SBI PHARMA FUND घ्यावा का ? का घ्यावा ? कोणी घ्यावा ?

SBI PHARMA FUND

SBI PHARMA FUND हा Thematic फंड आहे.

ज्या लोकांनी या आधी कोणताच म्युच्युअल फंड घेतला नाही आहे, त्या लोकांसाठी हा म्युच्युअल फंड नाही.

पहिल्याच वेळेस म्युच्युअल फंड घेणाऱ्या लोकांनी हा लेख वाचवा किंवा म्युच्युअल फंड तज्ञाशी इथे सल्ला घ्यावा.

Thematic म्युच्युअल फंड – असे म्युच्युअल फंड जे एका प्रकारच्या theme मध्ये गुंतवणूक करतात. जसे कि IT हा फंड INFORMATION TECHNOLOGY या क्षेत्रातील कंपनीं मध्ये गुंतवणूक करतो. PHARMA हा औषधी, आरोग्य या क्षेत्रातील कंपनी मध्ये गुंतवणूक करतो.

वस्तू केव्हा स्वस्त मिळतात ?

याचे आपण एक साधे उदाहरण पाहू. प्रत्येक शहरात एक भूत बंगला असतो. आता त्या बंगल्याला भूत बंगला असे नाव पडले तर त्या बंगल्याची किंमत कमी होते. कारण कोणीच तो विकत घ्यायला तयार नसतो. पण कोणी समजदार माणूस असेल, योग्य संशोधन करून ठरवेल कि या बंगल्यात खरेच भूत आहेत का नाही ? तर तो हा बंगला स्वस्तः मध्ये मिळवू शकतो. भूत बंगला हा १ करोड चा ५० लाखात मिळू शकतो. पण यात धोका पण आहे, तिथे खरेच भूत निघण्याचा.

आता हेच उदाहरण आपण व्यवसायात पाहू. काही व्यवसायात इतक्या समस्या येतात कि लोक भूत दिसल्यासारखे त्या व्यवसायापासून पळू लागतात. मग ते व्यवसाय स्वस्तःमध्ये मिळू लागतात.

गुंतवणूकदार म्हणून आपल काम आहे, हे शोधून काढणे की ह्या समस्या नेहमीकरिता आहेत कि तात्पुरत्या आहेत. जर समस्या तात्पुरत्या असतील, तर हि आपल्यासाठी गुंतवणुकीची संधी आहे. अशाप्रकारच्या गुंतवणुकीमध्ये सर्वात जास्त धोका असतो आणि होणारा नफाही जास्त असतो. जर आपण सखोल अभ्यास केला तर समस्या तात्पुरती आहे कि दीर्घकालीन याचा अंदाज घेऊ शकतो. अशाप्रकारे आपण कमी धोका आणि जास्त नफा, अशी गुंतवणूक करू शकतो. धोका आणि नफा यांच गणित पाहून गुंतवणूक करायची का नाही ? हे आपण ठरवू शकतो. तुम्ही गुंतवणूक करण्याआधी स्वतः अजून सखोल संशोधन करा.

फार्मा सेक्टर मधेही सध्या काही समस्या आहेत. तुम्ही या समस्यांचे स्वतः संशोधन करा आणि ठरवा ह्या समस्या तात्पुरत्या आहेत कि दीर्घकालीन. त्यानुसार गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

अशाच काही समस्या मी खाली लिहिण्याच्या प्रयत्न करत आहे. याव्यतिरिक्त आणखी काही समस्या असतील तर तुम्ही खाली कमेंट मध्ये सांगू शकता, त्या लेखामध्ये समाविष्ट करण्यात येतील.

Generic औषधी

सरकार असा नियम आणू पाहत आहे कि ज्यामुळे डॉक्टरांना फक्त generic औषधांचा सल्ला द्यावा लागेल, branded नाही.

Modi’s generics-only drugs plan worries health experts, Indian pharma sector

आता तुम्ही म्हणणार हे काय बुवा ? branded औषध ? औषध मध्ये पण ब्रांड असतो का ? हो. औषधीच्या क्षेत्रात पण इतर क्षेत्रासारखे ब्रांड असतात. जसे साधी गाडी आहे आणि ferrari तसेच. साहजिकच branded औषधी महाग आहेत. सरकार डॉक्टरांना जबरदस्ती स्वस्त generic औषध लिहायला भाग पाडू शकते. Branded वस्तू विकल्यावर जास्त नफा होतो. त्यामुळे branded औषध नाही विकले तर कंपनीचा फायदा कमी होईल.

