ICICI Prudential Freedom SIP. कोण सुरू करू शकतं ?

ICICI Prudential Freedom SIP हे अनेक स्मार्ट फिचर चे संयुक्त रूप आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारजोखिमेच्या अधीन असते. योजनेशी संबधीत दस्तावेज वाचूनच गुंतवणूक करावी.

ICICI Prudential Freedom SIP

SIP + विमा + स्विच + SWP = Freedom SIP

फ्रीडम SIP मध्ये या सर्व सुविधा आहेत.

  1. तुम्ही SIP करता.
  2. तुम्हाला विमा मिळतो.
  3. ठराविक काळानंतर तुमचा पैसा switch होतो.
  4. तुम्ही SWP ने दरमहा पैसे काढता.
फ्रीडम SIP कशी काम करते ?

SIP

Systematic Investment Plan म्हणजे SIP. ही SIP इतर SIP सारखीच आहे, फक्त या मध्ये मासिक हा पर्याय उपलब्ध आहे. त्रैमासिक, अर्धवार्षिक हा पर्याय यात उपलब्ध नाही.

विमा

ही अशी SIP आहे ज्यात तुम्हाला विमा मिळतो. SIP PLUS ही सुविधा तुम्हाला यात मिळते.

SIP PLUS

पहिल्या वर्षी विमा मासिक SIP रक्कमेच्या १० पट असतो.

दुसऱ्या वर्षी ५० पट.

तर तिसऱ्या वर्षी १०० पट.

SIP PLUS बद्दल अधिक माहितीसाठी विमा वाली SIP हा लेख तुम्ही वाचू शकता.

स्विच

तुमचा SIP चा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुमचे पैसे हे सोर्स स्किम मधून टार्गेट स्किम मध्ये स्विच होतील.

सोर्स स्किम – म्हणजे म्युच्युअल फंड ची अशी योजना ज्यात तुम्ही SIP सुरू करता.

टार्गेट स्किम – म्हणजे म्युच्युअल फंड ची अशी योजना ज्यात तुम्ही SWP सुरू कराल.

SWP – Systematic Withdrawal Plan, म्हणजे ठराविक काळानंतर ठराविक रक्कम काढणे. SWP वापरून तुम्ही दरमहा ठराविक रक्कम मिळवू शकता.

स्विच ची आवशक्यता काय ?

जेव्हा आपण SIP सुरू करतो तेव्हा पैसे काढायला काही वर्षे बाकी असतात. त्यामुळे आपण जास्त धोका असणारी योजना निवडू शकतो. कारण जास्त परतावा यावा ही आपली अपेक्षा असते.

परंतु जेव्हा आपण SWP मार्फत पैसे काढणे सुरू करतो, तेव्हा आपला उद्देश सुरळीत दरमहा रक्कम मिळणे हा असतो. पैसे काढणे आपण सुरू केल्यामुळे आता आपण कमी धोका घेतो.

SIP सुरू करताना आपला उद्देश संपत्ती वाढविणे हा असतो तर SWP घेताना आपला उद्देश नियमित उत्पन्न हा असतो. म्हणून धोका घेण्याची आपली क्षमता कमी होते.

जास्त धोका, जास्त परतावा योजनेमधून कमी धोका कमी परतावा योजनेमध्ये आपले पैसे ट्रान्सफर होतात त्याला आपण स्विच म्हणू.

Source & Target Scheme

कालावधी

फ्रीडम SIP कालावधी

ही SIP तुम्ही ८, १०, १२, १५, २०, २५, ३० वर्षे कालावधीकरिता सुरू करू शकता.

वरील फोटो मध्ये उदाहरण दिले आहे की किती वर्षे SIP केल्यास तुम्ही किती रक्कमेची SWP करू शकता.

१०,००० ₹ SIP तुम्ही ३० वर्ष केल्यास दरमहा तुम्ही १.२ लाख म्हणजेच SIP रक्कमेच्या १२ पट रक्कम ३० वर्षानंतर SWP च्या स्वरूपात काढू शकता.

१०,००० हे इथे उदाहरण दिले आहे, तुम्ही कमीत कमी १,००० ची SIP करू शकता. परंतु कालावधी तुम्हाला ८,१०,१२,१५,२०,२५,३० यापैकीच निवडावा लागेल. किती वर्षे SIP सुरू ठेवली तर SIP च्या किती पट SWP सुरू करता येईल, याचे वर उदाहरण दिले आहे. जसे की १२ वर्षे SIP केल्यास दुप्पट SWP तर २० वर्ष SIP केल्यास ५ पट SWP.

मी कोणता कालावधी निवडावा ?

