बेबीलॉनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस

बेबीलॉनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस Richest Man In Babylon हे जगप्रसिद्ध पुस्तक George S Clason यांनी लिहिले आहे.

गुंतवणुकीबद्दल मुलभूत माहिती देणारे सर्वात उत्तम पुस्तक हे मला वाटले. या पुस्तकामध्ये श्रीमंत होण्याच रहस्य सांगितले आहे. मला हे पुस्तक फार आवडले व मी अनेक मित्र, नातेवाईकांना हे पुस्तक भेट म्हणून दिले. नक्कीच प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे

.

“त्या लोकांसाठी या जगात भरपूर धन उपलब्ध आहे, ज्यांना ते मिळवण्याचे सोपे नियम माहित आहेत.”

श्रीमंत बनण्याची इच्छा.

बंझीर हा फार उदास असतो कारण त्याच्याकडे पैसे नाहीत, आणि अशावेळी त्याचा मित्र कोबी त्याच्याकडे उधार मागायला येतो. तेव्हा बंझीर म्हणतो, माझे पाकीट पण खाली आहे.

तेव्हा बंझीर विचार करतो, आपल्याजवळ पैसा टिकत का नाही ? आपण संपत्ती का जोडू शकत नाही ? आपण फक्त तेवढच का कमवू शकतो, कि अन्न आणि कपडे या मुलभूत गरजच पूर्ण होतील. आपली मूल पण आपल्याच पदचिन्हांवर चालत आहेत. ते आणि त्यांची मुले पण या सोन्याच्या शहरात गरीबच राहतील का ?

आपल्याला याचा पत्ता लावता येणार नाही का ? की श्रीमंत लोक, कसे श्रीमंत बनतात ? यानंतर कदाचित आपण पण त्या मार्गाने चालून श्रीमंत बनू.

श्रीमंत बनण्याचं रहस्य जाणण्याकरिता कोबी आणि बंझीर, अरकाद कडे जाण्याच ठरवतात. अरकाद हा बेबीलॉनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस असतो.

बेबीलॉनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस

अरकाद च्या मित्रांनी त्याला विनंती केली की, त्याने तो श्रीमंत कसा बनला हि गोष्ट सांगावी.

अरकाद ला मृदापत्र तयार करण्याचे काम भेटले होते. एकेदिवशी तिथे एक वृद्ध माणूस आला, त्याला मृदापत्र लवकरात लवकर तयार करून पाहिजे होते. तो एक श्रीमंत व्यक्ती होता. अरकादने त्याचे काम लवकरात लवकर करून देण्याची हमी भरली, पण त्या बदल्यात श्रीमंत होण्याच रहस्य काय ? या प्रश्नाच्या उत्तराची मागणी केली. त्यावर तो वृद्ध माणूस म्हणाला, मी तोपर्यंत श्रीमंत नाही झालो जो पर्यंत मी असे ठरवले नाही की,

“मी माझ्या उत्पन्नाचा एक हिस्सा स्वत:साठी ठेवेल.”
जर तुमच्या उत्पन्नाच्या १० % पैसा तुम्ही तुमच्या जवळ ठेवला तर १० वर्षात किती संपत्ती जमा होईल ? आणि तो गुंतवला तर ? आपल्या उत्पन्नाचा एक हिस्सा नेहमी स्वतःसाठी ठेवा. तुमचे उत्पन्न किती पण कमी असो, तुम्ही कमीत कमी १०% बचत केली पाहिजे. यापेक्षा जितकी जास्त बचत तुम्ही करू शकता, करा. सर्वात आधी स्वत:साठी पैसा काढा मग उरलेल्या पैशातून खर्च भागवा.

ब्रेड बनवणाऱ्याला तुम्ही भविष्य विचारता का ?

सल्ला हि अशी वस्तू आहे , ज्याला लोक फुकट मध्ये वाटत फिरतात. पण याबद्दल सतर्क राहा. तोच सल्ला माना, जो मानण्या योग्य आहे. जो व्यक्ती आपल्या बचत बद्दल अनुभवहीन व्यक्तीकडून सल्ला घेतो, तो आपली बचत गमावून बसतो.

पहिले तर हे शिका कि आपल्या उत्पन्नापेक्षा कमी पैशांमध्ये खर्च कसा चालवावा ? नंतर अनुभवी आणि तज्ञ व्यक्तींकडून सल्ला घ्यायला शिका. आणि शेवटी पैशांकडून काम कसे करवून घ्यावे शिका.

संधी हि एक अहंकारी देवता आहे. जे तयार नाहीत, त्या लोकांवर ती वेळ व्यर्थ नाही घालवत नाही.

