Artificial Intelligence म्हणजे काय ? फायदे, धोके.

Artificial Intelligence म्हणजे काय ? त्याचा मानव जातीवर काय परिणाम होऊ शकतो ? हे या लेखात आपण जाणून घेऊ.

SuperIntelligence

चिमण्यांना वाटत त्या फार लहान आणि कमजोर आहेत. जर घरटी बांधायला एखादे घुबड असते तर!

दुसरी चिमणी बोलते, “घुबड आपल्यातील वयस्कर आणि लहान चिमण्यांची काळजी घेईल.”

तिसरी चिमणी बोलते, “मांजरीवर पण घुबड लक्ष ठेवेल.”

चिमण्यांचा नेता बोलला, “चला आपण एखादे घुबड किंवा त्याचे अंडे शोधुया.”

“कावळाही चालेल”, दुसरी एक चिमणी बोलली.

तेव्हा एका डोळ्याने आंधळी चिमणी बोलली, “घुबडाला आपल्यात आणण्याआधी आपण घुबड कसे पाळावे, त्याच्यावर कसा ताबा ठेवायचा, शिकायला नको का ?”

पण जास्तकरून चिमण्यांना घुबड शोधण्याची आवड जास्त असते, कारण घुबड नसताना त्यावर ताबा कसा मिळवावा हे शोधणे त्यांना कठीण वाटते.

Artificial Intelligence म्हणजे काय ?

आपण शिकू शकतो. तुमच्या अनुभवांवरून तुम्ही शिकू शकता. मशीन तसं करू शकत नाही. पण मशीन तसे करू लागले तर ? Artificial Intelligence म्हणजे मशीन ने स्वतःच शिकणे.

आजकाल मोबाईल मध्ये आपल्या दिसते की बरोबर व्यक्तीनुसार फोटोचे अल्बम तयार झाले आहेत. किंवा तुमचे पहाडावरचे फोटो, कारचे फोटो, खाद्य पदार्थांचे फोटो, लग्नाचे फोटोंचे आपोआप अल्बम तयार झाले आहेत. हे कसे शक्य आहे ? आपण कोणतीही माहिती न देता मोबाईल ला कसे कळले की कोणते फोटो कोणाचे आहेत ? माझे म्हणणे अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी तुम्ही Google Photos अँप च्या search मध्ये जा.

याचे उत्तर आहे Artificial Intelligence.

Artificial Intelligence स्वतःच शिकता-शिकता, स्वतः मध्ये सुधार करते. जेव्हा मोबाईल तुम्हाला विचारतो तुमचे फोटो योग्य प्रकारच्या योग्य अल्बम मध्ये गेलेत का ? तेव्हा तुम्ही जो अभिप्राय देता, त्यावरून AI शिकत जात.

Click To Open Demat Account

Artificial Intelligence चे प्रकार

Narrow AI – अशी AI जी केवळ मर्यादित जागी, मर्यादित कामे करते, जसे की वर फोटोचे उदाहरण दिले आहे.

General AI – ही AI अजून अस्तित्वात नाही. अशी AI जिला क्षेत्राचे बंधन नसेल जी सर्व गोष्टींबद्दल निर्णय घेऊ शकेल.

मानवाच्या जीवनात जे बदल चाक, वीज, इंटरनेट यांनी केलेत तेवढ्याच मोठ्या प्रमाणात बदल Artificial Intelligence घडवून आणेल. म्हणूनच जगातील सर्व महासत्ता लवकरात लवकर यावर ताबा मिळवू पाहत आहेत.

Artificial Intelligence फायदे

अफाट मोजण्याची शक्ती

मानव त्याच्या डोक्यात किती गोष्टी ठेऊ शकतो याला बंधन आहे, तो एका वेळेस किती गोष्टी करू शकतो यालाही बंधन आहे. पण Artificial Intelligence ला हे बंधन नसेल. मानवाच्या इतिहासात लिहलेली सर्व माहिती AI क्षणात वाचू शकतो आणि गरज पडल्यास तशीच आठवूही शकते.

जर हवामानाचा अंदाज काढण्यात करोडो गणित करायचे असतील तेही एका क्षणात तर AI कडे ती क्षमता आहे, माणसाकडे नाही.

