टर्म इन्शुरन्स काय आहे ?
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय ? टर्म चा अर्थ होतो ‘कालावधी‘. ठराविक कालावधी करीता घेतलेला जीवन विमा.
विमा कालावधी मधे जर तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या नॉमिनीला विम्याची रक्कम मिळते. हा सर्वात स्वस्त प्रकारचा विमा आहे. यामध्ये सहसा विमा कालावधी संपल्यावर तुम्ही जिवंत राहिलात तर तुम्हाला विम्याची रक्कम मिळत नाही. कमी हफ्ता भरून फार मोठा विमा मिळतो.
विविध योजनेमध्ये, विविध सुविधा आणि अटी असतात. त्यामुळे विमा घेण्याआधी त्या विशिष्ट योजने विषयीचे दस्तावेज वाचूनच विमा घ्यावा.
विमा कंपनी, व्यक्तीचे आरोग्य, वय, लिंग आणि आयुर्मानाच्या आधारावर प्रीमियमची गणना करते.
हा विमा प्रकार किती स्वस्त असतो ? यासाठी आपण एक उदाहरण पाहूया.
समजा एका व्यक्तीचे वय ३० आहे आणि त्याला ५० लाखाचा विमा हवा आहे. HDFC च्या टर्म इन्शुरन्स प्रीमियम calculator नुसार त्या व्यक्तीला ६-७ हजार एवढा वार्षिक प्रीमियम येतो. व्यक्तीचा विमा ६० वयापर्यंत आणि ही व्यक्ती नॉन स्मोकर आहे, असे गृहीत धरले आहे.
टर्म इन्शुरन्स कसा निवडावा ?
- आधी ठरावा कि तुम्हाला किती चा विमा हवा आहे ? हे ठरवताना लक्ष्यात घ्या तुमच्या कुटुंबाचा सध्याचा खर्च किती आहे ? तुम्ही नसल्यावर त्यांना किती पैसे लागतील ? तुमच्यावर काही कर्ज आहे का ? साधारणतः तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या कमीत कमी १० पट तुमचा विमा असावा.
- महागाई दर लक्ष्यात घ्या, आज जेवढे पैसे लागतात त्यापेक्षा भविष्यात जास्त लागतील. महागाई दर जवळपास ५-७ % पकडा.
- आपण साधारणतह ६०-६५ वयापर्यंत काम करतो, म्हणजे आपला टर्म इन्शुरन्स हा त्यावेळेपर्यंत तरी असावा.
- इन्शुरन्स सोबत काही रायडर (rider) घेऊ शकता का ते पाहावे. जेणेकरून तुम्हाला आजारपणासाठी खर्च वगैरे मिळू शकेल. कोणकोणत्या प्रकारचे रायडर (RIDER) असतात ते तुम्ही खाली पाहू शकता. एक गोष्ट लक्ष्यात घ्या की रायडर हे मोफत नसतात, त्यासाठी आपल्याला जास्त Premium (हफ्ता) द्यावा लागतो.
- Claim settlement ratio (क्लेम सेटलमेंट रेशो) म्हणजे किती लोकांना दावा केल्यानंतर पैसे मिळाले. १०० पॉलिसी धारकांनी जर दावा केला तर त्यातील किती पॉलिसी धारकांना विम्याचे दावे बरोबर मानून त्यांना विमा रक्कम मिळाली, यावरून तुम्हाला अंदाज येईल की तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबियांना किती सहज विमा रक्कम मिळेल. यावरून तुम्हाला अंदाज येईल की कोणती कंपनी किती सहज विमा रक्कम देते. वर्ष २०१८-१९ करीताचे Claim Settlement Ratio खाली दिले आहे.
- तज्ञांचा सल्ला घ्या.
- तुम्ही विमा घेतला आहे, त्याबद्दल तुमच्या कुटुंबियांना कळवा.
Claim Settlement Ratio २०१८-१९
टर्म इन्शुरन्स किती वर्षांचा असावा ?
या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी तुम्ही स्वतःला खालील माहिती विचारू शकता.
माझा सर्वात लहान मुलगा/मुलगी स्वावलंबी बनायला किती वर्षे लागतील ?
माझे कर्ज फेडायला किती वर्षे लागतील ?
मी आणि माझा जोडीदार निवृत्त व्हायला किती वर्षे लागतील ?
जर माझ्या इतर काही जवाबदाऱ्या असतील तर त्यांना किती वर्षे लागतील ?
रायडर चे प्रकार
- Accident Death Rider – यात जर तुमचा मृत्यू अपघातामध्ये झाला तर तुम्हाला अधिक रक्कम मिळते. तुम्हाला तुमच्या विम्याची रक्कम तर मिळणारच, पण हा रायडर घेतल्यामुळे तुम्हाला अतिरिक्त रक्कम मिळेल, जर तुमचा मृत्यु अपघातात झाला तर.
- Permanent & Partial Disability – अपघातामुळे जर तुम्हाला कायम किंवा तात्पुरते अपंगत्व आले तर तुम्हाला काही रक्कम मिळते.
- Critical Illness – Policy मधे नोंद केलेल्या गंभीर आजारांपैकी काही आजार झाला तर तुम्हाला पैसे यात मिळतात. कोणत्या बिमारी मध्ये हि सवलत मिळेल, ते Policy घेताना तपासून घ्यावे.
- Waiver Of Premium – जर आजारपणामुळे किंवा उत्पन्न बंद झाल्यामुळे तुम्ही Premium भरू शकत नसाल, तर या रायडर मुळे तुम्हाला पुढचे Premium तुम्हाला माफ होतील, तरीही तुमची Policy सुरु राहील.
- Income Benefit Rider – यात तुम्हाला विम्याच्या रक्कमेसोबत अतिरिक्त रक्कम पुढील येणारे काही वर्ष मिळते.
तुमच्या टर्म इन्शुरन्स चा हफ्ता किती येईल ? हे जाणून घेण्यासाठी खालील फॉर्म भरा.
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.
4 thoughts on “टर्म इन्शुरन्स म्हणजे काय ? तो कसा निवडावा ?”