Atomic Habits Marathi By James Clear हे पुस्तक म्हणजे चांगल्या सवयी तयार करण्याचा आणि वाईट सवयी तोडण्याचा, एक सोपा आणि सिद्ध मार्ग.
James Clear यांचे अनुसरण करून माझ्या जीवन शैलीमध्ये अनेक बदल झालेत. माझ्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव पाडणारी व्यक्ती ते सध्या आहेत. त्यांचे पुस्तक वाचून तुमच्या जीवनात फरक पडेलच अशी आशा करतो.
Atomic Habits Marathi By James Clear
छोटे बदल, उल्लेखनीय परिणाम.
Atomic म्हणजे
१. अणू , अतिशय लहान गोष्ट;
मोठया प्रणालीचा आणखी कमी किंवा संक्षिप्त करता न येण्यासारखा भाग. संक्षिप्त करता न येण्यासारखा भाग.
२. अफाट उर्जा किंवा सामर्थ्याचा स्रोत.
Habit म्हणजे
१. सवय
२.नित्यक्रम किंवा सराव जो नियमितपणे केला जातो; विशिष्ट परिस्थिती मधला स्वयंचलित प्रतिसाद.
१% रोज सुधार
वरील फोटो तुम्हाला दर्शवितो की १% रोज सुधार झाल्यास १ वर्षात आपण ३७ पट वाढतो.
याउलट १% रोज घट झाल्यास आपल्याकडील १ ₹ १ वर्षात ३ पैसे होतात.
संभाव्यतेचे पठार
“वाईट सवयींचे परिणाम लवकर दिसतात, चांगल्या सवयींचे उशिरा.”
“वाईट सवयी लवकर आनंद देतात, चांगल्या सवयी उशिरा.”
आपण बर्याचदा प्रगती सरळ रेषेत होण्याची अपेक्षा करतो. कमीतकमी, आपल्याला आशा असते की प्रगती लवकर होईल. पण वास्तविकतेत, आपल्या प्रयत्नांचे परिणाम बहुतेक वेळा उशिराने दिसतात. आपण केलेल्या कामाचे खरे मूल्य लक्षात येण्यासाठी कधी महिने तर कधी वर्ष लागतात. यामुळे “निराशेची दरी” निर्माण होते, ज्यात लोकांना निराशा वाटते, आठवडे, महिने मेहनत करूनही कोणतेही परिणाम न आल्यामुळे. तथापि, आपली मेहनत वाया गेलेली नसते. ती फक्त साठवली गेलेली असते. आपण केलेल्या मेहनतीचे परिणाम दिसायला वेळ लागतो.
ध्येय विसरा, त्याऐवजी प्रणालींवर लक्ष द्या.
समस्या १ – जिंकणाऱ्यांकडे आणि हरणाऱ्यांकडे समान उद्दिष्ट असतात.
चुकून असे गृहीत धरले जाते की महत्वाकांशी उद्देश आपल्याला यशाकडे नेतात. पण ते हे दुर्लक्ष करतात की हरणाऱ्यांकडे सुद्धा समान उद्दिष्ट असतात तरीसुद्धा ते हरतात.
उद्देश तर सर्वांकडे असतातच पण जोपर्यंत सतत छोटे सुधार होत नाही तोपर्यंत परिणाम बदलत नाहीत.
समस्या २ – ध्येय साध्य करणे केवळ एक क्षणिक बदल आहे.
ध्येय गाठणे केवळ त्या क्षणासाठी तुमचे जीवन बदलते.
आपल्याला वाटते की आपल्याला निकाल बदलण्याची आवश्यकता आहे, परंतु परिणाम समस्या नाहीत. आपल्याला त्या परिणामास कारणीभूत असलेल्या प्रणाली बदलण्याची खरोखर गरज आहे.
सवयी जीवनशैली असतात.
समस्या 3 – ध्येय आपला आनंद मर्यादित करतात.
कोणत्याही ध्येयामागील अंतर्भूत धारणा अशी असते की, “एकदा मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचलो की मी आनंदी होईल.” ध्येय-प्रथम मानसिकतेची समस्या अशी आहे की आपण पुढचे ध्येय पूर्ण होईपर्यंत सतत आनंदी होणे ढकलत राहतो.
याउप्पर, ध्येयांमुळे हे किंवा ते संघर्ष निर्माण होतो: एकतर तुम्ही तुमचे ध्येय साध्य करता आणि यशस्वी होता किंवा तुम्ही अपयशी ठरता आणि आपण निराश होता.
तुम्ही स्वतःला आनंदाच्या संकुचित आवृत्तीत मानसिकदृष्ट्या बंद करता.
समस्या ४ – दीर्घकालीन प्रगतीमध्ये लक्ष बाधा ठरतात.
