Value Investing and Behavioral Finance By Parag Parikh Marathi

Value Investing and Behavioral Finance पराग पारीख यांनी हे पुस्तक लिहले आहे. Stocks to Riches हे यांचे दुसरे प्रसिध्द पुस्तक आहे.

जीवनात आपले यश आपल्या आत्म-जागरूकतेवर अवलंबून असते. जितके आपण स्वतःला ओळखतो तितकी आपली वैयक्तिक वाढ होते. जीवनातील सर्व समस्या, पैशांच्याही, मानवाच्या त्वरित तृप्त होण्याच्या मूलभूत प्रवृत्तीमुळे जन्माला येतात. म्हणजेे आपल्याला फक्त श्रीमंत व्हायचं नसतं तर लगेच श्रीमंत व्हायचं असतं.

संयमाची कमतरता हे आर्थिक अपयशाचे प्रमुख कारण आहे.

Value Investing and Behavioral Finance

गुंतवणूक करणे सोपे आहे, परंतु इंडस्ट्रीने ते गुंतागुंतीचे बनवले आहे. झटपट संतुष्ट होण्याच्या नादात, गोंधळात टाकणारे गुंतागुंतीचे जाळे त्यांनी तयार केले आहे.

मार्केट हे त्यात सहभागी झालेल्या विविध लोकांच्या मतांच्या आधारे तयार होते.

गुंतवणुकीतील यश हे भावनिकदृष्ट्या कठीण मार्गाचे अनुसरण केल्याने प्राप्त होते. बाजाराच्या भावनेच्या आवेगात वाहून जाऊ नका.

वॉरेन बफे, चार्ली मंगर, पीटर लिंच यासारखे यशस्वी गुंतवणूकदार त्यांच्या यशाचे श्रेय केवळ त्यांच्या बौद्धिक क्षमतेलाच नाही तर त्यांच्या शिस्त आणि भावनिक नियंत्रणालाही देतात.

व्हॅल्यू इन्वेस्टिंगमधील भावनिक अडथळे

तुम्ही देता ती किंमत, तुम्हाला मिळतं ते मुल्य.

बेंजामिन ग्रॅहम

तेजीच्या काळात लोक कंपनीचा शेअर घेण्यासाठी अधिक किंमत देण्यास तयार असतात आणि मंदीच्या काळात ते खूपच कमी पैसे देण्यास तयार असतात. मंदीच्या काळात गुंतवणूकदारांच्या अपेक्षा जेव्हा कमी होतात, व्हॅल्यू गुंतवणूकदार तेव्हाच शेअरची खरेदी करतात.

ग्रोवथ स्टॉक इन्वेस्टिंग अंदाजावर, स्वप्नांनावर, भ्रमावर किंवा लोकप्रिय मतावर आधारित असते. त्यांना ‘स्वप्नांचे शेअर’ असे म्हणतात.

Contrarian Investing

सर्वसामान्य, चुकीच्या मताविरुद्ध जाऊन जो नफा कमावतो त्याला काँट्रॅरियन गुंतवणूकदार म्हणतात.

जर तुम्ही तुमच्या शेअरमध्ये पेपरवर ५०% नुकसान सहन करू शकत नाही तर मार्केट पासून दूर रहा.

वॉरेन बफेट

जगाचे शहाणपण शिकवते की तुमच्या प्रतिष्ठेसाठी पारंपरिकपणे हरणे, अपारंपरिकपणे हरण्यापेक्षा चांगले असते.

John Maynard Keynes

म्हणजे तुम्ही अप्पल चा शेअर घेऊन नुकसान झाले तर तुमची कमी निंदा होईल, एखादा स्मॉल कॅप घेऊन नुकसान होण्यापेक्षा.

IPO

आयपीओ जे गुंतवणूकीचे चांगल ठिकाण वाटतात, ते तसे नसतात. खरे तर आयपीओ हे असे उत्पादन आहे, जे गुंतवणूकदारांच्या हिताच्या विरोधात असते. कारण IPO हे चढत्या मार्केट मध्ये येतात, जेव्हा कंपन्यांना जास्त भाव मिळतो. अशा वेळेस स्टॉक गुंतवणूकदारांना विकणे कंपन्यांना फायद्याचा सौदा वाटतो. पुरावा दर्शवितो की मार्केटमध्ये येणाऱ्या बर्‍याच आयपीओ पैकी फारच थोडे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरतात. सुज्ञ गुंतवणूकदारांनी अशा प्रकारच्या संधी शोधण्यासाठी पडत्या मार्केटची वाट पाहणे आवश्यक आहे. IPO वेळी शेअर घेणे टाळा. बरेच लोक जे ipo वेळी स्टॉक घेतील ते काही काळाने तुम्हाला कमी किमतीत विकतील.

Index Investing

एखादी कंपनी निर्देशांकात येते कारण ती चांगली आहे म्हणून नाही तर त्याचे बाजार भांडवल जास्त आहे म्हणून.

इतर विकतात ते विकत घेणे आणि इतर खरेदी करतात ते विकणे, हेच यशस्वी गुंतवणूक आहे.

लोकांच्या विचारसरणीच्या विरोधात जाऊन दिर्घकाळात पैसे बनतात.

Bubble Trap

अत्यधिक आशावाद आणि अति आत्मविश्वास ही बबल तयार होण्याची मुख्य कारणे आहेत.

प्रत्येक नवीन बबल भूतकाळातील बबलपेक्षा कसा वेगळा आहे हे पटवून देणारी एक नवीन कथा असते.

जेव्हा स्टॉकच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकीत नफा दिसू लागतो, तेव्हा गुंतवणूकदार यशाचा, त्याच्या ज्ञानाशी आणि क्षमतेशी संबंध जोडू लागतो.

तुमच्या स्टॉकशी कधीही लग्न करू नका.

म्हणजे शेअरला जन्म भर चिकटून राहू नका, भावनिक होऊ नका.

व्हॅल्यू इन्वेस्टिंग बद्दल अजून शिकायचे असेल तर हे पुस्तक विकत घ्या.

फ्री pdf शोधणारे पूर्ण पुस्तक क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते. वरील लिंक वरून पुस्तक विकत घ्या.

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.