शेअर मार्केट शब्दकोश सोप्या शब्दात

शेअर मार्केट शब्दकोश या लेखामध्ये, शेअर मार्केटमध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांचे अर्थ सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत आहे. शब्द हे इथे A ते Z अशा क्रमात मांडण्यात आले आहेत. हा लेख लिहताना मला INVESTOPEDIA या साईट ची भरपूर मदत झाली आहे. शेअर मार्केट ची मूलभूत माहिती हवी असल्यास हा लेख वाचा.

शेअर मार्केट शब्दकोश

Book Value

Book Value = पूर्ण संपत्ती – अमूर्त संपत्ती (Intangible Assets).

म्हणजेच Book Value हिला भौतिक संपत्ती म्हणता येईल. अशी संपत्ती जिला स्पर्श करता येईल.

Bonus Share बोनस शेअर

बोनस शेअर म्हणजे विनामूल्य तुम्हाला शेअर मिळणे.

हे शेअर त्या शेअर धारकांना मिळतात ज्यांच्याकडे आधीच काही शेअर आहेत. म्हणजे कंपनीने असे जाहीर केले की ज्या शेअर धारकाकडे ३ शेअर आहेत त्यांना १ बोनस शेअर मिळेल. बोनस शेअर दिल्यामुळे शेअरची किंमत कमी होते आणि छोटे गुंतवणूकदार शेअर विकत घेऊ शकतात.

स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर मध्ये बरेच साधर्म्य आहे. शेअरची संख्या वाढते पण शेअरची रक्कम कमी होते, म्हणून गुंतवणूकदारांना विशेष असा काही फरक पडत नाही.

Call Option

सर्वात आधी लक्ष्यात घ्या ही सुविधा मोफत नसते, याला काही फी लागते, आणि ती फी तुमचा तोटा ठरू शकते.

हे एक प्रकारे ऍडव्हान्स बुकिंग सुविधा सारखे आहे. एखाद्या गोष्टीचे भविष्यात भाव वाढणार असतील तर ती तुम्ही ऍडव्हान्स बुक करून कमी किमतीत मिळविता, हे तसेच आहे. आणि तुम्ही ती गोष्ट नाही घेतली तर जसा ऍडव्हान्स बुडतो, तसे इथे आहे.

अशी सुविधा ज्याने तुम्हाला भविष्यात शेअर घेण्याचा अधिकार असतो, पण बंधन नसते.

सोप्या भाषेत, जर तुम्हाला वाटत असेल एखादा शेअर भविष्यात वाढणार आहे तर तो शेअर आज विकत न घेताही तुम्ही त्यावर नफा कमवू शकता. कॉल ऑपशन विकत घेतल्यावर भविष्यात तुम्हाला शेअर घेण्याचा अधिकार असेल, पण बंधन नाही. तुम्ही शेअर विकत नाही घेतला तर कॉल ऑपशन घ्यायला जी फी लागते, ती तुमचे झालेले नुकसान समजा.

समजा एखादा ट्रेडर Apple च्या शेअरचा भाव १०० डॉलर असताना Call Option विकत घेतो.

कॉल ऑपशन एका महिन्यानंतर कालबाह्य (Expire) होणार आहे.

समजा १ महिन्याने Apple च्या शेअरची किंमत १२०$ झाली. कॉल ऑपशन घेतल्यामुळे त्या ट्रेडरला आता तो शेअर १००$ मध्ये विकत घेण्याचा अधिकार असेल, पण बंधन नाही. कॉल ऑपशन घ्यायला समजा तुम्हाला २$ फी लागली.

म्हणजे ज्या गोष्टीची किंमत १२० आहे ती आधीच बुक करून १००$ ला मिळविणे.

कॉल ऑपशन च्या विरुद्ध असते पुट ऑपशन. पुट ऑपशन मध्ये तुम्हाला शेअर विकण्याचा अधिकार असतो, पण बंधन नाही.

डिमॅट खाते उघडायला क्लीक करा.

Dividend

कंपनीच्या भागधारकांना कंपनीच्या कमाईचा काही भाग वितरित करणे म्हणजे लाभांश (डिव्हिडंड) होय.

Dividend Yield

शेअरच्या किंमतीच्या किती % डिव्हिडंड मिळाला, हे डिव्हिडंड यिइल्ड मधून आपल्याला कळत.

आर्थिक गुणोत्तर (लाभांश / किंमत) जे हे दर्शवते की कंपनी दर वर्षी त्याच्या स्टॉक किंमतीच्या तुलनेत किती लाभांश (Dividend) देते.

