The Dhandho Investor Marathi By Mohnish Pabrai

The Dhandho Investor Marathi By Mohnish Pabrai ह्या पुस्तकात जास्त परतावा देणारी, कमी धोका असणारी Value Method दिली आहे.

The Dhandho Investor Marathi By Mohnish Pabrai

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची संख्या, अमेरिकेच्या लोकसंख्येच्या एक टक्के म्हणजे, जवळपास 30 लाख आहे. ह्या भारतीयांपैकी थोडेफार गुजराती आहेत आणि ह्या गुजरातीं पैकी काही पटेल आहेत. ५०० अमेरिकन नागरिकांपैकी एक पटेल आहे. तरीही पूर्ण देशातील मोटेल व्यवसायांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त पटेलच्या मालकीचे आहेत. आणि ह्या पेक्षा आकर्षक गोष्ट म्हणजे पस्तीस वर्षांपूर्वी अमेरिकेत कोणीही पटेल नव्हते.

१९७० मध्ये त्यांनी शरणार्थी म्हणून अमेरिकेत येण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे जास्त पैसा व शिक्षण नव्हते. तसेच त्यांना इंग्रजी थोडेफारच येत होते. पटेल समुदायाकडे आज चाळीस बिलियन डॉलर एवढा मोठा व्यवसाय अमेरिकेत आहे. ते ७२५ मिलियन टॅक्समध्ये देतात आणि दहा लाख लोकांना रोजगार देतात. कशाप्रकारे हा एवढा छोटा समुदाय एवढ्या मोठ्या संपत्तीवर ताबा करू शकला ? याचे उत्तर आहे “धंधो”.

धंधो

धंधो हा शब्द संस्कृत मधून आला आहे. धन म्हणजे संपत्ती आणि धंधो चा अर्थ आहे संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न. बोलीचालीच्या भाषेत धंधो चा अर्थ आहे व्यवसाय. व्यवसाय संपत्ती तयार करण्याचा प्रयत्न नाहीतर दुसरे काय आहे ? धंधो म्हणजे धोका कमी करणे आणि परतावा वाढवणे. धंधो म्हणजे संपत्ती वाढवणे जवळपास काहीच धोका न घेता.

गुजरात, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे तिथे अनेक बंदरे आहेत. अनेक शतकांपासून गुजरात आशियाई व आफ्रिकी देशांसाठी व्यापार करण्यासाठी एक आदर्श केंद्र आहे. पारशी लोक ज्यांच्यावर इराणमध्ये अत्याचार होत होते ते गुजरात मध्ये बाराव्या शतकात आले. तसेच इस्माईली नवव्या शतकात इराण वरून गुजरातमध्ये आले. अनेक शतकांपासून गुजराती लोकांना आशियाई व आफ्रिकी देशात प्रवास करणे व व्यापार करण्याची सवय आहे.

पटेल हे मूलतः पाटीदार होते, जमीनदार. गुजरातमधील बहुतांश खेड्यात राजाकडून पाटीदार यांची नेमणूक करण्यात येत असे. त्यांची जबाबदारी असे टॅक्स जमा करणे, सुरक्षा देणे आणि शेतीमध्ये काम करवून घेणे. पटेल यांचे कुटुंब मोठे होते. पुढे अनेक पिढ्या गेल्या नंतर शेतीचे विभाजन छोट्या तुकड्यांमध्ये होत गेले. त्यामुळे शेती करणे आता सोयीस्कर राहिले नव्हते. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी इस्माईली आणि पटेल गुजरात वरून युगांडा आणि पूर्व आफ्रिका देशात व्यापारी किंवा रेल्वे मार्ग बांधण्यासाठी मजूर म्हणून गेले. त्यांनी तिथे मोठ्या प्रमाणात व्यवसायांवर ताबा मिळवला.

ईडी अमीन

१९७२ मध्ये जनरल ईडी अमीन सत्ते मध्ये आला आणि त्याने जाहीर केले की आफ्रिका हे आफ्रिकन लोकांसाठीच आहे. इतरांना देश सोडावा लागेल. युगांडा सरकारने गुजरातींचे सर्व व्यवसाय आणि संपत्ती, राष्ट्रीय घोषित केली आणि गुजरातींना मोबदलाही दिला नाही. अशा प्रकारे ७०,००० गुजराती लोकांना त्यांची संपत्ती जबरदस्तीने बळकवून देशाबाहेर हाकलण्यात आले. १९७१ मध्ये भारतात आधीच पूर्व पाकिस्तान सोबत युद्ध सुरू होते आणि त्यातून बांगलादेशची निर्मिती झाली होती. त्यामुळे भारतात आधीच बांगलादेशमधून शरणार्थी येत होते. त्यामुळे जास्त प्रमाणात गुजराती इंग्लंड, कॅनडा व काही प्रमाणात अमेरिकेत गेले.

The Dhandho Investor Marathi By Mohnish Pabrai

मोटेल व्यवसाय का ?

