लोक व्यवहार, मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा.

लोक व्यवहार – लोकांसोबत आपली वागणूक कशी असली पाहिजे, हे या पुस्तकात सांगण्यात आले आहे.

How To Win Friends And Influence People या इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर असलेले पुस्तक म्हणजे “मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा.”

या लेखाचा विडिओ देखील तुम्ही खाली पाहू शकता.

या पुस्तकाची प्रथम आवृत्ती १९३७ साली छापण्यात आली. तेव्हा या पुस्तकाचे प्रकाशक आणि लेखक स्वतः Dale Carnegie यांना अपेक्षा नव्हती की, पुस्तकाच्या ५,००० पेक्ष्या जास्त प्रती विकल्या जातील. पण आज जवळपास १०० वर्ष पूर्ण होऊनही हे पुस्तक लोकप्रिय आहे.

Dale Carnegie यांच्या मते आर्थिक यशामध्ये तांत्रिक ज्ञानाचा फक्त १५ % प्रभाव असतो तर, ८५ % प्रभाव आपण लोकांसोबत कशा प्रकारे व्यवहार करतो, याचा असतो.

Dale Carnegie यांनी जेव्हा सुरवात केली तेव्हा त्यांच्या शिकवणुकीची सूत्रे पोस्ट कार्ड वर मावतील एवढीच होती. पुढल्या वर्षी थोडे मोठे कार्ड छापावे लागले. हळू हळू आकार वाढत लीफलेट, मग बुकलेट झाला. १५ वर्षांच्या प्रयोग आणि शोधानंतर या पुस्तकाचा जन्म झाला. हे पुस्तक प्रयोगशाळेत मोठे झाले आणि यात हजारो वयस्क लोकांचा अनुभव आहे.

मध जमा करायचे असेल, तर मधमाशांच्या पोळ्यावर लाथ मारू नका.

तुम्ही गुन्हेगारांच्या मुलाखती वाचल्यात का ? अनेक वेळा तुम्हाला असे दिसून येईल की, गुन्हेगारांना वाटत की त्यांची काहीच चूक नव्हती, परिस्थितीमुळे त्यांना गुन्हा करावा लागला.

जर अट्टल गुन्हेगारांना त्यांची चूक वाटत नाही. मग तुम्ही, मी आणि आपल्या सारख्या इतर सामान्य लोकांना कसे काय वाटेल की ते चुकीचे आहेत ? म्हणून दोष देणे मूर्खपणा आहे, असे Dale Carnegie यांचे म्हणणे आहे.

बहुतांश लोक स्वतःला दोष देत नाहीत, त्यामुळे कोणाची टीका करून फायदा होत नाही. उलट टीका केल्यामुळे समोरचा व्यक्ती मग स्वतःचा बचाव करू लागतो, कारणं देऊ लागतो, तर्क देऊ लागतो.

टीका करून कोणी सुधारत नाही, पण संबंध मात्र नक्कीच खराब होतात. टीका ही Boomerang सारखी असते, ती फेकली का परत आपल्याकडेच येते. आपण कोणाची टीका केली का ते आपली टीका करतात. तुम्ही टीका केली तर लोक परत तुमची टीका करतील किंवा रडत उत्तर देतील ” मी जे केलं त्याशिवाय दुसर काय करू शकत होतो ? “

लोकांशी व्यवहार करताना आपण एक गोष्ट लक्ष्यात ठेवली पाहिजे, आपण भावनिक लोकांशी व्यवहार करतो तार्किक नाही. लोकांमध्ये पुर्वाग्रह असतात, दोष असतात, गर्व असतो आणि अहंकार पण असतो.

छोट्या व्यक्तींशी व्यवहार करताना मोठे लोक आपला मोठेपणा दाखवतात.

लोकांची टीका करण्यापेक्षा आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

वाईट बोलू नका, निंदा करू नका. तक्रार करू नका.

लोकांसोबत व्यवहार करण्याचे अचूक रहस्य.

कोणत्याही व्यक्ती पासून काम करून घेण्याचा फक्त एक उपाय आहे, आणि तो म्हणजे ‘त्या व्यक्तीमध्ये ते काम करण्याची इच्छा उत्पन्न करणे.’

प्रत्येकाला महान बनण्याची इच्छा असते. प्रत्येकाला प्रशंसा आवडते. जो व्यक्ती लोकांची ही भूक भागवतो, तो लोकांना आपल्या वश मध्ये करू शकतो. लोक त्याच्यावर इतके प्रेम करतील की त्याच्या मृत्यूवेळी त्याच्यासाठी गड्डा खोदणारेही रडतील.

प्राणी आणि मानवामध्ये हाच फरक असतो, मानवाला महत्वपूर्ण बनण्याची महत्वाकांशा असते.

शर्यतीत जिंकणाऱ्या बैलांना कधी त्यांना मिळणाऱ्या पदकाचा अभिमान नसतो. पण त्यांच्या मालकांना जरूर असतो. कारण बक्षीस त्यांना महत्वपूर्ण असण्याची जाणीव करून देतात.