उदाहरण – कंपनीने १०₹ डिव्हिडंड दिला आणि शेअर ची किंमत आहे १०० ₹ तर यावरून कळते की डिव्हिडंड यिइल्ड १०/१०० = ०.१ = १०%

डिव्हिडंड यिइल्ड हे % मध्ये दाखवतात. समजा २ कंपन्यांनी १००₹ डिव्हिडंड दिला मग कोणत्या कंपनीने जास्त दिला हे कसे ठरेल ?

१०० ₹ शेअरची किंमत असलेल्या कंपनीने १००₹ डिव्हिडंड देणे आणि १०००₹ शेअरची किंमत असलेल्या कंपनीने १००₹ डिव्हिडंड देणे यात फरक आहे.

१००₹ च्या शेअर वर १०० ₹ डिव्हिडंड मिळणे फार मोठी गोष्ट आहे, इथे डिव्हिडंड यिइल्ड येतो १००/१०० = १ = १००%

१०००₹ च्या शेअर वर १००₹ डिव्हिडंड येणे हे वरील उदाहरणापेक्षा खराब आहे. कारण इथे १०००₹ चा शेअर घेऊन १००₹ डिव्हिडंड आला आहे. हे फक्त समजण्यास सोपे उदाहरण दिले आहे.

जास्त डिव्हिडंड यिइल्ड चा सकारात्मक अर्थ हा आहे की कंपनी जास्त डिव्हिडंड देत आहे. आपल्याला जास्त पैसे मिळतील. तर नकारात्मक अर्थ हा आहे की कंपनी हे पैसे पुढे न गुंतवता आपल्याला परत देत आहे, म्हणजे कंपनी कडे ह्या पैशांचा काय उपयोग घ्यावा ह्याचे उत्तर नाही. विकास करण्यास वाव नाही.

Fundamentals

मूलभूत आर्थिक बाबी. अशा गोष्टी ज्या कंपनीची आर्थिक परिस्थिती दर्शवितात.

Indicators

Indicator म्हणजे सूचक. सूचक जे बाजाराची, शेअरची परिस्थिती दर्शवितात.

डिमॅट खाते उघडायला क्लीक करा.

Intangible Asset

Intangible Asset अशी मालमत्ता जी भौतिक स्वरुपाची नसते. सद्भावना, ब्रँड ओळख आणि बौद्धिक मालमत्ता, जसे की पेटंट्स, ट्रेडमार्क आणि कॉपीराइट्स, सर्व Intangible Assets आहेत.

Market Value

एखाद्या कंपनीचे बाजारात ठरलेले मूल्य. एखाद्या कंपनीकडे जेवढी मालमत्ता आहे तेवढीच तिची किंमत नसते.

उदाहरण – समजा एखादी चहाची टपरी आहे. त्या टपरीची संपूर्ण किंमत १ लाख ₹ आहे. पण चहा टपरी वाला तिची २ लाख किंमत मागतो आणि विकत घेणारा ती द्यायला तयारही असतो. तर ती झाली त्या चहाच्या टपरीची मार्केट value.

मग १ लाखाच्या टपरीचे विकत घेणारा २ लाख का घेतो ? कारण चहाच्या टपरीचा जम बसला आहे, अनेक ग्राहक तिकडचे फॅन आहेत. आजूबाजूला स्पर्धा करणारा कोणी नाही.

Money Market

मनी मार्केट म्हणजे अल्प-मुदतीच्या डेट मध्ये ट्रेडिंग.

होलसेल पातळीवर, संस्था आणि व्यापारी यांच्यात मोठ्या प्रमाणात व्यवहारांचा समावेश असतो.

किरकोळ स्तरावर, वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून खरेदी केलेले मनी मार्केट म्युच्युअल फंड आणि बँक ग्राहकांनी उघडलेल्या मनी मार्केट खात्यांचा समावेश असतो.

मनी मार्केटमध्ये जास्त सुरक्षितता आणि तुलनेने कमी परतावा असतो.

सरकार आणि बँक यांमध्ये मनी मार्केटमध्ये व्यवहार होतात. मोठ्या कंपनी किंवा बँक मनी मार्केट मध्ये व्यवहार करतात.

Overvalued

एखादी गोष्ट त्याच्या वाजवी किमतीपेक्षा जेव्हा जास्त किमतीत मिळत असते, तेव्हा तिला Overvalued म्हणतात. १०० ₹ चा आंबा ११० मध्ये मिळत असेल तर आपण त्याला Overvalued म्हणू. Overvalued च्या विरुद्ध आहे Undervalued.

PB Ratio

Price To Book Ratio = (मार्केट व्हॅल्यू / बुक व्हॅल्यू)

म्हणजे कंपनीच्या भौतिक मूल्याच्या तुलनेत कंपनीला मार्केट मध्ये किती व्हॅल्यू आहे.

