ZERO EMI ह्या Ra Ma. Palaniappan यांच्या पुस्तकात आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवावे हे सांगितले आहे.
ZERO EMI
कर्ज हे धोकादायक आहे
न कमावलेले पैसे खर्च करणे म्हणजे कर्ज.
भविष्यातील उत्पन्नातून आपण कर्ज फेडू असा पण विचार करतो. पण भविष्यात उत्पन्नच नसेल तर ?
जेव्हा कर्जाचा विचार केला जातो तेव्हा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे “व्याज”. मित्रांनो, आयटीमधील लोकांप्रमाणेच व्याजही झोपत नाही.
संपत्ती सुट्टी घेते, परंतु कर्ज नाही.
तेच पैसे खर्च करा जे कमावून झाले आहेत.
चांगले कर्ज विरुद्ध वाईट कर्ज
जर तुम्ही एखाद्या अशा वस्तूसाठी कर्ज घेत असाल ज्याचे मूल्य वाढेल, तर ते चांगले कर्ज आहे.
उदाहरणार्थ: गृहनिर्माण कर्ज, व्यवसाय कर्ज आणि शैक्षणिक कर्ज.
जर तुम्ही एखाद्या वस्तूसाठी कर्ज घेत असाल ज्याचे मूल्य कमी होईल, तर ते वाईट कर्ज आहे.
उदाहरणार्थ: घरगुती उपकरणे, मोबाइल फोन आणि कार.
“० टक्के ईएमआय लोकांना परवडत नसलेल्या वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त करते. लवकरच, ० टक्के ईएमआयने खरेदी करण्याची सवय लागते आणि लोक त्यांच्या पगाराचा एक मोठा भाग अनेक ईएमआय भरण्यासाठी वापरतात.”
बँका किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थांचा मुख्य व्यवसाय म्हणजे कर्ज देणे आणि व्याज मिळविणे. व्याजाचे फक्त नाव बदलते जसे की प्रोसेससिंग फी, पण परिणाम नाही.
मोबाइल फोन विकत घेण्यासाठी कर्ज घेणे हे एक वाईट कर्ज आहे आणि ते टाळले जाणे आवश्यक आहे. सर्वात महागड्या फोनवर भरपूर आणि भरपूर सुविधा असतात. क्वचितच आपण ह्या सुविधा वापरतो. आपण वापरत नाही अशा सुविधा खरेदी करण्यासाठी इतके पैसे का खर्च करावे? तसेच, मोबाईल फोन ची किंमत नेहमी कमी होत जाते, वाढत नाही.
ऋण सापळा
जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात तेव्हा आपोआपच तुम्ही दुसर्या कर्जासाठी अर्ज करता. अशाप्रकारे लोक हळूहळू कर्जाच्या सापळ्यात अडकतात.
कर्ज घेऊन शेअर मार्केटमध्ये येण्याचा तुमचा विचार असेल तर तो सोडून द्या.
गृह कर्ज
“घराची मालकी असणे, आता आनंद देत नाही कारण बहुतेक मालकीची घरे अपार्टमेंट आहेत. तळ तुमचा नाही; छप्पर तुमचे नाही; भिंत तुमची नाही आणि तुम्हाला जमिनीचा एक छोटासा वाटा मिळतो.”
चाळीस वर्षाअगोदर लोक घर कसे खरेदी करत होते तुम्हाला माहित आहे का ?
“आधी लोक निवृत्त झाले का घर बांधायचे आता नोकरी लागली की.”
क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्ड हे बँकेचे सर्वात फायदेशीर उत्पादन आहे.
जरी अचूक बिले तयार करणे ही क्रेडिट कार्ड कंपन्यांची जबाबदारी असली, तरीही बिल तपासणे आपले कर्तव्य आहे.
कमी उत्पन्न आणि जास्त कर्ज असले की नैसर्गिकरित्या नवीन कर्ज घेणे हाच उत्तम उपाय वाटतो. पण तो योग्य नाही.
कार लोन
भारतासारख्या शेतीप्रधान देशात ट्रॅक्टर लोन पेक्षा कार लोन का स्वस्त आहे ?
कारशी बर्याच भावना आणि अभिमान जोडलेले असतात. भारतातील मध्यमवर्गीय आणि उच्च-मध्यम-वर्गातील कुटुंबे या भावना आणि अभिमानाशी जुळलेले आहेत. त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसले तरीही कार खरेदी करण्यास तयार आहेत.