तुम्ही ज्या उद्देशासाठी गुंतवणूक करत आहात, त्याला किती वर्षे बाकी आहे, त्यानुसार तुम्ही कालावधी निवडू शकता. जसे निवृत्तीसाठी तुम्ही गुंतवणूक करत असाल तर निवृत्तीला जेवढे वर्ष बाकी असतील त्या कालावधीची SIP करा.

जर मुलांसाठी SIP करत असाल तर त्यांच्या पदवीला अजून किती वर्षे बाकी आहेत, त्या हिशोबाने SIP करा.

फिरायला जाणे, कार किंवा घर घेणे या गोष्टींसाठी तुम्ही पैसे जमा करत असल्यास तेवढ्या कालावधीची SIP घ्या.

किती रक्कमेची SIP ?

१०,०००₹ ६% महागाई पकडून आपण किती होतात हे खाली पाहूया.

६% महागाई दर

वरील फोटो वरून तुम्हाला असे दिसून येईल की आजचे १०,००० हे १० वर्षांनी १७,००० च्या बरोबर असतील. म्हणजे आजचे, २०२१ चे १०,००० ची बरोबरी २०३१ चे १७,००० करतील. म्हणजे ज्या व्यक्तीला २०२१ मध्ये १०,००० लागतात त्या व्यक्तीला २०३१ मध्ये १७,००० लागतील.

३० वर्षाचे उदाहरण घेतले तर, आजचे,२०२१ चे १०,००० २०५१ सालच्या ५७,००० च्या बरोबर असतील. म्हणजे ज्याचा खर्च आज १०,००० आहे त्याचा ३० वर्षांनी अंदाजे ५७,०००₹ असेल. यावरून तुम्ही तुमच्या निवृत्तीला किती पैसे लागतील हे ठरवू शकता.

परतावा ठरलेला आहे का ?

नाही. म्युच्युअल फंड च्या कोणत्याच योजनेत परतावा आधीच ठरलेला नसतो. परतावा हा मार्केटवर अवलंबून असतो.

Illustration

वरील फोटो हा उदाहरणाखातर दिला आहे. खरा परतावा वेगळा असू शकतो.

वरील फोटो मध्ये उदाहरण दिले आहे की आपण केलेल्या SIP मधून आपल्याला १२% वार्षिक परतावा आला तर काय होईल ? १२% परतावा हा इथे गृहीत धरला आहे तो १२% च येईल असे नाही. तो परतावा मार्केटवर अवलंबून राहील.

आणि त्यानंतर आपण जमा झालेल्या रक्कमेच्या किती % रक्कम SWP म्हणून काढत आहोत, हे वरील फोटो मध्ये दाखविले आहे.

फ्रीडम SIP असलेल्या स्किम

कोणता फंड घ्यावा हे तुम्हाला कळत नसेल तर खाली दिलेला फॉर्म भरून अधिक माहिती घेऊ शकता.

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

खालील लिंक वर क्लीक करून तुम्ही फ्रीडम SIP सुरू करू शकता.

ICICI Prudential Bluechip Fund (New Investor) (Existing Investor)

ICICI Prudential Multicap Fund (New Investor) (Existing Investor)

ICICI Prudential Large & Midcap Fund (New Investor) (Existing Investor)

ICICI Prudential India Opportunities Fund (New Investor) (Existing Investor)

ICICI Prudential Smallcap Fund (New Investor) (Existing Investor)

ICICI Prudential Midcap Fund (New Investor) (Existing Investor)

ICICI Prudential Dividend Yield Equity Fund (New Investor) (Existing Investor)

ICICI Prudential Focused Equity Fund (New Investor) (Existing Investor)

ICICI Prudential Value Discovery Fund (New Investor) (Existing Investor)

ICICI Prudential Asset Allocator Fund (FOF) (New Investor) (Existing Investor)

ICICI Prudential Balanced Advantage Fund (New Investor) (Existing Investor)

ICICI Prudential Equity & Debt Fund (New Investor) (Existing Investor)

ICICI Prudential Multi – Asset Fund (New Investor) (Existing Investor)

Documents

Product Presentation

Brochure

FAQs

म्युच्युअल फंड चे प्रकार जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

Disclaimer :- Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. The NAVs of the schemes may go up or down depending upon the factors and forces affecting the securities market including the fluctuations in the interest rates. The past performance of the mutual funds is not necessarily indicative of future performance of the schemes. The Mutual Fund is not guaranteeing or assuring any dividend under any of the schemes and the same is subject to the availability and adequacy of distributable surplus. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax and financial implications of the investment/participation in the scheme.

While all efforts have been taken to make this web site as authentic as possible, please refer to the print versions, notified Gazette copies of Acts/Rules/Regulations for authentic version or for use before any authority. 

1 thought on “ICICI Prudential Freedom SIP. कोण सुरू करू शकतं ?”

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.