व्यावहारिक म्हणी आणि सखोल मनन हा लेख Vizi Andrei यांच्या ECONOMY OF TRUTH Practical Maxims and Reflections ह्या पुस्तकावर आधारित आहे.
व्यावहारिक म्हणी आणि सखोल मनन
चांगले तत्ववेत्ता सिद्धांतापासून सुरुवात करतात आणि शेवट कृतीने. महान तत्त्वज्ञ कृतीपासून सुरवात करतात आणि शेवट सिद्धांताने.
जोखीम न घेणारी बुद्धिमत्ता म्हणजे वाया घालवलेली प्रतिभा.
जो व्यक्ती फक्त ज्ञान गोळा करायचे म्हणून गोळा करतो, तो त्या नाविकासारखा आहे जो समुद्रात तहानेने मरतो. त्याने कितीही पाणी पिले तरीही तो नेहमी तहानलेला असतो.
“सत्याविन दया म्हणजे खुशामत, आणि दयेविन सत्य म्हणजे अनादर.”
तर्कशुद्धतेने बहकलेले
जे लोक तर्कशक्तीची उपासना करतात ते बॉक्सच्या बाहेरचा विचार करत नाहीत; ते एका बॉक्समध्ये जग बसवतात.
आपण फक्त त्यांनाच “मुक्त विचाराचे” समजतो जे आपल्यालाशी सहमत असतात. क्वचितच आपण अशा लोकांना मुक्त विचाराचे म्हणतो जे आपल्या विश्वासांशी असहमत असतात.
मानवी मन सत्य आणि अचूकतेचा शोध घेत नाही; ते अर्थ शोधते.
जीवनात, जर तुम्ही “तर्कसंगत” व्हायचे ठरवले तर तुम्ही धोकादायक ठरू शकत नाही. तुम्ही कमकुवत असता – कारण तुम्ही काय करणार याचा अंदाज लावणे शक्य होते.
तुम्ही एकाच वेळी विज्ञान आणि धर्माची प्रशंसा करू शकत नसल्यास, तुमचे जीवन फार भीतीदायक असेल.
युक्तिवाद जिंकण्यासाठी तर्कशास्त्रावर अवलंबून रहा. जीवनात जिंकण्यासाठी तर्कशास्त्र नाकारा.
एकदा माझ्या मूल्यांवर आक्रमण झाल्यावर माझ्या भावना दु:खी होतात. त्या माझ्या “तर्कशुद्ध” मनाला ईमेल पाठवण्यास सुरवात करतात, “आमचा बचाव कर”.
सुख आणि दुखः
कमीत कमी मध्ये जगण्याचा प्रयत्न करा, स्वातंत्र्याची चव चाखायला मिळेल.
मानवाची सर्वात मोठी उपलब्धी – व्यस्त माकडाची, काहीही न करता तासनतास घालवणे.
जो त्रास सहन करण्याला प्राधान्य देतो तो तणावग्रस्त विचारांवर विश्वास ठेवतो. जो त्रास सहन न करण्यास प्राधान्य देतो तो तणावग्रस्त विचारांना प्रश्न करतो.
श्रीमंत होण्यापूर्वी आनंदी व्हायला शिका.
आधुनिकतेचा छुपा शाप
विपुल जगात उत्पादकता म्हणजे वाईट सवयी दूर करणे; नंतर चांगल्या सवयी जोडणे.
विपुल जगात ज्ञान माहिती गोळा करणे नाही, तर गाळणे आहे.
विपुल जगात शिस्त हे नवीन स्वातंत्र्य आहे.
विपुल जगात – कमी जास्त आहे; आणि जास्त कमी आहे.
कायदा आणि धर्म कल्पनारम्य आहेत, परंतु ते खोटे नाहीत.
माहितीच्या तुटवड्यास सामोरे जाताना आपले मन मोकळे ठेवणे हेच उत्तम मानसिक मॉडेल आहे. विपुल प्रमाणात माहिती असताना, उत्कृष्ट मानसिक मॉडेल म्हणजे आपले मन बंद करणे – उघडण्यायोग्य खिडक्यांद्वारे.
