Sapiens सेपिअन्स मानव जातीचा संक्षिप्त इतिहास, हे पुस्तक Yuval Noah Harari यांच्या Sapiens या पुस्तकाचे भाषांतर आहे. अतिशय सोप्या भाषेत यात मानवजातीच्या इतिहासाचे संक्षिप्त वर्णन केले आहे.
Sapiens सेपिअन्स मानव जातीचा संक्षिप्त इतिहास
- ४,५००,०००,००० वर्षांपूर्वी – पृथ्वीचा जन्म झाला.
- ३ लाख वर्षांपूर्वी – आगीचा रोज वापर सुरू झाला.
- १२,००० वर्षांपूर्वी – कृषी क्रांती झाली.
- ५,००० वर्षांपूर्वी – पहिले साम्राज्य, पहिला हस्तलेख, पहिले पैसे, बहुदेववाद अस्तित्वात आले.
- भविष्य – होमो सेपियन्स, सुपर-हुमन्सने बदलले जातील ?
आपली भावंड
वरील सर्व प्रजाती हे मानव आहेत.
काही निअंडरथल गोरे असण्याचे पुरावे आहेत.
जैविक वास्तविकता काळी-पांढरी नसते, त्यात ग्रे पण असतो. म्हणजे सगळे काही इकडे किंवा तिकडे नसते. बरेचशे अपवाद असतात.
सहनशीलता हा सेपिअन्सचा ट्रेडमार्क नाही. कदाचित म्हणूनच आपल्या पूर्वजांनी निआंदरथल्स चा अंत केला. ते दुर्लक्ष करण्यासाठी चांगले परिचयाचे होते, पण सहन करण्यासाठी फार वेगळे.
ज्ञानाचे झाड
आपली भाषा कंडया पिकवण्याच्या (Gossip) स्वरूपात विकसित झाली. कंडया पिकवणारे सहसा समाजातील चुकीच्या गोष्टीवर लक्ष ठेवतात, ते पत्रकार म्हणून काम करतात आणि समाजाला धोक्यापासून वाचवतात. भाषेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अस्तित्वात नसलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही बोलू शकता.
फक्त होमो सेपिअन्स अस्तित्वात नसलेल्या गोष्टींबद्दल बोलू शकतात.
“माकडांच्या स्वर्गात अमर्यादित केळी मिळतील,” असे वचन देऊन तुम्ही माकडाला आज त्याच्याकडे असलेले केळ तुम्हाला देण्यास पटवू शकत नाही.
सेपिअन्स हे अनोळखी व्यक्तींसोबतही सहकार्य करू शकतात, म्हणून ते जगावर राज्य करतात. तर मुंग्या आपले शिल्लक अन्न खातात आणि चिंप प्राणीसंग्रहालय व लॅबोरेटरी मध्ये कैद असतात.
कधीही न भेटलेले दोन कॅथलिक, धर्म युद्धावर जाऊ शकतात किंवा रूग्णालय बांधण्यासाठी निधी गोळा करू शकतात. कारण त्या दोघांचा असा विश्वास असतो की देवाने मानवी देहात जन्म घेतला आणि आपल्या पापांसाठी वधस्तंभावर जीव दिला.
कधीही न भेटलेले दोन सर्ब स्वतःचा जीव धोक्यात घालून कदाचित एकमेकांना वाचवतील, कारण दोघे सर्बियन देशाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात.
सामान्य मानवांच्या कल्पनेबाहेरच्या विश्वामध्ये कोणतीही देवता नाही, कोणतीही राष्ट्रे नाहीत, पैसा नाही, मानवी हक्क नाहीत, कायदे नाहीत आणि कोणताही न्याय नाही.
अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल जर आपण बोलू शकलो नसतो तर राज्य, चर्च, कायदे पद्धती आपण तयार करू शकलो असतो का ? जर आपण फक्त नद्या, झाड आणि सिंहाबद्दल बोलू शकलो असतो तर ?
ऐक लोक (Ache)
पेराग्वे च्या जंगलात राहणारे शिकार आणि अन्न गोळा करणारे लोक ऐक म्हणून ओळखले जात. या लोकांचे जीवन आपल्याला भटकंती करणार्या पूर्वजांच्या जीवनातील झलक दाखवते.
जेव्हा एखादा महत्त्वाचा व्यक्ती मरत असे, तेव्हा ऐक लोक लहान मुलगी त्याच्या सोबत मारून पुरत असत.
ज्या व्यक्तीचा अपघात होत असे त्याला मरण्यासाठी मागे सोडून दिले जाई.
जेव्हा म्हाताऱ्या महिला ऐक समूहावर ओझं बनत तेव्हा एखादा तरूण कुर्हाडीने त्यांच्या डोक्यावर वार करत असे.
मुली नको असल्या तर त्यांना जिवंत गाडण्यात येई. कधी कधी कोणी मूड खराब आहे म्हणूनही लहान मुलांची हत्या करी. एका मुलाला तर केवळ यासाठी जिवंत पुरले होते की तो विचित्र दिसत होता आणि इतर मुले त्याच्यावर हसत होती.
लग्न पद्धती अस्तित्वात नव्हती, कोणीही कधीही आपला सोबती बदलू शकत होते.
आजच्या काळातील लोक जसे गर्भपाताला सामान्य समजतात तसे ऐक लोक लहान मुलांना मारणे, बिमारांना मारणे, म्हातार्यांना मारणे सामान्य समजत होते.
पेराग्वेन शेतकरी ऐक लोकांची शिकार करत त्यांचा खून करत, कदाचित म्हणूनच जे लोक समूहावर भार बनत ऐक लोक त्यांच्यावर एवढे कठोर होत. ऐक काही हिरो नव्हते ना की ते राक्षस बस ते मानव होते.
पूर
पृथ्वीचे हवामान कधीच विश्रांती घेत नाही. ते सतत प्रवाहात असते. इतिहासातील प्रत्येक घटनेला हवामानातील काही बदलांची पार्श्वभूमी होती.
आपल्या ग्रहाने थंड आणि गरम होण्याचे अनेक चक्र अनुभवले आहेत. सहसा दर १ लाख वर्षांनी हिमयुग येते.
आपले पूर्वज निसर्गाशी एकोप्याने राहत होते असा दावा करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. औद्योगिक क्रांती होण्याच्या फार पूर्वी, होमो सेपियन्सकडे बहुसंख्य वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती नामशेष करण्याचा विक्रम आहे.
आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरे आणि राज्यांची कशी स्थापन केली?
देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसे काय विश्वास ठेवू लागलो?
आणि येणाऱ्या सहस्रकांमध्ये आपले जग कसे असेल?
मानवाची विचारपद्धती, वर्तन, बलस्थाने आणि मानवाचे भविष्य
याबद्दलच्या आपल्या सर्व समजुतींना आव्हान देणारं
एक विचारप्रवर्तक पुस्तक…सेपिअन्स.
या पुस्तकात अशा बऱ्याच काही भन्नाट गोष्टी सांगितल्या आहेत, त्या वाचण्याकरिता खालील लिंक वरून हे पुस्तक विकत घ्या.
पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा. पुस्तक नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या.
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.