ELSS मराठी मध्ये.
ELSS म्हणजे Equity Linked Saving Scheme.
आता तुम्ही बोलणार फुल फॉर्म सांगून काही फायदा नाही झाला. अजूनही काहीच कळल नाही. आपला उद्देशच आहे, माहिती एकदम सोपी करून सांगण्याचा. म्हणून खाली एक-एक शब्दाचा अर्थ पाहूया.
Equity – व्यवसायाचा भागीदार होणे
Linked – जुळलेली
Saving – बचत
Scheme – योजना
याचाच अर्थ सोप्या भाषेत, अशी बचत योजना जी आपल्याला व्यवसायाचा भागीदार होण्यास मदत करते. बाकी बचत योजनेत आणि ELSS मध्ये फरक काय ? हे त्याच्या नावामुळे, आता तुमच्या लक्षात आलेच असेल. ही बचत योजना तुम्हाला व्यवसायाचा भागीदार बनवते. व्यवसाय म्हटलं का नफा नुकसान आलाच. आणि आपण व्यवसायाचे भागीदार, म्हणजेच आपण नफ्या – नुकसानाचे भागीदार.
तर ELSS आणि इतर बचत योजनांमध्ये मुख्य फरक आहे, धोक्याचा आणि परताव्याचा. व्यवसायाचे भागीदार झाल्यामुळे धोका जास्त आणि मिळणारा परतावा ही.
मग कुठल्या व्यवसायात आपण पैसे लावायचे ? तो निर्णय घेणे आपले काम नाही. तो निर्णय ELSS चा फंड मॅनेजर घेईल. ELSS हा म्युच्युअल फंड चाच प्रकार आहे. म्युच्युअल फंड बद्दल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंड म्हणजे काय ? हा लेख वाचू शकता. फंड मॅनेजर यासारखे म्युच्युअल फंड चे शब्द तुम्हाला माहित नसतील, तर तुम्ही म्युच्युअल फंड शब्दकोश हा लेख वाचू शकता.
तर आता परत मूळ मुद्यावर वळूया, म्हणजेच ELSS. हा म्युच्युअल फंड चाच प्रकार आहे, मग यात इतर फंड पेक्षा वेगळ काय ? यात दोन गोष्टी प्रामुख्याने वेगळ्या आहेत ज्या याला इतर म्युच्युअल फंड पेक्षा वेगळ करतात.
१. इनकम टॅक्स सुट 80(c)
२. लॉक इन पिरियड ३ वर्ष – म्हणजे असा काळ, ज्यात तुम्ही पैसे काढू शकत नाही.
ELSS कोणासाठी योग्य आहे ?
१. ज्या लोकांना इनकम टॅक्स 80 (c) सुट हवी आहे.
२. जे लोक इतर टॅक्स बचत योजना जसे का FD, PPF पेक्षा थोडा जास्त धोका घ्यायला तयार आहेत, जास्त परतावा मिळवण्याकरीता.
ELSS कोणासाठी योग्य नाही ?
१. ज्या लोकांना इनकम टॅक्स सूट 80 (c) नको आहे.
२. ज्यांना मार्केटच्या चढ उतारांचा धोका घ्यायचा नाही आहे. जे कमी परतावा आला तरी समाधानी आहेत.
ELSS मध्ये धोका किती ?
ELSS हे Diversified Mutual Fund सारखे असतात. ते Large, Mid आणि Small अशा सर्व प्रकारच्या कंपनी मध्ये गुंतवणूक करतात. ELSS मध्ये हायब्रीड फंड पेक्षा जास्त व सेक्टर फंड पेक्षा कमी धोका असतो. ज्या व्यक्तीला म्युच्युअल फंड च्या धोक्याबद्दल बद्दल माहिती नाही, त्याने म्युच्युअल फंड म्हणजे काय ? हा लेख वाचावा.
ELSS मध्ये परतावा किती ?
