घर विकत घेण्याचा सामान्य माणसाचा ३/२०/३०/४० चा नियम हा लेख P V Subramanyam यांच्या House buying Rule: 3/20/30/40! या लेखावर आधारित आहे.
P V Subramanyam हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. तसेच ते लेखकही आहेत. Retire Rich, invest Rs 40 a day हे पुस्तक त्यांनी लिहले आहे ज्याच्या २,००,००० पेक्षा जास्त प्रति विकल्या गेलेल्या आहेत.
गृह कर्ज हे चांगले कर्ज आहे. वाईट कर्ज काय आहे ? हे जाणण्याकरिता ZERO EMI हा लेख वाचा.
“तुम्ही कर्ज घेण्यास पात्र आहात, हे कर्ज घेण्याचे पुरेसे कारण नाही.”
Youtube (5:30 min)
जर तुम्ही ३/२०/३०/४० या नियमाचे अनुसरण केले तर तुम्ही एक छोटेसे घर विकत घेऊ शकता किंवा शहराच्या बाहेरच्या भागात तुम्हाला घर मिळेल. परंतु तुम्हाला नक्कीच अधिक शांतता मिळेल आणि कमी तणावाचे जीवन तुम्ही जगाल.
बऱ्याच लोकांना आता जाणीव झाली आहे की गृह कर्ज ही मोठी जबाबदारी आहे आणि कार लोन ने दुःखात आणखी भर पडते. गृह कर्ज आवश्यक असले तरी ते किती असावे ? हेही महत्वाचे आहे. नाहीतर EMI भरून भरून तुम्ही तणावग्रस्त व्हाल.
३
घराची किंमत तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या तिपटीपेक्षा जास्त नको. म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न १० लाख असेल तर तुमच्या घराची किंमत तीस लाखांपेक्षा जास्त नको.
मोठ्या शहरांमध्ये एवढया किंमतीत घर खरेदी करणे अवघड आहे. जुने घर किंवा जमीन विकून ही रक्कम तुम्ही जमवू शकता. किंवा तुमच्या वडिलांची तुम्ही मदत घेऊ शकता. परंतु हे शक्य नसल्यास उत्पन्न वाढीपर्यंत तुम्ही भाड्याने राहू शकता किंवा अशा लहान जागी राहायला जाऊ शकता, जिथे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या तिपट्टीत तुम्हाला घर मिळेल.
जर पती पत्नी दोघेही कमी होत असतील तर घराचे बजेट वाढवू शकता. पण याचा अर्थ हा असेल की लोन फिटेपर्यंत तुम्ही दोघेही नोकरी सोडू शकणार नाही. जर दोघांचा पगार जवळपास सारखा असेल तर एकाचा पगार लोन लवकर फेडण्यासाठी वापरा.
२०
गृह कर्जाचा कालावधी २० वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ ठेवा. कर्जाचा कालावधी जितका कमी तितका चांगला.
३०
तुम्ही भरत असलेला ईएमआय (इतर सर्व ईएमआय सह) तुमच्या उत्पन्नाच्या 30% पेक्षा जास्त नको. घर खरेदी करण्यासाठी पैसे जमा होईपर्यंत भाड्याने राहणे उत्तम पर्याय आहे.
४०
घर खरेदी करताना तुम्ही घराच्या किंमतीच्या कमीतकमी कमी ४०% डाउन पेमेंट केले पाहिजे.
घर विकत घेताना काय करू नये ?
तुम्ही कर्जात असताना घर खरेदी करणे टाळा.
तुम्हाला न परवडणारे घर खरेदी करणे टाळा.
डाउन पेमेंटसाठी पुरेशी बचत न करणे टाळा.
स्वतःचे घर विरुद्ध फ्लॅट
छोटे कुटुंब असताना फ्लॅट घेणे सोयीस्कर असते. मोठे कुटुंब असताना स्वतःचे घर घेणे सोयीस्कर ठरते.
“घराची मालकी असणे, आता आनंद देत नाही कारण बहुतेक मालकीची घरे अपार्टमेंट आहेत. तळ तुमचा नाही; छप्पर तुमचे नाही; भिंत तुमची नाही आणि तुम्हाला जमिनीचा एक छोटासा वाटा मिळतो.”
– ZERO EMI
घर विकत घ्यावे का भाड्याने राहावे ?
Magicbricks.com चे हे calculator तुम्ही यासाठी वापरू शकता.
P V Subramanyam यांच्या मते तुम्ही ५०-५५ वयाचे होईपर्यंत घर घेणे टाळावे.
P V Subramanyam यांचे Retire Rich, invest Rs 40 a day हे पुस्तक खालील लिंक वरून खरेदी करू शकता.
पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा. पुस्तक नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या.
इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.