Cashflow Quadrant Marathi By Robert Kiyosaki कॅशफ्लो क्वाड्रन्ट

Cashflow Quadrant Marathi By Robert Kiyosaki कॅशफ्लो क्वाड्रन्ट हे पुस्तक रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाचा पुढील भाग आहे. हे पुस्तक म्हणजे आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली.

“खरे स्वातंत्र्य तुम्हाला कधीही आर्थिक स्वातंत्र्याशिवाय मिळू शकत नाही.”

– रिच डॅड

Cashflow Quadrant Marathi काय आहे ?

लोक चार प्रकारे पैसे कमवतात. याचे वर्णन या पुस्तकात केले असल्यामुळे या पुस्तकाला कॅशफ्लो क्वाड्रन्ट असे नाव देण्यात आले आहे.

Cashflow Quadrant Marathi By Robert Kiyosaki कॅशफ्लो क्वाड्रन्ट

तुम्ही कोणत्या चौकोनात आहात?

तुमच्या उत्पन्नाचा मुख्य हिस्सा वरील कोणत्या भागातून येतो ?

पगारदार, डॉक्टर, चार्टर्ड अकाऊंटंट चौकोनाच्या डाव्या बाजूला असतात.

व्यवसाय करणारे आणि गुंतवणूकदार चौकोनाच्या उजव्या बाजूला असतात.

एक छोटंसं गाव होतं. त्या गावात पाणी टंचाई होती. पाणी पुरवठा करण्यासाठी जाहीररित्या प्रस्ताव मागितले गेले. ‘X’ आणि ‘Y’ यांचे प्रस्ताव आले. दोन्ही प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

‘X’ ने लगेच काम सुरू केलं. त्याने दोन बादल्यात गावाबाहेरून पाणी आणायला सुरूवात केली. ते पाणी तो गावातल्या मोठ्या टाकीत ओतत असे. पहाटेपासून कष्ट करायचा. ‘Y’ ने अजून कामाला सुरूवात केली नव्हती. ‘X’ आनंदात होता, कारण त्याला स्पर्धा नव्हती.

मधल्या काळात ‘Y’ ने अभ्यास केला. गावाजवळ असलेल्या तळ्यातून पाईपने पाणी आणण्याची व्यवस्था केली. पाईपचे पाणी स्वच्छ आणि नेहमी उपलब्ध होते, शिवाय त्याने ‘X’पेक्षा ७५ टक्के कमी दरात पाणी दिलं.
या गावाला जशी पाण्याची गरज आहे, तशीच शेजारच्या गावांनाही होती. ‘Y’ ने हीच योजना त्यांच्याही पुढे मांडली आणि तिथले देखील काम मिळवले.

‘Y’ आनंदात राहिला. ‘X’ कष्ट करीत राहिला. मी स्वत:ला प्रश्न विचारतो – ‘‘मी पाईप लाईन टाकतोय की बादलीनं पाणी भरतोय?’’ ‘‘मी हुशारीनं काम करतोय की कष्टानं?’’ या प्रश्नांच्या उत्तरांनी मी आर्थिक स्वातंत्र्याकडे पोहोचलो. हे पुस्तक ‘B’ आणि ‘I’ कडे जाणाऱ्या, पाईपलाईनकडे जाणाऱ्यांसाठी आहे.

– रॉबर्ट कियोसाकी

Cashflow Quadrant Marathi पुस्तकाचे ३ भाग आहेत.

भाग १ : या भागात चार चौकोनातील माणसांमध्ये मूलभूत फरक काय आहे, हे सांगितले आहे. चार चौकोनात सध्या तुम्ही कुठे आहात व तुम्हाला कुठे जायचं हे ठरविण्यासाठी माहिती दिलीय.

भाग २ : वैयक्तिक बदल कसा करावा हे इथे सांगितलंय.

भाग ३ : उजव्या बाजूच्या चौकोनातून यश प्राप्त करण्याच्या ७ पायऱ्या सांगितल्या आहेत.

दुर्दैवानं शाळा अजूनही औद्योगिक युगात आहेत. त्या डाव्या चौकोनातील माणसे तयार करीत आहेत.

मी ‘E’ आणि ‘S’ कडून ‘B’ आणि ‘I’ कडे गेलो. जाताना जे अनुभव आले ते इथं मांडलेत. अशा प्रवासाला तुम्ही तयार असाल आणि आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.

– Robert Kiyosaki

तुम्ही नोकरी का करीत नाही ?

१९८५ मधली गोष्ट आहे. मला राहायला घर नव्हतं. मी व माझी बायको दोघेही बेरोजगार होतो. बचतीमधून थोडेच पैसे उरले होते. क्रेडिट कार्डची मर्यादाही संपली होती. आम्ही एका जुन्या टोयोटामध्ये कारमध्ये राहत होतो. 

एका मैत्रिणीला आमची ही दयनीय स्थिती लक्षात आल्यावर तिने तिच्या तळघरातील एक खोली राहायला दिली.

