PSU Mutual Fund हे सरकारी कंपनींमध्ये मुखत्वे गुंतवणूक करतात. PSU म्हणजे काय ? Public Sector Undertaking. अशा कंपनी ज्यांचे स्वामित्व सरकारकडे असते, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार, किंवा दोन्ही सरकार मिळून.
वरील फोटो वरून तुम्हाला असे दिसून येईल की २०११ मध्ये ज्यांनी या इंडेक्स मध्ये ७३०० गुंतवले होते त्यांची रक्कम २०२० मध्ये जवळपास ६६०० एवढी होती.
१० वर्षांनी सुद्धा Negative परतावा असताना मग या फंड मध्ये गुंतवणूक का करावी ?
मग या फंड मध्ये गुंतवणूक का करावी ?
वॉरेन बफेट यांनी श्रीमंत होण्याचे रहस्य सांगितले आहे. जेव्हा इतर लोक घाबरतात तेव्हा लोभी व्हा. १० वर्षांपासून या फंडने जवळपास ०% परतावा दिला आहे. त्यामुळे यात क्वचितच कोणी गुंतवणूक करण्यास इच्छुक असेल. त्यामुळेच या फंड मध्ये गुंतवणूक करण्याची कदाचित ही संधी आहे.
हेड आले तर मी जिंकेल, टेल आले तर मी जास्त गमावणार नाही, हा सिद्धांत धंधो या पुस्तकात सांगितला आहे.
या इंडेक्स चा PE Ratio ९.७७ आहे तर PB Ratio ०.८१ Dividend Yield 3.85 आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने ह्या गोष्टी चांगल्या आहेत.
वर्ष २००८ ते २०१९ जवळपास १० वर्षे सोन्याची किंमत ३०,००० ₹ च्या जवळपास होती आणि एका वर्षात ती ५०,००० ₹ पर्यंत गेली. या फंड बाबतीत हे असे होऊ शकते. किंवा होऊही शकत नाही. या फंड मध्ये चांगला परतावा येईलच असे कोणीच खात्रीशीर सांगू शकत नाही. कारण म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारजोखिमेच्या अधीन असते.
सरकारचे आता धोरण आहे की फार कमी सरकारी कंपनी असाव्यात. खाजगीकरणावर सरकारचा जास्त भर आहे. खाजगीकरण झाल्यास कंपन्यांंचे मूूल्य वाढण्याची शक्यता असते.
PSU Mutual Fund
हे फंड Thematic/Sectoral या प्रकारात मोडतात. Thematic/Sectoral फंड मध्ये जोखीम अतिशय जास्त असते. कारण त्यांच्यावर एका समान गोष्टीचा जास्त प्रभाव असतो, जसे इथे सरकारी धोरण. गुंतवणूक ही मुखत्वे सरकारी कंपनींमध्ये असल्यामुळे. PSU Mutual Fund चा उद्देश दीर्घ अवधी मध्ये पैसे वाढविणे असतो.
जोखीम जास्त असल्यामुळे तुमची पूर्ण गुंतवणूक पूर्णपणे याच फंड मध्ये करू नका. Thematic/Sectoral फंड हे तुमच्या पोर्टफोलिओच्या १०% पेक्षा जास्त नसावे, अशी सामान्य धारणा आहे.
एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा यात पुढील १ वर्ष SIP करणे योग्य राहू शकते. जो व्यक्ती पुढील १ वर्ष SIP करून किमान ५ वर्ष तरी वाट पाहू करू शकतो, त्याच्यासाठी हा फंड योग्य राहील असे मला वाटते. या क्षेत्रात गुंतवणूक करणारे २ फंडबद्दल आपण खाली माहिती पाहू.
SBI PSU FUND
हा फंड किमान ८०% गुंतवणूक ही PSU किंवा त्यांच्या सहाय्यक कंपन्या मध्ये करतो. उर्वरित २०% रक्कम इतर कंपन्या किंवा डेट वा मनी मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो.
फंड मॅनेजर – Mr. Richard D’souza (२६ वर्षांचा अनुभव)
Benchmark: S&P BSE PSU INDEX
Exit load: १ वर्षाआधी पैसे काढल्यास १%
किमान गुंतवणूक: एकरकमी प्रथम ५,०००₹. आणि त्यानंतर १०००. SIP – मासिक ५,००₹
गुंतवणूक ही मुखत्वे मोठ्या कंपन्यांमध्ये (Large Cap) आहे.
गुंतवणूक ही मुखत्वे आर्थिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये (Financial Services) आहे.
गुंतवणूक ही मुखत्वे SBI मध्ये आहे.
हा फंड विकत घेण्यासाठी तुम्ही खालील लिंक वर क्लीक करा.
Aditya Birla Sun Life PSU Equity Fund
फंड मॅनेजर – Mr. Mahesh Patil & Mr. Vineet Maloo अनुभव अनुक्रमे २७ आणि ११ वर्ष
Benchmark: S&P BSE PSU TR INDEX
किमान गुंतवणूक: ५००₹ एकरकमी किंवा SIP
Exit load: ३० दिवसांआधी पैसे काढल्यास १%
हा फंड विकत घेण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.
Aditya Birla Sun Life PSU Equity Fund
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.
Past performance may or may not be sustained in future and same may not necessarily provide the basis for comparison with other investment.
पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.
1 thought on “PSU Mutual Fund मध्ये आता गुंतवणूक करावी का ?”