Zero To One Marathi By Peter Thiel ह्या पुस्तकात यशस्वी यद्योजक बनण्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
Peter Thiel कोण ?
सर्वात आधी आपण Peter Thiel कोण हे पाहूया. त्यानंतरच ते काय बोलत आहेत ते वास्तविक आहे का नाही ? हे जाणण्यास आपल्याला मदत होईल. Pay Pal आणि Palantir चे संस्थापक. Facebook मध्ये पहिले बाहेरील गुंतवणूकदार. Spacex आणि Linkedln मध्ये गुंतवणूकदार. तर Peter Thiel यांना Startups बद्दल चांगलाच अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या मित्रांसोबत मिळून अनेक startups सुरु केले आहेत. आज काल भारतात अनेक युवकांना बेरोजगारीमुळे म्हणा अथवा इतर लोकांच्या यशस्वी कथा ऐकून, स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा होत आहे. पण हे करोडो तरुण, वास्तविक विचार न करता, फक्त प्रेरणादायी गोष्टी ऐकून व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहेत.
प्रेरणेमुळे व्यवसाय करण्यात नक्कीच मदत होते. प्रेरणा हि व्यवसाय सुरु करण्याचे कारण हि असतेच. पण फक्त प्रेरणेच्या सहाय्याने व्यवसाय टिकत नाहीत. प्रेरणेला वास्तविकतेची जोड हवी, तरच व्यवसाय यशस्वी होतो. या पुस्तकामध्ये तुम्हाला वास्तविकपणे व्यवसाय सुरु करताना आधी काय विचार केला पाहिजे हे सांगितले आहे. या पुस्तकात कुठे लोन मिळेल वगैरे सारख्या गोष्टी नाहीत. त्यामुळे ज्यांची हि अपेक्षा असेल त्यांनी हे पुस्तक वाचू नये.
प्रत्येक घटना व्यवसायामध्ये फक्त एकदाच होते.
पुढील बिल गेट्स operating system बनवणार नाही. पुढील Larry Page, Search Engine बनवणार नाही. पुढील Mark Zuckerberg Social Network बनवणार नाही.
जर तुम्ही या लोकांची नक्कल करत असाल, तर तुम्ही त्यांच्यापासून काहीच शिकला नाहीत. ज्या कंपनी नवीन शोध लावणार नाहीत, त्या टिकणार नाहीत, आज भलेही त्या कितीही मोठ्या असोत. या पुस्तकात तुम्हाला startup सुरु करण्याचे कुठले सूत्र दिले नाही आहे. खरे पहिले तर उद्योजकतेमध्ये सूत्र असूच शकत नाही. कारण प्रत्येक शोध हा अद्वितीय (Unique) असतो.
Zero To One Marathi By Peter Thiel
पुस्तकाचे नाव असे का ?
वरील आलेखावरून आपल्याला दिसून येईल. जेव्हा ० ते १ हि प्रगती होते तेव्हा ती उभी असते. कारण आपण शून्यातून काहीतरी निर्माण करत असतो. त्यानंतर १ च्या पुढे जी वाढ असते ती आडवी असते. १ ते १०० वाढ म्हणजे, १ typewriter अस्तित्वात आहे, तुम्ही आता १०० typewriter बनवायला लागलात. हि झाली आडवी वाढ. पण जर typewriter पासून जर तुम्ही word processor बनवलात तरी हि झाली उभी वाढ. उभी वाढ करणे, कठीण काम आहे, कारण या आधी कोणीच हे काम केलेले नसते.
जर आडव्या वाढी करिता फक्त एक शब्द वापरायचा झाल्यास तो आहे, Globalization (वैश्विकरण). म्हणजे जी गोष्ट एका जागी यशस्वी झाली आहे तिला थोडेफार बदल करून दुसऱ्या जागी वापरणे, आधीच अस्तित्वात असलेल्या गोष्टींची नक्कल करणे. तसेच उभ्या वाढीकरिता कोणता एक शब्द असेल तर तो म्हणजे Technology (तंत्रज्ञान). म्हणजे नवीन काहीतरी शोध लावणे. आणखी सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास. कोका कोला सर्व देशांमध्ये पोहचवणे हे झाले वैश्विकरण आणि कोका कोला चा शोध लावणे हे झाले तंत्रज्ञान ( Zero To One).
Zero To One Marathi By Peter Thiel
STARTUP का ?
मोठ्या कंपनी मध्ये शोध लावणे, कठीण होते. कारण त्या मोठ्या असतात, तिथे बदल घडवून आणणे कठीण आणि मंदगतीचे काम असते.जर आपण एकट्यानेच सर्व काही करतो म्हटले तर ते त्यावरूनही कठीण आहे. एकटा व्यक्ती एखादी चांगली कलाकृती निर्माण करून शकतो, पण उद्योग नाही.STARTUP चा पहिला नियम सिद्धांत आहे, तुम्हाला इतरांसोबत काम करावे लागेल, पण तुमची team एवढी पण मोठी नको कि काम करणे कठीण जाईल.
