The Subtle Art Of Not Giving A F*ck Marathi हे पुस्तक मराठी मध्ये द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फ* या नावाने उपलब्ध आहे. घंटा फरक पडू न देण्याची कला यात सांगितली आहे. हे पुस्तक Mark Manson यांनी लिहले आहे.
पुढे वाचण्यापूर्वी एक सूचना, ह्या पुस्तकातील भाषा आणि उदाहरणे वयस्कर लोकांसाठी आहे. त्यामुळे मुलांना न वाचायला दिलेली बरे. तुम्हालाही अशी भाषा आवडत नसेल तर हे पुस्तक तुम्ही सोडू शकता.
आत्मसुधार आणि यश सहसा एकत्र येतात. परंतु याचा अर्थ असा नाही की ते एकच आहेत.
आत्मविश्वास असलेल्या माणसाला त्याचा आत्मविश्वास सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. श्रीमंत स्त्रिला तिची श्रीमंती सिद्ध करण्याची गरज वाटत नाही.
जग आपल्याला सतत सांगत असतं की चांगले आयुष्य जगण्याचा मार्ग म्हणजे अधिक, अधिक, अधिक. अधिक विकत घ्या, अधिक ताबा मिळवा, अधिक बनवा, अधिक संभोग करा, अधिक काहीतरी करा.
नवीन टीव्हीचा विचार करा. तुमच्या सहकाऱ्यांपेक्षा चांगली सुट्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. योग्य प्रकारच्या सेल्फी स्टिकची काळजी करा. का? कारण तुम्ही अधिक मिळवण्याचा प्रयत्न करणे व्यवसायांसाठी चांगले असते.
सोशल मीडिया
फेसबुक वर जेव्हा तुम्ही जाता, तुम्हाला कुणाचे तरी आनंदी फोटो दिसतीलच.
ते आनंदी जीवन जगत असताना तुम्ही घरी तुमच्या मांजरीला अंघोळ घालत असता. मग तुम्हाला वाटत की तुमचे आयुष्य किती निराशाजनक आहे.
तुम्ही ५ मिनिटं दुःखी असताना तुम्हाला शेकडो आनंदी लोकांचे फोटो फेसबुक वर दिसतात. मग तुम्हाला वाटत माझ्यात काहीतरी कमी आहे.
सुख मिळवण्याची इच्छा हा नकारात्मक अनुभव आहे. कारण सुख मिळवायचं म्हणजे तुम्ही आता दुःखी आहात, हे तुम्हाला स्वीकारावं लागतं.
तुम्ही किती पैसे कमविता याने फरक पडत नाही, तुम्हाला अधिक पैसे कमावण्याची इच्छा असेल तर तुम्हाला काहीतरी कमी वाटेल, जीवनात दुःख वाटेल.
The Subtle Art of Not Giving A F*ck
फरक न पडणे याचा अर्थ उदासीनता नाही; याचा अर्थ असा आहे की वेगळे असणे ठीक आहे.
अशी कल्पना करा की तुम्ही किराणा दुकानात रांगेत आहात आणि कॉउंटरवर एक म्हातारी भांडते आहे. त्या म्हातारीचे कूपन स्वीकारले जात नाही म्हणून ती भांडते आहे.
२०₹ च्या कूपन साठी ही महिला का भांडतेय असे तुम्हाला वाटेल. मी का ते सांगतो: कदाचित त्या म्हातारीकडे घरी कूपन कापण्याशिवाय दुसरे काहीही काम नाही. ती म्हातारी एकटी आहे. तिची मुलं हरामखोर आहेत आणि कधीच भेटत नाहीत. तीस वर्षांत तिने सेक्स केला नाही. ती पाठ न दुखता पादू शकत नाही. तिची पेन्शन संपत आली आहे. कदाचित ती बिछान्यात डायपरमध्येच मरणार. म्हणून ती कूपन गोळा करते. तिच्या जीवनात हेच महत्वाचे आहे. कारण दुसरे काही महत्त्वाचे तिच्या जीवनात उरले नाही आहे. जेव्हा १७ वर्षाचा कॅशिअर म्हातारीचे कूपन नाकारतो तेव्हा तिच्यातील ज्वालामुखीचा स्फोट होतो.