नातेवाईक व मित्रांना सत्यस्थिती समजल्यावर ते एकच प्रश्न विचारीत – ‘‘तुम्ही नोकरी का करीत नाही?’’ सुरुवातीचा काही काळ आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आमचं म्हणणं त्यांना पटत नव्हतं. ज्यांच्यासाठी नोकरी खूप महत्त्वाची आहे, त्यांना ‘नोकरी नकोय’ हे समजणं अवघड होतं.

आम्ही छोट्या मोठ्या नोकऱ्या करून काही डॉलर कमविले. परंतु ते फक्त पोटाला अन्न आणि गाडीत पेट्रोल भरण्यासाठी पैसे मिळावे म्हणूनंच. एकच ध्येयं होतं, व्यवसायाचं.

काही क्षण असे आले की सुरक्षित व दरमहा पगाराच्या नोकरीचा मोह पडला. परंतु नोकरी हे आमचे ध्येय नव्हतेच. त्यामुळे तो मार्ग कटाक्षाने टाळला. तुटपुंज्या पैशावर गुजराण चालू ठेवली.

पैसा महत्त्वाचा नाही असे म्हणणारा माणूस नक्की फार काळ पैशाशिवाय राहिला नसेल. नोकरी करून पैसे मिळवावेत का ? यावरून आमच्या दोघात वादावादी झाली. भीती, असुरक्षितता, भूक यामुळे मनाचा निर्धार डळमळीत होऊ लागला. आपल्यावर सर्वाधिक प्रेम करणाऱ्या व्यक्तीशीही आपली भांडणं होऊ लागतात. परस्परांवरील प्रेमाच्या दृढ बंधामुळे या काळात आम्ही एकत्र राहू शकलो. आम्हाला काय करायचं हे निश्चित होतं. कुठे पोहोचायचं हेही ठरले होते. परंतु, तिथपर्यंत पोहचू का नाही हे अनिश्चित होते.

चांगली, सुरक्षित नोकरी आपल्याला केव्हाही मिळवता येईल याची जाणीव होती. आम्ही दोघंही पदवीधर व अनुभवी होतो. काम उत्कृष्टपणे कसं करायचं हे आम्हाला माहित होतं. तरीही आम्हाला ती सुरक्षित नोकरी नको होती. आम्हाला हवं होतं आर्थिक स्वातंत्र्य.

E – Employee (कर्मचारी)

‘‘मला सुरक्षित, चांगल्या पगाराची आणि अनेक फायदे असणारी नोकरी हवी.’’ ‘‘पैशापेक्षाही सुरक्षितता हवी.’’

S – Self-employed (स्वयंरोजगार)

‘S’ गटाला ‘आपले काम आपणच करणारे’ म्हटले आहे.
कमिशनवर विक्री करणारे, इस्टेट एजंट, किरकोळ विक्रेते, रेस्टॉरंटचे मालक, धुलाईकेंद्रे, सल्लागार, थेरपिस्ट, प्रवासी एजंट, मोटर दुरुस्ती केंद्रे, सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, केशभूषाकार, कलाकार, डेंटिस्ट, केशभूषाकार, मार्केटिंग सल्लागार, प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, वकील, कंपन्यांमध्ये प्रशिक्षण देणारे.

स्वयंरोजगार करणारे काय बोलतात ?

‘‘माझे एका तासाचे पंधराशे रुपये होतील.’’ ‘‘माझे कमिशन एकूण व्यवहाराच्या ६ टक्के आहे.’’ ‘‘चांगले काम करणारी माणसेच मिळत नाहीत.’’ ‘‘या कामाला मला २० तासाहून जादा वेळ लागणार आहे.’’

‘S’ प्रकारचे लोक इतरांना कामावर ठेवण्यास आणि प्रशिक्षण देण्यास संकोच करतात, कारण एकदा प्रशिक्षण घेतल्यानंतर तीच व्यक्ती बर्‍याचदा त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून उभी राहते. यामुळे त्यांना अधिक परिश्रम करावे लागतात.

B ( Business Owner) उद्योग करणारा बिझनेसमन.



‘‘माझी कंपनी चालविण्यासाठी मी नव्या अध्यक्षाच्या शोधात आहे.’’

खर्‍या ‘B’ ला काम सोपविणे आवडते. जे काम करायला आपण इतरांना नोकरीवर ठेवू शकतो आणि ते काम ती व्यक्ती आपल्यापेक्षा चांगले करू शकते. मग ते काम आपण स्वतः का करायचे ?”

S आणि B मधला फरक

जे लोक खरे ‘B’ आहेत, ते त्यांचा व्यवसाय एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी सोडून जाऊ शकतात.  कदाचित जेव्हा ते परत येतील तेव्हा त्यांचा व्यवसाय पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर आणि चांगल्या स्थितीत असेल.

परंतु खर्‍या ‘S’ प्रकारच्या व्यवसायात, जर ‘S’ एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ दूर गेला, तर तो परत येईपर्यंत त्याचा व्यवसाय असेल की नाही हा प्रश्न आहे.