STARTUP हा असा जास्तीत जास्त लोकांचा समूह आहे, ज्यांना तुम्ही एक वेगळे भविष्य निर्माण करण्याची योजना पटवू शकता.
विरोधाभासी सत्य
असे सत्य, जे प्रसिद्ध नाही किंवा असे सत्य जे अनेकांना खोटं वाटतं. तुम्हाला समाजामध्ये असणाऱ्या खोट्या विश्वासांविरुद्ध जावे लागेल. हे जग लोकांमुळेच चालते, लोकांना भावना असतात, लोक भावनिक असतात तार्किक नाही. नेहमीच निर्णय घेताना ते तर्काचा विचार करीत नाहीत. अनेक वेळा बहुसंख्य लोक कोणत्या तरी बाबतीत चूक असतात, आणि तीच आपली संधी असते.जर विरोधाभासी सत्य जाणण्यात आपण यशस्वी झालो तर आपल्या जिंकण्याची शक्यता फार वाढून जाते. बदल घडवताना आपण नम्र असले पाहिजे आणि समाजात हळू हळू बदल घडवून आणले पाहिजे.
Zero To One Marathi By Peter Thiel
एक मोठी चूक.
STARTUP सुरु करताना लोक विचार करतात, मी नवीन व्यवसाय सुरु करतोय, सध्या माझ्या व्यवसायाला ग्राहक नाहीत. पण माझे ग्राहक भविष्यात तयार होतील. म्हणजे सध्या हे उत्पाद वापरणारे लोक नाहीत, ते भविष्यात असतील.असा विचार करणे चूक आहे. जे ग्राहक अस्तित्वात आहेत, आधी त्यांच्यासाठी उत्पाद तयार करा. जे ग्राहक अस्तित्वात नाहीत, त्यांच्यासाठी उत्पाद तयार करून काय फायदा
उत्पादावर लक्ष्य द्या, जाहिरातीवर नाही.
जर तुम्हाला जाहिरातीची किंवा विक्रेत्याची गरज पडत असेल तर तुमचे उत्पाद पुरेसे नाही. तंत्रज्ञान म्हणजे उत्पादन, वितरण नाही.
एकाधिकारशाही
विमान कंपनी एकमेकांशी स्पर्धा करतात, पण गुगल ?एकाधिकारशाही म्हणजे एखादी कंपनी इतकी चांगली असणे की, ती जे करू शकते ते इतर कंपन्या नाही.स्पर्धा म्हणजे नफा नाही, आणि जगण्याचा संघर्ष. भांडवलशाही (Capitalism) आणि स्पर्धात्मकता (Competition) ह्या दोन विरुद्ध गोष्टी आहेत. स्पर्धा करणारे व्यवसाय एकमेकांचा नफा खाऊन टाकतात.
स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करू नका, तर स्पर्धा करावीच लागणार नाही याचा प्रयत्न करा.
एकाधिकारशाही हि प्रत्येक यशस्वी व्यवसायाची अट आहे. जर एकाधिकारशाही असलेले व्यवसाय आपल्याला प्रगती करू देत नसतील तर त्यांना विरोध करण्याचा अधिकार आपल्याला आहे.
Zero To One Marathi By Peter Thiel
सर्व सुखी कंपनी वेगळ्या असतात.
सर्व सुखी कंपनी वेगळ्या असतात. त्यांनी ग्राहकांची कोणती तरी समस्या सोडवण्यामध्ये यश मिळवलेले असते. पण सर्व अपयशी कंपन्या सारख्या असतात, त्या स्पर्धेच्या बाहेर पडू शकलेल्या नसतात.
स्पर्धा म्हणजे जगण्याचा संघर्ष.
Marx चे म्हणणे होते कि, ” लोक भांडतात कारण ते वेगळे असतात. जितका जास्त फरक तितका जास्त मोठा वाद.”तर या उलट Shakespeare चे म्हणणे होते कि, “सर्व लढणारे हे जवळपास सारखेच असतात.”स्पर्धेत लोक काय महत्वाचे आहे, यावर लक्ष्य देणे बंद करतात आणि प्रतिस्पर्ध्यावर लक्ष्य देणे सुरु करतात.जिंकणे हरण्यापेक्षा चांगले आहे. पण जेव्हा युद्ध लढण्यालायक नसते तेव्हा प्रत्येकजणच हरतो. जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्ध्याला हरवू शकत नाही, तेव्हा हात मिळवणे योग्य. पण काहीवेळा तुम्हाला लढावेच लागेल, मग अशा वेळी लवकरात लवकर जिंका किंवा लढूच नका.Technology कंपनीमध्ये सुरवातीला फार खर्च येतो. त्यांची खरी किंमत १० -१५ वर्षांनंतर दिसून येते.वाढ मोजणे सोपे आहे. पण टिकाऊपणा मोजणे कठीण आहे. १०, २० वर्ष हा व्यवसाय टिकेल का ?
एकाधिकारशाहीचे वैशिष्ट्ये
१. खाजगी तंत्रज्ञान.
