The Dip By Seth Godin Marathi

The Dip By Seth Godin Marathi या पुस्तकात कधी सोडावे व कधी टिकून राहावे हे सांगितले आहे.

चुकीचा सल्ला – विजेते कधीच सोडत नाहीत / माघार नाहीत.

योग्य सल्ला – विजेते गोष्टी सोडतात. ते योग्य वेळी, योग्य गोष्टी सोडतात.

चुकीच्या गोष्टी सोडा.

योग्य गोष्टींना चिकटून रहा.

हे किंवा ते करण्याचे धाडस ठेवा.

The Dip Marathi By Seth Godin

The Dip

The Dip म्हणजे जीवनातील उतार किंवा खड्डा. कोणतीही महत्त्वाची गोष्ट जीवनात मिळवायची असेल तर त्यात Dip असतेच.

Dip म्हणजे असा काळ जेव्हा तुम्ही भरपूर मेहनत घेता, पण त्यानुसार परिणाम मिळत नाही. थोडा काळ यश मिळते, पण परत अपयश येत. जिंकत आहोत असे वाटायला लागल्यावर हरायला लागता.

हा खड्डा, हा उतार, हा Dip आहे म्हणूनच कमी लोक यशस्वी होतात. हा खड्डा नसता तर बरेच लोक यशस्वी झाले असते.

जेव्हा लोक सोडतात / माघार घेतात तेव्हा अनेकदा ते लघु अवधीच्या फायद्यावर लक्ष्य देतात.

आपल्याला दीर्घ अवधीच्या फायद्यापेक्षा, अल्प मुदतीचा त्रास जास्त वाटतो.

जर तुम्ही Dip पार करू शकत नसाल तर सुरवात करू नका. Dip आल्यावर माघार घेणे म्हणजे आधीचा पूर्ण वेळ वाया घालविणे.

यशस्वी लोक आणि प्रयत्न करणारे यांच्यातील कुंपण आहे Dip.

तुमचे काम आहे तुमच्या प्रतिस्पर्ध्यासाठी मोठी Dip तयार करणे.

जेव्हा प्रणाली तुम्ही माघार घेण्याची अपेक्षा करते आणि तुम्ही तरीही टिकून राहता, तुम्हाला असामान्य परिणाम मिळतात.

THE CUL-DE-SAC

The Cul-De-Sac हा फ्रेंच शब्द आहे, याचा अर्थ होतो Dead End. म्हणजे अंत, शेवट, ज्या पुढे काहीच नाही.

म्हणजे जीवनात अशी परिस्थिती असते की आता पुढे काही सुधारणा होऊ शकत नाही.

कधीकधी तुम्ही सोडत नाही / माघार घेत नाही, तर तुम्ही सामान्य बनता.

बाजारात चौथ्या क्रमांकाची बिलियन डॉलर नफा देणारी कंपनी का विकावी ?

कारण ती लक्ष्य विचलित करते. आणि ती कर्मचाऱ्यांना शिकविते की जगातील सर्वोत्कृष्ट नसणे ठीक आहे.

Jack Welch

एखादी गोष्ट तुम्हाला जगातील सर्वोत्कृष्ट बनवायची असेल तर तुम्ही सर्व काही करू शकत नाही.

प्रॉक्टर अँड गॅम्बलने शेकडो उत्पादनांचा नाश केला. स्टारबक्सने त्यांचे संगीत-सीडी-बर्निंग स्टेशन नष्ट केले.

रणनीतिक माघार घेणे हे यशस्वी संस्थांचे रहस्य आहे.

सुतारपक्षी हजार झाडांवर वीस वेळा चोच मारू शकतो आणि काहीही मिळवू शकत नाही, परंतु व्यस्त राहू शकतो. किंवा तो एका झाडावर वीस हजार वेळा चोच मारून अन्न मिळवू शकतो.

नवीन नोकरी शोधण्याची ती वेळ असते जेव्हा तुम्हाला तिची आवश्यकता नसते.

The Cliff (दुर्मिळ पण भयानक)

The Cliff

म्हणजे जीवनात अशी परिस्थिती असते की यापुढे कितीही मेहनत घेतली तरी परिणाम सुधारणार नाहीत. उलट बिघडत जातील.

चिकाटीला मर्यादा असतात.

एखाद्याचे मन बदलणे अशक्य नसले तरी कठीण असते.

CUL-DE-SAC आणि Cliff यांचा अंत अपयशात होतो.

तुम्ही जगातील सर्वोत्तम न होण्याची सात कारणे

  1. तुमचा वेळ संपला (आणि तुम्ही सोडले).
  2. तुमचे पैसे संपले (आणि तुम्ही सोडले).
  3. तुम्ही घाबरलात (आणि तुम्ही सोडले).
  4. तुम्ही गंभीर नाही (आणि तुम्ही सोडले).
  5. तुम्ही इंटरेस्ट किंवा उत्साह गमावला किंवा सामान्य बनण्याचे निवडले (आणि सोडले).
  6. तुम्ही दीर्घ ऐवजी अल्प मुदतीवर लक्ष केंद्रित केले (आणि अल्प अवधी मध्ये कठीण वाटल्यावर सोडले).
  7. जगात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी तुम्ही चुकीची गोष्ट निवडली आहे (कारण तुमच्याकडे प्रतिभा नाही).

कधी सोडावे ?

तुम्ही जगात सर्वोत्कृष्ट बनत नाही, कारण बहुतेक वेळा, एकतर तुम्ही चुकीचे नियोजन करता किंवा तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यापूर्वीच हार मानता.

तुम्हाला माघार घ्यायची असेल तर सुरवात करण्यापूर्वीच माघार घ्या.

कार्य करीत नसलेले डावपेच, सोडा.

स्मार्ट रित्या माघार घेणे, अपयश टाळण्याचा एक चांगला मार्ग आहे.

हुशारीने माघार घेणाऱ्याचा, गर्व शत्रू असतो.

सर्वात चांगले सोडणारे/माघार घेणारे ते असतात जे सुरवात करण्याआधीच ठरवतात की ते कधी माघार घेतील.

तुम्ही कोणत्या परिस्थितीत सोडणार / माघार घेणार हे आधीच लिहून काढा, आणि मग तशी वेळ आली तर तुमच्या योजनेची अंमलबजावणी करा.

मोजता येणारी कोणती प्रगती तुम्ही करत आहात ?

तुमच्या जीवनात तुम्हाला कळत नसेल कधी सोडावे ? कधी टिकून राहावे ? तर हे पुस्तक नक्की वाचा. हे पुस्तक खाली दिलेल्या लिंक वरून विकत घेऊ शकता.

फ्री pdf शोधणारे पूर्ण पुस्तक क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते. वरील लिंक वरून पुस्तक विकत घ्या.

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.