Cognitive Bias (आकलनात्मक पूर्वाग्रह)

Cognitive Bias (आकलनात्मक पूर्वाग्रह) काय असतात हे गुंतवणूकदारांनी समजून घेणे आवश्यक आहे. कारण गुंतवणूकदारांचे मुख्य काम निर्णय घेणे असते. आपल्या निर्णयांवर Cognitive Bias (आकलनात्मक पूर्वाग्रहांचा) फार मोठा फरक पडतो.

Cognitive Bias (आकलनात्मक पूर्वाग्रह) म्हणजे काय ?


आपण मनुष्य आहोत. आपल्याला भावना आहेत. आपण परिपूर्ण नाही. आपल्याला मर्यादा आहेत. कितीही हुशार मनुष्य असला तरीही त्यालाही मर्यादा आहेत. काही चुकीच्या विचार पद्धतींमुळे, मानवीय मर्यादांमुळे आपण चुकीचे निर्णय घेतो. आकलन करताना आपण काही पूर्वाग्रह वापरतो, त्याचबद्दल आपण या लेखात बोलणार आहोत.

आपला मेंदू हा एकाचवेळी अनेक गोष्टींवर प्रक्रिया करत असतो. मेंदूची रचना अशी केली आहे की कमी ऊर्जा वापरून जास्तीत जास्त काम करणे. असे करण्याकरिता मेंदू जुन्या अनुभवांची मदत घेतो, बऱ्याच वेळा सखोल विचार करत नाही. त्यामुळे असे Cognitive Bias (आकलनात्मक पूर्वाग्रह) तयार होतात. आपण माहितीवर प्रक्रिया करीत असताना आपण केलेल्या या विचार त्रुटींना Cognitive Bias (आकलनात्मक पूर्वाग्रह) म्हणतात.

काही मुख्य Cognitive Bias (आकलनात्मक पूर्वाग्रह)

Survivorship Bias

जे व्यक्ती जिंकतात किंवा संकटातून वाचतात फक्त त्यांच्या कामगिरीवर लक्ष देणे. जे पराभूत होतात त्यांच्या कथेवर लक्ष न देणे.

द्वितीय महायुद्धाच्या वेळी विमानांनी महत्वाची भूमिका निभावली. आपले विमान शत्रूंपासून सुरक्षित राहावे यासाठी विमानांना कुठे जास्त नुकसान होते हे पाहण्याकरिता सैन्याने पाहणी केली. जे विमान नुकसानग्रस्त होऊन परत आले होते, त्यांना जिथे नुकसान झाले तिथे विमानाच्या चित्रावर लाल निशाण लावण्यात आले.

Survivorship Bias

वरील चित्रावरून विमानांना कुठे जास्त नुकसान झाले हे माहीत पडले. सैन्याने तिथे जास्त सुरक्षा वाढवली, पण त्यांचा हा निर्णय चुकीचा होता. का तुम्ही हे सांगू शकता का ? खालील उत्तर न वाचता कमेंट मध्ये उत्तर सांगा.

त्यांचा निर्णय चुकीचा होता कारण सैन्याने फक्त तेच विमान विचारात घेतले होते जे दुर्घटना होऊन परत आले होते. ते विमान नाही जे दुर्घटना होऊन परत आलेच नाही. याला म्हणतात Survivorship Bias.

म्हणजे जे विमान संकटातून वाचून परत आले, विजयी झाले फक्त त्यांनाच विचारात घेणे. अशा प्रकारे सैन्याने चुकीचा निर्णय घेतला. कारण ज्या विमानांना नाकावर किंवा इंजिन वर मार लागला होता, ते परत आलेच नाहीत. त्यामुळे तुम्हाला नाकावर किंवा इंजिन वर लाला निशाण दिसणार नाही.

प्रेरणादायी भाषण

खालील भाषण वाचा, आणि तुम्हाला वाचून प्रेरणा मिळते का सांगा ?

“अनेक लोकांनी सुरवातीला मला मूर्खात काढले. ते मला बोलले हे अशक्य आहे. पण मी हार मानली नाही, मी माझे काम सुरूच ठेवले. मी या साठी स्वतःचे घरदार गहाण ठेवले, माझी पत्नी यामुळे मला सोडून गेली. मी कर्ज घेऊन माझे काम सुरूच ठेवले. आणि शेवटी एक दिवस मला यश मिळालेच, मी जिंकलो.”

आता या व्यक्तीचे प्रेरणादायी भाषण ऐकून तुम्ही त्याच्या सारखे वागणे सुरू कराल का ? आपल्या आजूबाजूला देखील असेच होते. हे जुगारात जिंकणाऱ्या व्यक्तीचे भाषण होते. आताही तुम्ही त्याचे अनुकरण कराल का ?