रिकाम्या पाकिटाचे ७ उपचार

आपले आवश्यक खर्च नेहमी आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणात वाढतच राहतील, जो पर्यंत तुम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही. आवश्यक खर्च आणि तुमच्या इच्छा यांमधील फरक ओळखा.

इच्छा अमर्याद असतात, पण ज्या इच्छा पूर्ण होवू शकतात, त्या मर्यादित असतात.

प्रत्येक पैशाकडून मेहनत करवा, जो पर्यंत हे पैसे आणखीन पैशांना जन्म देत नाहीत.

पैशांचे ५ नियम

१. जो व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा कमीत कमी १० वा भाग वाचवतो आणि समजदारीने गुंतवतो, तो हळू हळू चांगली संपत्ती जमा करेल. ती संपत्ती त्याला भविष्यात चांगले उत्पन्न देत राहील आणि त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या कुटुंबासाठी तो चांगला पैसा सोडून जाईल.

२. पैसे त्या समजदार मालकासाठी खूप मेहनत करतात जो यांच्यासाठी फायद्याचे काम शोधतो.

३. पैसे त्या सावधान मालकाच्या संरक्षणात राहतात जो समजदार लोकांकडून सल्ला घेतो.

४. पैसे त्या मालकांपासून दूर जातात जे त्यांना अशा जागी गुंतवतात जी त्यांच्या परिचयाची नाही.

५. पैसे त्या लोकांपासून दूर जातात जे पैशांपासून अशक्य उत्पन्न मिळवू इच्छितात किंवा चालू लोकांचा लोभी सल्ला मानतात.

बेबीलॉन चा सावकार

जर तुम्हाला तुमच्या मित्राची मदत करायची असेल तर, अशा प्रकारे करा कि तुमच्या मित्राचं ओझं तुमच्यावर पडणार नाही.

तुम्ही अनेक लोकांना उधार देता. उधार घेणारे काय नेहमी उधार चुकवतात ?

सावकाराला सावधानपूर्वक आणि सामंजस्याने ठरवावं लागत, कि त्याचा पैसा कर्ज घेणाऱ्याच्या कामी येईल आणि त्याचा पैसा व्याजासकट त्याच्याकडे परत येईल. जर त्याचा पैसा मुर्खतापूर्ण कामांमध्ये लागला , तर त्याची मुद्दल पण डुबेल. सर्वात सुरक्षित कर्जदार ते असतात ज्यांच्याकडे कर्जाच्या रक्कमे पेक्षा जास्त संपत्ती आहे.

तरुण लोक महत्वाकांशी असतात. ते संपत्ती किंवा इच्छांसाठी शॉर्टकट वापरतात. फटाफट श्रीमंत होण्यासाठी तरुण लोक अनेकवेळा अविचाराने कर्ज घेतात, त्यांच्याकडे अनुभव नसतो. त्यांना या गोष्टीचे भान नसते की कर्ज हा खोल गड्डा आहे. त्यात कोणी पण आरामात उतरू शकतो, परंतु त्याच्या बाहेर निघणे सोपे नाही. कर्जातून बाहेर पडण्यासाठी खूप दीर्घ संघर्ष करावा लागू शकतो. सावकार बोलतो कि, मी असे नाही म्हणत कि कर्ज घेऊ नये. मी कर्ज घेण्याला हतोत्साहित करू पाहत नाही, तर प्रोत्साहित करू पाहतो. जर कर्ज समजदारीने घेतले जात असेल तर, मी कर्ज घेण्याचा सल्ला देतो.

मी माझ्या बहिणीच्या नवऱ्याला माझ्या सोन्याच्या ५० मुद्रा उधार दिल्या पाहिजे ?

रोदन ला बक्षीस म्हणून सोन्याचा ५० मोहरा मिळतात. त्याची बहिण त्याला त्या उधार मागते. बहिणीला उधार द्यावे का नाही ? यावर सल्ला घ्यायला रोदन सावकाराकडे येतो. त्यावर सावकार खालील उत्तर देतो.

जर तिचा पती माझ्याकडे कर्ज मागायला आला तर मी त्याला विचारेल, तू या मुद्रांच काय करणार आहेस ?

जर तो उत्तर देतो की, तो माझ्यासारखा व्यापारी बनू पाहतो आणि हिरे जवाहारात चा व्यवसाय करू पाहतो.

तर मी त्याला विचारेल, तुम्हाला या व्यवसायाचे किती ज्ञान आहे ? तुला माहित आहे, सर्वात कमी किंमतीत सामान कुठे मिळेल ? चांगल्या किंमतीत हे सामान कुठे विकल्या जाऊ शकते ? तो या प्रश्नांचे उत्तर हो मध्ये देऊ शकेल ?