तुमचे स्वतःच्या मालकीचे असे तंत्रज्ञान जे जवळच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा १० पट चांगले आहे. Amazon सुरवातीला फक्त पुस्तक विकत होते. पण ते इतर कुठल्याही प्रतीस्पर्ध्यापेक्ष्या १० पट जास्त विविध प्रकारचे पुस्तक विकू शकत होते.
२. Network परीणाम
तुमचे सर्व मित्र whatsapp वर असतील तर तुम्ही hike वापराल का ? पण तुमचे network तेव्हाच तयार होईल, जेव्हा सुरवातीचे वापर कर्त्यांना ते आवडेल. facebook ची सुरवात फक्त हार्वर्ड च्या विद्यार्थ्यांकरिता झाली होती, जगातील प्रत्येकासाठी नाही.
३. पट
एखादा व्यवसाय चांगला चालायला लागल्यावर तो तुम्ही किती पटीने चांगला वाढवू शकता ? software कंपनी अशा वेळी जास्त फायद्यात असतात. कमी खर्चामध्ये एकच software ते अनेक जागी विकू शकतात. पण सेवा क्षेत्र हे एकाधिकारशाही गाजवण्याकरिता कठीण असतात. असा व्यवसाय असावा जो अनेक पटीने वाढवणे शक्य असेल.
४. ब्रँड
आपण आधी आपल्या उत्पादावर लक्ष्य दिले पाहिजे, ब्रँड वर नाही. कोणतीच technology कंपनी फक्त ब्रँड वर टिकू शकत नाही.
एकाधिकारशाही कशी बनवावी ?
छोटी सुरवात करा आणि एकाधिकारशाही बनवा. छोटे मार्केट मध्ये दबदबा स्थापीत करणे सोपे असते, मोठ्या मार्केट पेक्षा. पण छोट्या चा अर्थ अस्तित्वात नसलेले नाही. सुरवातीला मोठे मार्केट हा वाईट पर्याय आहे. मोठ्या मार्केट मध्ये आधीच मोठ्या कंपनी असतात, त्यांच्याशी स्पर्धा करण्यात काहीच अर्थ नाही.
वाढवणे
Jeff Bezos चे स्वप्न होते सर्व online विक्री क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण करणे. पण त्यांनी जाणून बुजून सुरवात फक्त पुस्तक विक्रीपासून केली. जे लोक पुस्तकांच्या दुकानापासून दूरवर राहतात किंवा ज्यांना काही वेगळे पुस्तके हवी आहेत, त्या सर्वांसाठी amazon एक दमदार पर्याय बनला.आधी एका विशिष्ट गोष्टी, क्षेत्रामध्ये किंवा वस्तूमध्ये मध्ये दबदबा तयार करा. मग त्याच्या निगडीत आजूबाजूच्या मार्केट मध्ये उतरा.
नाश करू नका.
जर तुमच्या कंपनीचे उद्धिष्ट कोणत्या गोष्टीला विरोध करणे असेल तर तुमची कल्पना ही पूर्णपणे नवीन नसेल. त्यामुळे त्यात एकाधिकारशाही होणे कठीण आहे. विनाशामुळे अनेक लोकांच लक्ष्य आपल्यावर येत.जितके शक्य असेल तितके स्पर्धा टाळा. प्रत्येक यशस्वी कंपनी मध्ये एक रहस्य असतं आणि त्या रहस्यामुळेच ती कंपनी पैसे बनवत असते. जर तुम्हाला आजूबाजूला sales team दिसत नसेल तर तुम्हीच sales team आहे समजा.
व्यवसाय सुरु करण्याधी स्वतःला खालील प्रश्न विचारा.
१. आपण असे तंत्रज्ञान विकसित करू शकतो का ज्याने थोडे-थोडे नाहीतर मोठे काहीतरी बदल होतील ?
२. हा व्यवसाय सुरु करण्याची ही योग्य वेळ आहे का ?
३. छोट्या मार्केटचा, मोठा हिस्सा तुम्ही काबीज करणार आहे का ?
४. तुमच्याकडे चांगली team आहे का ?
५. तुमची मार्केट मधील जागा भविष्यात १०-२० वर्ष सुरक्षित राहु शकेल का ?
६. फक्त उत्पाद तयार न करणे, तर त्याचे वितरण करणे पण तुम्हाला जमणार आहे का ?
७. तुम्ही अशी संधी ओळखली आहे का जी इतरांना दिसत नाही आहे ?
“सह-संस्थापक निवडणे हे लग्न करण्यासारखे आहे आणि संस्थापक संघर्ष घटस्फोटासारखाच कुरूप आहे.”
-Peter Thiel
तुम्हालाही जर स्टार्टअप सुरू करायचा असेल आणि Peter Thiel चे मार्गदर्शन हवे असेल तर हे पुस्तक आताच खालील लिंक वरून विकत घ्या.
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.
Thanks for article
Welcome. Please subscribe to our email alert and our social media pages.