आनंदाची गुरुकिल्ली – जगातील सर्वात आनंदी लोकांकडून शिका.

आनंदाची गुरुकिल्ली हा लेख The Key To Happiness By Meik Wiking या पुस्तकावर आधारित आहे.

आनंदाची गुरुकिल्ली

डेन्मार्क जगातील सर्वात आनंदी देश.

चार वर्ष अगोदर डेन्मार्कमध्ये जेव्हा ट्रेन पाच मिनिटे उशिरा आली तेव्हा प्रवाशांना प्रधानमंत्री कडून माफीचे पत्र मिळाले आणि भरपाई म्हणून एक डिझायनर खुर्ची त्यांच्या आवडीची.

डेन्मार्कमध्ये विनामूल्य आरोग्य सेवा आहे. डेन्मार्कमध्ये पालक कॅफेच्या बाहेर आपल्या मुलांना बाबागाडीत सोडून जाऊ शकतात. डेन्मार्कमध्ये पालकांची कमाई कितीही असली तरी मुलं विद्यापीठात जाऊ शकतात. डेन्मार्कमध्ये लहान मुली प्रधानमंत्री बनण्याचे स्वप्न पाहू शकतात.

याचा अर्थ डेन्मार्क परिपूर्ण समाज आहे का ? नाही. तर लेखकाला असे म्हणायचे आहे की डेन्मार्क आपल्या नागरिकांना तुलनेने उच्च दर्जाची जीवनशैली आणि आनंद उपभोगण्यासाठी चांगल्या परिस्थिती पुरवतो.

आनंदाची गुरुकिल्ली

आनंद कसा मोजावा ?

आपल्याला असे वाटते पैसा म्हणजे आनंद. पण आनंदासाठी पैसा महत्त्वाचा जरी असला तरी सर्व काही नसतो. आनंदाचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो. म्हणून लेखक तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल काय वाटते ? ह्याचा अभ्यास करतो.

सर्वसाधारणपणे ग्रामीण भागात राहणारे लोक मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक आनंदी असतात आणि कदाचित हे खरे आहे की लोक ग्रामीण भागात गेले तर त्यांचा आनंद वाढतो.

कदाचित मोठ्या शहरांमध्ये राहणारे लोक मोठ्या शहरामुळे नव्हे तर ते कशा प्रकारचे व्यक्ती आहेत, यामुळे कमी आनंदी असतात. कदाचित मोठ्या शहरांकडे आकर्षित होणारे लोक महत्वाकांक्षी असतात. महत्वाकांक्षी असण्याचा नकारात्मक अर्थ असा आहे की तुम्ही यथास्थितीबद्दल असमाधानी असता.

एकत्रितपणा

लोकांना एकत्र आणण्याची अग्नि आणि अन्नाची क्षमता ही जागतिक आहे.

मोठी कार घेऊन आनंद मिळत नाही तर ज्या लोकांना तुम्ही ओळखता, ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्या गरजेच्या वेळी त्यांना मदत मिळेल हे जाणण्यात आनंद मिळतो.

तुम्ही तुमच्या शेजार्‍यांपैकी किती लोकांना मित्र म्हणाल ?

७ पेक्षा जास्त, हे डेन्मार्कमध्ये जास्तीत जास्त मिळणारे उत्तर आहे. तर ७०% लोकांचे उत्तर ४ पेक्षा जास्त आहे. म्हणजे ७०% डेन्मार्क मधल्या लोकांचे ४ पेक्षा जास्त शेजारी मित्र आहेत.

एक पावर ड्रिल वर्षाला फक्त काही मिनिटेच वापरण्यात येते. त्यामुळे प्रत्येकाला पावडर ड्रिल आपल्या घरी ठेवणे काही गरजेचे नाही. तुम्ही ती तुमच्या शेजाऱ्यांकडून उसनी घेऊ शकता.

रस्त्याला समुदायात रूपांतरित करा.

पहिल्यांदा एखाद्या शेजाऱ्याचे दार ठोठावणे काही लोकांना कदाचित भयानक वाटू शकते, पण त्याचे बक्षीस मोठे असू शकते.

आनंद तयार करायला गाव लागतं.

तुमच्या आठवणींचा विचार केला तर क्वचितच असे होईल की त्यात तुम्ही एकटे असाल. सहसा आपले सर्व आनंदाचे क्षण हे इतरांबरोबरचे असतात.

आपल्या वैयक्तिक बाबींबद्दल बोलू शकू असे जितके जास्त लोक असतील तितके जास्त आपण आनंदी असतो.

दूरचा मित्र असण्यापेक्षा चांगला शेजारी असणे बरे.

डच म्हण

तुमच्या शेजाऱ्यांना हॅलो म्हणा किंवा त्यांना चहा प्यायला बोलवा.

अमेरिकेसारखे देश श्रीमंत झाले आहेत पण तिथे आनंदाच्या स्तरात कमी सुद्धा आली आहे. कारण तिथले लोक एकमेकांसोबत कमी राहतात.

आधी पेक्षा आज आपण एकमेकांना जास्त चांगल्या प्रकारे जोडले गेलेलो आहे, तरी आपल्याला एकटे वाटते.

सोशल मीडिया कमी वापरणारे लोक आनंदी असतात आणि वास्तविक जीवनात जास्त लोकांशी जुळतात.

आनंदाची गुरुकिल्ली

पैसा

केकचा पहिला तुकडा फार छान लागतो पण पाचवा नाही.

काही देश आणि लोक पैसेवाले होतात पण आनंदी नाही.

तुमचे ध्येय तुम्हाला तात्पुरते आनंदी करते.

कर्जाच्या उपलब्धतेमुळे अशा जीवनशैलीचे अनुकरण करणे सोपे झाले आहे जी आपल्याला परवडत नाही.

एका चुलत भावाने जमीन विकत घेतली तर दुसऱ्या भावाच्या पोटात दुखते

साऊथ कोरियन म्हण

आपण किती पैसा कमावतो फक्त हेच महत्त्वाचे नाही तर कमावलेल्या पैशाचे आपण काय करतो हेही महत्त्वाचे आहे.

आठवणी विकत घ्या, वस्तू नाही.

एका तासाचा आनंद हवा असेल – झोप घ्या.

एका दिवसाचा आनंद हवा असेल – मासेमारी करा.

एका वर्षाचा आनंद हवा असेल – वारसात संपत्ती मिळवा.

जीवनभर आनंद हवा असेल – इतरांना मदत करा.

चिनी म्हण

या पुस्तकात आरोग्य, स्वातंत्र्य, विश्वास, दया यांचा आनंदावर काय परिणाम होतो हे सांगितले आहे. म्हणून जर आनंदी राहायचे असेल तर हे पुस्तक खालील दिलेल्या लिंकवरून नक्की विकत घ्या.

आनंदाची गुरुकिल्ली

पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा. पुस्तक नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या.

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

2 thoughts on “आनंदाची गुरुकिल्ली – जगातील सर्वात आनंदी लोकांकडून शिका.”

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.