रोदन बोलतो, “नाही, तो नाही देऊ शकणार. त्याने मला भाले बनवण्यामध्ये मदत केली आहे, पण त्याला या गोष्टीचा अनुभव नाही.

त्यावर सावकार बोलला, मी त्याला म्हणेल – तुझा उद्देश सामंजस्यपूर्ण नाही आहे. तुझा उद्देश महत्वाकांशी जरूर आहे, पण व्यावहारिक नाही. म्हणून मी तुला उधार देणार नाही. पण समजा तो उत्तर देतो, हो मी व्यापाऱ्यांना मदत केली आहे. मला माहित आहे कमी किमतीमध्ये सामान कुठे घ्यावे ? आणि चांगल्या किमती मध्ये कुठे विकावे. तर मी त्याला म्हणेल तुझा उद्देश सामंजस्यपूर्ण आहे आणि तुमची महत्वाकांक्षा सन्मानजनक आहे. मी तुम्हाला ख़ुशी खुशीने सोन्याचा ५० मोहरा देतो. परंतु त्याबदल्यात मला अशी वस्तू हवी आहे, जी या मोहरा परत मिळण्याची हमी देऊ शकेल ?

जर तो बोलला माझ्याकडे हमी द्यायला काही वस्तू नाही आहे. मी एक सन्मानित व्यक्ती आहे आणि तुमच्या कर्जाच्या बदल्यात चांगला व्याज देईल. तर मी त्याला म्हणेल, तुझ्याकडून कोणी ह्या मुद्रा लुटल्या किंवा तुझा माल लुटला तर तू माझे कर्ज चुकवू शकणार नाहीस. माझा सर्व पैसा डुबून जातील.

समस्यांमध्ये अडकलेल्या लोकांची मदत करणे चांगली गोष्ट आहे. पण मदत समजदारीने केली पाहिजे. आपल्या नवऱ्याच्या प्रयोगासाठी, तुमच्या बहिणीला तुमची वर्षांची मेहनत धोक्यात टाकू वाटेल का ?

कर्ज चुकवण्याचा मार्ग माहित नसतानाही कर्ज घ्यायला लोक किती उत्सुक असतात ? लोकांना वाटत कि त्यांच्याकडे व्यवसाय सुरु करायला पैसा आला तर ते सुद्धा श्रीमंत होतील. परंतु ही खोटी आशा आहे, कारण त्यांच्याकडे यशस्वी होण्याची योग्यता वा प्रशिक्षण नसतं.

अशा लोकांना कर्ज देऊन पैसा गमावण्यापेक्षा चांगले आहे की तुम्ही स्वत:च खर्च करून उडवून टाका.

बेबीलॉनचा उंटांचा व्यापारी.

दुर्देव त्या प्रत्येक माणसाच्या मागे जाते, जो कर्ज चुकवण्यापेक्षा कर्ज घेण्याबद्दल जास्त विचार करतो.

जो व्यक्ती आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो, तो अनावश्यक भोग विलासतेच झाड लावतो आणि पुढे जाऊन त्याला समस्या आणि अपमानाचं पिक कापाव लागत.

स्वतंत्र व्यक्तीचा आत्मा जीवनाकडे अशा प्रकारे पाहतो की, जीवनात समस्या येतात, त्यांना सोडवल्या जाऊ शकते, आणि तो त्यांना सोडवतो. याउलट गुलामाची आत्मा रडते, मी काय करू शकतो ? मी तर गुलाम आहे.

अशा प्रकारे सोप्या भाषेत या पुस्तकात श्रीमंत होण्याच रहस्य सांगितलेलं आहे. या पुस्तकातील बरेच प्रसंग आणि शिकवणूक इथे सांगण्यात नाही आली आहे. त्याची मजा तुम्ही पुस्तक वाचूनच घ्यावी.
बेबीलॉन या शहरात कशा प्रकारे एक माणूस कर्जबाजरी अवस्थेमधून श्रीमंत होतो, हे सांगणारे पुस्तक विकत घेण्याकरिता खाली क्लीक करा.

इतर पुस्तकांसाठी इथे क्लिक करा.

आमचे फेसबुक पेज ला तुम्ही इथे भेट देऊ शकता.

3 thoughts on “बेबीलॉनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस”

  1. हे पुस्तक मराठी मध्ये आहे भेटेल का माझ्या मनात शंका अशी आहे की हे पुस्तक जर इंग्लिश मध्ये असेल तर मग मी हे वाचणार कसे कृपया मला रिप्लाय द्यावा हि विनंती

    Reply

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.