How To Stop Worrying And Start Living Marathi By Dale Carnegie चिंता सोडा सुखाने जगा

How To Stop Worrying And Start Living Marathi Dale Carnegie चिंता सोडा सुखाने जगा. या पुस्तकाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. हे पुस्तक विकत घ्यावे का नाही ? हा निर्णय घेण्यास तुम्हाला हा लेख मदत करेल.

मला सर्वात जास्त आवडलेल्या पुस्तकांपैकी एक हे पुस्तक आहे. माझ्या जीवनातील निराशेच्या काळात या पुस्तकाची मला फार मदत झाली. आजही जेव्हा मला जास्त चिंता वाटते, तेव्हा या पुस्तकाकडे मी परत जातो. फक्त याच पुस्तकाने तुमची चिंता पूर्ण मिटेल असे मी इथे म्हणत नाही. पण या पुस्तकाचा भरपूर फायदा नक्की होईल. या पुस्तकातील सिद्धांत वापरून तुमच्या बऱ्याच चिंता नक्कीच कमी होतील.

How To Stop Worrying And Start Living Marathi

या पुस्तकाचा जास्तीत जास्त लाभ कसा करून घ्यावा ?

आपल्या डोक्यात फक्त तेच विचार राहतात, ज्यांचा आपण उपयोग करतो.

तुम्हाला या पुस्तकात दिलेल्या सिद्धांतानुसार प्रत्येक क्षणी जगणे कठीण वाटेल, मी हे पुस्तक लिहिले आहे तरीसुद्धा मी शिकवलेल्या सिद्धांतानुसार जगणे मला अनेक वेळा कठीण जाते. तुम्ही जेव्हा हे पुस्तक वाचाल तेव्हा लक्ष्यात ठेवा, तुम्ही हे पुस्तक फक्त माहिती गोळा करण्याकरिता नाही तर सवयी लावण्याकरिता वाचत आहात. तुम्ही नवीन जीवनशैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहात. याला वेळ, चिकाटी आणि दैनंदिन अभ्यासाची गरज असते.

वाचताना नेहमी थोडे थांबून विचार करा, की प्रत्येक सल्ला तुम्ही तुमच्या जीवनात कशा प्रकारे अमलात आणू शकता.

Dale Carnegie

वर्तमानात एक एक दिवस जगा.

जहाज डुबू नये म्हणून काय करण्यात येते ?

जहाजाचा तळ अनेक छोट्या विभागांमध्ये विभाजित करण्यात येतो. समजा चुकून जहाजाला कुठे छिद्र पडले, तर तेवढा तो भाग इतर भागांपासून बंद करण्यात येतो. म्हणजे त्या भागातील पाणी इतर भागांमध्ये जाणार नाही आणि जहाज डुबणार नाही.

अशाच प्रकारे आपण आपले जीवन डूबण्यापासून वाचवू शकतो. आपल्याला काय करायचे आहे ?

भूतकाळाचा दरवाजा बंद आणि भविष्याचा दरवाजा बंद. भूतकाळातील चुकांची चिंता करू नका, भविष्यात येणाऱ्या समस्यांची चिंता करू नका. इथे एक गोष्ट लक्ष्यात घ्या, मी इथे चिंता करू नका असे म्हणत आहे, विचार करू नका असे नाही. विचार करणे आणि चिंता करणे यात फरक आहे. जेव्हा अति विचार करून आपल्याला फायदा न होता फक्त त्रास होतो, ती झाली चिंता.

जीवन हे वाळूचे घड्याळ आहे.

वाळूचे घड्याळ

या घड्याळात जसे एका वेळी एक-एक करून वाळूचे कण खाली जातात, तसेच आपले जीवन आहे. एका वेळी एक-एक क्षण आपण जगला पाहिजे. एका वेळी अनेक कामे करायला गेलो तर आपण अनेक वाळूचे कण एकाच वेळी खाली घालायला पाहू. त्यामुळे मोकळी जागा बंद होईल आणि वाळू खाली जाणेच बंद होईल. जास्त दबाव वाढवला तर घड्याळ फुटूनच जाईल. माणसांचे पण असेच असते, एका वेळी अनेक काम करायला गेलं की आपण शारीरिक आणि मानसिक ताण वाढवून घेतो.

