. १०% मार्केट कधीही खाली जाऊ शकते. खाली गेल्यावर मार्केट मध्ये पैसा लावला पाहिजे. उत्तर प्रदेश राज्य ब्राझील एवढे आहे. उत्तर प्रदेशात भारताच्या इतर राजाच्या तुलनेत कमी प्रगती झाली आहे. तिथे वाढीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

रिधम देसाई – Morgan Stanley

मार्केट वाढीच ६०-७० % कारण जागतिक आहे. ४०-३०% कारण भारतीय आहे. ९० लाख व्यवसाय gst मध्ये येणार आहेत. २५ दिवसात gst येत आहे. पण ५०% व्यवसाय त्यासाठी तयार नाहीत. ९० % व्यवसायांना gst बद्दल प्रशिक्षण हवं आहे. पुढील ३-४ महिन्यात gst मुळे अस्थिरता येऊ शकते. साधारण गुंतवणूकदाराने दरमहा थोडी-थोडी गुंतवणूक करावी. सध्याच्या परिस्थितीमध्ये ६०% खर्च हा खाण्या-पिण्यावर होतो. जेवणावर होणारा हा खर्च आता जास्त वाढणार नाही, कारण आपण ठराविक प्रमाणातच खाऊ शकतो. भविष्यात होणारी उत्पन्नात वाढ ही इतर क्षेत्रात खर्च केली जाईल. इन्शुरन्स, nps, pf माध्यमातून मार्केट मध्ये गुंतवणूक वाढेल.

इतर लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.