The Most Important Thing By Howard Marks ह्या पुस्तकावर आधारित हा लेख आहे. विचारशील गुंतवणूकदारांसाठी असामान्य व्यवहारज्ञान.
Howard Marks हे Oaktree Capital Management चे Cofounder आहेत.
The Most Important Thing By Howard Marks
“जेव्हा मी क्लायंट्स आणि प्रॉस्पेक्ट्सना (संभाव्य ग्राहकांना) भेटतो तेव्हा मी वारंवार त्यांना सांगतो, ‘सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे X. ’आणि त्यानंतर दहा मिनिटांनंतर म्हणतो,‘ सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Y. ’आणि त्यानंतर थोडा वेळाने Z आणि हे असेच चालू राहते.” – Howard Marks
म्हणून माझ्या असे मनात आले की गुंतवणुकीसाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यांच्यावर मी एक पुस्तक लिहावे.
गुंतवणूक कशी करावी हे सांगणारे हे पुस्तक नाही, तर हॉवर्ड मार्क्स यांचे गुंतवणुकीचे तत्वज्ञान सांगणारे हे पुस्तक आहे.
यशस्वी गुंतवणूकीसाठी एकाच वेळी बर्याच वेगवेगळ्या पैलूंकडे विचारपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. एकाला जरी वगळले तरी परिणाम तुम्हाला आवडणार नाहीत.
गुंतवणूकीत यशासाठी खात्रीशीर अशी कोणतीही रेसिपी नाही. चरण-दर-चरण सूचना नाहीत. मूल्यांकणाचे कोणतेही सूत्र नाही.
गुंतवणूक सुलभ करणे माझे ध्येय नाही. खरं तर, मला सांगायचं आहे की गुंतवणूक करणे किती गुंतागुंतीचे आहे. जे लोक गुंतवणूकीला सुलभ करण्याचा प्रयत्न करतात ते त्यांच्या प्रेक्षकांचे मोठे नुकसान करतात.
तुम्हाला जे हवं ते मिळत नाही तेव्हा अनुभव मिळतो.
The Most Important Thing By Howard Marks
The Most Important Thing. . . द्वितीय-स्तरीय विचार
“सर्व काही शक्य तितके सोपे केले पाहिजे, परंतु अतिशय सोपे नाही.”
– Albert Einstein
कारण असे केल्याने महत्वाच्या गोष्टी आपण गाळतो.
“गुंतवणूक करणे सोपे नाही, ज्याला हे सोपे वाटते तो मूर्ख आहे.”
– Charlie Munger
“थोड्याच लोकांकडे उत्तम गुंतवणूकदार होण्यासाठी जे हवं असतं ते असतं. काहींना ते शिकवल्या जाऊ शकतं, परंतु प्रत्येकाला नाही. . . आणि ज्यांना ते शिकविल्या जाऊ शकतं त्यांना सर्व काही शिकवल्या जाऊ शकत नाही.”
अगदी उत्तम गुंतवणूकदारही प्रत्येक वेळी बरोबर नसतात. कारण कोणताही नियम नेहमी कार्य करत नाही.
गुंतवणूकीची एक पद्धत थोड्या काळासाठी कार्य करेल, परंतु तीच पद्धत अखेरीस वातावरण बदलेल, म्हणजे नवीन पद्धत आवश्यक आहे.
अर्थशास्त्र हे अचूक विज्ञान नाही. गुंतवणूकीतील तुमचे लक्ष्य सरासरी परतावा मिळविणे नाही तर तुम्हाला सरासरीपेक्षा चांगलं करायचं आहे. तुमची विचारसरणी इतरांपेक्षा चांगली असायला हवी.
गुंतवणुकीच्या यशासाठी योग्य असणे ही एक आवश्यक अट असू शकते, परंतु ती पुरेशी अट नाही. तुम्ही इतरांपेक्षा अधिक योग्य असले पाहिजे. . . ज्याची व्याख्या म्हणजे तुमची विचारसरणी वेगळी असली पाहिजे.
The Most Important Thing By Howard Marks
द्वितीय-स्तरीय विचार म्हणजे काय ?
प्रथम-स्तराचे विचार म्हणतात, “ही चांगली कंपनी आहे; चला शेअर विकत घेऊया. ”
द्वितीय-स्तराचे विचार म्हणतात, “ही एक चांगली कंपनी आहे, परंतु प्रत्येकाला वाटत ही एक महान कंपनी आहे, आणि तसे नाही. शेअर मूल्यापेक्षा जास्त किंमत मिळतोय; चला विक्री करूया.”
प्रथम स्तराचे विचार म्हणतात, “मला वाटते कंपनीची कमाई कमी होईल; विका.
द्वितीय-स्तराचे विचार म्हणतात, “मला वाटते कंपनीची कमाई लोकांच्या अपेक्षे एवढी कमी होणार नाही. हा आनंदाचा धक्का शेअर ला वर नेईल; खरेदी करा.”
प्रथम-स्तरीय विचारसरणी सोपी आणि वरवरची असते आणि प्रत्येकजण हे करू शकतो.
द्वितीय-स्तरीय विचारसरणी खोल, जटिल आणि गुंतागुंतीची असते.
सर्व गुंतवणूकदार बाजारात विजय मिळवू शकत नाहीत. कारण एकत्रितपणे, तेच बाजारपेठ आहेत.
प्रत्येकजण यशस्वी गुंतवणूकदार होऊ शकतो असा विश्वास देऊन लोकांची दिशाभूल केली जाते. प्रत्येकजण यशस्वी गुंतवणूकदार होऊ शकत नाही.
The Most Important Thing By Howard Marks
The Most Important Thing Is . . . मार्केटला समजून घेणे
विक्रेत्यापेक्षा तुम्हाला मालमत्तेबद्दल खरोखर अधिक माहिती आहे का?
एकदा एक फायनान्स प्राध्यापक आणि विद्यार्थी सोबत जात असतात.
विद्यार्थी विचारतो, “जमिनीवर ती 10 डॉलरची नोट पडलेली आहे काय ?”
प्राध्यापक त्यावर उत्तर देतात, “नाही, ती १० डॉलरची नोट असू शकत नाही. कारण ती १० डॉलरची नोट असती तर आतापर्यंत कोणीतरी उचलली असती.”
प्राध्यापक तेथून निघून जातात. विद्यार्थी ती १० डॉलरची नोट उचलतो आणि त्याची बिअर पितो.
The Most Important Thing By Howard Marks
The Most Important Thing Is . . . मूल्य आणि किंमत दरम्यानचे नाते
गुंतवणूक ही एक लोकप्रियता स्पर्धा आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट तिच्या लोकप्रियतेच्या शिखरावर खरेदी करणे.
सर्वात सुरक्षित आणि संभाव्य फायदेशीर गोष्ट म्हणजे जेव्हा ती कोणालाही आवडत नसेल तेव्हा खरेदी करणे.
The Most Important Thing Is . . . चक्रा कडे लक्ष देणे
काहीही कायमस्वरूपी एका दिशेने जात नाही. आकाशापर्यंत झाडे वाढत नाहीत.
नियम क्रमांक एक: बर्याच गोष्टी चक्रीय ठरतील.
नियम क्रमांक दोन: जेव्हा इतर लोक नियम क्रमांक एक विसरतात तेव्हा नफा आणि तोटा होण्याच्या काही उत्तम संधी मिळतात.
इतर कोणत्या गोष्टी गुंतवणुकीसाठी महत्वाच्या आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आताच पुस्तक विकत घ्या.
पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा. पुस्तक नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या.
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.