तोच खुश आहे, आणि केवळ तोच खुश आहे,

जो ‘आज’ला आपला बोलू शकतो,

जो आत्मविश्वासाने बोलू शकतो-

उद्या तुम्हाला जे करायचे ते करा, मी तर आज जगलोय.

-Horace

child to old

लहान मुल असताना तो म्हणे मी जेव्हा मी मोठा होईल,

मोठा झाल्यावर तो म्हणे जेव्हा मी कमवायला लागेल,

कमवायला लागल्यावर तो म्हणे जेव्हा माझ लग्न होईल,

लग्न झाल्यावर तो म्हणे, निवृत्त झाल्यावर

आणि निवृत्त झाल्यावर फार उशिरा त्याला कळत, जीवन हे प्रत्येक क्षणी जगण्यासाठी असत, ते आपण प्रत्येक क्षणाला, तासाला जगल पाहिजे.

तुम्ही भूतकाळातील गोष्टींचा पश्चाताप करून वर्तमानाला निराशाजनक बनवत आहात का ? त्या घटना, ज्या घटल्या आहेत, ज्या बदलू शकत नाहीत.

“आरीने भुसा कापू नका.”

-फ्रेड फुलर शेड

चिंताजनक स्थितींना सोडवण्याचा जादुई फॉर्म्युला

१. वाईटात वाईट काय होऊ शकत ?

२. त्याला स्वीकारा.

३. आता विचार करा आपण या वाईटात वाईटाला सुधारू शकतो का ?

अर्ल हैनी, यांना अल्सर ची बिमारी झाली होती. रोज रात्री आणि सकाळी नर्स त्यांच्या आमाशयामध्ये रबरी नळी टाकत असे, आणि त्यातील सामग्री बाहेर काढत असे.

अर्ल हैनी, यांना जगाची सफर करण्याची इच्छा होती, त्यांना वाटले आपली इच्छा पूर्ण करण्याची हीच शेवटची संधी आहे, एक तर ते तडफडत मरु शकतात किंवा जो वेळ त्यांच्याकडे उरला आहे, त्याचा ते आनंद घेऊ शकतात.

हैनी यांनी ही गोष्ट डॉक्टरांना सांगितली, “मी जगाच्या प्रवासावर जहाजाने निघालो आहे आणि दिवसातून दोन वेळा स्वतः आमाशयाला पंप करणार आहे.” त्यावर डॉक्टरांनी त्यांना चेतावणी दिली की असे केले तर तुमचे शरीर समुद्रात गाडले जाईल. त्यावर अर्ल बोलले, ” नाही, असे नाही होणार, मी आपले ताबूत सोबत घेऊन जात आहे, मी मेलो तर जहाज परत येईपर्यंत ते मला बर्फात ठेवतील. “

जहाजावर त्यांनी मजा केली. जेव्हा अर्ल हैनी परतले तेव्हा ते विसरले होते कि त्यांना आमाशयाची काही बिमारी आहे.

१. वाईटात वाईट ? मृत्यू

२. त्याचा त्यांनी स्वीकार केला.

३. स्थिती सुधारण्याचा प्रयत्न – जेवढा वेळ त्यांच्याकडे होता, त्यात आनंद घेण्याचा प्रयत्न.

चिंता तुमचे काय बिघडवू शकते ?

जे लोक चिंतेशी लढू शकत नाही, ते तरुणपणीच मरतात.

डॉ. अलेक्सिस कैरेल

आपण अशा व्यक्तीला यशस्वी बोलू शकतो का, जो व्यवसायातील प्रगतीची किंमत पोटाचा अल्सर, हृदयाच्या बिमारीने चुकवत आहे ?