व्यवसायात निश्चित परतावा नसतो. म्हणून ELSS मध्ये ही निश्चित परतावा नसतो. मागील काळातील म्युच्युअल फंडचा परतावा पाहून आपण काही अंदाज लावू शकतो. पण मागील परतावा भविष्यात मिळेल का नाही याची शास्वती नसते. परतावा जास्त, कमी किंवा सारखाही असू शकतो. मागील काही दशकांमध्ये ELSS च्या काही फंड ने चांगला परतावा दिला आहे. त्याचे उदाहरण आपण इथे पाहू शकता. SBI चा हा plan २२ वर्षात ४० पट झाला. तर बिर्ला चा हा plan २० वर्षात १०० पट.
धोक्याची सूचना – म्युच्युअल फंड हे बाजार जोखीमेच्या अधीन असतात. म्युच्युअल फंड मध्ये मागील परतावा भविष्यात येऊ शकतो अथवा येऊ ही शकत नाही. म्युच्युअल फंड संबंधित योजनेबद्दल कागदपत्र वाचून गुंतवणूक करावी.
म्युच्युअल फंड मध्ये निश्चित नाही, तर अपेक्षित परतावा असतो. १० वर्ष तुम्ही गुंतवणून राहिल्यास १२-१५ % वार्षिक परतावा तुम्ही अपेक्षा करू शकता.
ELSS ची इतर योजनांशी तुलना
निकष | FD | PPF | ULIP | ELSS |
---|---|---|---|---|
लॉक इन पिरियड | ५ | १५ | ५ | ३ |
धोका | कमी | कमी | जास्त | जास्त |
पैसे काढताना टॅक्स | व्याजावर | नाही | नाही | नाही |
परतावा | ७-९% | ८% | मार्केट अबलंबून | मार्केट अवलंबून |
PPF ६ वर्षांनंतर अंशात्मक रक्कम काढू शकतो, पण पूर्ण रक्कम १५ वर्ष झाल्यावरच.
ELSS मध्ये जरी लॉक इन पिरियड ३ वर्षांचा असला, तरी तुम्ही ३ वर्ष कालावधी साठी गुंतवणूक करू नका. ३ वर्षांनंतर पण तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. पण गुंतवणूक करताना, तुम्ही दिर्घअवधीसाठी म्हणजेच १० वर्ष वा अधिक काळासाठी गुंतवणून राहण्याची तयारी ठेवली पाहिजे.
PPF vs ELSS
खालील आलेखामध्ये PPF आणि ELSS च्या परताव्यामध्ये फरक दर्शविला आहे.
लाल रेष ELSS चा
तर निळी रेष PPF चा परतावा दाखवत आहे.
हिरवी रेष महागाई दाखवते.
हा फरक २००५ – २०१५ या कालावधी दरम्यानचा आहे. सविस्तर माहिती तुम्ही इथे पाहू शकता.
या काळात PPF ने सरासरी वार्षिक ८% दराने परतावा दिलाय, तर ELSS ने सरासरी वार्षिक १५% दराने परतावा दिलाय.
२००५ मध्ये गुंतवलेले १,०००
२०१५ मध्ये
PPF – २२१५
ELSS – ५४६० झाले
हेच उदाहरण जर आपण १ लाखांसाठी पहिले तर आपल्याला असे दिसून येईल की
१ लाखाचे १० वर्षात
PPF – २.२ लाख
ELSS – ५.४ लाख
एवढे झाले.
ELSS मध्ये गुंतवणुकीचे दोन पर्याय
१. LUMPSUM – एकाच वेळी गुंतवणूक करणे.
२. SIP – नियमित गुंतवणूक करणे.
SIP यात तुम्ही मासिक गुंतवणूक करू शकता.
SIP मधून मासिक गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्ष्यात घ्या. लॉक इन पिरियड ३ वर्षांचा आहे. म्हणजे ३ वर्ष पैसे काढता येणार नाहीत. तर SIP मध्ये ३ वर्षांचा काळ खालील प्रकारे पकडण्यात येईल.
नोव्हेंबर २०१७ साठी नोव्हेंबर २०२०
डिसेंबर २०१७ साठी नोव्हेंबर २०२०
जानेवारी २०१८ साठी जानेवारी २०२१
याचाच अर्थ असा आहे कि, SIP मध्ये जी मासिक गुंतवणूक करता, त्या तारखेपासून तुम्हाला ३ वर्ष म्हणजेच ३६ महिने वाट पहावी लागेल.
