SBI Retirement Benefit Fund हा SBI म्युच्युअल फंडकडून नवीन फंड आणण्यात आला आहे.
SBI Retirement Benefit Fund
अशी म्युच्युअल फंड ची योजना जी तुमची निवृत्तीची समस्या सोडवते.
निवृत्तीचे नियोजन का आवश्यक आहे ?
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाचे जीवनमान आता वाढत आहे. आता ७५ वयापर्यंत जगणे ही सामान्य गोष्ट आहे. आणि जे आज त्यांच्या वयाच्या तिशीमध्ये आहेत ते कदाचित १०० वर्षापर्यंत जगतील. मग ६० नंतर निवृत्त झाल्यावर तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी काय करावे ?
निवृत्तीच्या नियोजनाचे उदाहरण
आजचे वय | ३० |
आयुर्मान | ८० |
मासिक खर्च | ४०,००० ₹ |
निवृत्तीपूर्वीचा अपेक्षित परतावा | १२% |
निवृत्तीपश्चातचा अपेक्षित परतावा | ७.५०% |
सरासरी महागाई | ६% |
निवृत्तीचे वय | ५५ |
अपेक्षित निवृत्तीची रक्कम | ४.३४ करोड ₹ |
अनपेक्षित खर्च १०-१५% पकडून निवृत्तीची रक्कम | ४.७ – ५ करोड ₹ |
निवृत्ती ५५ मध्ये हवी असल्यास मासिक SIP ची आवशक्यता | २९३७४ |
निवृत्ती ६० मध्ये हवी असल्यास मासिक SIP ची आवशक्यता | १६२२९ |
जर तुम्ही SIP सुरू करण्यास उशीर केला तर काय होईल ?
तुम्हाला ६० मध्ये निवृत्त होऊन ₹५ करोड मिळवायचे असल्यास वयाच्या ३० मध्ये १६२२९ ची SIP करणे आवश्यक आहे.
तुम्ही ५ वर्ष उशीर करून ३५ मध्ये SIP सुरू केली, तर तुम्हाला ६० मध्ये निवृत्त व्हायला २९३७४ ची SIP करणे आवश्यक आहे.
उशीर | SIP रक्कम |
५ वर्ष | २९३७४ ₹ |
१० वर्ष | ५४३५६ ₹ |
१५ वर्ष | १०५०५७ ₹ |
२० वर्ष | २२३१७९ ₹ |
२५ वर्ष | ६१६४९५ ₹ |
वरील उदाहरणामध्ये १२ % वार्षिक परतावा अपेक्षित धरला आहे.
वयानुसार धोका
या फंडमध्ये चार योजना आहेत. आणि यामध्ये Auto Transfer हा पर्याय आहे, म्हणजे जस जसे तुमचे वय वाढत जाईल गुंतवणूक आपोआप कमी धोका असलेल्या योजनेत ट्रान्सफर होईल.
प्लॅन | वय | धोका | इक्विटी |
Aggressive | ४० पर्यंत | जास्त | ८०-१००% |
Aggressive Hybrid | ४०-५० | मध्यम | ६५-१००% |
Conservative Hybrid | ५०-६० | मध्यम पेक्षा कमी | १०-४०% |
Conservative | ६० च्यावर | कमी | ०-२०% |
किमान गुंतवणूक – पहिली ५०००₹ एकरक्कमी, त्यानंतर किमान १०००₹. किमान SIP १०००₹.
EXIT LOAD – ०%
SWP (A)
निवृत्तीनंतर हा पर्याय वापरून तुम्ही दर ३ महिन्याला ठराविक रक्कम आपोआप काढू शकता. किंवा दरमहा देखील काढू शकता.
SIP INSURE
ही SIP विमा सोबत येते. हा विमा मोफत मिळतो. ह्या बद्दल अधिक माहितीसाठी आमचा विमा वाली SIP हा लेख वाचा.
80 C
ह्या फंडमध्ये 80 c मार्फत सूट नाही आहे. ज्या लोकांना 80 C अंतर्गत उत्पन्नाच्या करात सूट हवी आहे त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडची ELSS ही योजना असते.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा.
SBI Retirement Benefit Fund Aggressive Plan- Regular Plan – Growth
SBI Retirement Benefit Fund Aggressive Hybrid Plan- Regular Plan – Growth
SBI Retirement Benefit Fund Conservative Hybrid Plan- Regular Plan – Growth
SBI Retirement Benefit Fund – Conservative Plan- Regular Plan – Growth
Mutual Fund investments are subject to market risks,
read all scheme related documents carefully.
पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.
2 thoughts on “SBI Retirement Benefit Fund Marathi.”