कॉउंटरवर भांडणारी म्हातारी, एक्स गर्लफ्रेंडचे फेसबुकचे फोटो, टीव्ही रिमोटची खराब बॅटरी किती आणि गमावलेला चांगला डिस्काउंट या सर्वांची तुम्हाला काळजी वाटत असेल तर समस्या ह्या गोष्टी नाहीत. समस्या आहे तुम्ही या समस्यांना महत्व देणं.
जेव्हा तुमच्याकडे कोणतीही समस्या नसते तेव्हा मन आपोआप समस्या शोधून काढतं. मध्यमवर्गीयांकडे काही खास समस्या नसतात, म्हणून ते क्षुल्लक गोष्टींना महत्त्व देतात.
जीवनात खरोखर काय महत्वाचे आहे जाणून घेणे फार आवश्यक आहे नाहीतर आपण फालतू गोष्टींना महत्त्व देतो, त्यात अडकून राहतो.
तुमच्या लक्षात आले आहे की तुम्ही कधी कर्करोग बरा करू शकणार नाही किंवा तुम्ही चंद्रावर जाणार नाही किंवा जेनिफर अनिस्टन सारखी स्त्री तुम्हाला मिळणार नाही. आणि हे ठीक आहे. आयुष्य पुढे जात राहते. आता तुम्ही तुमच्या जीवनात ज्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या आहेत कुटुंब, मित्र, त्याकडे लक्ष देता.
मग या पुस्तकाचा उद्देश काय ?
कधीकधी गोष्टी खराब होणे ठीक आहे. नाहीतर आपण नकळत स्वतःला दोष देणे सुरू करतो. तुम्हाला असे वाटू लागले आहे की तुमच्यात काहीतरी चुकीचे आहे, आणि अशा भावनेचा अतिरेक झाला की तुम्ही अशा गोष्टी करता, जसे की चाळीस जोड्या शूज खरेदी करणे किंवा भरपूर दारू पिणे किंवा मुलांनी भरलेल्या स्कूल बस गोळ्या झाडणे.
काही दु: ख न टाळण्यासारखे असतात. तुम्ही काहीही केले तरी जीवनात अपयश, तोटा, पश्चाताप आणि मृत्यू हे येणारच.
हे पुस्तक तुम्हाला कसे मिळवायचे हे शिकवणार नाही, तर कसे सोडायचे आणि जाऊ द्यायचे हे शिकवणार आहे.
आनंद ही एक समस्या आहे
कुटुंब नसलेले लोक, कुटुंब नसल्यामुळे दुःखी असतात; तर कुटुंब असलेले लोक कुटुंबामुळे.
तुमचा मेंदू शारीरिक वेदना आणि मानसिक वेदना यांच्यात फारसा फरक ओळखत नाही.
समस्या कधी संपत नाही त्या फक्त बदलतात. जीवन म्हणजे अंतहीन समस्या.
“या समस्येचा तोडगा हा पुढील समस्येचे कारण ठरतो.”
समस्या सोडवण्यात आपल्याला आनंद मिळतो.
तुमचे जीवन बदलण्याचा तुम्ही नेहमी प्रयत्न करीत असता परंतु प्रत्यक्षात जीवनात तुम्हाला जास्त फरक वाटत नाही.
तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न करता त्याच व्यक्तीची भांडता.
तुमची स्वप्नातील नोकरीच तुम्हाला ताण देते.
प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी त्याग करावा लागतो.
तुमचे संघर्ष निवडा
तुम्हाला जीवनात काय पाहिजे आहे?