बरेच धावपटू महिने कठोर परिश्रम करतात, परंतु अंतिम रेषा ओलांडताच ते प्रशिक्षण थांबवतात. त्यांना प्रेरित करण्यासाठी आता यापुढे शर्यत नसते. जेव्हा तुमची सर्व मेहनत एका विशिष्ट ध्येयावर केंद्रित असते, तेव्हा ते गाठल्यानंतर तुम्हाला पुढे ढकलण्यास काय उरते? म्हणूनच बरेच लोक ध्येय गाठल्यानंतर स्वत: ला त्यांच्या जुन्या सवयींकडे वळताना पाहतात.
लक्ष्य निश्चित करण्याचा उद्देश खेळ जिंकणे असतो. प्रणाली विकसित करण्याचा उद्देश खेळ खेळत राहणे असतो. खरी दीर्घकालीन विचारसरणी म्हणजे ध्येय विरहित विचारसरणी. हे कोणत्याही एका कर्तृत्वाबद्दल नाही. हे अंतहीन परिष्करण आणि सतत सुधारणेच्या चक्र बद्दल आहे. शेवटी, ही आपली प्रक्रिया प्रतिबद्धता आहे जी आपली प्रगती निश्चित करेल.
तुमच्या सवयी तुमची ओळख कशी बनतात ?
- पुस्तक वाचणे हे ध्येय नाही, वाचक होणे हे ध्येय आहे.
- मॅरेथॉन धावणे हे ध्येय नाही, तर धावपटू बनणे हे ध्येय आहे.
- एखादे वाद्य शिकणे हे ध्येय नाही, तर संगीतकार बनणे हे ध्येय आहे.
तुम्हाला जशी व्यक्ती बनायची आहे ती व्यक्ती काय करेल असे स्वतःला विचारा ?
जर वजन कमी करायचे असेल तर निरोगी व्यक्ती काय करेल हे विचारा ?
तुम्ही काय साध्य करू इच्छिता यावर लक्ष केंद्रित करू नका, तर तुम्ही कोण बनू इच्छिता यावर लक्ष केंद्रित करा.
प्रेरणेला जास्त महत्व दिले जाते; पर्यावरण अनेकदा अधिक महत्त्वाचे असते.
वातावरण बदला सवयी बदलतील.
जर मी स्वयंपाकघरात गेलो आणि तिथे कुकीजची प्लेट पाहिली तर मी एक डझन उचलून खाण्यास सुरूवात करेल, जरी मी आधी त्यांच्याबद्दल विचार करत नसेल आणि मला भुक नसेल तरीही. वरील फोटो पाहून तुम्हालाही खायची इच्छा झाली असेल, मला तर झाली आहे.
सुपर मार्केटमध्ये डोळ्याच्या पातळीवरील वस्तू सहज विकल्या जातात, त्यामुळे तुम्हाला असे दिसून येईल की तिथे महागडे ब्रँड असतात. याउलट स्वस्त वस्तू अशा जागी असतील जिथे पोहोचणे थोडे कठीण असेल.मेंदूची अर्धी संसाधने दृष्टीवर वापरली जातात.
यशासाठी तुमच्या पर्यावरणाची कशी रचना करावी ?
१९९० साली ॲम्स्टरडॅम येथील एअरपोर्टवर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी एक माशी सारखे दिसणारे स्टिकर मुतारीच्या बरोबर मधोमध चिटकवले. जेव्हा पुरुष लघवी करण्यासाठी येत तेव्हा ते त्या माशीकडे नेम पकडण्याचा प्रयत्न करत, त्यांना वाटत असे ही माशी आहे. त्या स्टिकर मुळे पुरूषांचा नेम सुधारला आणि अस्वछता कमी झाली. पुढे असे निदर्शनास आले की त्या स्टीकर मुळे स्वच्छ करण्याचा खर्च वर्षाला 8 टक्के कमी झाला.
तुम्हाला अधिक पाणी प्यायचे असल्यास दररोज सकाळी काही पाण्याच्या बाटल्या भरा आणि त्या घरात ठिक ठिकाणी ठेवा.
प्रतिकार करण्यापेक्षा मोह टाळणे सोपे आहे.
आत्म-नियंत्रण ही एक अल्पकालीन रणनीती आहे, दीर्घकालीन नाही.
आपण विशेषत: तीन गटांच्या सवयींचे अनुकरण करतो:
1. जवळचे
2. बहुसंख्य.
3. शक्तिशाली.
किमान प्रयत्नांचा कायदा
दोन समान पर्यायांमधील निर्णय घेताना, लोक कमीतकमी मेहनतीची आवश्यकता असलेल्या पर्यायांकडे स्वाभाविकपणे आकर्षित होतात.
जिम जर का तुमच्या कामाच्या रस्त्यावर असेल तर तुम्ही जिमला जाण्याची शक्यता जास्त आहे कारण त्याकरिता तुम्हाला तुमच्या जीवनात काही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही.
आधी लोक गाणे ऐकण्यासाठी दुकानात जाऊन कॅसेट विकत घेत पण आता लगेच मोबाईल वर ऐकू शकतात.
सारखे परिणाम अधिक सोप्या पद्धतीने वितरीत करण्याची कधीच न संपणारी शोध प्रक्रिया म्हणजे व्यवसाय.