काय फायदा, जर कोणी व्यक्ती पूर्ण जग जिंकेल पण आपले स्वास्थ गमावून बसेल?

भलेही तो पूर्ण जगाचा मालक बनू शकतो, परंतु तो एकावेळी एकाच पलंगावर झोपू शकतो, आणि दिवसातून फक्त ३ वेळाच जेवू शकतो.

हसण्याने कॅन्सर बरा तर नाही होऊ शकत, पण आनंदी राहिल्याने शरीराला बिमारीशी लढायला मदत नक्कीच मिळते.

चिंतेचे विश्लेषण कसे करावे ? आणि तिला कसे सोडवावे ?

माझे ६ प्रामाणिक सेवक आहेत. (मी जे काही जाणतो ते सर्व काही त्यांनी मला शिकवलं आहे).

त्यांचे नाव आहे – काय ? का ? कधी ? कसे ? कुठे ? कोणी ?

रुड्यार्ड किपलिंग

१. तथ्ये जमा करा.

२. तथ्यांचे विश्लेषण करा.

३. निर्णयावर पोहचा आणि निर्णयानुसार काम करा.

आपण शिकारी कुत्र्यांसारखे फक्त त्याच गोष्टींचा शोध घेतो, ज्या आपल्या पक्षाला मजबूत करतील. बाकी सर्व तथ्यांना आपण दुर्लक्षित करतो. आपल्याला फक्त तेच तथ्य हवे असतात जे आपल्या कार्यांना योग्य ठरवतात. आपण असेच तथ्य शोधत असतो जे आपल्या पूर्वग्रहांना न्याय्य ठरवतात. यालाच इंग्लिश मध्ये Confirmation Bias म्हणतात.

आपण तथ्यांना निष्पक्ष आणि निरपेक्ष पणे जमा केले पाहिजे.

अशी कल्पना करा की तुम्ही विरोधी पक्षाचे वकील आहात, आणि आता तथ्य जमा करा.

५० % चिंता तेव्हा संपतात जेव्हा तुम्ही काही निर्णयावर पोहचता, उरलेल्या ५० % तेव्हा जेव्हा तुम्ही निर्णयावर काम सुरु करता.

१. मी कशाबद्दल चिंता करत आहे ?

२. मी याबद्दल काय करू शकतो ?

३. मी याबद्दल ——– हे करणार आहे.

४. मी हे काम कधी सुरु करणार आहे ?

How To Stop Worrying And Start Living Marathi

तुमच्या व्यवसायाच्या ५० % चिंता कशा दूर करू शकता.

तुमच्या कर्मचाऱ्यांना खालील प्रश्न विचारा.

१. समस्या काय आहे ?

२. समस्येचे कारण काय आहे ?

३. समस्या किती मार्गांनी सोडवली जाऊ शकते ?

४. तुम्ही कोणता मार्ग सुचवता ?

तुम्ही असे प्रश्न तुमच्या कर्मचाऱ्यांना विचारले तर तुमच्या व्यवसायातील ५० % चिंता कमी होतील. कारण ह्या ४ प्रश्नांचे उत्तर देण्याकरिता त्यांना तथ्य जमवावे लागतील. योग्य विचार करावा लागेल. त्यामुळे अनेक वेळा त्यांना तुम्हाला विचारण्याची गरजच पडणार नाही. त्यांना स्वत:च समजून जाईल, अशा परिस्थितीमध्ये काय केले पाहीजे ?

असा एक नियम जो तुमच्या अनेक चिंता मिटवेल.

