The 7 Habits Of Highly Effective People Marathi By Stephen Covey अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी

The 7 Habits Of Highly Effective People Marathi By Stephen Covey

Stephen Covey यांनी या पुस्तकात, अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी सांगितल्या आहेत.

मला हे आताच पाहिजे.

लोकांना वस्तू पाहिजे असतात आणि त्या आताच पाहिजे असतात. मला पैसा पाहिजे, एक चांगले मोठे घर पाहिजे. एक चांगली कार पाहिजे, मोठा टीव्ही पाहिजे. मला हे सर्व आताच पाहिजे आणि मी या सर्व गोष्टीं मिळवण्याच्या लायक आहे, असे लोकांना वाटत राहते. पण परिणामकारक लोक हे चांगल्या सवयी लावून घेतात आणि त्या सवयींचे चांगले परिणाम मिळण्याची वाट पाहायला ते तयार असतात.

आवश्यक अशा गुंतवणुकी तुम्ही करत आहात का ? ज्याने तुम्ही १, ५, १० वर्षानंतर पण यशस्वी राहाल ?

तुमच्या जीवनात अपेक्षांना इतके कमी करून टाका की कोणत्या वस्तू वा व्यक्तीमुळे तुम्ही निराश होणार नाही.

आपल्या पैकी कित्येक लोक मृत्यू च्या वेळी ही इच्छा व्यक्त करतील की, “मी ऑफिसमध्ये किंवा टीव्ही / मोबाईल पाहताना जास्त वेळ व्यतीत केला असता तर ?” याचे उत्तर आहे, ‘कोणीच नाही’.

प्रत्येकाला वाटेल की आपले प्रियजन, कुटुंब यांच्या सोबत जास्त वेळ व्यतीत केला असता तर ?

अल्पकालीन मानवीय संबंधांमध्ये , जिथे एक दोन वेळा भेटण्याची गरज आहे, तिथे तुम्ही व्यक्तित्व आधारित नीतिशास्त्राचा वापर करून यश मिळवू शकता. तुम्ही समोरच्याच्या आवडींमध्ये रुची असल्याचा अभिनय करू शकता. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाची छाप पाडू शकता. अल्पकालावधीसाठी तुम्ही लोकांशी संवादाच्या शैली वापरून यश मिळवू शकता, पण दीर्घावधी मध्ये नाही. जर प्रामाणिकपणा आणि चारित्र्य नसेल, तर दीर्घावधी मध्ये अपयशच हाती येईल.

“तुम्ही काय आहात ? हे माझ्या कानात इतक्या जोरात वाजते की तुम्ही काय बोलत आहात, हे मला ऐकूच येत नाही.”

काही लोकांवर आपण विश्वास करतो, कारण आपण त्यांचे चरित्र जाणतो. त्यांना चांगले बोलता येवो न येवो, मानवीय संबंधांच्या शैलींमध्ये ते निपुण असो वा नसो, आपला त्यांच्यावर विश्वास असतो.

दृष्टिकोन

खालील फोटो मध्ये तुम्हाला तरुण स्त्री दिसते का ?

तरुणी

फोटो क्रमांक १.

आता खालचा फोटो पहा, यामध्ये तुम्हाला तरुण स्त्री दिसते का ?

वृद्ध आणि तरुणी

फोटो क्रमांक २.

दिसतेय ना !? तुम्हाला वरील फोटो मध्ये तरुण स्त्री! पण अनेकांना यात एक वयोवृद्ध स्त्री दिसतेय. तुम्हाला दिसतेय का एखादी वयोवृद्ध स्त्री या फोटो मध्ये ? नाही ना ? मग इतरांना का दिसते ? आणि ते बरोबर पण का आहेत ? याचे उत्तर तुम्हाला खाली मिळेल.

ज्या लोकांना या फोटो मध्ये वयोवृद्ध स्त्री दिसतेय त्यांना आधी फोटो क्रमांक ३ दाखवण्यात आला होता मग २. आणि ज्या लोकांना यात तरुण स्त्री दिसतेय त्यांना आधी फोटो क्रमांक १ दाखवण्यात आला होता मग २.

