करोडपती कसे व्हावे ?

करोडपती कसे व्हावे ?

माफ करा. हो, लेखाच्या सुरवातीलाच माफी मागत आहे. कारण ९० % लोक जे मथळा (Headline) वाचून हा लेख वाचायला आलेत, हा लेख त्यांच्या कामाचा नाही. म्हणून त्या ९० % लोकांची आधीच माफी मागतो.

बहुतेक लोकांना १-२ वर्षात करोडपती व्हायचं आहे. त्या लोकांसाठी हा लेख नाही. कमीत कमी १० वर्षांनंतर ज्यांना करोडपती बनायचे आहे, त्याच लोकांसाठी हा लेख आहे.

ठीक आहे तर मग आता ज्यांच्याकडे संयम आहेत, तेच लोक हा लेख पुढे वाचत आहेत असे आपण गृहीत धरूया. पण एक आणखी समस्या आहे. आजचे १ करोड हे १० वर्षांनंतर १ करोड राहणार नाहीत. महागाई मुळे १ करोडचे मूल्य कमी होईल. म्हणून सर्वप्रथम आपण १ करोड चे भविष्यातील मूल्य काय असेल त्याचा अंदाज बांधूया.

आजचे १ करोड भविष्यात किती असतील ?

खालील आकडेमोड करताना महगाई चा दर ६% पकडण्यात आला आहे.

वर्षांनंतरमूल्य (लाख)
१०५६
१५४२
२०३१
२५२३.५
३०१७.५
३५
१३
४०९.८

म्हणजे आज जरी तुम्हाला १ करोड मोठी रक्कम वाटत असली, तरी भविष्यात त्याचे मूल्य काय असेल याचा तुम्हाला अंदाज येईल. जसे आपल्या लहानपणी आपण म्हणायचो तो लखपती माणूस आहे, म्हणजे तो फार श्रीमंत आहे. पण आता लाख म्हणजे काहीच वाटत नाहीत. म्हणून १ करोड जमा करायचे का २,३…१० करोड हे वरील आकडेमोड वरून ठरवा.

गुंतवणूक म्हणजे काय ? हे आधी माहित असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही हा लेख वाचू शकता.

या लेखात आपण फक्त म्युच्युअल फंड च्या माध्यमातून १ करोड कसे जमा करायचे हेच पाहणार आहोत. म्युच्युअल फंड बद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीचे दोन मार्ग आहेत.

१. LUMPSUM (एकरक्कमी)

२. SIP (दरमहा)

मोबईल वरील वाचकांनी सर्व स्तंभ (Column) दिसण्याकरिता मोबईल आडवा करून, Portrait हा पर्याय बंद करा आणि Auto Rotate हा पर्याय निवडा.

४० वर्ष

परतावा (%)१०१२१५१८
LUMPSUM रक्कम (लाख)४.६२.२१.०८०.३७०.१३५
SIP (हजार)३१००१८००१०००४५०२००

३५ वर्ष

परतावा (%)१०१२१५१८
LUMPSUM रक्कम (लाख) ६.८३.६१.९०.७५०.३१
SIP (हजार) ४७००३०००१८००९००४५०

३० वर्ष

परतावा (%)१०१२१५१८
LUMPSUM रक्कम (लाख)१०५.८३.४१.५०.७
SIP (हजार)७१००४९००३३००१८००१०००

२५ वर्ष

परतावा (%)१०१२१५१८
LUMPSUM रक्कम (लाख) १५९.३५.९३.११.६
SIP (हजार)११,०००८१००५९००३७००२३००

२० वर्ष

परतावा (%)१०१२१५१८
LUMPSUM रक्कम (लाख)२१.५१५१०.४६.२३.७
SIP (हजार)१७,५००१४,०००११,०००७६००५२००

१५ वर्ष

परतावा (%)१०१२१५१८
LUMPSUM रक्कम (लाख)३१.५२४१८.५१२.५८.५
SIP (हजार) ३०,०००२५,०००२२,०००१६,५००१२,५००

१० वर्ष

परतावा (%)१०१२१५१८
LUMPSUM रक्कम (लाख)४६.५३८.५३२.५२४.५१६
SIP (हजार) ५६,०००५०,०००४५,०००३८,०००३२,५००

मोबईल वरील वाचकांनी सर्व स्तंभ (Column) दिसण्याकरिता मोबईल आडवा करून, Portrait हा पर्याय बंद करा आणि Auto Rotate हा पर्याय निवडा.

वरील तक्त्यांवरून तुम्हाला असे दिसून येतच असेल कि, वेळ कमी केला तर रक्कम वाढवावी लागते. म्हणून लवकरात लवकर गुंतवणूक सुरु करा.

तसेच आणखी एक गोष्ट तुमच्या लक्ष्यात आली असेल. कमी परतावा असेल तर रक्कम आणि वेळ दोन्ही वाढवावे लागतात. फक्त FD मधेच गुंतवणूक करणाऱ्यांनी याची दाखल घ्यावी.

Diversifed म्युच्युअल फंड च्या प्रकारात १० वर्ष गुंतवून राहिल्यास, १५ % वार्षिक परतावा अपेक्षित असतो. म्हणून जास्त परताव्यासाठी अतिशय जास्त धोका घेण्यापेक्षा, योग्य प्रमाणात धोका घेऊन, संयमाने नियमित गुंतवणूक करणे कधीही फायदेशीर ठरते.

वेगवेगळ्या म्युच्युअल फंड बद्दल आपण लेखांमध्ये माहिती देतच असतो. येणाऱ्या लेखांमध्ये म्युच्युअल फंड चा portfolio कशा प्रकारे बनवू शकतो. यावर माहिती देऊ.

आमचे फेसबुक पेज ला इथे भेट देऊ शकता.

2 thoughts on “करोडपती कसे व्हावे ?”

  1. Hi I hv inveted in TVS motors yesterday took 100 shares of 497. Is it likely that it is going to increase in near future. One more think I took 500 shares of Ashokleyland. 3or 4 yrs back of Rs 106 per share is it likely shares is going to of Ashokleyand as well. I had 800 shares of Suzlon Energy. 500 shares of UCO bank. 10 shares of sbi.

    Reply

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.