मोटेल म्हणजे रस्त्याच्या कडेला असलेले हॉटेल, प्रामुख्याने वाहनधारकांसाठी रचना केलेले.
दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराज्य महामार्ग पद्धतीला अमेरिकेत अनेक सरकारी मदत भेटल्या, त्यामुळे अनेक मोटेल अस्तित्वात आले. पण १९७३ च्या मंदीमध्ये पेट्रोलचे भाव वाढले, त्यामुळेच मोटेलमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या घटली. धंदा चालत नसल्यामुळे अनेक मोटेल विक्रीला आले.

पापा पटेल

१९७३ मध्ये पापा पटेल युगांडा वरून आपली संपत्ती जेवढी होऊ शकेल तेवढी सोन्यामध्ये रूपांतरित करून अमेरिकेत घेऊन आले. अमेरिकेत त्यांना मोटेल सापडले जे डबघाईस आले होते. पापा पटेल ने विचार केला की मी हे मोटेल विकत घेण्याचे ठरवले तर बँक ८०-९० टक्के रक्कम मला आर्थिक मदत करतील आणि मला राहण्यासाठी फुकट जागा मिळेल. बँक तसे करणार होत्या कारण त्या जुन्या मोटेल व्यावसायिकांना कर्ज देऊन नुकसान मध्ये होत्या.

पापा पटेलनी त्यांच्या जवळचे आणि इतर नातेवाईकांचे पैसे जमा केले आणि ते मोटेल विकत घेतले. पटेल तिथे आपल्या कुटुंबासह राहत होते त्यामुळे त्यांना कर्मचारी ठेवण्याची गरज पडली नाही व घरभाडे ही वाचले.

Heads आले तर मी जिंकेल, Tails आले तर मी जास्त गमावणार नाही.

समजा मोटेल व्यवसायात अपयश आले असते तर, पापा पटेल कडे मोटेल सोडून इतर कोणतीही संपत्ती नव्हती. त्यामुळे बँक काही करू शकत नव्हती. तसेच बँकांना मोटेल ताब्यात घेऊन ते चालवणे शक्य नव्हते किंवा ते विकणे ही शक्य नव्हते. जर पटेल ते मोटेल चालू शकत नव्हते तर इतर कोणीही ते चालू शकले नसते. मग काय बँकांकडे फक्त एकच पर्याय उरला असता की पापा पटेल सोबत काम करणे, कर्जाच्या अटी बदलणे आणि पापा पटेलला मदत करणे जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही.

पापा पटेल पेक्षा इतर कोणीही मोटेल व्यवसाय स्वस्तात चालू शकत नव्हते. कारण पापा पटेल तिथे आपल्या कुटुंबासोबत २४ तास राहत होते त्यांना कर्मचारी ठेवण्याची गरज नव्हती.

ही काय ० धोका असलेली पैज नव्हती पण ही कमी धोका असलेली आणि जास्त परतावा देणारी पैज होती.
“Heads आले तर मी जिंकेल, Tails आले तर मी जास्त गमावणार नाही.”

The Dhandho Investor Marathi By Mohnish Pabrai

Virgin Dhandho

Richard Branson यांना एअरलाइन व्यवसाय सुरु करण्याची विचारणा करण्यात आली होती. रिचर्ड ब्रॅन्सन यांना एअरलाइन व्यवसाय विषयी काहीच माहिती नव्हती. पण तरी त्यांना ही कल्पना आवडली होती. त्यांच्या कंपनीतील इतर गुंतवणूकदार या व्यवसायात उतरण्यास तयार नव्हते, कारण एअरलाईन व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप जास्त पैसा लागतो. विमान खूप महाग असतात. तेव्हा ब्रॅन्सन यांनी बोईंग कंपनीला विचारणा केली की तुमच्याकडून एक वर्षाकरिता विमान भाड्यावर मिळेल का ?

जर व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्स अपयशी झाली असती तर त्याची किंमत दोन मिलियन डॉलर एवढी असती. पण त्यावेळेस ब्रॅन्सन यांची म्युझिक कंपनी वर्षाला बारा मिलियन डॉलर कमवत होती, तसेच त्याच्या पुढील वर्षी 20 मिलियन डॉलर एवढी कमाई होणार होती. ब्रॅन्सन यांनी चांगली सुविधा देण्यावर भर दिला. इतर विमान कंपन्यांना जोपर्यंत याची जाणीव झाली होती तोपर्यंत त्यांनी एक चांगला ब्रँड तयार केला होता.

“Heads आले तर मी जिंकेल, Tails आले तर मी जास्त गमावणार नाही.” होणारे नुकसान फार कमी होते आणि होणारा फायदा हा खूप जास्त होता.

मित्तल धंधो

लक्ष्मी मित्तल यांचा दृष्टिकोन नेहमी असा होता की एक डॉलर ची गोष्ट नेहमी एक डॉलरपेक्षा कमी किमतीत घ्यायची. मारवाडी माणूस, तो फक्त पाचवी शिकलेला असेल तरीही, त्याची अपेक्षा ही असते की त्याची मुद्दल रक्कम डिव्हिडंड (लाभांशाच्या) रूपात तीन वर्षाच्या आत त्याला परत मिळावी.