विमा कंपनी काय करतात ? त्या तुमच्याशी शर्यत लावतात. ज्या गोष्टी होतील असे तुम्हाला वाटत विमा कंपनीला ते वाटत नाही. विमा कंपनी शर्यत लावते तुम्ही जर मृत पावले तर इतके रक्कम मिळेल. विमा कंपनीला वाटत तुम्ही मरणार नाही. त्या मागे विमा कंपनीचे गणित असतं जे त्यांना सांगत, हा व्यक्ती मरण्याची शक्यता किती ? त्यानुसार ते आपल्याला विम्याचे हफ्ते देतात. आणि विमा कंपनीचे हे गणित कोणत आहे ? तर त्याच नाव आहे सरासरी.

विमा कंपनी हिशोब लावतात की मागील ५० वर्षात किती % लोक ५० वर्षाआधी मृत पावले ? कोणत्या कारणामुळे मृत पावले ? यांचा अभ्यास केला जातो. त्यानुसार पुढील ५० वर्षात काय होऊ शकत याचा एक अंदाज घेतला जातो. आणि त्या नुसार मग विमा कंपनी आपला हफ्ता ठरवते. साहजिकच वाटते तेवढ हे गणित सोप नाही, पण सांगण्याचा इथे मुख्य मुद्दा म्हणजे, सरासरी.

जर आपणही सरासरी चा नियम जीवनात अमलात आणला तर आपल्या अनेक चिंता संपून जातील. एक व्यापारी होता, तो नेहमी चिंतीत राहायचा, त्याचा माल ट्रेन ने जाताना अपघात झाला तर ? ट्रेन ज्या पुलावरून जाते तो पडला तर ? या चिंतेमुळे त्याला फार त्रास होत होता. त्याच्याकडे त्याच्या सामानाचा विमा असून पण. मग त्याने पण सरासरी चा नियम वापरण्याचे ठरवले.

मी आज पर्यंत किती वेळा माल पाठवला आहे ? २५,०००. यात किती वेळा ट्रेन चा अपघात झाला आहे ? ५ वेळा. म्हणजे दुसऱ्या शब्दात ५,००० मध्ये एकदा.

आणि पूल पडला तर ? मग त्याने विचार केला २५,००० वेळा माल पाठवून पूल एकदा पण पडला नाही.

आणि त्याच्याकडे विमा तर होताच. म्हणजे ज्या घटना क्वचितच होता किंवा कधीच होत नाही त्यांची चिंता करत आपण जीवनात खूप वेळ वाया घालवतो आणि स्वतःला त्रास करून घेतो.

जुने रेकॉर्ड पहा. स्वतःला विचार, मी ज्या बद्दल चिंता करत आहे, सरासरी च्या नियमानुसार ती गोष्ट होण्याची किती शक्यता आहे ?

How To Stop Worrying And Start Living Marathi

जे झालं त्याचा स्वीकार करा.

जीवनात तुम्हाला अनेकदा जे वाईट झाल आहे त्याचा स्वीकार करून पुढे जाव लागतं. हे झाल आहे, आणि ते आता बदलू शकत नाही. परंतु मी जीवनात पुढे जाऊ शकतो, आणि मी जाणार.

अशक्य गोष्टींचा आपण स्वीकार केला पाहिजे.

नालीत वाहून गेलेल्या दुधाबद्दल रडून काय फायदा ?

हा लेख तुम्ही वाचू शकत आहे ? म्हणजे तुमचे डोळे चांगले आहेत. तुम्ही वाचून ज्ञान मिळवू शकता. पण विचार करा, अनेक लोकांनी आपली दृष्टी गमावली आहे, त्यांनी जगणे सोडले का ? जे झालं त्याचा स्वीकार करा, जे बदलणे अशक्य आहे, त्याचा स्वीकार करा आणि जीवनात पुढे चला.

दुर्घटना, आपल्या जीवनात दु:खाच कारण नसतात, तर दु:ख झेलू शकण्याची योग्यता नसणे हे दुःखाच कारण असतं.

त्या गोष्टींचा स्वीकार करा ज्या बदलल्या जाऊ शकत नाही,

ज्या गोष्टी बदलल्या जाऊ शकतात त्यांच्याबद्दल धैर्य ठेवा,

आणि या दोन्ही मधील फरक ओळखण्याची बुद्धी.