काही लोक निव्वळ नशिबामुळे यशस्वी होतात किंवा अनेकांच्या यशात नशिबाचा खूप मोठा वाटा असतो, किंवा काही लोकांना स्वतःलाच माहीत नसतं ते का यशस्वी झालेत, किंवा काही लोकांचा गैरसमज असतो ते का यशस्वी झालेत. मग तुम्ही अशा लोकांचा सल्ला ऐकला तर तुम्हाला यश मिळेल का ? पण आपण अशा लोकांना आदर्श समजून त्यांच्यापासून प्रेरणा घेतो. त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतात Survivorship Bias. यशस्वी झालेल्या, किंवा संकटातून वाचलेल्या लोकांच्या सल्याला सत्य मानणे.

Decoy Effect ( आमिष प्रभाव )

खाली तुम्हाला मोबाईल विकत घेण्याचे २ पर्याय दिले आहेत. तुमच्या आवडणीनुसार आणि बजेट नुसार तुम्ही फोन विकत घ्याल.

काही लोक ६,००० चा मोबाईल विकत घेतील तर काही ८,००० चा. पण हुशार विक्रेता असे काही करेल.

Decoy Effect

आता तुम्ही कोणता मोबाईल निवडाल ? आता तुम्हाला ६,००० वा ७,५०० च्या मोबाईल पेक्षा ८,००० चा मोबाईल घेणे फायद्याचे वाटू लागले का ?

याला म्हणतात Decoy Effect.

आता मी नवीन एक मोबाईल आणला आहे, तो decoy आहे. म्हणजे त्याचा उद्देश फक्त प्रलोभन किंवा आमिष दाखविणे आहे.

आता तुम्हाला दिसेल की ७५०० मध्ये फक्त ५०० ₹ अधिक टाकून मला चांगला मोठा फोन मिळतोय, तर मला तो घ्यायला परवडेल.

अशा प्रकारे मी तुम्हाला ६००० च्या मोबाईलशी तुलना न करता ७५०० च्या मोबाईलशी तुलना करायला लावली. ७५०० पेक्षा ८००० चा मोबाईल चांगलाच आहे, फक्त ५००₹ जास्त देऊन. अशा प्रकारे मी तुम्हाला ८०००₹ चा मोबाईल घेण्यास प्रवृत्त करू शकतो.

याचे दुसरे उदाहरण आपण Jio चे पाहू.

Jio Decoy Effect

Jio चे प्लॅन समजून घेऊया.

₹ १२९ चे पॅक

हा Jio चा स्मार्ट फोन साठीचा सर्वात कमी किमतीचा रिचार्ज आहे.

फक्त २० ₹ जास्त देऊन तुम्ही महिन्याला २ gb मिळण्याऐवजी रोज १ gb मिळवू शकता.

₹ १४९ चे पॅक

म्हणजे १२९ हा decoy आहे. त्यांचा उद्देश १२९ चा प्लॅन विकणे हा नाहीच.

आता तुम्ही १४९ चा प्लॅन घ्यायला तयार झालात. पण Jio चा उद्देश आहे तुमच्याकडून आणखी पैसे काढण्याचा. म्हणून त्यांनी काही अटी टाकल्या जसे की १४९ हा प्लॅन २४ दिवसांचा आहे २८ चा नाही. तसेच त्यामध्ये फक्त ३०० मिनिट महिन्याला Jio To Non Jio मिळतात, १००० नाही. ह्या दोन्ही सुविधा १२९ मध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे तुमची अपेक्षा असते, ह्या मूलभूत सुविधा तर आपण घेतल्याचं पाहिजे.

म्हणजे अशा प्रकारे ह्या ३ प्लॅन पैकी सर्वात योग्य प्लॅन आता उरतो १९९ चा. प्लॅन ची अशा प्रकारे रचना करून Jio तुम्हाला २०० दरमहा खर्च करण्यास प्रवृत्त करतं. कारण तुम्हाला वाटेल २० ₹ जास्त देऊन २ ऐवजी २४ GB डेटा मिळेल आणि आणखी ५०₹ टाकून ४२ GB डेटा आणि १००० मिनिटे मिळतील.

Normalcy bias

जी गोष्ट याआधी कधी झाली नाही ती कधीच होणार नाही असा विचार करणे.

जेव्हा वेसूव्हियसचा ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा पोंपेईचे रहिवासी शहर सोडून पळून न जाता तास न तास ज्वालामुखी पाहत बसले. कारण त्या आधी कधीच असे झाले नव्हते.