१ पेक्षा कमी PB Ratio चांगले मानले जाते, कारण याचा अर्थ असतो, कंपनीच्या भौतिक मूल्यापेक्षा मार्केटची व्हॅल्यू कमी आहे.

PE RATIO

(Price Earning) – पी-ई गुणोत्तर, पी / ई किंमत-उत्पन्न गुणोत्तर. शेअरची किंमत / प्रति शेअर कमाई.

Put Option

पुट ऑपशन हे कॉल ऑपशन च्या विरुद्ध असते. कॉल ऑपशन बद्दल आपण वर वाचलेच आहे.

ठराविक कालावधी नंतर शेअर विकण्याचा किंवा शॉर्ट सेल करण्याचा तुम्हाला अधिकार मिळतो, पण विकणे तुम्हाला बंधनकारक नसते.

डिमॅट खाते उघडायला क्लीक करा.

Short Sell

जेव्हा एखाद्या शेअरची किंमत कमी होणार अशी तुम्हाला अपेक्षा असते तेव्हा हा पर्याय वापरतात.

या पद्धतीमध्ये तुम्ही शेअर आधी विकता, मग विकत घेता.

विकण्यासाठी हे शेअर उधार घेतले जातात. शेअर जास्त किमतीत विकायचे आणि कमी किंमत झाली का विकत घेऊन उधार चुकता करायची.

हे उधारीचे शेअर परत करायला एक मर्यादित कालावधी असतो, त्या कालावधीच्या आतच ही उधारी चुकती करावी लागते.

जास्त धोका जास्त परतावा ही अशी पद्धत आहे.

उदाहरण – टेस्ला चे शेअर आज उधार घेऊन तुम्ही १००$ ला विकले. तुम्ही तुमच्याकडे नसलेले शेअर विकले, हे उधारीचे शेअर तुम्हाला आता परत करायचे आहेत, त्यासाठी ते तुम्हाला विकत घेऊन परत करावे लागतील.

आता जर टेस्ला च्या शेअर ची किंमत ८०$ झाली तर तुम्हाला नफा होईल. कारण टेस्ला चा शेअर तुम्ही उधारीमध्ये विकला १००$ ला पण ८०$ ला विकत घेऊन उधारी चुकती केली.

पण याउलट जर टेस्ला च्या शेअरची किंमत कमी न होता जास्त झाली तर तुमचे नुकसान होईल. कारण १००$ ला विकलेले शेअर तुम्हाला १२०$ ला विकत घेऊन उधार चुकती करावी लागेल.

Stock Split (स्टॉक स्प्लिट)

शेअर ट्रेडिंग मध्ये liquidity वाढवण्यासाठी स्टॉक स्प्लिट केल्या जातात. २:१ जर असा स्टॉक स्प्लिट झाला तर १ शेअरच्या जागी तुम्हाला आता २ शेअर मिळतील आणि शेअर ची किंमत कमी होते. त्यामुळे शेअर धारकांना असा विशेष काही फरक पडत नाही. फक्त त्यांच्या जवळची शेअरची संख्या वाढते.

Undervalued

एखादी गोष्ट त्याच्या वाजवी किमतीपेक्षा जेव्हा कमी किमतीत मिळत असते, तेव्हा तिला Undervalued म्हणतात. १०० ₹ चा आंबा ९० मध्ये मिळत असेल तर आपण त्याला Undervalued म्हणू. Undervalued च्या विरुद्ध Overvalued.

Unrealized Profits

जेव्हा शेअर खरेदी केली जातो आणि नंतर शेअरचे मूल्य वाढते परंतु शेअरची विक्री केलेली नसते, त्या नफ्याला “अवास्तविक नफा (Unrealized Profits)” म्हणतात.

Unwinding

तुमचा ट्रेड संपविणे.

Value Investing

Undervalued शेअरमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे व्हॅल्यू इन्वेस्टिंग.

VIX

Volatility Index अशा निर्देशांक जो बाजारातील चढउतार दर्शवितो.

शेअर मार्केट शब्दकोश या लेखामध्ये पुढे आणखी शब्द जोडण्यात येणार आहेत. एखाद्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत नसेल तर तो कमेंट मध्ये कळवा. त्याचा अर्थ update करण्यात येईल.

डिमॅट खाते उघडायला क्लीक करा.

पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

माझे काम आवडत असेल व मी ते आणखी चांगल्या प्रकारे करावे ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला मदत करू शकता. खाली दिलेल्या देणगी बटन वर क्लीक करून तुम्ही मदत करू शकता.

2 thoughts on “शेअर मार्केट शब्दकोश सोप्या शब्दात”

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.