बर्याच नास्तिकांसाठी, विज्ञान खरं तर धर्माची आधुनिक आवृत्ती आहे. ते विज्ञानाला प्रश्न विचारत नाहीत – त्यावर विश्वास ठेवतात.
राजकारणी काय म्हणतो याकडे लक्ष देऊ नका; तो काय करतो यावर लक्ष द्या.
मूर्ख आणि “शिक्षित”
जे तत्वज्ञ केवळ तत्वज्ञान वाचतात ते मूर्ख तत्त्वज्ञ असतात.
अशिक्षित मुर्खांना जेव्हा तपशिलात जाण्याची गरज असते तेव्हा ते सामान्यीकरण करतात; सुशिक्षितांना जेव्हा सामान्यीकरण करण्याची आवश्यकता असते तेव्हा ते तपशिलात जातात.
एखाद्या लेखकाने एखादी अवघड कल्पना अशा प्रकारे व्यक्त करण्याचे लक्ष्य ठेवले, जेणेकरुन कोणताही मूर्ख ती समजू शकेल, तर त्याचे वास्तविक मूल्य कमी होते. त्या कल्पनेचे नाजूक आणि सूक्ष्मभेद काढून टाकल्यामुळे कल्पनेचे अवमूल्यन होते. त्यामुळे ते लोकही चालले जातात जे या कल्पनेचे कौतुक करण्यास पात्र आहेत!
जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीस भेटले ज्याला सदैव मूर्ख अभिप्राय देण्याची सवय आहे, तर वाद घालू नका किंवा त्याचा अपमान करु नका. त्याच्या मूर्ख विधानांनंतर अधूनमधून “का” विचारा आणि त्याचा नाश पहा.
अशिक्षित मूर्ख आणि सुशिक्षित मूर्ख लोकांमध्ये फरक असा आहे की सुशिक्षितांनी त्यांचे बौद्धिक नपुंसकत्व मिळवण्यासाठी खरोखर कठोर परिश्रम केले.
रोबोट्स मधील एक कलाकार
तुम्ही वकील नाही, तुम्ही असे व्यक्ती आहात जे लोकांना कायदेशीर प्रकरणात व्यवहार करण्यास मदत करतात. तुम्ही डॉक्टर नाही, तुम्ही असे व्यक्ती आहात जे लोकांचे जीवन वाचवितात किंवा त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी योग्य सल्ला देतात.
तुमच्या ओळखीमध्ये एक क्रियापद जोडा – ते तुम्हाला समजूतदार ठेवते; एक आडमुठे नाव नाही – जे केवळ तुमच्या अहंकारास चालना देईल; असे आडमुठे नाव तुम्हाला तुमच्या कामापासून दूर नेते.
तुम्ही काहीतरी करणे आवश्यक आहे, काहीतरी होणे नाही.
एक चांगला लेखक आपले शब्द काळजीपूर्वक निवडतो. एक महान लेखक शब्दांना त्याला निवडू देतो.
“नीतिशास्त्र, कायद्याच्या शालेय अभ्यासक्रमाचा भाग नाही.“
लोकसंख्या जितकी मोठी असते तितकाच लोकांमधील विश्वास कमी असतो.
तुमचा तुमच्या आईवर जितका विश्वास आहे तितका विश्वास तुमच्या केंद्र सरकारवर असेल तर तुम्ही एक वेडे आहात.
शॉवरमध्ये आपल्याला क्रिएटिव्ह विचार येतात कारण की ते इतके निम्न-स्तरीय काम आहे की मन पूर्णपणे व्यस्त नसते. हे आधुनिक जीवनातील एकमेव ठिकाण आहे जिथे आपल्याला स्वतःसोबत वेळ मिळतो, नाहीतर इतर वेळी आपण काही ना काही करण्यात व्यस्तच असतो.
जीवन म्हणजे जंगल – इथे कोणतेही नियम नाहीत; फक्त जिवंत राहणे सर्वकाहीआहे.
वरील वास्तविक म्हणी आणि सखोल मनना बद्दल अजून जाणून घ्यायचे असल्यास खालील लिंक वरून हे पुस्तक विकत घ्या.
पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा. पुस्तक नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या.
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.