लघु व्यावसायिकांनी ऑनलाईन जाहिरात कशी करावी ? Local Online Marketing

Local Online Marketing By Claude Whitacre

ह्या पुस्तकात रिटेल आणि सेवा क्षेत्रातील लघु व्यवसायांसाठी ऑनलाईन जाहिरात कशी करावी हे सांगितले आहे.

Local Online Marketing

विशेषत: त्यांच्यासाठी आहे, ज्यांना स्थानिकपातळीवर सेवा द्यायची आहे.

“तुम्ही मला ऑनलाईन सापडले”, ग्राहकांकडून तुम्हाला हे अनेक वेळा ऐकायचे आहे का ?

८०-२० नियम.

तुमचे २०% सर्वोत्तम ग्राहक, तुमचा ८०% नफा तयार करतात.

ग्राहक जे फक्त कमी किंमत शोधतात, ते माहिती शोधत नसतात.

तुमचे २० टक्के सर्वोत्तम ग्राहक, जे तुमचा ८० टक्के नफा तयार करतात, ते माहिती शोधत असतात.

तुमच्याकडून जर त्यांना चांगल्या गुणवत्तेची माहिती मिळाली तर त्यांनी तुमच्याकडून विकत घेण्याची शक्यता वाढते. त्यांची रुची जर गुणवत्तेमध्ये असेल तर त्यांची रुची कमी किमतीमध्ये नसेल.

Local Online Marketing तुम्हाला काय माहीत असणे आवश्यक आहे ?

Internet Facts

४१% ग्राहक त्यांच्या ऑनलाइन शोधात Location वापरतात.

Example “Mutual Fund Distributor In Akola”

बहुतेक सर्व ऑनलाइन सर्च हे उत्पादन, ब्रँडचे नाव, शहराचे नाव, राज्याचे नाव किंवा विशिष्ट प्रश्नाने होतात. व्यवसायाचे नाव माहीत असल्याशिवाय कोणीही ते सर्च करत नाही.

स्थानिक पातळीवर इंटरनेटवर सर्च करणाऱ्यांपैकी ८२ टक्के तुमच्या दुकानात येतात.

43 टक्के इंटरनेटवरील सर्च ऑफलाइन विकत घेण्याच्या उद्देशाने होतात.

तुम्ही कसे सापडणार ?

बहुसंख्य लोकांना स्थानिक पातळीवरून विकत घ्यायला आवडते. पण जर ते तुम्हाला शोधू शकले नाही, तर ते तुमच्या पासून विकत घेऊ शकणार नाही.

तसेच अनेक लोक ज्यांना ऑनलाईन विकत घ्यायचे असते, त्यांना आपल्या शहरातील व्यवसायाचे नाव ऑनलाईन पाहून आश्चर्य वाटते. त्यांची अपेक्षा नसते की स्थानिक पातळीवरील कोणत्या व्यवसायाचे नाव गुगलवर पहिल्या नंबर वर असेल. तुम्ही स्थानिक असल्यामुळे ते तुम्हाला भेटू शकतात, तुमच्याशी थेट फोनवर बोलू शकतात.
मनोरंजन सोडून लोक इंटरनेटवर दोन गोष्टी शोधतात, काहीतरी शिकण्यासाठी किंवा काहीतरी विकत घेण्यासाठी.

बहुतांश लोक विकत घेण्याआधी, शिकण्यासाठी ऑनलाईन जातात.

लोकांचे डोळे प्रथम व्हिडिओकडे, नंतर लेखाकडे आणि मग व्यवसाय सूची वर जातात. ते त्यांच्या आवडीच्या विषयावरील फ्री माहिती शोधत असतात. ते फ्री माहितीच्या स्त्रोतावर क्लिक करतील. का? कारण इंटरनेटवरील माहिती फ्री असते.

तुम्हाला हवे असते की माहिती गोळा करण्याच्या टप्प्यावर ग्राहकाला तुम्ही भेटावे… त्याने तुमच्याकडून माहिती घ्यावी… त्याने तुम्हाला तज्ञ म्हणून पहावे… विक्रेता म्हणून नाही, असा तज्ञ ज्याचा सल्ला त्याला हवा आहे.

पण त्यांना तुम्ही कसे सापडणार ?

बरेच लोक खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, अधिक जाणून घेण्यासाठी ऑनलाइन जातात.

लोक उपयुक्त माहिती देणार्‍या लिंकवर क्लिक करतात, कारण खरेदी करण्यापूर्वी ऑनलाइन जाणारे ९५% लोक “माहिती संग्रह” टप्प्यात असतात… आणि फ्री माहिती कोणाला आवडत नाही ?

तुमची वेबसाईट

ग्राहकांची अपेक्षा असते की तुमच्याकडे वेबसाइट असावी आणि तुमच्याकडे वेबसाईट नसणे हे दर्शवते की तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल गंभीर नाही.

तुम्ही तुमच्या डोमेन च्या नावामध्ये जर Keyword वापरले तर तुम्हाला तुमच्या URL मधून जास्त फायदा मिळू शकतो. तुमचे संभाव्य ग्राहक एखादी वस्तू किंवा सुविधा ऑनलाईन शोधत असतात. ते तुमच्या व्यवसायाचे नाव शोधत नसतात.

तुमचे सर्वोत्तम Keyword Home पेजवर सुरवातीलाच ठेवा. पहिले वाक्य Keyword साठी चांगली जागा असते.

तुमच्या साइटवरील पहिल्या परिच्छेदामध्ये तुम्ही काय करता ? तुमच्याकडून का विकत घ्यावे आणि वाचकांनी पुढे का वाचावे ? हे सांगितले पाहिजे.

शक्य तितक्या वेळा “मी” ला लेखातून बाहेर काढा आणि त्याला “तुम्ही” ने बदला. लेख तुमच्याबद्दल नाही; लेख वाचकांना हव्या असलेल्या गोष्टी कशा मिळू शकतात याबद्दल आहे.

शोध इंजिन लेख वाचू शकतात. ते व्हिडिओ किंवा चित्रे वाचू शकत नाहीत. त्यामुळे सर्च इंजिन ला लेख जास्त आवडतात.

आपली वेबसाइट बनवताना, कोणताही लेख इतरांच्या वेबसाइटवर टाकण्यापूर्वी, प्रथम स्वतःच्या वेबसाइटवर टाकावा. यामुळे गूगल ला कळेल लेखाचा उगम कोणता आहे, त्याने रँकिंग मध्ये तुमचा फायदा होईल. 

सोशल मीडिया

सर्च चे परिणाम दाखवताना गुगल एका वेबसाइटवरून लेखांच्या फक्त दोन-तीन लिंक घेते. त्यामुळे जर तुमचे व्हिडिओ यूट्यूब वर असतील तर तुम्ही सर्च परिणामांमध्ये जास्त दिसाल.

फेसबुक बिझिनेस पेज का असायला हवे ? कारण गुगलला फेसबुक आवडते. बऱ्याच वेळा, फेसबुक पेज हे गूगल सर्च मध्ये सर्वात वर असते.

गूगल चा मोफत डिजिटल मार्केटिंग कोर्स तुम्ही इथे करू शकता.

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

1 thought on “लघु व्यावसायिकांनी ऑनलाईन जाहिरात कशी करावी ? Local Online Marketing”

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.