जेसिंडा आर्डर्न , पंतप्रधान न्यूझीलंड. एक उत्तम नेतृत्व.

जेसिंडा आर्डर्न , पंतप्रधान न्यूझीलंड यांच्याबद्दल मी युट्यूब वर एक व्हिडिओ पाहिला. त्यांचे काम पाहून असे वाटले की त्यांच्याबद्दलची माहिती आपण आपल्या वाचकांसमोर मांडली पाहिजे.

पण न्यूझीलंड च्या पंतप्रधानाबद्दल माझे वाचक रस घेतील का नाही ही शंका मनात होती. पण त्यांचे काम खरोखरच चांगले आहे. तसेच त्यांचे इतर विडिओ पाहून त्यांचे व्यक्तिमत्व फारच चांगले वाटले. म्हणून फेसबुक पेजवर मी प्रश्न विचारला की, “जेसिंडा आर्डर्न पंतप्रधान न्यूझीलंड, यांच्या बद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का ?” बऱ्याच लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

कोरोनामुक्त न्यूझीलंड

मला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचे वैशिष्ट्य वाटले तर ते की संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना, न्यूझीलंडने स्वतःला कोरोनामुक्त घोषित केले. कदाचित हा लेख लिहून होईपर्यंत, तुम्ही वाचेपर्यंत न्यूझीलंड मध्ये कोरोनाग्रस्त पुन्हा आढळलेले असतील, आणि तुम्हाला या लेखावर हसायला येईल.

पण जेसिंडा आर्डर्न यांनी न्यूझीलंडला कोरोनामुक्त घोषित करताना काय म्हटले आहे ? आधी ते खाली वाचा

“आम्ही सध्याकरिता वायरस चा संसर्ग संपवण्यात यशस्वी झालो आहे, पण संसर्ग थांबवणे ही घटना नाही. आपल्याला आपले प्रयत्न चालू ठेवावे लागतील. जवळजवळ हे निश्चितच आहे की आपण परत केसेस पाहू. मी परत सांगते, जवळजवळ हे निश्चितच आहे की आपण परत केसेस पाहू. याचा हा अर्थ नाही की आपण हरलोत. तर हे या वायरसचे वास्तव आहे. पण जर अशी परिस्थिती परत आली तर आपण निश्चित केले पाहिजे की आपण तयार असू, आणि आपण तयार आहोत.”
  – जेसिंडा आर्डर्न
 

(न्यूझीलंड कोरोना मुक्त घोषित करताना)

https://youtu.be/5af_YSpOy0M

पंतप्रधान असताना आई बनणे.

जेसिंडा आर्डर्न, पंतप्रधान न्यूझीलंड असताना आई बनल्या. असे करणाऱ्या त्या जगातील दुसऱ्या महिला आहेत. त्यांचा जन्म १९८० चा असून सध्या त्यांचे वय ४० आहे. या आधी पाकिस्तान च्या बेनझीर भुट्टो पंतप्रधान असताना आई बनल्या होत्या. जेसिंडा आर्डर्न यांनी ६ आठवड्यांची प्रसूती रजा घेतली होती.

UN मध्ये जेव्हा त्यांनी भाषण दिले तेव्हा त्यांची ३ महिन्यांची मुलगी Neve  त्यांच्यासोबतच होती. त्या प्रथम महिला आहेत ज्या आपल्या बाळाला UN मध्ये घेऊन आल्यात. त्यासाठी त्यांच्या मुलीचा ID देखील बनविण्यात आला होता.

जेव्हा त्यांना विचारण्यात आले की पंतप्रधानाने प्रसूती रजा घेणे योग्य आहे का ? तेव्हा त्यांनी उत्तर दिले “२०१८ मध्ये एका महिलेला ह्या प्रश्नच उत्तर द्यावे लागते हे अस्वीकाहार्य आहे.”

Ardern with Green Party co-leader James Shaw at Victoria University of Wellington, 12 April 2018

भूकंपात शांत असणे.

न्युज चॅनेल वर जेसिंडा आर्डर्न, पंतप्रधान न्यूझीलंड यांची मुलाखत सुरू असताना, भूकंप आला पण तरीही त्या फार शांत होत्या.