आणखी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे, नोव्हेंबर २०१७ आधी तुम्ही जेवढी पण गुंतवणूक ELSS मध्ये केली आहे, ती तुम्ही नोव्हेंबर २०२० नंतर काढू शकता. पण डिसेंबर २०१४ ची गुंतवणूक काढण्याकरिता तुम्हाला डिसेंबर २०२० पर्यंत थांबावे लागेल.
SIP बद्दल अधिक माहिती साठी SIP म्हणजे काय ? SIP काम का करते ? हा लेख वाचू शकता.
ULIP vs ELSS
ULIP चे plan सुद्धा मार्केट मध्ये गुंतवणूक करतात. पण ते गुंतवणुकी बरोबर विमा ही देतात. पण त्यामुळे तुमची पूर्ण रक्कम गुंतवणूक होत नाही. सर्वात उत्तम हे राहील कि गुंतवणुकी करिता म्युच्युअल फंड आणि विम्याकरिता टर्म इन्शुरन्स घेणे. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय ? ते तुम्ही ह्या लेखात वाचू शकता.
ELSS मध्ये टॅक्स सूट किती ?
ELSS मध्ये टॅक्स सूट ची कमाल मर्यादा १.५ लाख आहे. याचा अर्थ तुमचा १.५ लाख पर्यंत टॅक्स माफ होतो असे नाही. तर १.५ लाखांवर जो टॅक्स तुम्हाला भरावा लागणार होता, तो माफ होईल. म्हणजे समजा तुमचे उत्पन्न ६.५० लाख आहे आणि १.५ लाख तुम्ही ELSS मध्ये गुंतवले तर तुम्हाला ० Income टॅक्स भरावा लागेल.
मार्च ची वाट नको
टॅक्स वाचवण्यासाठी मार्च महिन्याची वाट पाहू नका. आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच, म्हणजेच एप्रिल मधेच ठरवा. तुम्हाला टॅक्स वाचवण्यासाठी काय करावे लागेल. त्यामुळे तुम्ही घाईत चुकीचे निर्णय घेणार नाही. SIP पद्धतीने ELSS मध्ये गुंतवणूक करु शकता, त्यामुळे तुमचा धोका कमी होईल.
मी बातमी मध्ये असे उदाहरण वाचले आहे, ज्यात एका व्यक्तीने वर्षाच्या शेवटच्या दिवशी ELSS मध्ये ऑनलाईन गुंतवणूक केली. परंतु बँक व्यवहार फेल झाल्यामुळे नंतर तो व्यवहार रद्द झाला. मग त्या व्यक्तीला त्या वर्षी टॅक्स सूट मिळाली नाही. त्यामुळे मार्च ची वाट पाहू नका. लवकर टॅक्स वाचवण्याची योजना आखा.
३ वर्ष लॉक इन का ?
तुम्ही जी गुंतावणूक करता, तिचा उपयोग देशाच्या विकासासाठी होतो. तुम्ही व्यवसायात केलेली गुंतवणूक ही उद्योगांना वाढण्यास मदत करते. यामुळे सरकार तुम्हाला करामध्ये सूट देते. तुम्ही जी गुंतवणूक केली आहे, त्याचा खरोखर फायदा व्यवसायांना व्हावा, यासाठी सरकारने त्यावर ३ वर्ष रक्कम काढण्यास निर्बंध लादला आहे.
SBI च्या ELSS प्लॅन बद्दल तुम्ही या लेखात सविस्तर माहिती पाहू शकता.
Top ELSS Fund
काही टॉप ELSS फंड ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता, खालील प्रमाणे आहेत.
ICICI Prudential Long Term
Equity Fund (Tax Saving)
इतर लेख वाचण्याकरिता तुम्ही इथे क्लिक करू शकता.
आमच्या फेसबुक पेज ला इथे भेट देऊ शकता.
I have invested 20000/- in 2007 in SBI Magnum tax gain scheme
at Loni branch IFIc code no
SBIN0006322
Afterwards I have no any reply pl inform us on my mail
Please contact your bank or call this sbi mf customer no. 18004255425
I have to invest 50 thousand rupees in this schem
and how can i invest
तुम्ही आमच्या फेसबुक पेजला मेसेज करा.
http://www.facebook.com/guntavnukdar