वॉरेन बफेटची रत्ने. व्यवहारज्ञान आणि शहाणपण.

वॉरेन बफेटची रत्ने हा लेख Mark Gavagan यांच्या Gems From Warren Buffett या पुस्तकावर आधारित आहे. ३४ वर्षे शेअरधारकांना वॉरेन बफेट यांनी लिहलेल्या पत्रांमधील व्यवहारज्ञान आणि शहाणपण.

वॉरेन बफेटची रत्ने

प्रामाणिकपणा, पारदर्शकता, जबाबदारी आणि अकाउंटिंग

चांगले हेतू हे परिणामांच्या कसोटीवर वेळोवेळी तपासले पाहिजे.

-1983 letter

“व्यवस्थापक जे नेहमीच ‘आकडे मिळवण्याचे’ वचन देतात त्यांना कधीकधी आकडे बनवण्याचा मोह होईल.”

-2002 letter

माझ्या चुका

नोहाचे तत्व :- पावसाचे अंदाज लावून फरक पडत नाही, जहाज बनविण्याने पडतो.

-1981 letter

अब्राहमिक धर्मामध्ये अशी मान्यता आहे की जेव्हा जग बुडणार होते, तेव्हा नोहा यांनी जहाज बांधले आणि त्या जहाजावर सर्व प्रजातींची एक-एक जोडी नेली होती. या कथेचा संदर्भ देत वॉरेन बफे म्हणत आहेत की फक्त पावसाचा अंदाज लावणे पुरेसे नाही जहाज बांधणे आवश्यक आहे.

स्मार्ट व्यवसाय

“त्यांच्या व्यवसायाची संभावना कितीही आकर्षक असो. एखाद्या वाईट व्यक्तीशी चांगला व्यवहार करण्यात आम्ही कधीही यशस्वी झालो नाही. ”

-1989 letter

अधिग्रहण आणि गुंतवणूक

“मोठ्या संधी क्वचितच येतात. जेव्हा सोन्याचा पाऊस पडतो, तेव्हा थिंबल नव्हे तर बादली लावा.”

-2009 letter

Thimble(थिंबल)- कपडे शिवताना सुई कपड्यात ढकलण्यासाठी आणि बोटांचे रक्षण करण्यासाठी छोटी धातु किंवा प्लास्टिकची टोपी.

शेअर निवडताना आम्ही आमचे लक्ष आकर्षक विक्रीपेक्षा आकर्षक खरेदीकडे देतो.”

-1985 letter

बँकर्स, दलाल, सल्लागार आणि इतर “मदतनीस”

सुरवातीला शहाणा माणूस जे करतो, मूर्ख माणूस ते शेवटी करतो.

-1989 letter

बाजार शक्ती: भीती, लोभ, जोखीम आणि बक्षीस

भीती आणि लोभ, कायमच गुंतवणूक समुदायात येतील. जेव्हा इतर लोभी असतात तेव्हा आम्ही भिण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा इतर घाबरतात तेव्हा आम्ही लोभी होण्याचा.

-1986 letter

पुढील महिन्यात किंवा पुढच्या वर्षी स्टॉक मार्केट काय करणार आहे याचा अंदाज लावण्याचा आम्ही कधीही प्रयत्न केला नाही.

-1999 letter

अतिरिक्त नफ्याच्या संधीसाठी मी एका रात्रीच्या झोपेचा देखील सौदा करणार नाही.

-2008 letter

सरकार

आम्ही नशीबवान आहोत की सरकारला आम्ही मोठे चेक देतो नियमितपणे सरकारकडून अपंग किंवा बेरोजगार असण्यासाठी चेक घेण्यापेक्षा हे चांगले आहे.

-1998 letter

अवर्गीकृत

“कितीही हुशार किंवा मेहनती असो, काही गोष्टींना वेळ लागतोच: तुम्ही नऊ स्त्रिया गरोदर करून एका महिन्यात बाळाला जन्म देऊ शकत नाही.”

-1985 letter

“जेव्हा तुम्ही स्वतःला खड्ड्यात पाहता तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खड्डा खोदणे थांबविणे.”

-1990 letter

“जेव्हा लाट जाते तेव्हाच कळते कोण नागडे पोहत होते.”

-1992 letter

“तुम्ही चुकीच्या मार्गावर असाल तर धावण्याचा काही उपयोग नाही.”

-1993 letter

जर तुम्हाला दागदागिने समजत नसतील तर ज्वेलरला जाणून घ्या.

-1988 letter

आर्थिक संकटे ‘घटस्फोटापेक्षा’ वाईट असतात. तुम्ही तुमची अर्धी संपत्ती गमावता – आणि तुमची पत्नी अजूनही तुमच्याच सोबत असते.

-2010 letter

वार्षिक भागधारकांची बैठक

जो कोणी म्हणतो पैसा आनंद खरेदी करू शकत नाही, तो कोठे खरेदी करावी हे शिकलेला नाही.

-2008 letter

वॉरेन बफेट यांच्याकडून अजून भरपूर काही शिकायचे असेल तर आताच हे पुस्तक खाली दिलेल्या लिंक वरून विकत घ्या.

फ्री pdf शोधणारे पूर्ण पुस्तक क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते. वरील लिंक वरून पुस्तक विकत घ्या.

वॉरेन बफेट बद्दल अधिक माहिती साठी हा लेख वाचा.

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.