दोन-मिनिटांचा नियम वापरुन विलंब करणे कसे थांबवायचे ?
“त्याच सवयी सुधारल्या जाऊ शकतात ज्या अस्तित्वात आहेत, म्हणून छोटी का होईना सुरवात करा.“
“जेव्हा तुम्ही नवीन सवय सुरू करता तेव्हा तिने दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ घ्यावा.”
सवयी तुम्ही दोन मिनिटांमध्ये कशा विभाजीत करू शकता याचे उदाहरण खाली दिले आहे.
“प्रत्येक रात्री झोपायच्या आधी वाचा” बनते “एक पान वाचा.”
“योगा तीस मिनिटे करा” बनते “माझी योगाची चटई काढा.”
“अभ्यास करणे” बनते “माझ्या नोट्स उघडणे.”
“कपड्यांच्या घड्या घालने” बनते “मोज्यांची एक जोडी घडी घालने.”
“तीन मैल चालणे” बनते “माझे धावण्याचे जोडे घालणे.”
सकाळी लवकर उठण्याची सवय कशी लावावी ?
सवयी | सकाळी लवकर उठण्याची सवय | व्यायाम करण्याची सवय कशी लावावी ? |
टप्पा १ | रोज रात्री दहाच्या आत घरी या | व्यायाम करण्याचे कपडे घाला |
टप्पा २ | रोज रात्री टीव्ही फोन सारखी उपकरणे दहाच्या आत बंद करा | दरवाज्याच्या बाहेर पडा चालण्याचा प्रयत्न करा |
टप्पा ३ | रोज रात्री दहाच्या आत बिछान्यावर जा, पुस्तक वाचा किंवा तुमच्या भागीदाराशी बोला | जिम पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा पाच मिनिटे व्यायाम करा आणि परत या |
टप्पा ४ | रोज रात्री दहाच्या आत दिवे बंद करा | आठवड्याला निदान एकदा तरी पंधरा मिनिट व्यायाम करण्याचा प्रयत्न करा |
टप्पा ५ | रोज सकाळी सहा वाजता उठा | आठवड्याला तीन वेळा व्यायाम करा |
जेव्हा तुम्ही नवीन सवयीची सुरुवात करता तेव्हा तिला दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला पाहिजे.
जी सवय अस्तित्वातच नाही तुम्ही सुधारू शकत नाही.
छोट्या प्लेटमध्ये खा तुमची, गुंतवणूक स्वयंचलित करा.
जे पुरस्कृत होते त्याची पुनरावृत्ती होते. ज्यात शिक्षा मिळते ते टाळले जाते.
जे त्वरित पुरस्कृत होते ते परत केले जाते. ज्यात त्वरित शिक्षा मिळते ते टाळले जाते.
आपल्या मेंदूची उत्क्रांती अशी झाली आहे की आपण उशिरा मिळणाऱ्या पुरस्कारांपेक्षा, लगेच मिळणाऱ्या पुरस्कारांना निवडतो. समाधानकारक भावनांपैकी एक भावना म्हणजे प्रगती करण्याची भावना.
तुम्ही जिंकण्याची शक्यता जास्त असेल असा खेळ कसा शोधावा ?
असे काय आहे ज्यात मला मजा येते पण इतरांना ते काम वाटते ?
ज्यात मी वेळ विसरून जातो असे काय आहे ?
जिथे मला सामान्य लोकांपेक्षा जास्त परतावा मिळतोअसे काय आहे ?
नैसर्गिक रित्या मला काय जमते ?
यशाची शक्यता वाढवण्यासाठी योग्य क्षेत्र निवडा.
जनुके बदलता येत नाहीत, त्यामुळे काही परिस्थितींमध्ये ती फायद्याचे ठरतात तर काही परिस्थितींमध्ये ती नुकसानदायक.
असा खेळ खेळा जो तुमच्या बलस्थानांच्या अनुकूल आहे, जर तुम्हाला असा खेळ मिळत नसेल तर असा खेळ तयार करा.
जनुके मेहनत करण्याची गरज संपवत नाहीत, तर ते आपल्याला सांगतात की आपण कुठे मेहनत करण्याची गरज आहे.
तुमच्या क्षमतेच्या सीमेवर असणारी आव्हाने तुम्हाला जास्त प्रोत्साहित करतात.
सवयींची जमेची बाजू अशी आहे की आपण विचार न करता गोष्टी करू शकतो. नकारात्मक बाब म्हणजे आपण छोट्या त्रुटींकडे लक्ष देणे थांबवतो.
सवयी बदलून जीवन कसे बदलावे हे सविस्तर जाणण्यासाठी हे पुस्तक आताच खालील लिंकवरून विकत घ्या.
पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा. पुस्तक नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या.
फ्री pdf शोधणारे पूर्ण पुस्तक क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते. वरील लिंक वरून पुस्तक विकत घ्या.
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.
1 thought on “Atomic Habits Marathi By James Clear”