SBI Small Cap Fund

SBI Small Cap Fund ह्या फंडचे उद्दिष्ट आहे प्रामुख्याने लहान कंपनींमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करून गुंतवणूकदारांच्या भांडवलात वाढ करणे.

प्रामुख्याने स्मॉल कॅप स्टॉकमध्ये (किमान ६५%) हा फंड गुंतवणूक करतो.

हा फंड अन्य इक्विटींमध्ये (लार्ज आणि मिड-कॅप कंपन्यांसह) आणि / किंवा Debt आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये 35% पर्यंत गुंतवणूक करू शकतो.

गुंतवणूकीच्या Growth आणि Value शैलीचे मिश्रण हा फंड करतो. Growth चा सोपा अर्थ अशा कंपनी जिथे वाढ होण्याची अपेक्षा आहे. Value अशा कंपनी जिथे कंपनी त्यांच्या मुल्यापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत.

हा फंड स्टॉक निवडीसाठी गुंतवणूकीच्या Bottom-up ह्या धोरणाचे अनुसरण करतो. Bottom-up चा अर्थ आधी स्टॉक निवडणे मग ती कंपनी कुठल्या क्षेत्रात काम करते हे पाहणे. Top-down धोरणा मध्ये आधी आपण क्षेत्र निवडतो आणि मग स्टॉक.

“ह्या फंडने सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांसाठी चांगली संपत्ती निर्माण केली आहे.”

“हा फंड सुरू झाल्यापासून कोणत्याही सात वर्षांच्या कालावधीत, त्याचे वार्षिक उत्पन्न जवळपास 20 टक्क्यांपेक्षा जास्त राहिले आणि कधीही 18 टक्क्यांपेक्षा कमी झाले नाही.” Source

खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही ह्या फंड मध्ये गुंतवणूक करू शकता.

SBI Small Cap Fund

SBI Small Cap Fund थोडक्यात माहिती

हा फंड MODERATELY HIGH या Risk category मध्ये येतो. फंड मॅनेजरचे नाव Mr. R Srinivasan आहे, ते Nov 2013 SBI Small Cap Fund सांभाळत आहेत. त्यांना पूर्ण २६ वर्षांचा अनुभव आहे. SBI Small Cap Fund सोबतच ते SBI Equity Hybrid Fund आणि SBI Focused Equity Fund सांभाळत आहेत.

  • Category : EQUITY
  • AUM : ₹ 2711.57 Cr as on 31 Mar 2020
  • Risk : MODERATELY HIGH
  • Benchmark : S&P BSE Small Cap Index
  • Exit Load : १ वर्षाच्या आत १%. १ वर्षानंतर NIL

Riskometer

ह्या बद्दल अधिक माहितीसाठी Sbi Mutual Fund च्या अधिकृत site ला भेट देऊ शकता.

काही महत्वाचे कागदपत्रांची लिंक खाली दिली आहे.

Fund Factsheet SID KIM

Mutual fund investments are subject to market risks. Please read the offer document carefully before investing. Past performance is not indicative of future returns.

आमचे इतर लेख इथे वाचू शकता.

आमचे फेसबुक पेजला इथे भेट देऊ शकता.

1 thought on “SBI Small Cap Fund”

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.