व्यवसायात यशस्वी कसे व्हावे ? हा लेख देवदत्त पटनायक यांचे How To Succeed At Business या पुस्तकावर आधारित आहे. कोणता व्यवसाय करावा ? हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर हा लेख वाचा.
व्यवसायात यशस्वी कसे व्हावे ?
व्यवसाय म्हणजे मोहात पाडणे.
व्यवसाय म्हणजे मोहकपणा. बाजारपेठेचा आकार वाढविण्यासाठी, ज्या ग्राहकांनी तुमचे उत्पादन किंवा सेवा कधीही वापरली नाही अशा ग्राहकांना तुम्ही मोहित केले पाहिजे.
जो भूक भागवितो तो इष्ट होतो.
इष्ट म्हणजे हवासा वाटणारा.
ही कथा बौद्ध जातकातील आहे. रस्त्यावर एक उंदीर मरून पडलेला असतो. एक तरुण, व्यापाऱ्याच म्हणणं ऐकतो की, चांगला उद्योजक मेलेल्या उंदीरातही संधी शोधेल. तो तरुण मृत उंदीर हातात घेऊन विचार करत असतो. तेव्हा एक मांजर त्याच्या जवळ येऊन त्याच्या हातातील मृत उंदीर पकडण्याचा प्रयत्न करते.
“माझ्या मांजरीला तो उंदीर दे आणि मी तुला एक तांब्याच नाणं देईल,” मांजरीचा मालक म्हणाला.
मुलाने नाणे खिशात घातले, जिथे भूक आहे तिथे संधी आहे, याची त्याला जाणीव झाली.
त्या नाण्याचं त्या तरुणाने मडकं घेतलं आणि त्या मडक्याचं पाणी गवत कापणाऱ्यांना पाजलं. हे गवत त्याने घोड्यांच्या बाजारात विकलं.
गवत कापणाऱ्यांना रोज पाणी पाजून आणि गवत विकून तरुणाला आता रोज तांब्याच नाणं मिळायला लागलं. तरुण व्यापाऱ्याला धन्यवाद द्यायला त्याला भेटायला गेला. तरुणाची चलाखी आणि उद्योजकता पाहून त्या श्रीमंत व्यापाऱ्याने त्याला जावई बनविले.
जंगलात, सर्व प्राणी, शिकारी व शिकार तहान भागविण्यासाठी तलावाकाठी येतात. व्यवसाय म्हणजे असा तलाव बनणे जो प्रतिभा, गुंतवणूकदार आणि ग्राहक आपल्याकडे आकर्षित करेल.
पूनम कॉलनीमध्ये नवीन मॉल उघडला तेव्हा छोट्या किराणा दुकानाचा मालक जयेश खूप घाबरला. त्याला वाटले की तो मॉलमधील किंमतींशी कधीही स्पर्धा करू शकणार नाही. मग त्याला समजले की त्याच्या ग्राहकांच्या गरजा लहान आहेत: एक बिस्किट, सोडयाची बाटली किंवा स्नॅक्सचे पॅकेट. अशा छोट्या छोट्या वस्तूंसाठी मॉलचा प्रवास करणे परवडणारे नव्हते. जयेशने कितीही छोटी ऑर्डर असली तरी माल घरी पाठवण्याचे आश्वासन दिले. त्याला छोट्या ऑर्डरसोबतच मोठ्या ऑर्डर्सही यायला लागल्या. होम डिलिव्हरीची सोय पूनम कॉलनीतील लोकांना लागली होती आणि चांगला डिस्काउंट देऊनही ती सवय मॉल मोडू शकत नव्हते. जयेशचा व्यवसाय सुरक्षित होता, निदान सध्यातरी.
आनंद तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा भौतिक विकासाबरोबर, बौद्धिक आणि भावनिक विकास होतो.
सर्व देवता समान नसतात
आपण परिणामांसाठी संपूर्ण टीमवर अवलंबून असतो. संघातील प्रत्येक सदस्य देवता आहे. परंतु कार्यसंघांमध्ये नेहमी कल्पना निर्माते आणि कल्पना लागू करणारे असतात. यजमानाला दोघांमध्ये फरक करणे आवश्यक आहे. कल्पना अंमलबजावणी करणारे आवश्यक असले तरी कल्पना निर्माते अत्यावश्यक असतात.
अनेक देवतांना मोहात पडणे आव्हानात्मक आहे.
जेव्हा देवता, यजमानाची भूक भागविण्याचा प्रयत्न करतात, तेव्हाच खरोखर मोह यशस्वी होतो. मुद्दा असा आहे की कर्मचार्यांनी त्यांची सर्वोत्तम सेवा स्वेच्छेने दिली पाहिजे. याउलट जेव्हा आपण आपले कार्य पूर्ण करण्यासाठी नियम, बक्षिसे आणि शिक्षा यावर अवलंबून असतो, तेव्हा याचा अर्थ असा असतो की आपण देवतांना मोहात पाडण्याऐवजी त्यांचे पालनपोषण करत आहोत. याचा अर्थ ते आनंदाने कार्य करीत नाहीत.
व्यवसायात यशस्वी कसे व्हावे हे आध्यात्मिक रित्या समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक खाली दिलेल्या लिंकवरून विकत घ्या.
फ्री pdf शोधणारे पूर्ण पुस्तक क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते. वरील लिंक वरून पुस्तक विकत घ्या.
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.