आपण या जगाला तसे नाही पाहत, जसे ते आहे. तर आपण या जगाला तशा प्रकारे पाहतो, ज्या प्रकारे पाहायला आपल्याला तयार केले गेले आहे. जेव्हा लोक आपल्याशी असहमत होतात, तेव्हा आपल्याला वाटत त्यांच्यात काहीतरी गडबड आहे. परंतु वरील प्रयोगावरून असे सिद्ध होते की प्रामाणिक लोकही एकाच गोष्टीला वेगवेगळ्या प्रकारे पाहू शकतात, कारण प्रत्येक व्यक्ती गोष्टींना त्यांच्या अनुभवाच्या नजरेतून पाहतो.

हो तुम्हाला फोटो क्रमांक ३ पाहायचा असेल, तो खाली आहे.

दोन लोक एकाच वस्तूला, दोन वेगळ्या प्रकारे पाहू शकतात आणि दोघेही बरोबर असू शकतात. हे तार्किक नाही तर मनोवैज्ञानिक आहे.

वृद्ध स्त्री

फोटो क्रमांक. ३.

अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी

The 7 Habits Of Highly Effective People Marathi

१. स्वयंप्रेरित बना.

क्रिया आणि प्रतिक्रिया यामध्ये माणसाकडे निवड करण्याचे स्वातंत्र्य असते.

तुमच्या सहमतीशिवाय, तुमच्यामध्ये कोणीच हीन भावना निर्माण करू शकत नाही.

– एलिनोर रूझवेल्ट

आपल्या सोबत जे होतं, ते आपल्याला एवढे दुख: देत नाही, जेवढी त्यावर आपली प्रतिक्रिया.

कोणतीही घटना झाल्यावर त्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी ? ह्याची निवड करण्याचे स्वातंत्र्य आपल्याकडे असते. स्वयंप्रेरित व्यक्तीला या गोष्टीची जान असते. तो प्रतिक्रिया देत नाही तर विचारपूर्वक कार्य करतो. कोणी तुम्हाला रागात बोलले, म्हणून तुम्ही रागात बोलले तर हि झाली प्रतिक्रिया. पण दुसरा रागात बोलला आणि तुम्ही शांतीपूर्वक उत्तर देण्याची निवड केली, तर हे झाले स्वयंप्रेरित वागणे. स्वयंप्रेरित लोक हे स्वतःच्या जीवनाची जवाबदारी उचलतात.

पुढाकार घेणे

घटना घडवण्याची जवाबदारी ओळखणे

प्रतिक्रियात्मक व्यक्तीस्वयंप्रेरित व्यक्ती
मी या परिस्थितीमध्ये काहीच करू शकत नाही.या, आपण आपले पर्याय तपासूया.
मी असाच आहे.मी स्वतःला बदलू शकतो.
तो मला राग आणून देतो.स्वतःच्या भावनांवर माझा ताबा आहे.
मला करावे लागेल.मी या गोष्टीला प्राधान्य देतो.

सवय २. अंत लक्ष्यात घेऊन सुरवात करणे.

घर बांधताना आपण आधी काय करतो ? आपल्याला कसे घर हवे आहे ? हे आधी कागदावर ठरवतो. आधी नकाशा तयार करतो, मग घराचं बांधकाम सुरु करतो. घराचा नकाशा तयार न करता आपण कधी घराचे बांधकाम सुरु करतो का ? तसेच आपल्या जीवनाबद्दल आहे. आधी तुम्ही ठरवा तुमच्या जीवनाचा अंत तुम्हाला कसा हवा आहे ?

अशी कल्पना करा कि तुम्ही मृत पावले आहात. आणि तुमच्या मृत्युच्या समयी लोक तुमच्या बद्दल दोन शब्द बोलत आहेत. त्या लोकांनी काय बोलाव ? अशी तुमची अपेक्षा आहे ? तुमचा भाऊ ? आई ? बाबा ? शेजारी ? पत्नी ? मित्र, समाजातील इतर लोक ? आणि तुम्ही स्वतः. काय केल्याने तुम्हाला मरताना समाधान असेल ? तुमचे जीवन त्याच गोष्टीच्या आसपास तयार करा.