प्रत्येकाच उत्तर असत की बिनधास्त जगायचं, आनंदी जगायचं, प्रेमात पडायचं, पैसा मिळवायचा, प्रसिद्धी मिळवायची, मान सन्मान मिळवायचा.
तुम्हाला जीवनात काय पाहिजे पेक्षा, तुम्हाला कोणता त्रास हवा आहे ? कोणता संघर्ष करायला तुम्ही तयार आहात ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
लोकांना चांगली बॉडी पाहिजे. परंतु त्यांना जिममध्ये तासन् तास व्यायाम करण्याच्या वेदना नको, जेवणावर ताबा नको.
स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. परंतु धोका, अपयश, अनिश्चितता, मेहनत नको.
लोकांना एक चांगला जोडीदार हवा. पण तुम्हाला भावनिक अशांतता नको, नकार नको, फोनची वाट पाहणे नको.
तुम्ही खेळला नाही तर तुम्ही जिंकू शकणार नाही.
तुम्ही वेदनामुक्त जीवन जगू शकत नाही. “तुम्हाला कोणती वेदना सहन करायची आहे?”
मला संघर्ष नको बक्षीस हवे. मला प्रक्रिया नको निकाल हवा. मला लढाई नको विजय हवा.
व्यायामशाळेच्या संघर्षाचा आनंद घेणारे लोकच मॅरेथॉन मध्ये पळतात, अँब्स बनवतात.
The Subtle Art Of Not Giving A F*ck Marathi
तुम्ही स्पेशल नाही
आपण सर्वजण बऱ्याच गोष्टींमध्ये साधारण असतो. तुम्ही जरी काही गोष्टींमध्ये असाधारण असला तरी इतर गोष्टींमध्ये सरासरीपेक्षा कमी असता. कोणत्याही गोष्टी मध्ये श्रेष्ठ होण्यासाठी वेळ द्यावा लागतो, मेहनत करावी लागते. त्यामुळे सर्वच गोष्टींमध्ये आपण असाधारण बनू शकत नाही.
हुशार व्यावसायिक लोक त्यांच्या वैयक्तिक जीवनात बऱ्याचदा चुका करतात. असाधारण खेळाडू बऱ्याच वेळा मूर्ख असतात.
“सरासरी” असणं हे अपयशाचे नवे प्रमाण बनले आहे.
एक दिवस तुम्ही आणि तुमच्यावर प्रेम करणारे सर्व मरतील. थोड्या अवधी नंतर तुम्ही अस्तित्वात होता हेही कोणाला माहीत राहणार नाही. हे जीवनाचे सत्य आहे. या ब्रह्मांडातील छोट्याश्या ग्रहावर काही क्षणाकरिता तुम्ही येता. आपणच आपले महत्त्व शोधून काढतो, आपणच आपला उद्देश शोधून काढतो, पण आपण काहीच नाही.
या ब्रह्मांडाला तुमच्या आईचे ऑपरेशन यशस्वी होईल का नाही याने फरक पडत नाही, नाही तुमची मुले कॉलेज ला जातील का नाही याने. ब्रह्मांडाला काही फरक पडत नाही भाजपा जिंकते का काँग्रेस, नाही याने फरक पडतो की कोणता हिरो कसा मेला आहे. ब्रह्मांडाला फरक पडत नाही की जंगले जळत आहेत, हिमनग वितळत आहेत, अलियन्स आहेत की नाही. पण या सर्वांची तुम्हाला काळजी असते. आणि तुम्हाला या गोष्टींचे महत्त्व असते म्हणून तुम्हाला वाटते ब्रह्मांडालाही याचे महत्त्व असेल. तुमचे महत्त्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तसे करायचे असते.
The Subtle Art Of Not Giving A F*ck Marathi
फ्री pdf शोधणारे पूर्ण पुस्तक क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते. वरील लिंक वरून पुस्तक विकत घ्या.
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.
1)आनंद ही एक समस्या आहे
2) या समस्येचा तोडगा हा पुढील समस्येचे कारण ठरतो
Superb ✌️