Click To Open Demat Account

आरोग्य

तुमच्या आवाजातील बदल, शरीराचे तापमान, हृदयाची स्पंदने, अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्याकडे आपण लक्ष देणे शक्य नाही. पण या गोष्टींवर लक्ष देऊन AI बरेच आजार होण्यापूर्वीच तुम्हाला चेतावणी देऊ शकते.

Automatic Weapons

जर युद्धात असा रोबोट असेल ज्याला दुरून कंट्रोल करण्याची गरज नसेल तर ? कोणाला माराव ? कोणाला सोडावं ? कोणतं शस्त्र वापरावं ? हे तो स्वतःच ठरवू शकत असेल तर ? Artificial Intelligence चा वापर करून असे रोबोट तयार करणे शक्य आहे.

Self Driving Cars

स्वयंचलित कार Artificial Intelligence चा वापर करतात.

Cyber Security

Artificial Intelligence वापरकर्त्याच्या वागणूकीचे कार्यक्षमतेने विश्लेषण करू शकते, एक नमुना काढू शकते आणि नेटवर्कमध्ये सर्व प्रकारच्या विकृती किंवा अनियमितता ओळखू शकते.

Click To Open Demat Account

Artificial Intelligence चे धोके

वरील चिमणी आणि घुबडाचे जे उदाहरण दिले आहे तसेच AI आणि आपले आहे. इथे आपण चिमणी आणि AI घुबड आहे. जर चिमण्या घुबडावर ताबा मिळवू शकल्या नाही तर घुबड चिमण्यांना गुलाम बनवू शकतं, किंवा त्यांचा जीव घेऊ शकतं.

एवढी शक्तिशाली AI जर आपल्या ताब्याबाहेर असली तर ? किंवा त्यात काही बिघाड झाला तर ?

माकडांचे भविष्य त्यांच्या नाही तर आपल्या हातात आहे. माकड आपल्या दयेवर जिवंत आहेत. तसेच जर मानवाने अशा गोष्टीची निर्मिती केली जी मानवापेक्षा हुशार असेल तर मानवाचे अस्तित्व त्या गोष्टीच्या दयेवर अवलंबून असेल. मानवाच्या इच्छेवर नाही.

Useless Class

Yuval Noah Harari सेपिअन्स या पुस्तकाचे लेखक यांच्या म्हणण्याप्रमाणे भविष्यात Useless Class असेल. म्हणजे असे लोक ज्यांचा काहीच उपयोग नाही, कारण ते जे काम करतात ते मशीन करू लागतील.

सध्या मुलं शाळेत जे शिकत आहेत त्यांच्या ४० व्या वर्षी अप्रासंगीक होऊन जाईल. नवीन नोकरी अस्तित्वात येतील पण त्यात सर्जनशीलता ( Creativity) आणि लवचिकता लागेल. ४० वर्षाचा व्यक्ती हे त्या वयात शिकू शकेल याबद्दल साशंकता आहे. आणि ते जरी शिकू शकले तर लगेच पुढच्या १० वर्षात त्यांना आणखी नवीन कौशल्य अंगिकारावे लागेल. कारण प्रगतीचा खूप जास्त आहे.

२०३०-४० मध्ये नोकऱ्या कशा असतील हे आपल्याला माहीत नाही, पण आज आपण मुलांना शाळेत काय शिकवावं हे आपल्याला माहीत नाही.

Click To Open Demat Account

पुढील २० वर्षात नोकरी तुमची गमावण्याची शक्यता काय ?

अंपायर – ९८%

शेफ – ९६%

वेटर – ९४%

टूर गाईड -९१%

बेकर – ८९%

बस ड्राइवर ८९%

पुरातत्वशास्त्रज्ञ – ०.३%

अशा नोकऱ्या ज्यांना रोबोटने बदलून खूप नफा मिळेल, अशा नोकऱ्या सर्वात आधी धोक्यात येतील.

Artificial Intelligence Stocks

गूगल, ऍमेझॉन, अप्पल, टेस्ला यासारख्या दिग्गज कंपन्या या क्षेत्रात काम करत आहेत. International Mutual Fund च्या माध्यमातून तुम्ही या कंपनी मध्ये गुंतवणूक करू शकता. कोणता म्युच्युअल फंड निवडावा ही माहिती हवी असेल तर खाली दिलेला फॉर्म भरा.

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.