Pride Parade


Pride Parade मध्ये सामील होणाऱ्या त्या प्रथम पंतप्रधान आहेत. Pride Parade ह्या LGBTQI ह्या लोकांना मदत करण्यासाठी काढल्या जातात.

क्राइस्टचर्च मशिदवर गोळीबार

जेव्हा क्राइस्टचर्च मशिदवर गोळीबार झाला, त्यात ५० च्या जवळपास लोक मृत पावले होते. मृतांच्या नातेवाईकांना भेटायला त्या हिजाब घालून आल्या होत्या. त्यांनी Military Style Semi Automatic शस्त्रांवर न्यूझीलंडमध्ये बंदी घातली.

Ardern visits members of the Muslim community at the Phillipstown Community Centre, 16 March 2019. Captured through a glass window, the photo was widely shared at the time and described by The Guardian as “an image of hope”.

ह्या हल्ल्यानंतर संसदेत भाषणाची सुरवात त्यांनी अस्‌-सलामु-अलयकुम असे बोलून केली. हा हल्ला करणाऱ्याला अतिरेकी, गुन्हेगार आणि दहशतवादी संबोधले. त्यांनी त्याला प्रचार मिळू नये म्हणून त्याचे नाव घेणे टाळले. त्या बोलल्या ह्या गुन्हेगाराला न्यूझीलंडमध्ये काहीच मिळणार नाही, त्याचे नावसुद्धा.

https://youtu.be/EoS_wESRMpM

UN भाषण

“मुलगी म्हणून मला कधीही असे नाही वाटले की आयुष्यात मला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी, माझे लिंग माझ्या मार्गात आडवे येईल. कारण मी न्यूझीलंडची प्रथम नाही तर तिसरी महिला पंतप्रधान आहे. महिलांना मतदानाचा हक्क मिळून न्यूझीलंडमध्ये नुकतेच १२५ वर्ष झालेत. असे करणारे आम्ही जगात पहिलेच होतो.”

“परंतु हे सर्व असूनही अद्याप आमच्याकडे वेतनात लिंगानुसार फरक आहे. कमी पगाराच्या कामात महिलांचे जास्त प्रतिनिधित्व आणि घरगुती हिंसाचारही आहे. आणि आम्ही ह्यात एकटे नाही.”

“हे आश्चर्यकारक आहे की या आधुनिक युगातही आपल्याला लिंग समानतेसाठी पुन्हा प्रतिबद्ध व्हावे लागत आहे.”

“राजकारणी आणि सरकार या नात्याने आव्हानांना आपण कसा प्रतिसाद द्यायचा ही आपली निवड आहे.”

“असुरक्षिततेची भावना पोसण्यासाठी आपण वातावरणाचा उपयोग घेऊन नाव नसलेल्यांना आणि चेहरा नसलेल्यांना दोष देऊ शकतो. एकाकीपणाकडे नेऊ शकतो. किंवा आपण आपल्या समस्या ओळखून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो.”

“आम्ही राजकीय प्रणालींविषयी असंतोष दर्शविणारी तरुणांची जागतिक प्रवृत्ती पाहिली आहे. ते आम्हाला गोष्टी वेगळ्या प्रकारे करण्यास सांगत आहेत. तरुणांना इतक्या जलद बदलत्या जगाशी जुळवून घ्यावे लागत आहे. तर ते आपल्याला असे का सांगणार नाहीत ? ज्या नोकऱ्यांसाठी ते प्रशिक्षण घेत आहेत त्या दोन दशका नंतर अस्तित्वात असतील का ? शिक्षण किंवा नोकरीच्या बाजारात ते फक्त त्यांच्या घराशेजारी व्यक्तीशी स्पर्धा करणार नसून, त्यांच्या शेजारच्या देशांशी स्पर्धा करणार आहेत.”

मित्रांनो कोणतीच व्यक्ती ही परिपूर्ण नसते, तशाच जेसिंडा आर्डर्न ही नसतील. भविष्यात त्यांच्याकडूनही कदाचित काही चुका होतील, पण वर ज्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत त्या खरोखर कौतुकास्पद आहेत. त्यांनी केलेले काम वाखाणण्या योग्यच आहे.

https://youtu.be/HiobwkovZWw

https://www.newsroom.co.nz/2018/09/27/256105/full-text-pms-speech-to-the-united-nations

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.