One Up On Wall Street Marathi हे पुस्तक Peter Lynch यांनी लिहले आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे बनविण्यासाठी तुम्हाला जे आधीच माहीत आहे त्याचा वापर करून पैसे कसे बनवावे हे या पुस्तकात सांगितले आहे.
One Up On Wall Street By Peter Lynch Marathi
माझ्या मते, स्टॉक किंमत आपण मागोवा घेऊ शकत असलेली सर्वात कमी उपयुक्त माहिती आहे आणि ती सर्वात जास्त प्रमाणात ट्रॅक केली जाते.
तुम्ही केवळ एका डेटाचे अनुसरण करू शकत असल्यास, कंपनीच्या कमाईचे अनुसरण करा.
अमेरिकेत एक काळ असा होता की सोनं शोधणाऱ्यांची लाट आली होती, त्याला गोल्ड रश (Gold Rush) असे म्हणत.
गोल्ड रश दरम्यान जास्त करून खोदणाऱ्यांनी पैसे गमावले. परंतु ज्या लोकांनी त्यांना कुदळ, फावडे, तंबू आणि निळ्या जीन्स (लेव्ही स्ट्रॉस) विकल्या त्यांचा चांगला फायदा झाला.
एखादा हौशी गुंतवणूकदार कामाच्या ठिकाणी, मॉल, ऑटो शोरूम, रेस्टॉरंट्स किंवा इतर कोठेही जिथे नवीन उद्यम पदार्पण करत असेल, तिथल्या घडामोडींकडे लक्ष देऊन उद्याचे मोठे विजेते निवडू शकतो.
पीटर लिंच तुम्हाला असा सल्ला देत नाहीत की ज्या स्टोअरमध्ये तुम्हाला खरेदी करणे आवडते त्याच स्टोअरचे शेअर विकत घ्या. एखाद्या निर्मात्याचे शेअर यासाठी खरेदी करू नका की तुम्हाला त्यांचं उत्पादन आवडतं. तसेच रेस्टॉरंटचेही शेअर यासाठी घेऊ नका कारण तुम्हाला तिथले अन्न आवडतं.
एखादे स्टोअर, उत्पादन किंवा रेस्टॉरंट आवडल्यामुळे तुम्ही त्या कंपनीत रस घेऊ शकता आणि तिला तुमच्या संशोधन सूचीवर ठेऊ शकता. परंतु शेअरचा मालक होण्याचे ते पुरेसे कारण नाही!
कधीही कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करु नका, जोपर्यंत तुम्ही कंपनीच्या कमाईच्या संभाव्यतेचा, आर्थिक स्थितीचा, स्पर्धात्मक स्थितीचा, विस्तारासाठी बनविलेल्या योजनांचा अभ्यास करत नाही.
भविष्यातील वाढ कोठून येत आहे आणि ती कधी कमी होण्याची शक्यता आहे याचा तुम्ही मागोवा ठेवला पाहिजे.
तुमचा शेअर एखादया दिवशी वर जाईल असा विचार करणे ही इच्छा आहे गुंतवणूक नाही.
डे-ट्रेडिंग
डे-ट्रेडिंग (Intraday) व्यवसायात पैसे कमवण्याची शक्यता घोड्याच्या शर्यतीत आणि पत्त्यात पैसे कमविणे एवढीच आहे. खरं तर, पीटर लिंच यांना डे-ट्रेडिंग (Intraday) घरबसल्या जुगार वाटतो.
डे ट्रेडिंग (Intraday) एक असा कॅसिनो (जुगार) आहे जो भरपूर अकाउंटंट्सचे घर चालवतो.
मार्केट खाली का जाणार याचे कारण नेहमीच आपल्याला समजदारीचे वाटते.
तुम्ही नैराश्यात विक्री करता तेव्हा तुम्ही नेहमीच स्वस्त विक्री करता.
लोक ज्या गोष्टींमध्ये पूर्णपणे अज्ञानी आहेत अशा जागी त्यांना गुंतवणूक करणे अधिक सोयीस्कर वाटते.
वॉल स्ट्रीटचा विरोधाभास
आपण सर्व सारखेच वर्तमानपत्रे आणि मासिके वाचतो आणि सारख्याच अर्थशास्त्रज्ञांचे ऐकतो.
तुम्ही IBM चा शेअर विकत घेतला असेल आणि तो खाली जात असेल आणि तर लोक विचारतील: “आयबीएम मध्ये काय चुक होत आहे?”
परंतु तुम्ही ‘ला क्विंटा मोटर इन्स’ चे शेअर घेतले आणि ते खाली गेले, तर लोक विचारतील: “तुमच्यासोबत काय चुक होत आहे?”
म्हणजे नावाजलेल्या कंपनी मध्ये गुंतवणूक केली आणि ती विफल झाली तर लोक तुम्हाला दोष देणार नाहीत. पण लहान कंपनी मध्ये गुंतवणूक करून तुम्हाला अपयश आले तर लोक तुम्हाला दोष देतील.
