Who Moved My Cheese Marathi हे पुस्तक Spencer Johnson यांनी लिहले आहे.
Who Moved My Cheese Marathi
ही कथा आहे चौघांची
२ उंदीर : स्निफ आणि स्करी,
२ माणसं : हेम आणि हॉ यांची.
ही माणसं उंचीला उंदरां एवढीच असतात. ही चौघे जिथे राहत तिथे एक भूलभुलैया होती. या चौघांना चीज आवडायचे, हे चीज त्यांना भूलभुलैया मध्ये सापडत असे.
रोज सकाळी उठून भूलभुलैया मध्ये जाऊन चीज शोधणे हे त्यांचे रोजचे काम होते.
ते दररोज सकाळी उठायचे. आपला जॉगिंग सुट आणि स्पोर्ट शूज चढवून आपल्या आवडत्या ‘चीज’च्या शोधात भूलभुलैयात जायचे.
एके दिवशी त्या सर्वांना त्यांचं ‘चीज’ मिळालं. भूलभुलैयातल्या ‘सी’ स्टेशनजवळ त्यांना त्यांच्या आवडीचं भरपूर चीज सापडलं.
सुरुवातीला हेम आणि हॉ ही दोन छोटी माणसं, चीज खाण्यासाठी ‘सी’ स्टेशनजवळ धावतपळत जात. पण काही कालावधीनंतर मात्र या दोन छोट्या माणसांची दिनचर्या बदलली. ते कमालीचे आळशी बनले. सकाळी उशिरा उठणं, रमतगमत आवरणं, आरामात कपडे घालणं आणि मग ‘सी’ स्टेशनकडे जाण्यासाठी प्रवास सुरू करणं… असा त्यांचा दिनक्रम बनला होता. कारण आता त्यांना चीज नेमकं कुठं आहे, हे समजलं होतं.
या ठिकाणी चीज नेमकं कुठून आलं, ते इथं कोणी आणून ठेवलं याविषयी त्यांना मुळीच माहिती नव्हती.
Who Moved My Cheese Marathi
तुमचं चीज तुमच्यासाठी जितकं महत्त्वाचं असतं, तितके तुम्ही त्यावर अवलंबून राहता.
काळ पुढे जात होता… पण स्निफ आणि स्करी या दोन उंदरांनी मात्र त्यांच्या दिनचर्येत थोडाही बदल केला नाही. त्यांचा दिनक्रम पूर्वीसारखाच सुरू होता.
ती दोन उंदरं अशाच एका सकाळी नेहमीप्रमाणे ‘सी’ स्टेशनजवळ आली. पाहतात तर काय, तिथलं चीज आता गायब झालं होतं. पण याचं त्यांना मुळीच आश्चर्य वाटलं नाही. कारण तिथं असणारं चीज दररोज थोडं थोडं कमी होत चाललंय, हे स्निफ आणि स्करी यांना माहिती होतं. त्या दोन उंदरांनी भूलभुलैयात चीज शोधण्याचा निर्णय घेतला.
हेम आणि हॉ ही दोन्ही माणसं ‘सी’ स्टेशनजवळ आली. तिथं चीज नसल्याचं पाहताच त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. हा त्यांच्यासाठी आश्चर्याचा दुःखद आणि जबर धक्का होता. चीज नेमकं गेलं कुठे, हे त्यांना मुळीच समजेना. आयुष्यभर इथंच चीज मिळणार, हे त्यांनी जणू गृहीतच धरलं होतं.
इकडे हेम आणि हॉ आरडाओरडा करण्यात वेळ दवडत होते; तर तिकडे स्निफ आणि स्करी मात्र नव्या चीजचा शोध घेत उत्साहानं पुढं जात होते.
हेम आणि हॉ रोज ‘सी’स्टेशन वर येत आणि चीज आले आहे का पाहत. चीजची वाट बघत आणखी काळ घालवला, तर आपली स्थिती अत्यंत बिकट होईल, याची हॉला खात्री पटली होती. एके दिवशी तो स्वतःशीच हसत म्हणाला, “हाऽऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ किती वेडा आहे ना मी? मी पुन्हापुन्हा एकच गोष्ट करतोय आणि तरीही मला नवीन परिणाम का प्राप्त होत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त करतोय!”