वैयक्तिक कर्ज
वैयक्तिक कर्ज बँकांद्वारे नोकरदार व्यक्तींना दिले जातात कारण ती परत येण्याची हमी जास्त असते.
अनपेक्षित घटनांसाठी तयार असणे, वैयक्तिक कर्ज टाळण्याचा हाच एकमेव उपाय आहे.
कर्ज कसे कमी करावे?
“बर्याच कंपन्या दरवर्षी वार्षिक बोनस, एकरकमी रक्कम देतात. त्या पैशाचे तुम्ही काय करता? तुम्ही लवकर कर्जाची परतफेड करण्यासाठी त्या पैशाचा वापर करू शकता.”
“तुम्ही तुमच्या सर्व खर्चांचा हिशोब ठेवता का ?” पैशाची बचत कशी करावी ? हा लेख वाचू शकता.
जेव्हा व्यक्ती कर्ज पटकन कमी करण्याचे ध्येय ठेवतो तेव्हा त्याला ते कमी करण्याचे मार्ग सापडतात.
पुनर्रचनासारखे काहीतरी केले जाऊ शकते हे बर्याच जणांना ठाऊक नसते आणि आपण जाऊन बँकांशी वाटाघाटी करू शकतो. होय, तुम्ही खरोखर जर कर्ज फेडण्यासाठी संघर्ष करत असाल तर तुम्ही बँकांशी बोलणी करू शकता.
आपले कर्ज कमी करण्याचे आणि शून्य ईएमआय मिळवण्याचे तीन मार्ग १. परतफेड २. वेळेआधी फेडणे आणि ३. पुनर्रचना
कर्ज कसे टाळावे ?
१. खर्चांचा हिशोब ठेवा.
२. अनावश्यक खर्च बंद करा.
३. आरोग्य विमा घ्या.
४. आपत्कालीन निधी तयार करा.
पैसे व्यवस्थापन
एकदा मुलाची कमाई सुरू झाली की पालक पैशाविषयी व्याख्याने देण्यास सुरुवात करतात. पण असे न करता लहान वयातच शिक्षणाच्या रूपाने सल्ले व व्याख्याने देणे सुरू केले तर ?
तुम्ही तुमच्या मुलांना पैशाबद्दल शिकवण्यास प्रारंभ का करत नाही?
आपण करू शकणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जीवनशैली-संबंधित कर्ज जसे की नवीन मोबाइल खरेदी करणे, भव्य सुट्टी यांना नकार देणे.
कर्ज न घेता, फक्त कमवलेल्या पैशात जगण्याचा तुमचा निर्धार असला पाहिजे. यामुळे आर्थिक स्वातंत्र्याकडे तुम्ही मोठी झेप घ्याल.
तुमच्याकडे बरीच कर्ज असल्यास, लेखक नेहमीच उच्च-व्याज कर्जाची परतफेड करण्यास सूचवितो.
“जेव्हा महिला स्वतःहून आर्थिक व्यवहार करतात तेव्हा त्या पुरुषांपेक्षा चांगले काम करतात. महिला माहितीच्या आधारे निर्णय घेतात, तर पुरुष बहुतेक वेळा आवेगात निर्णय घेतात.”
सोन्यात गुंतवणूक करावी का ?
तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये तुम्ही सोन्याला जागा देऊ शकता. विशेषतः जेव्हा तुमची गुंतवणूक शेअर किंवा इक्विटी मध्ये असते तेव्हा. कारण सहसा सोने आणि शेअर मार्केट विरुद्ध दिशेला जातात.
घर कॅशमध्ये घ्यावे की कर्जाने ?
तुमच्याकडे घर खरेदी करण्यास पैसे नसतील तर गृह कर्ज घेण्यावाचून तुमच्याकडे पर्याय नाही. गृह कर्ज एक चांगले कर्ज आहे. पण घर तुम्ही गुंतवणुकीच्या उद्देशाने घेत असाल तर तुम्ही ते कुठे विकत घेता हे महत्त्वाचे आहे. राहण्यासाठीचे गृह घेणे योग्य आहे.
मग तुम्हाला जर ZERO EMI चे उद्देश पूर्ण करायचे असेल तर हे पुस्तक खाली दिलेल्या लिंकवरून नक्की विकत घ्या.
पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा. पुस्तक नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या.
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.
1 thought on “ZERO EMI तुमचे आर्थिक स्वातंत्र्य अनलॉक करा.”