इतर लोक सांगत आहेत, फक्त तेच तुमच्या जीवनाचे लक्ष्य बनवू नका. तुमच्या जीवनाचे लक्ष्य, तुम्ही स्वतः तयार करा. काय प्रसिद्ध आहे, किंवा इतरांना काय हवं आहे फक्त याचा विचार करू नका.

तुमच्या जीवनाच्या केंद्रभागी सिद्धांत असले पाहिजे, व्यक्ती, वस्तू किंवा भावना नाही.

सवय ३. पहिल्या गोष्टी पहिले ठेवणे.

ज्या गोष्टी तुम्हाला जीवनात महत्वाच्या आहेत त्या आधी केल्या पाहिजे.

अत्यावश्यकअत्यावश्यक नाही
महत्वाचेQ1
परीक्षेच्या आधीची एक रात्र

संकट, कालावधीची मर्यादा असलेली कामे
Q2
परीक्षेच्या आधीचा अभ्यास करण्याचा काळ

नाते बनवणे, नवीन शोध
लावणे, नवीन गोष्टी शिकणे, योजना बनवणे, तयारी करणे.
महत्वाचे नाही
Q3
अभ्यास करताना इतरांचे लग्न, वाढदिवस यासारखे क्षण

अनोळखी फोन, email, मिटींग्स
Q4
अभ्यास करताना नको असलेल्या लोकांचे वाढदिवस, लग्न यासारखे क्षण

नको असलेले फोन email, वेळ वाया घालवणारे लोक

Q1 – महत्वाचे आणि अत्यावश्यक.

Q2 – महत्वाचे, पण अत्यावश्यक नाही.

Q3 – महत्वाचे नाही, पण अत्यावश्यक.

Q4 – महत्वाचे नाही, अत्यावश्यक पण नाही.

तुम्ही सांगा तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ कुठे घालवला पाहिजे ? Q1, Q2, Q3, Q4 ?

तुम्हाला वाटत असेल उत्तर Q1 आहे, तर ते चूक आहे. तुम्ही जीवनात जास्त वेळ महत्वाच्या, पण अत्यावश्यक नसलेल्या गोष्टी केल्या पाहिजे. कारण Q1 मध्ये गोष्टी संकटे बनून जातात. जास्त काळ Q1 मध्ये जगणारा व्यक्ती नेहमी तणावाखाली असतो. Q2 मध्ये तुम्ही वेळेआधीच सर्व काम आटपून घेता.

नाही म्हणायला शिकणे

Q2 मध्ये जास्त वेळ घालवायचा असेल, तर Q4 आणि Q3 मध्ये कमी वेळ घालवावा लागेल. Q2 मध्ये वेळ घालवल्यामुळे संकटे कमी होतील आणि Q1 मध्ये घालवावा लागणारा वेळ आपोआपच कमी होईल.

सवय ४. जिंकणे/जिंकणे विचार करणे.

१. जिंकणे/हरणे – मी जिंकणार/ तुम्ही हरणार

अशा प्रकारचे नाते जास्त काळ टिकत नाही. कारण हरणारा तुमच्यासोबत का राहील ?

२. हरणे/जिंकणे – मी हरणार/ तुम्ही जिंकणार

असे नाते तुम्हाला जास्त काळ टिकवायचे नाही. कारण इथे तुम्ही हरत आहात.

३. हरणे/हरणे – मी हरणार/तुम्ही पण हरणार

या नात्यात दोघेही हरतात. बदला घेणारे लोक या प्रकारात येतात. वैर, भांडण, स्पर्धेमध्ये मध्ये जेव्हा लोक विचार करतात कि आपले नुकसान झाले तरी चालेल, फक्त समोरच्याचा फायदा नाही झाला पाहिजे.

४. जिंकणे/जिंकणे – मी जिंकणार/ तुम्ही पण जिंकणार

जिथे दोघेही जिंकतात. असे नातं चिरकाल टिकू शकत. कारण या मध्ये दोघेही खुश असतात.

५. जिंकणे/जिंकणे किंवा सौदा नाही – मी जिंकणार/ तुम्ही जिंकणार, नाही तर आपण सौदा करणारच नाही.