Stop Loss

शेयर मार्केटशी संबंधीत व्यक्तींना Stop Loss काय आहे, याची कल्पना आहे. इतरांकरिता सोप्या शब्दात Stop Loss म्हणजे काय हे पाहू.

Stop – थांबवणे
Loss – नुकसान

समजा तुम्ही एक शेयर १०० ला घेतला आहे आणि तुम्ही त्यात ५ रुपये नुकसान झेलू शकता. म्हणून तुम्ही ९५ वर Stop Loss लावला. म्हणजे आता त्या शेयरची किंमत ९५ झाली तर तो शेयर आपोआप विकला जाईल. ही झाली Stop Loss ची मुलभूत माहिती, सविस्तर नाही.

Stop Loss म्हणजे जीवनात एक असा बिंदू निश्चित करणे, ज्या पलीकडे तुम्ही नुकसान सहन करणार नाही.

मित्राची वाट पाहताय ? पण तो उशिरा भेटायला येतो ? असा काही काळ ठरवून घ्या की त्या पलीकडे तुम्ही त्याची वाट पाहणार नाही, ह्याला म्हणतात Stop Loss.

तुमच्या चिंतेवर Stop Loss लावा. ठरवून घ्या, ह्या बिंदू नंतर मी अमुक अमुक गोष्ट करेल, त्रास सहन करणार नाही. म्हणजे एखाद्या गोष्टी मध्ये नुकसान किती सहन करायचं ते आधीच ठरवून घ्या आणि तो बिंदू आला तर नुकसान सहन करून पुढे चला. यामुळे विनाकारण चिंता करत बसण्याची सवय बंद होईल, कारण छोट्या छोट्या गोष्टींसाठी चिंता करणे व्यर्थ आहे. आणि वेळेवर काय करू, ठरवण्यापेक्षा आधीच काय करायचे याचे तुमच्याकडे नियोजन असेल. Stop Loss नंतर काय होते, याचा पश्चाताप करू नका. आधीच सर्व गोष्टींचा विचार करून Stop Loss ठरवा.

गोष्टी कधी सोडाव्यात हे शिकण्यासाठी हा लेख वाचा.

या पुस्तकात वरच्या सारखे अनेक मार्ग सुचवले आहेत ज्यांनी तुम्ही चिंता मुक्त होऊ शकता. तसेच या पुस्तकात अनेक लोकांचे अनुभव पण आहेत, त्यांनी कशा प्रकारे त्यांच्या चिंतेवर मात केली आहे.

या पुस्तकातील पूर्ण ज्ञान तुम्ही खालील लिंक वरून पुस्तक विकत घेऊन मिळवू शकता.

How To Stop Worrying And Start Living Marathi

Dale Carnegie यांचे दुसरे पुस्तक लोक व्यवहार. मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा. How To Win Friends and Influence People याबदल तुम्ही आमचा लेख वाचू शकता.

हे पुस्तक तुम्ही आमच्या facebook पेज वर जिंकूही शकता. सविस्तर माहिती साठी आमचं पेज पहा.

फ्री pdf शोधणारे पूर्ण पुस्तक क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते. वरील लिंक वरून पुस्तक विकत घ्या.

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

7 thoughts on “How To Stop Worrying And Start Living Marathi By Dale Carnegie चिंता सोडा सुखाने जगा”

  1. Thank you so much! Fantastic theory … Great philosophy made so simple & in easy to implement. Hat’s off! Beyond mere words ! Selfless Service! Best Regards!

    Reply
  2. SIR THANKS KHUP CHAN BOOK AAHE MI ORDER KEL AANI READ KEL AAYUSHYAT VACHALYLACH PAHIJE ASE BOOK THANKU SO MUCH

    Reply
  3. Thank you for sharing such a important story…. Very basic mistake we all do in our day to day life…. because of this today we are facing major health issues…

    Reply

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.