आता सरकारचा हा विचार तर आहे. पण generic औषधी हि branded औषधीच्या गुणवत्तेची बरोबर करू शकते का हा चर्चेचा विषय आहे. generic औषध डॉक्टरने देणे म्हणजे डॉक्टर फक्त chemical चे नाव लिहणार कोणत्या कंपनीचे औषध हे नाही. मग मेडिकल वाले हे ठरवतील कि कोणत्या कंपनीचे औषध द्यायचे. आता साहजिकच आहे, तो तेच औषध देईल ज्यात त्याला जास्त नफा मिळेल. आता काही औषधांमध्ये २-३ पेक्षा जास्त API ( ACTIVE PHARMACEUTICAL INGREDIENT) असतात. डॉक्टरांना मग त्या सर्वांचे नाव लिहावे लागेल. भारतात हि पण समस्या आहे कि generic आणि branded औषधी यांची गुणवत्ता सारखी आहे का ? डॉक्टर लोक कंपनी ओळखतात, त्यामुळे branded औषधी वर त्यांचा विश्वास असतो. पण जेव्हा फक्त chemical चे नाव लिहिले जाईल, तेव्हा रुग्ण कोणते औषध घेत आहे हे डॉक्टरला कळणार नाही. त्यामुळे असा नियम आणण्याचा विचार असला तरी त्यात अडथळे आहेत. हि समस्या अशा प्रकारे तात्पुरती असू शकते, यात काही मध्यम मार्ग निघू शकतो. तुम्ही स्वतःसुद्धा या समस्येवर संशोधन केले पाहिजे.

USFDA

USFDA – UNITED STATES FOOD & DRUG ADMINISTRATION हि अमेरिकेची सरकारी संस्था आहे. नावावरून तुम्हाला कळल असेलच कि ह्या संस्थेच काम आहे, अन्न आणि औषधी याबद्दल लोकांच्या हितांच संरक्षण करणे.

TURKEY, NEW ZEALAND, TAIWAN BANGLADESH यासारख्या देशांमधून पण अमेरिकेत आता औषधी विक्रीच्या परवानगी चे अर्ज येत आहेत. स्पर्धा वाढल्यामुळे कमी भावात माल विकावा लागत आहे. जशी जशी वेळ पुढे सरकत जाईल तसे, भारतीय कंपनी स्वतः मध्ये सुधार करून या स्पर्धेत पुढे जातील हि अपेक्षा आहे.

तसेच अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे नव्याने निवडून आले आहेत. त्यांची विचारसरणी आहे कि अमेरिकेतील कंपनींना अमेरिकेत वाव मिळावा. त्यामुळे सरकारी धोरण असे बनत आहे कि अमेरिकेत विदेशी कंपनींना समस्या येत आहेत. जागतिकीकरणाच्या लाटेत या धोरणासोबत अमेरिका जास्त काळ चालू शकणार नाही, त्यांना थोडे मवाळ धोरण करावे लागेल अशी अपेक्षा आहे.

अजून काही कारणे या लेखात दिली आहेत.

5 reasons why pharma stocks could still come under pressure

जर तुम्हाला ह्या समस्या तात्पुरत्या वाटत असतील तर फार्मा सेक्टर मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता, नाहीतर तुम्ही यापासून दूर राहू शकता. जो अंदाज वर लावण्यात आलेला आहे तो खराच ठरेल असे नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः संशोधन करून निर्णय घ्यावा.

ज्यांना फार्मा theme मध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांना SBI PHARMA FUND हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. आपल्या पूर्ण गुंतवणुकीच्या १० % पेक्षा जास्त गुंतवणूक thematic फंड मध्ये करू नका. या फंड मध्ये पुढील १ वर्ष तुम्ही sip स्वरूपात गुंतवणूक करू शकता आणि चांगला परतावा मिळण्यासाठी साधारणतः ५ वर्ष वाट पाहू शकता.

या फंड बद्दल काही महत्वाचे कागदपत्रे खाली दिली आहेत, जे आपण वाचू शकता.

खालील कागदपत्रे चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्युच्युअल फंड शब्दकोश, हा लेख तुम्ही वाचू शकता.

SBI PHARMA FUND

SCHEME INFORMATION DOCUMENT

KEY INFORMATION MEMORANDUM

SBI PHARMA FUND LEAFLET

म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक हि बाजार जोखीमेच्या अधीन असते. फंड संबंधी कागदपत्रे काळजीपूर्वक वाचून गुंतवणूक करा.

SBI Pharma Fund – Regular Plan – Growth हा plan घेण्यासाठी इथे क्लिक करा.

तुम्हाला म्युच्युअल फंड तज्ञाची मदत हवी असेल तर हा फॉर्म भरा.

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

इतर लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

1 thought on “SBI PHARMA FUND घ्यावा का ? का घ्यावा ? कोणी घ्यावा ?”

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.