एका शोधामध्ये असे आढळून आले कि, घर सोडून जाणाऱ्या पत्नींमध्ये सर्वात मुख्य कारण होते, प्रशंसेचा अभाव. काही लोक प्रशंसेचे इतके भुकेले असतात कि चमचेगीरीला पण प्रशंसा समजतात.

प्रशंसा आणि चमचागिरी मध्ये फरक काय ? एक खरी असते आणि दुसरी खोटी.

९५ % वेळ आपण स्वत:चा विचार करत असतो. जर आपण स्वतःचा थोडा कमी विचार केला आणि दुसऱ्या व्यक्तीच्या चांगुलपणाचा थोडा जास्त विचार केला तर आपल्याला चमचागिरी करण्याची गरजच उरणार नाही.

खरी प्रशंसा करण्याची सवय लावा.

जो हे करू शकतो, त्याच्यासोबत जग आहे. जो हे करू शकत नाही, तो एकटाच राहील.

मच्छिमार जेव्हा मासोळी पकडायला जातात, तेव्हा ते चारा म्हणून कशाचा वापर करतात ? मच्छिमार त्या पदार्थाचा वापर करतात जो मासोळ्यांना आवडतो, त्या पदार्थाचा नाही जो मच्छिमाराला आवडतो.

लोकांना प्रभावित करण्याचा एकमात्र मार्ग आहे, त्यांच्या इच्छांबद्दल बोलणे.

आपल्यात ही क्षमता असावी की आपण समोरच्याचा दृष्टीकोन समजू शकू आणि कोणत्याही घटनेला आपण स्वतःच्या तसेच समोरच्याच्या नजरेने पाहू शकू, हेच यशाच रहस्य आहे.

– हेनरी फोर्ड

हे जग अशा अनेक लोकांनी भरलेले आहे जे स्वार्थी आहेत. त्यामुळे, त्या माणसाचा खूप फायदा होतो जो निस्वार्थ भावाने दुसऱ्यांची मदत करतो.

‘दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टीकोन समजणे आणि त्यात काम करण्याची इच्छा जागवणे’, याचा हा अर्थ नाही कि तुम्ही त्यांचे शोषण करत आहात. असे काम करवून घ्या की ज्याने दोघांचा फायदा होईल.

समोरच्या व्यक्ती मध्ये इच्छा जागवा.

प्रत्येक जागी आपले स्वागत कसे करून घ्यावे ?

स्वतः मध्ये रस घेऊन जेवढे मित्र २ वर्षात बनणार नाही त्यापेक्षा जास्त मित्र दुसऱ्यांमध्ये रस घेऊन २ महिन्यात बनतील. आपण दुसऱ्यांमध्ये रस घेतो, तेव्हा दुसरे आपल्यात रस घेतात.

दुसऱ्या लोकांमध्ये खरोखर रस घ्या.

त्वरित प्रभावित करण्याचा सोपा उपाय.

स्मितहास्य

यात खर्च काही होत नाही, पण खूप काही मिळून जातं.

जे घेतात ते समृद्ध होऊन जातात, पण जे देतात ते गरीब होत नाहीत.

हे एका क्षणात घडत आणि याची आठवण खूप वेळ कायम राहते.

कोणी एवढे श्रीमंत नाही कि याशिवाय जगू शकेल आणि कोणी इतका गरीब नाही कि याचा फायदा उचलू न शकेल.

हे घरात सुख आणत, व्यवसायात सदभावना आणि मैत्रीच तर हे हस्ताक्षर आहे.

परंतु याला विकत घेतल्या जाऊ शकत नाही, उधार घेता येत नाही, भिक मध्ये मिळत नाही. कारण याच तोपर्यंत मोल नाही जो पर्यंत हे स्वत:हून दिल्या जात नाही.

स्मितहास्याची गरज त्यांनाच जास्त आहे, ज्यांच्याकडे द्यायला स्मितहास्य उरले नाही आहे.

Smile

लक्ष्यात ठेवा प्रत्येक व्यक्तीला, ‘ त्याच नाव ‘ हा सर्वात महत्वपूर्ण आणि गोड शब्द असतो.

चांगला श्रोता बना. दुसऱ्यांना स्वतःबद्दल बोलण्यास प्रोत्साहित करा.

समोरच्या व्यक्तीच्या आवडींमध्ये रुची घ्या.

समोरच्या व्यक्तीला महत्वपूर्ण असल्याचा अनुभव करवा आणि प्रामाणिकपणे करवा.

वादविवाद करून फायदा होत नाही.

कोणत्याही व्यक्तीला तो चूक आहे, हे सिद्ध करून काय फायदा ? असे करण्याने त्याला तुम्ही आवडाल का ? त्याने तुमचे मत विचारले नव्हते. त्याला तुमच्या मताची गरजही नव्हती. त्याच्यासोबत वाद-विवाद का करावा ?

वादविवादा पासून असे वाचा जसे कि साप आणि भूकंप.