जर दोघेही व्यक्ती जिंकत नसतील तर जिंकणे/हरणे, हरणे/जिंकणे किंवा हरणे/हरणे या पैकी एक गोष्ट होईल. त्यापेक्षा आपण जर सौदाच नाही केला तर बरे राहील. म्हणजे दोघेही व्यक्ती खुश राहतील हा प्रयत्न करणे अथवा मग त्यांनी काहीच व्यवहार न करणे. अशा व्यक्तीशी व्यवहार करणे जिथे दोघेही खुश राहतील.

सवय ५. प्रथम दुसऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, मग त्यांनी तुम्हाला समजून घेण्याचा.

मुख्यतः आपण जीवनात प्रतिक्रिया देण्याच्या तयारीने ऐकत असतो समजून घेण्याच्या नाही.

ऐकणे आणि समजून घेणे यामध्ये फार फरक आहे. लोकांचे बोलणे संपण्याआधीच आपले उत्तर तयार असते. अनेक वेळा तर त्यांनी बोलाण्याधीच आपले उत्तर तयार असते. समस्या काय आहे हे आपण आधीच गृहीत धरले असते.

आपला मेंदू नेहमी कमीत कमी काम करायला पाहतो. समोरचा सांगतोय त्या परिस्थिती मध्ये मी काय केले असते किंवा मी काय करू शकेल फक्त हाच विचार आपण करतो. पण समोरचा व्यक्ती हा वेगळा आहे. त्याचे जीवनाचे अनुभव आणि त्याची क्षमता वेगळी आहे. आपल्याला लागू पडलेले उपाय कदाचित त्याच्या कामाचे नसतील, किंवा हे उपाय त्याने आजमावून देखील पहिले असतील. याचा आपण विचार न करता, आपले औषध आपण त्याला पाजतो.

ऐकून घेताना आपण फक्त शब्दांकडे लक्ष्य देतो, पण समजून घेताना आपण त्या शब्दांमागील अर्थांना, भावनांना, न सांगितलेल्या गोष्टींना समजून घेत असतो.

पण जीवनात अनेक वेळा आपण ‘सौदा नाही’, हा पर्याय आपण निवडू शकत नाही. कारण आपले कुटुंब, मित्र यांच्याशी वागताना सौदा नाही, हा पर्याय निवडू शकत नाही. अशा वेळेस दोघांनी समजूत दारीने मध्यम मार्ग निवडणे योग्य.

The 7 Habits Of Highly Effective People Marathi

सवय ६. Synergy

Synergy या शब्दाचा अर्थ आहे, जेव्हा दोन गोष्टी एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या मिलनाने एखादी तिसरी चांगली गोष्ट तयार होणे. अशी तिसरी गोष्ट जी तिला निर्माण करणाऱ्या दोघांपेक्षाही श्रेष्ठ आहे. याला Synergy म्हणतात.

जेव्हा मतभेद असतात, तेव्हा थोडा जास्त विचार करून समजूतदारीने असा बिंदू शोधून काढणे, जिथे सर्व जिंकतील. Synergy म्हणजे फक्त तडजोड नाही तर त्रिकोणाच्या उच्च बिंदू सारखे वर जाणे.

जे काम एकट्याने होणार नाहीत, पण संघाच्या मदतीने होतील. असे काम म्हणजे Synergy.

सवय ७. नवीनीकरण

नवीन गोष्टी शिकणे, नवीन काहीतरी करणे, ह्या गोष्टी Q2 मध्ये येतात.

आरीला धार लावणे. जसे लाकुडतोड्या मधे-मधे थांबून आपल्या आरीला धार लावतो. तसेच आपल्या जीवनात काही काळ थांबून विचार करणे, स्वतःला सुधारणे, नवीन नवीन गोष्टी शिकणे आवश्यक आहे.

हे पुस्तक तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून विकत घेऊ शकता.

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

हे पुस्तक तुम्ही आमच्या facebook पेज वर जिंकू शकता. त्यासाठी आमच्या पेज ला भेट द्या.

2 thoughts on “The 7 Habits Of Highly Effective People Marathi By Stephen Covey अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी”

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.