Choice-Supportive Bias Or Post-Purchase Rationalization

एखादी गोष्ट तुम्ही निवडली किंवा विकत घेतली तर ती गोष्ट कशाप्रकारे चांगली आहे हे तुम्ही सांगता आणि दुसरा पर्याय कसा वाईट हे.

उदाहरण

जर एखादया व्यक्तीने A पर्याय निवडला B नाही, तर ती व्यक्ती B पर्यायांमध्ये काय दोष आहे हे वाढवून सांगेल आणि A पर्यायामधील दोषांकडे दुर्लक्ष्य करेल. तसेच A चे गुण वाढवून सांगेल आणि B चे गुण कमी.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे जर तुम्ही मोदींना मतदान केलंत तर नंतर तुम्हाला त्यांचे दोष कमी वाटतील राहुल गांधींचे जास्त. तसेच गुणांबद्दल, मोदींचे गुण फार जास्त वाटतील राहुल गांधींचे गुण फार कमी. तुम्ही त्यांच्या चुकीच्या कामांचे पण समर्थन कराल, कारण तुम्ही त्यांची निवड केली आहे.

जर तुम्ही राहुल गांधी मतदान केलंत तर नंतर तुम्हाला त्यांचे दोष कमी वाटतील मोदींचे जास्त. तसेच गुणांबद्दल, गांधींचे गुण फार जास्त वाटतील मोदींचे गुण फार कमी. तुम्ही त्यांच्या चुकीच्या कामांचे पण समर्थन कराल, कारण तुम्ही त्यांची निवड केली आहे.

Ambiguity Effect (अस्पष्टता प्रभाव)

लोक अशा पर्यायांची निवड करतात ज्यांच्या परिणामांची शक्यता त्यांना माहीत असते. ज्या परिणामांची शक्यता त्यांना माहीत नसते, ते निवडत नाहीत.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे म्युच्युअल फंड vs FD

म्युच्युअल फंड मध्ये परतावा जास्त येऊ शकतो हे माहीत असते. पण मार्केटच्या लहरीपणामुळे अनिश्चितता निर्माण होते. त्यामुळे लोक FD मध्ये कमी परतावा निवडतात, पण म्युच्युअल फंड नाही.

Confirmation Bias (पुष्टीकरण पूर्वाग्रह)

पुष्टीकरण पूर्वाग्रह म्हणजे एखाद्याच्या आधीच्या वैयक्तिक श्रद्धा किंवा मूल्यांची पुष्टी किंवा समर्थन करणारी माहिती शोधणे. किंवा माहितीचा अशा प्रकारे अर्थ लावणे की आपले आधीचे पूर्वाग्रह सिद्ध होतील. अशीच माहिती आठवणे जी आपले बोलणे खरी करेल.

उदाहरण

जर तुम्हाला नरेंद्र मोदी आवडत असतील तर तुम्ही गूगलवर मोदी चांगले का आहेत किंवा त्यांनी घेतलेले निर्णय चांगले का आहेत ? ही माहिती शोधाल.

जर तुम्हाला नरेंद्र मोदी आवडत नसतील तर तुम्ही गूगलवर मोदी चांगले का नाहीत किंवा त्यांनी घेतलेले निर्णय चांगले का नाहीत ? ही माहिती शोधाल.

Ostrich effect (शहामृग प्रभाव)

गुंतवणूकदारांनी नकारात्मक माहिती दुर्लक्षित करणे. संकट आले की शहामुर्ग आपले तोंड जमिनीत घालतात, अशी म्हण आहे. ह्या पूर्वाग्रहाचे नाव ह्या धारनेवरूनच आले आहे. वास्तविक पाहत शहामुर्ग असे काही करत नाही, ही फक्त एक म्हण आहे.

बाजारातील मंदीत, लोक त्यांच्या गुंतवणूकीवर नजर ठेवणे किंवा पुढील आर्थिक बातमी शोधणे टाळतात.

Disposition effect

ज्या शेयर ची किंमत वाढली आहे तो विकण्याचा विचार करणे आणि जो शेयर वाढला नाही तो ठेवण्याचा. मानवाची प्रवृत्ती अशी असते की त्याला त्याच्या सर्व शेयर मधून चांगला परतावा येण्याची अपेक्षा असते. त्यामुळे जे शेयर वाढले नाही किंवा कमी झालेत ते शेयर तो विकत नाही. याउलट जे शेयर वाढले आहेत ते तो विकून टाकतो. वाढलेला शेयर अजून वाढण्याची संधी असताना देखील.

Dunning–Kruger effect

कमी हुशार लोक स्वतःला जास्त हुशार समजतात, याउलट जास्त हुशार लोक स्वतःला कमी हुशार समजतात.

“तुम्ही अक्षम असाल तर तुम्ही अक्षम आहात हे तुम्ही समजू शकत नाही …”
– Dunning

कमी हुशार लोक त्यांच्या अज्ञानामुळे स्वतःला ज्ञानी समजतात.