The Dhandho Investor Marathi By Mohnish Pabrai

धंधो चौकट

१. आधीच अस्तित्वात असलेले व्यवसाय विकत घेण्यावर भर द्या.

स्टार्ट अप सुरू करण्यापेक्षा आधीच अस्तित्वात असलेले व्यवसाय विकत घेणे फार कमी धोकादायक आहे.

२. साधे व्यवसाय विकत घ्या, अशा क्षेत्रांमध्ये जिथे बदलाचा वेग फार कमी आहे.

“आम्ही बदलाला गुंतवणुकीचा शत्रू म्हणून पाहतो… म्हणून आम्ही बदलाचा अभाव शोधतो. आम्हाला पैसे गमवायला आवडत नाही. भांडवलशाही खूप क्रूर आहे. सर्वांना आवश्यक असणारी सांसारिक उत्पादने आम्ही शोधतो. ” – वॉरेन बफेट

३. संकटात असलेल्या क्षेत्रातील, संकटात असलेले व्यवसाय विकत घ्या.

“विकत घेण्याची किंमत तुमची एवढी चांगली असू द्या की एक साधारण विक्री सुद्धा तुम्हाला चांगले परिणाम देईल.” – वॉरेन बफेट

व्यवसाय विकत घेण्याची योग्य वेळ ती असते जेव्हा नजीकच्या काळातील त्याचे भविष्य चांगले नसते आणि व्यवसायाला तिरस्कार मिळतो, प्रेम मिळत नाही.

४. असे व्यवसाय विकत घ्या जिथे टिकाऊ स्पर्धात्मक फायदा मिळेल – The Moat (खंदक)

“मला स्पर्धकांसाठी सोपा व्यवसाय नको आहे. मला असा व्यवसाय हवा आहे ज्याच्या भोवती खंदक आहे. मला आत मध्ये एक मौल्यवान किल्ला हवा आहे आणि मग असा सरदार जो फार प्रामाणिक आणि मेहनती आणि सक्षम आहे. मग मला त्या किल्ल्याभोवती खंदक हवा आहे. खंदक वेगवेगळ्या गोष्टी असू शकते: आमच्या ऑटो विमा व्यवसायाच्या(GEICO) भोवतीचे खंदक आहे, कमी खर्च.” – वॉरेन बफेट

५. जेव्हा शक्यता तुमच्या बाजूने असतात, जबरदस्त पणे पैज लावा.

तुम्ही चुकीच्या किंमतीचा जुगार शोधत असता. ह्यालाच गुंतवणूक म्हणतात. आणि जुगार चुकीच्या किमतीचे आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. हेच Value Investing आहे.

– चार्ली मंगर

फक्त साध्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करा.

“जेव्हा जग संधी देते, हुशार लोक मोठी पैज लावतात. जेव्हा शक्यता त्यांच्या बाजूने असते, ते मोठी पैसे लावतात. आणि इतर वेळेस ते पैज लावत नाहीत, हे इतके सोपे आहे.”

– चार्ली मंगर

धंधो म्हणजे काही पैज लावणे, मोठ्या पैज लावणे, क्वचित पैज लावणे.

“आम्हाला असे किल्ले घ्यायला आवडतात जिथे लुटारूंना रोखण्यासाठी मोठे खंदक शार्क आणि मगर यांनी भरलेले असतात. लुटारू – पैसा असलेले लाखो लोक ज्यांना आमचा पैसा हवा आहे. आम्हाला असे खंदक हवे आहेत जे पार करण्यास अशक्य आहेत. आम्ही आमच्या व्यवस्थापकांना सांगतो की जरी नफा नाही वाढला तरी खंदकाची रुंदी दरवर्षी वाढवा.”

–  वॉरेन बफेट

The Dhandho Investor Marathi By Mohnish Pabrai

कोणत्याही शेयर मध्ये उतरण्याआधी गुंतवणूकदारांनी खालील प्रश्न विचारले पाहिजे.

१. हा व्यवसाय मी चांगल्या प्रकारे समजतो का ?

२. मला या व्यवसायाची आजची Intrinsic Value माहित आहे का ? आणि ती पुढील येणाऱ्या काही वर्षात कशी बदलेल ?

३. Intrinsic Value पेक्षा बऱ्याच कमी किमतीत मला हा व्यवसाय मिळत आहे का ?

४. माझ्याकडे असलेल्या पैशाचा मोठा भाग मी याव्यवसायात गुंतवू इच्छितो का ?

५. होणारे नुकसान कमी आहे का ?

६. व्यवसाय भोवती खंदक आहे का ?

७. व्यवसाय सक्षम आणि प्रामाणिक व्यवस्थापकांकडून चालविला जातो का ?

The Dhandho Investor Marathi By Mohnish Pabrai

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.