९० % वेळा वादविवादामुळे फायदा होत नाही, कारण वादविवादा नंतर दोन्ही पक्षांना विश्वास होतो की ते बरोबर आहेत. वादविवादामध्ये जर तुम्ही हरलात तर तुमचा पराभव होईलच आणि जर तुम्ही जिंकलात तरीसुद्धा तुमचाच पराभव होईल, कारण त्या व्यक्तीच्या सन्मानाला ठेच पोहचली असेल. तुम्ही समोरच्याला हे सिद्ध करून दिल की तो चूक आहे, आता त्या व्यक्तीची काय अवस्था होईल ? आता तो तुमच्या विजयाने चिडून जाईल.

आपल्या इच्छेविना जो कोणतीही गोष्ट स्वीकारतो, तो अजूनही त्याच विचारांचा असतो.

गैरसमज वादविवादाने नाही, तर समजदारीने, चतुरतेने, सदभावनेने, समोरच्याचा दृष्टीकोन समजण्याच्या इच्छेने संपतात.

आपल्या पहिल्या भावनेवर विश्वास ठेऊ नका. जेव्हाही आपल्या समोर समस्या येते आपली पहिली प्रतिक्रिया सुरक्षात्मक असते. सावधान राहा. थंड डोक्याने विचार करा. आपल्या रागावर ताबा ठेवा. आधी समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्या. ज्या गोष्टींवर तुम्ही सहमत आहात तिथून सुरवात करा. प्रामाणिक राहा. जिथे चूक स्वीकारू शकता, स्वीकारा. माफी मागा. हे वचन द्या की, तुम्ही तुमच्या विरोधकांच्या विचारांवर तुम्ही लक्ष्य देता.

वादविवादा पासून एकाच प्रकारे फायदा होऊ शकतो, त्यापासून वाचून.

शत्रू बनवण्याचा अचूक उपाय आणि त्या पासून कसे वाचावे ?

कधीच बोलण्याची सुरवात अशी करू नका की, “आता मी तुम्हाला काही सिद्ध करणार आहे “. दुसऱ्या शब्दात तुम्ही समोरच्याला सांगत आहात की, ” मी तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे “.

हे एक प्रकारच आव्हान आहे, यामुळे विरोध उत्पन्न होतो. तुम्ही काही बोलण्याआधीच समोरचा व्यक्ती तुमच्याशी लढायला तयार होतो. जर तुम्हाला कोणाला काही सिद्ध करायचे असेल तर तुम्ही ते चतुरतेने, कुशलतेने केले पाहिजे, कोणालाही न कळता. लोकांना अशा प्रकारे शिकवलं पाहिजे की, त्यांना कळलच नाही पाहिजे की त्यांना नवीन काही शिकवण्यात येत आहे.

दुसऱ्या लोकांपेक्षा बुद्धिमान बना: परंतु त्यांना ते सांगू नका. -लॉर्ड चेस्टरफिल्ड

दुसऱ्या लोकांच्या विचारांप्रती सन्मान दाखवा. ” तुम्ही चूक आहात “, असे कधीच बोलू नका.

जर चूक तुमची असेल तर लगेच तुमची चूक स्वीकारा.

मैत्रीपूर्ण मार्गाने सुरवात करा.

सुकरात चे रहस्य

लोकांशी बोलताना तुमच्या मतभेदांचा आधी उल्लेख करू नका. तुम्ही आधी त्या गोष्टींवर भर द्या, ज्यावर तुमचे एकमत आहे.

समोरच्या व्यक्तीपासून लगेच ” हो , हो ” बोलवा.

समोरच्या व्यक्तीला जास्त बोलू द्या.

आदर्शवादी सिद्धांतांची मदत घ्या.

आपल्या विचारांना नाटकीयरित्या प्रस्तुत करा.

जर काहीच काम नाही आले, तर आव्हान द्या.

लोकांची चूक त्यांना सरळ सांगू नका.

कोणाची टीका करण्याआधी स्वतःच्या चुका सांगा.

सरळ आदेश देण्यापेक्षा प्रश्न विचारा.

थोड्याश्याही सुधारणेची तारीफ करा, मनमोकळ्या पणे तारीफ करा.

समोरच्या व्यक्तीला एक चांगली image द्या, जी त्याला सिद्ध करू वाटेल.

प्रोत्साहित करा. “चूक सुधारणे सोपे आहे “, हे सांगा.

वरील सूत्रांची सविस्तर माहिती तुम्ही या पुस्तकात वाचू शकता. हे पुस्तक वाचून तुमचा नक्की फायदा होईल. हे पुस्तक विकत घेण्यासाठी खाली क्लिक करा.

इतर पुस्तक वाचण्याकरिता इथे क्लिक करा

आमच्या फेसबुक पेज ला इथे भेट द्या.

4 thoughts on “लोक व्यवहार, मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा.”

  1. I READ THE BOOK
    VERY EXLENT
    I HAVE QTY BUY THIS BOOK
    PLEASE SEND ME QTY RATE
    THIS BOOK OR OTHER BOOKS
    8668553095

    Reply

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.