२०% मेहनत ८०% परिणाम हे पुस्तक विकत घेण्याकरिता तुम्ही खाली क्लिक करू शकता.
२०% मेहनत ८०% नफा
Pareto Principle – आपल्या २० % कामापासून आपल्याला ८० % परिणाम मिळतो.
एक इटलीचा अर्थशास्त्रज्ञ होता. त्याने हा सिद्धांत मांडला होता. त्याच्या असे लक्ष्यात आले होते कि, इटली मध्ये ८०% जमीन हि २०% लोकांकडे आहे. शेती करत असताना त्याला हे दिसून आले कि, २० % वाटाणाच्या शेंगामधून ८०% वाटाणा मिळत होता. त्यावरून मग त्याने पुढे काही शोध सुरु केले. तेव्हा त्याला असे अनेक उदाहरण भेटत गेले. २० % लोकांकडे पूर्ण संपत्तीच्या ८० % संपत्ती आहे. २० % खेळाडूंनी सर्व पदाकांपैकी ८० % पदके मिळवली आहेत. या सिद्धांतानुसार त्याचे म्हणणे असे होते कि, आपल ८०% यश हे आपण केलेल्या २०% कामापासूनच येत असत. आपण त्या २०% कामावर लक्ष्य केंद्रित केल, तर कमी काम करून आपण जास्त परतावा मिळवू शकतो.
जसे कि फक्त २० % ग्राहकच आपला ८०% माल विकत घेत असतात. आपलाकडे असलेल्या सर्व उत्पादनांपैकी २० % उत्पादन ८० % वेळा विकल्या जातात. ८०% तक्रारी ह्या फक्त २०% ग्राहकांकडून आलेल्या असतात. २० % लोक हे ८०% असलेली दारू पिऊन टाकतात. २०% ढगांपासून ८०% पाऊस पडतो. २०% कलाकारांना ह्यांना ८०% प्रसिद्धी मिळते. २० % शास्त्रज्ञ हे ८०% शोध लावतात. २० % लेखक सर्व पुस्तकांपैकी ८० % पुस्तके विकतात.
८० % जे काम फक्त आपल्याला २०% नफा मिळवून देत,ते करणे पेक्षा २० % असा काम कराव ज्याने आपल्याला ८० % नफा होईल. आपल्या सर्व मित्रांपैकी फक्त २०% मित्र आपल्याला ८०% आनंद देतात. म्हणून सर्व मित्रांना जवळ करण्यापेक्षा ह्या २०% मित्रांवर लक्ष्य दिले तर चांगले राहील, वेळ वाचेल. हा वाचवलेला वेळ आपण नवीन काही शिकण्यासाठी वापरू शकतो. २० % असे प्रश्न असतात, जे परीक्षेत ८० % वेळा परत आलेले असतात. ह्या २०% प्रश्नांवर आपण लक्ष्य केंद्रित केल, तर आपण चांगले मार्क्स मिळवण्याची आपली शक्यात जास्त होते.
या सिद्धांतानुसार असे म्हणणे आहे कि, सर्व जागी जास्त मेहनत करण्यापेक्षा असे क्षेत्र शोध जिथे कमी काम करून तुम्ही जास्त परिणाम मिळवू शकता. असा प्रकारे तुम्ही कमी काम करून जास्त गोष्टी करू शकता. याने तुमची कार्यक्षमता वाढेल. हे पुस्तक मजेशीर रित्या खालील video मध्ये सांगितले आहे.
हे पुस्तक विकत घेण्याकरिता तुम्ही खाली क्लिक करू शकता.
इतर पुस्तके वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
2 thoughts on “२०% मेहनत ८०% परिणाम The 80/20 Principle Richard Koch Marathi”