हॉने एकेदिवशी नवीन चीज भूलभुलैया मध्ये शोधण्याचे ठरवले. “पण इतरत्र कुठेच चीज नसेल तर? आणि असूनही तुला ते शोधता आलं नाही तर?” हेमनं आपल्या मनातली शंका व्यक्त केली. हॉने त्यावर उत्तर दिले “कित्येक वेळा गोष्टी बदलतात आणि परत कधीच पूर्वीसारख्या होत नाहीत. आपल्यासोबतही हेच घडतंय हेम… हेच तर जीवन आहे. जीवन नेहमी पुढं जात असतं आणि आपणही त्याच्यासोबत मार्गक्रमण केलं पाहिजे.”
हॉला प्रश्न पडला, “त्या ठिकाणाहून चीज पुढं गेलं खरं; पण मी चीजसोबत पुढं का नाही गेलो?
Who Moved My Cheese Marathi
भीती वाटत नसती तर आता तू काय केलं असतंस?”
हॉने आता भूलभुलैया मध्ये नवीन चीज चा शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी हॉला एके ठिकाणी काही चीज मिळालं. पण ते खूप दिवसांसाठी पुरेल एवढं मात्र मुळीच नव्हतं. जसजसा काळ पुढं सरकत होता, तसतसा हॉच्या मनात विचार येऊ लागला, ‘चीज मिळवण्याची माझी इच्छा कधी बरं पूर्ण होईल? मी लहान तोंडी मोठा घास तर घेत नाहीये ना!’ ‘सी’ स्टेशनकडे परतावं, असंही त्याला क्षणभर वाटलं. तिथं मला हेम भेटेल आणि माझं एकाकीपण नाहीसं होईल. असा विचार मनात येताच हॉनं स्वतःला प्रश्न विचारला-‘समज, तुला भीती वाटत नसती, तर आता तू काय केलं असतंस?’
नव्या दिशेनं वाटचाल केली की चीज शोधण्यास मदत होते.
आता हॉ एका अंधाऱ्या गल्लीजवळ आला होता. त्यानं त्या गल्लीतून खाली पाहिलं. त्याला पुन्हा भीती वाटू लागली. ‘पुढं काय होईल? सगळी चीज स्टेशन्स रिकामी तर नसतील ना? इथं माझ्या जिवाला काही धोके तर नसतील?’ हॉच्या मनात भितीदायक विचारांची गर्दी होऊ लागली. नंतर तो स्वतःशीच हसला. भितीमुळे माझी परिस्थिती खूपच बिकट होत आहे, हे लक्षात आल्यावर त्यानं तेच केलं, जे त्यानं भीती वाटली नसती तर केलं असतं! त्यानं नवीन दिशा पकडली.
Who Moved My Cheese Marathi
तुम्ही जेव्हा तुमच्या भीतीवर विजय मिळवता, तेव्हाच तुम्ही खरं स्वातंत्र्य अनुभवता.
काही दिवसानंतर हॉ ‘सी’ स्टेशनकडे परतला. त्याची हेमशी भेट झाली. त्यानं हेमला चीजचे काही तुकडे देऊ केले. पण हेमनं मात्र ते घेतले नाहीत. हेमनं हॉचं स्वागत तर केलं, पण तो कुत्सितपणे म्हणाला, “नवीन चीज आवडेल असं मला तर वाटत नाही. मला त्याची सवय नाही. मला माझं आधीचंच चीज मिळावं, अशी माझी इच्छा आहे. जोपर्यंत ते मिळत नाही, तोपर्यंत मी बदलणार नाही.”
जितक्या लवकर जुनं चीज सोडाल, तितक्या लवकर नवीन चीज शोधू शकाल!
हॉला आधी नवीन चीज मिळवण्याची इतकी भीती वाटत होती की, ते शोधण्याची तो सुरुवातच करू शकत नव्हता. पण प्रत्यक्ष शोधण्याची कृती केल्यावर मात्र हॉला गरजेपुरतं चीज मिळू लागलं.
‘एन’ स्टेशनमध्ये हॉला नवीन चीज मिळालं. ‘मी स्वप्नात तर नाही ना?’ हॉला क्षणभर काही सुचेनाच. पण ही अवस्था क्षणभरच होती. कारण तिथं हॉला त्याचे जुने मित्र स्निफ आणि स्करी भेटले.
या कथेचा बोध काय ? आणि तो आपण वास्तविक जीवनात कसा अमलात आणू शकतो ? हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक खाली दिलेल्या लिंक वरून विकत घेऊ शकता.
पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा. पुस्तक नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या.
Who Moved My Cheese Marathi
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.