Thinking In Bets Marathi By Annie Duke

Thinking In Bets Marathi By Annie Duke हे पुस्तक आपल्याला स्मार्ट निर्णय घ्यायला मदत करते जेव्हा आपल्याकडे सर्व तथ्य नसतात. अनेक चुकीचे पूर्वाग्रह जे माझ्या मनात होते ते या पुस्तकामुळे दूर झालेत. जर तुम्हालाही जीवनात स्मार्ट निर्णय घ्यायचे असतील तर हे पुस्तक नक्की वाचा. खाली मी या पुस्तकातील काही महत्वाचे मुद्दे मांडत आहे, जेणेकरून हे पुस्तक का घ्यावे ह्याचे तुम्हाला उत्तर मिळेल.

Thinking In Bets Marathi By Annie Duke

चांगल्या निर्णयांचे ही वाईट परिणाम मिळू शकतात. आपण परिणामांना निर्णयांशी जोडतो. अशी निर्विवाद उदाहरणे देणे सोपे आहे, जिथे निर्णय आणि परिणाम यांचा संबंध परिपूर्ण नाही.

भाग्यवान निकालाच्या आधारे भविष्यातील निर्णय बदलणे धोकादायक आहे.

आपली विचारसरणी दोन प्रवाहात विभागली जाऊ शकते. एक वेगवान, स्वयंचलित आणि मुख्यत्वे नकळत आणि दुसरी, हळुहळु, मुद्दाम आणि न्यायपूर्ण.

– Gary Marcus

Poker Vs Chess

Poker – पत्यांचा एक खेळ (पैसे लावून हा खेळ खेळला जातो)

बुद्धिबळात कोणतीही छुपी माहिती नसते आणि नशीब फारच कमी असते. बुद्धिबळात कोणीही फासे फेकत नाही, आणि जर फासे तुमच्या विरुद्ध गेले, तर तुमचा उंट फलकातून काढून घेतल्या जात नाही. जर तुम्ही बुद्धीबळाचा एखाद्या खेळ हरलात तर त्याचे कारण तुम्ही न केलेल्या किंवा पाहिलेल्या चांगल्या चाली असतात.

बुद्धीबळ, किचकट असले तरी जीवनात निर्णय घेण्याचे ते एक उत्तम मॉडेल नाही. आपण जीवनात असे बरेच निर्णय घेतो जिथे माहिती लपलेली असते किंवा नशिबाचा जास्त प्रभाव असतो.

याउलट पोकर हा अपूर्ण माहितीचा खेळ आहे. काळानुसार अनिश्चिततेच्या परिस्थितीत निर्णय घेण्याचा हा एक खेळ आहे. मौल्यवान माहिती लपलेली राहते. परिणामामध्ये नशीबाचा घटक देखील असतो.

बुद्धिबळात, निकाल निर्णयाच्या गुणवत्तेवर अधिकतर अवलंबून असतो. Poker मध्ये, नशीबवान असणे आणि जिंकणे, कमनशिबी असणे आणि हरणे खूपच सोपे आहे. 

जर आयुष्य बुद्धीबळासारखे असते तर प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही सिग्नल तोडल्यावर तुमचा अपघात झाला असता किंवा कमीतकमी पोलिसांकडून चलान मिळाले असते.

पण आयुष्य पोकरसारखे आहे. तुम्ही चतुरतेने, अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेऊ शकता आणि तरीही अपयशी होऊ शकता. तुम्ही सिग्नल तोडू शकता आणि तरीही वाचू शकता. रहदारीच्या सर्व नियमांचे आणि सिग्नलचे अनुसरण करू शकता आणि तरीही मरू शकता.

पोकर मध्ये, नवशिक्या चॅम्पियनला हरवू शकतो. पण बुद्धिबळात असे होऊ शकत नाही.

Thinking In Bets Marathi By Annie Duke

मला माहित नाही

मला माहित नाही, असे कबूल करणे समाजात वाईट समजल्या जाते.

“मला माहित नाही” हे एक अपयश नाही तर ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक पाऊल आहे.

“महान परिणामांमुळे, निर्णय महान बनत नसतात.” महान निर्णय हा चांगल्या प्रक्रियेचा परिणाम असतो.
अशी प्रक्रिया ज्यात आपल्या ज्ञानाची अवस्था अचूकपणे दर्शविली जाते.

हे करण्यासाठी, आपल्याला “मला माहित नाही” आणि “मला खात्री नाही” या वाक्यांना गलिच्छ वागणूक देणे बंद करणे आवश्यक आहे.

बरोबर असल्यावर आपल्याला जेवढा आनंद होतो त्यापेक्षा जास्त दुखः चूक असल्यावर होतं. सामान्यतः फायदा जेवढा चांगला वाटतो त्याच्या दुप्पट नुकसान वाईट वाटतं.

– Daniel Kahneman

पैज लावणार ?

तुम्ही मान्य करा अथवा नका करू, पण प्रत्येक निर्णयामध्ये धोका असतो. काही गोष्टी माहीत नसतात किंवा काही गोष्टी माहित होऊ शकतही नाहीत. आपले निर्णय हे पैज असतात.

सर्वच निर्णय हे पैज असतात.

अपूर्ण माहिती आणि आपल्या नियंत्रणाबाहेरील घटकामुळे सर्व गुंतवणूकीच्या निवडी अनिश्चित ठरतात.

आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी (नशीब) परिणामांवर प्रभाव पाडू शकतात.

आपण सहसा जे वाचतो आणि ऐकतो ते खरे मानतो.

आपल्याला समोर एखादे झाड दिसले तर ते झाड अस्तित्त्वात आहे का ? असा प्रश्न करणे सामान्यतः बौद्धिक उर्जेचा अपव्यय आहे.

खरं तर, आपण काय पाहतो किंवा ऐकतो त्याला प्रश्न करणे आपल्या जीवावर बेतू शकते, तेवढ्या वेळात आपली शिकार होऊ शकते.

हुशार असणे खरोखरच पूर्वाग्रहांना अधिक वाईट बनवू शकते.

तुम्ही जितके हुशार असता, तितके तुम्ही कथा तयार करण्यात सक्षम असता. अशी कथा जी तुमच्या विश्वासांचे समर्थन करते. तुम्ही माहिती तर्कसंगतपणे, अशाप्रकारे दाखवू शकता की ती तुमच्या युक्तिवादात किंवा दृष्टिकोनात तंतोतंत बसेल.

आकडेमोडमध्ये तुम्ही जेवढे चांगले असता, तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही आकड्यांना तुमच्या बाजूने फिरवू शकता. तुमच्या विश्वासांना अधिक दृढ करण्यासाठी.

दुर्भाग्यपणे उत्क्रांती ने आपल्याला असेच तयार केले आहे. आपला उद्देश सत्य शोधणे असला तरीही आपली रचना आपल्या विश्वासांचे रक्षण करण्यासाठी बनलेली आहे. आपण हट्टीपणाने आपल्या विश्वासांना सुधारण्यास नकार देतो.

अशी घटना तुमच्यासोबत कधी घडली आहे का ? तुमच्या मित्रासोबत तुम्ही एखाद्या चित्रपटाबद्दल चर्चा करत असाल. आणि तुम्ही म्हटले की तो चित्रपट ऑस्कर जिंकला आहे. त्यावर तुमचा मित्र बोलला, नाही तो चित्रपट ऑस्कर जिंकला नाही. पण तुम्ही त्याचे ऐकायला तयार नसता. तेव्हा तुमचा मित्र तुम्हाला विचारतो “पैज लावतो का ?

“पैज लावतो का ?” हे ऐकताच तुमचा विश्वास थोडासा कमी होतो ? या आव्हानामुळे तुमचे पाय जमिनीवर येतात आणि  तुम्ही तुमच्या विश्वासाला प्रश्न विचारायला सुरुवात करता.

  • मला हे कसे माहीत झाले ?
  • मला ही माहिती कुठून मिळाली ?
  • माझ्या स्त्रोतांची गुणवत्ता काय ?
  • मी त्यांच्यावर किती विश्वास ठेवू शकतो ?
  • माझी माहिती अद्ययावत आहे का ?
  • विरोधकांना असे काय माहित आहे जे मला माहित नाही ?

जो व्यक्ती दीर्घ काळात अधिक पैजा जिंकतो त्याचे विश्वास अधिक अचूक असतात.

परिणाम अभिप्राय आहेत.

तज्ञ होण्यासाठी अनुभव आवश्यक आहे, पुरेसा नाही. जे लोक अनुभवातून शिकतात ते सुधारतात, प्रगती करतात आणि (थोड्याशा नशिबाने) आपल्या क्षेत्रातील तज्ञ आणि नेते बनतात.

Thinking In Bets Learning Loop 1
Learning Loop 1

परिणामांपासून आपण शिकतो. त्यामुळे आपले विश्वास दृढ होतात किंवा बदलतात. आपण परत पैज लावतो.

Thinking In Bets Learning Loop 2
Learning Loop 2

पहिल्या पद्धतीमध्ये दोष आहे. त्यात आपण नशीब आणि कौशल्य असा फरक करत नाही. परिणामांवर नशिबाचा प्रभाव आहे की कौशल्याचा हे जाणून घेणे आवश्यक आहे. नशिबाचा प्रभाव असेल तर त्याबाबत आपण काही करू शकत नाही. कौशल्याचा प्रभाव असेल तर आपण त्यापासून शिकू शकतो.

आपल्या १०० % वाईट परिणामांचे कारण दुर्दैवं नसते आणि आपल्या १०० % चांगल्या परिणामांचे कारण आपण चांगले असणे नसते. आपण आपल्या नशिबालाच दोष देत राहिलो तर ते निर्णय जिथे आपण सुधारणा करू शकतो, आपण सुधारण्याची संधी गमावून बसू.

“आपण नशिबावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला आवडत नसलेल्या लोकांच्या यशाचे आपण काय स्पष्टीकरण देऊ ?”

– Jean Cocteau

इतर लोकांचे परिणाम आपल्यावर प्रतिबिंबित होतात.

जर आपला सहकारी जिंकत असेल तर तुलनेने आपल्याला वाटते की आपण हरत आहोत. जर त्यांची मुले शाळेत आपल्या मुलांपेक्षा चांगले करत असतील तर आपण आपल्या मुलांसोबत काय चूक करत आहोत ?

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

3 thoughts on “Thinking In Bets Marathi By Annie Duke”

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.