Anchoring Bias

निर्णय घेताना एका विशिष्ट गुणावर किंवा माहितीच्या तुकड्यावर (किंवा त्या विषयावर घेतलेल्या माहितीच्या पहिल्या भागावर) खूप जास्त अवलंबून राहण्याची प्रवृत्ती.

समजा एक व्यक्ती आहे त्याने त्याच्या बद्दल चांगल्या गोष्टी तुम्हाला आधी सांगितल्या आणि वाईट गोष्टी नंतर. तुमचा मेंदू चांगल्या गोष्टींवर लक्ष्य देईल.

समजा दुसऱ्या व्यक्तीने  त्याच्या बद्दल वाईट गोष्टी तुम्हाला आधी सांगितल्या आणि चांगल्या गोष्टी नंतर तर तुमचा मेंदू वाईट गोष्टींवर लक्ष्य देईल. याला म्हणतात Anchoring Cognitive Bias.

Anthropomorphism मानववंशशास्त्र

इतर गोष्टींना मानवासारख्या भावना आहेत असे समजणे. 

याचे उदाहरण म्हणजे देव आपल्यासारखाच दिसतो. तसेच देवालाही आपल्यासारख्या भावना आहेत, असे समजणे. देवता प्रेमात पडले, लग्न केले, मुले झाली, लढाया लढले, शस्त्रे चालवली आणि घोडे आणि रथ चालविले. देवतानांही आपल्या सारखा राग येणे, मत्सर वाटणे.

Bandwagon Effect

एखाद्या गोष्टीला जेवढी मान्यता मिळते, इतरांकडून तिला मान्यता मिळण्याची गती वाढते.

उदाहरण
ओपिनियन पोल मध्ये कोणती पार्टी जिंकणार आहे, हे पाहून अनेक लोक विजयी पार्टीसोबत जाण्याचा निर्णय घेतात. लोक त्यांची मते बहुमताच्या बाजूने बदलतात.

Ben Franklin effect

आपण सहसा मानतो की आपण कोणाला मदत केली तर तो आपल्याला मदत करेल. पण या विरुद्ध हे खरे आहे की जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला मदत केली तर तो परत तुम्हाला मदत करेल, अशा व्यक्तीपेक्षा की ज्याची मदत त्याने घेतली आहे.

उदाहरण

A ने B ची मदत केली. B ने C ची मदत केली तर पुढील वेळेस B मदत करायला A पेक्षा C ला निवडेल. A ला नाही A ने मदत करूनही.

आपल्याला कोण मदत करतं, ह्या पेक्षा आपण कोणाला मदत केली आहे, हे पुढील मदत आपण कोणाला करू या विषयामध्ये महत्वाचे आहे.

उलट

या प्रभावाच्या उलट एक प्रभाव आहे. ज्या लोकांसोबत आपण वाईट केले आहे, त्या लोकांना आपण वाईट ठरवतो. आपण केलेले वाईट कृत्य बरोबर आहे, हे सिद्ध करण्यासाठी आपण त्या लोकांना वाईट ठरवतो.

Bias Blind Spot

दुसऱ्यांच्या निर्णयांमध्ये Cognitive Bias आकलनात्मक पूर्वाग्रहांचा परिणाम ओळखणे. पण स्वतःच्या निर्णयामधील पूर्वाग्रहांचा परिणाम ओळखण्यास असमर्थ असणे.

85% अमेरिकन लोकांचा असा विश्वास आहे की ते सरासरी अमेरिकनपेक्षा कमी पक्षपाती आहेत.

लोकांना वाटतं की ते “कसे” आणि “का” निर्णय घेतात हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे पूर्वग्रह त्यांच्या निर्णयांच्या आड येत नाहीत.

Self-serving bias

म्हणजे जिंकल्यावर स्वतःला श्रेय देणे आणि हरल्यावर दुसऱ्यांना दोष देणे.

काही विद्यार्थी परीक्षेत चांगले मार्क मिळाल्यावर स्वतःला श्रेय देतात आणि खराब मार्क मिळाल्यावर प्रश्नपत्रिकेला किंवा शिक्षकांना. याला Self-serving bias म्हणतात.

Backfire Effect

जेव्हा तुम्ही लोकांना त्यांच्या विश्वासांविरूद्ध पुरावा देता ते लोक पुरावे नाकारू शकतात आणि त्यांचा विश्वास अधिक दृढ होतो.

https://en.m.wikipedia.org/wiki/List_of_cognitive_biases

https://study.com/academy/lesson/cognitive-bias-definition-examples-quiz.html#transcriptHeader

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.