इक्विटी फंड जितका मोठा असेल तितके जास्त कठीण स्पर्धकांपेक्षा जास्त परतावा आणणे होते.
चुकीच्या वेळी योग्य शेअर खरेदी करा आणि तुम्हाला मोठे नुकसान होईल.
लोक रिअल इस्टेट मध्ये पैसे कमवतात आणि शेअर बाजारात पैसे गमावतात यात काही आश्चर्य नाही. ते त्यांची घरे निवडण्यात महिने लावतात तर शेअर निवडण्यासाठी मिनिटे.
तोटा झाला तरी नजीकच्या भविष्यात तुमच्या दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही तीच रक्कम शेअरमध्ये गुंतवा.
हे चांगले मार्केट आहे का? कृपया विचारू नका.
अमेरिकेत ६०,००० अर्थतज्ज्ञ आहेत, त्यापैकी बरेचजण मंदी आणि व्याजदराचा अंदाज वर्तवण्यासाठी पूर्णवेळ काम करतात. ते जर सलग दोनदा यशस्वीरित्या असे करू शकले असते तर आतापर्यंत ते सर्व लक्षाधीश झाले असते.
मायाच्या पौराणिक कथेत विश्वाचा चार वेळा नाश झाला. प्रत्येक वेळी मायांनी एक-एक धडा घेतला आणि अधिक चांगल्या संरक्षणाची शपथ घेतली.
प्रथम तेथे पूर आला, पुरात वाचलेल्यांनी हे लक्षात ठेवले. ते जंगलात उंच-उंच ठिकाणी गेले. पायर्या बनविल्या आणि तटबंदी लावली. जंगलात घरे बांधली. त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले कारण दुसऱ्या वेळी जगाचा नाश अग्निमुळे झाला.
त्यानंतर, आगीत वाचलेले जंगल सोडून खाली आले. त्यांनी जंगलापासून शक्य होईल तितक्या दूर पळ काढला. त्यांनी दगडाची नवीन घरे बांधली, विशेषत: मोठ्या दगडांची. लवकरच, भूकंपात जगाचा तिसऱ्यांदा नाश झाला.
चौथा विनाश कसा झाला हे मला आठवत नाही – कदाचित एखादी मंदी आली असेल- पण जे काही झालं असेल, ते माया लोकांना होणार हे माहीत नसेल. ते पुढच्या भूकंपासून बचाव कसा करावा हा विचार करण्यात खूप व्यस्त होते.
दोन हजार वर्षांनंतरही, आपण येणाऱ्या धोक्याची चिन्हे शोधताना मागे वळून पाहतो.
गेल्या वेळी आपण महागाईसाठी तयारी केली तेव्हा आपल्याला मंदी मिळाली. मग मंदीच्या शेवटी आपण अधिक मंदीची तयारी केली आणि आपल्याला महागाई मिळाली.
याचा अर्थ असा की जुनी समस्या कधी येईल आपण फक्त हाच विचार करतो. पण नवीन समस्याही येऊ शकतात ज्यांची आपण तयारी केलेली नाही.
जर व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ अर्थव्यवस्थेचा आणि व्यावसायिक भविष्यकर्ते बाजारपेठेचा अंदाज सांगू शकत नाहीत, तर हौशी गुंतवणूकदाराने असे करण्याची किती शक्यता आहे ?
बाजारपेठेचा अंदाज लावण्यावर माझा विश्वास नाही. माझा विश्वास आहे की महान कंपन्या खरेदी करा – विशेषत: ज्यांना मूल्यापेक्षा कमी किंमत मिळत आहे.
शेअर बाजारात नव्हे तर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा.
मला समजले, मला समजले — हे काय आहे?
वेगाने वाढणारी कंपनी ही वेगाने वाढणार्या क्षेत्रातीलच असावी, हे आवश्यक नसते.
सर्वसाधारण म्हणींवर धोरण ठरवणे, जसे की “जेव्हा तुमचे पैसे दुप्पट होतील तेव्हा विका,” “दोन वर्षानंतर विक्री करा” किंवा “दहा टक्के किंमत कमी झाल्यावर विक्री करुन आपले नुकसान कमी करा,” हा पूर्णपणे मूर्खपणा आहे.
सर्व शेअरवर लागू होणारे सर्वसाधारण सूत्र शोधणे अशक्य आहे.
तुम्हालाही पीटर लिंच यांचे धोरण वापरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल, तुम्हालाही तुम्हाला आधीच माहीत असलेल्या गोष्टींचा वापर करून शेअर मार्केट मध्ये पैसे बनवायचे असतील तर खालील लिंक वरून आताच हे पुस्तक विकत घ्या.
One Up On Wall Street By Peter Lynch Marathi
पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा. पुस्तक नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या.
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.
Excellent extraction of source book.
Thank you so much.