त्यांच्यात काय फरक आहे? सोप्या शब्दांत सांगायचे तर, ‘S’ हे कामाचे मास्टर आहेत, तर ‘B’ हे प्रणालीचे मास्टर आहेत. ‘B’ त्यांची प्रणाली चालविण्यासाठी पात्र व्यक्ती नियुक्त करतात. बर्‍याच प्रकरणांमध्ये ‘S’ हा स्वतःच प्रणाली असतो. त्यामुळे तो आपले काम सोडून जाऊ शकत नाही. 

समस्या अशी आहे की जेव्हा दंतचिकित्सक सुट्टीसाठी बाहेर पडतो, तेव्हा त्याचे उत्पन्न देखील त्याच्याबरोबर बाहेर पडते. ‘B’ व्यवसाय मालक सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर जाऊ शकतात. कारण ते कामाचे नव्हे तर संपूर्ण यंत्रणेचे स्वामी असतात. जर ‘B’ सुट्टीसाठी बाहेर गेला तर पैसे येणे थांबणार नाही. म्हणून यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे. सिस्टमचे नियंत्रण किंवा मालकी आणि लोकांचे नेतृत्व करण्याची क्षमता.

जर ‘S’ ला ‘B’ बनायचे असेल तर त्याने त्याचे मूलभूत स्वरूप आणि सिस्टमबद्दलची माहिती देखील बदलली पाहिजे. बर्‍याच लोकांना हे करणे शक्य नाही किंवा ते बहुधा सिस्टममध्ये खोलवर गुंतलेले असतात.

Cashflow Quadrant Marathi By Robert Kiyosaki कॅशफ्लो क्वाड्रन्ट

मॅकडोनाल्ड

मॅकडोनाल्डपेक्षा कोट्यावधी लोक चांगले बर्गर बनवू शकतात. परंतु केवळ मॅकडोनल्ड्सकडे अशी प्रणाली आहे जी कोट्यवधी हॅम्बर्गर विकू शकते. मॅकडोनाल्डला जा, तिथली सिस्टम पहा.
कच्चे बर्गर आणणारे ट्रक, बीफ तयार करणारे रेचर, बीफ खरेदी करणारा खरेदीदार आणि टी.व्ही. वरील जाहिरात पहा. तरुण अननुभवी लोकांचे प्रशिक्षण पहा. “फ्रँचायझीची सजावट देखील तपासा, प्रादेशिक कार्यालये पहा आणि लाखो पौंड फ्रेंच फ्राई पहा. जगभरात कोणाची समान चव आहे ते पहा. नंतर वॉल स्ट्रीटवर मॅकडॉनल्ड्ससाठी पैसे उभे करणाऱ्या स्टॉक ब्रोकरकडे पहा. जे लोक संपूर्ण चित्र पाहू शकतात त्यांच्याकडे “B” किंवा “I” चौकोनात जाण्याची संधी आहे.

सत्य हे आहे की नवीन कल्पना अमर्यादित आहेत. नवीन सेवा किंवा उत्पादने देण्याचे विचार कोट्यावधी लोकांच्या मनात भिरभिरले आहेत, परंतु अतिशय चांगली व्यवसाय प्रणाली कशी तयार करावी हे फारच थोड्यांना माहित आहे. मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सने कोणतेही उत्तम उत्पादन शोधले नाही.  त्यांनी दुसर्‍याचे उत्पादन विकत घेतले आणि आजूबाजूला एक मजबूत जागतिक प्रणाली तयार केली.

I – Investor (गुंतवणूकदार).

गुंतवणूकदार पैशातून पैसे कमवतात. त्यांचे पैसे त्यांच्यासाठी काम करतात. ‘I’ चौकोन श्रीमंतांसाठी खेळण्याचे मैदान आहे. तुम्ही कोणत्या चौकोनातून पैसे कमवता याचा फरक पडत नाही, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला शेवटी ‘I’ क्वाड्रन्टमध्ये यावेच लागेल. ‘I’ क्वाड्रन्टमध्येच पैसे संपत्तीत रूपांतरित होतात.

लोक स्वातंत्र्यापेक्षा सुरक्षेला जास्त महत्त्व का देतात ?

लोक नोकरीला घट्ट पकडून राहतात कारण ते सहसा आर्थिक दिवाळखोरी पासून केवळ तीन महिने किंवा त्यापेक्षा कमी काळ दूर असतात. तुम्ही बर्‍याचदा या लोकांच्या तोंडून असे शब्द ऐकत असता, “मी नोकरी सोडू शकत नाही. मला बिलं भरावे लागतात.” किंवा म्हणतात “माझ्यावर कर्ज आहे, माझ्यावर कर्ज आहे, म्हणून मी कामावर जातो.”

जर तुम्हालाही E,S,B चौकोनामधून I चौकोनात यायचे असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. खालील लिंक वरून तुम्ही ते विकत घेऊ शकता.

Cashflow Quadrant Marathi By Robert Kiyosaki कॅशफ्लो क्वाड्रन्ट

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

5 thoughts on “Cashflow Quadrant Marathi By Robert Kiyosaki कॅशफ्लो क्वाड्रन्ट”

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.