चीनची पारंपारिक युद्धनीती

चीनची पारंपारिक युद्धनीती – चीन ला हजारो वर्षांचा इतिहास आहे. गोल्डमॅन सॅक्स च्या अभ्यासानुसार २०२७ नंतर चीनची जीडीपी अमेरिकेच्या जीडीपी पेक्षा मोठी होणार आहे.

गोल्डमॅन सॅक्स

चीनची जुनी महासत्ता परत येणार आहे. ह्या महासत्तेची, चीनची पारंपारिक युद्धनीती काय आहे ते आपण या लेखात समजून घेऊया.

चीनची पारंपरिक युद्धनीती का महत्वाची आहे ?

चीनमध्ये लोकशाही नाही. निवडणुका, स्वातंत्र्य आहे – पण भारतात, अमेरिकेत, युरोपियन राष्टात आहे तसे नाही. चीन हा एक प्रकारे राजाच्या शासनात काम करावं तसे शी जिनपिंग च्या हाताखाली काम करतो. त्यामुळे इतर देशांची युद्धनीती व चीनची युद्धनीती मध्ये फरक आहे. चीनला इतर देशांसारखे पारदर्शक होण्याची गरज नाही. पारदर्शकता नसल्यामुळे चीन बऱ्याच अशा गोष्टी करतो जे इतर देश करत नाही.
चीनची पारंपरिक युद्धनीती अजूनही चीनमध्ये बऱ्याच प्रमाणात वापरली जाते, म्हणून तिचा अभ्यास करून घेणे महत्वाचे आहे.

ह्या लेख लिहण्यासाठी मी जे पुस्तक किंवा स्रोत वापरत आहे त्यांची यादी मी लेखाच्या शेवटी दिली आहे.

The Art Of War

Sun Tzu नावाचा एक जनरल होता. त्याची युद्धाची कला पाहून Ho Lu नावाच्या राजाने Sun Tzu ची परीक्षा घेण्याचे ठरविले. Ho Lu राजाने त्याला महिलांचे सैन्य तयार करण्याचा आदेश दिला.

Sun Tzu ने महिलांना पिछे मूड, बाये मूड अशा इतर सूचनांचा अर्थ समजवून सांगितला. Sun Tzu ने महिलांना विचारले की त्यांना त्या सूचना समजल्या का ? महिलांनी होकार दिला. ढोल वाजत असताना Sun Tzu पीछे मूड ची सुचना दिली. पण त्यावर महिला हसायला लागल्या.

Sun Tzu बोलला,“जर आदेशाचे शब्द स्पष्ट नसतील, जर सूचना पूर्णपणे समजल्या नसतील तर जनरल दोषी ठरेल. ”

Sun Tzu ने परत महिलांना बाये मूड ची सूचना दिली. महिला परत हसायला लागल्या. Sun Tzu बोलला, “जर आदेशाचे शब्द स्पष्ट नसतील, जर सूचना पूर्णपणे समजल्या नसतील तर जनरल दोषी ठरेल. परंतु जर त्याचे आदेश स्पष्ट असतील आणि तरीही सैनिकांनी त्याची आज्ञा पाळली नाही तर तो अधिकाऱ्यांचा दोष असेल.”

असे म्हणत Sun Tzu ने दोन महिला अधिकाऱ्यांचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला. राजा हे पाहून घाबरला आणि त्याने असे न करण्याची Sun Tzu ला विनंती केली. पण Sun Tzu ने सांगितले की एकदा राजाकडून मला सैन्याचा जनरल होण्याची परवानगी मिळाल्यावर काही गोष्टी आहेत ज्या मी राज्याच्या आता ऐकू शकत नाही. त्या दोन महिला अधिकाऱ्यांचा Sun Tzu ने शिरच्छेद केला. महिला आता Sun Tzu चा आदेश ऐकू लागल्या  होत्या. Ho Lu ने Sun Tzu काम पाहून त्याला जनरल म्हणून नियुक्त केले.

“जो पूर्णपणे युद्धाच्या उपायांवर विसंबून राहतो त्याला संपवले जाईल; जो पूर्णपणे शांततापूर्ण उपायांवर  अवलंबून असेल त्याचा नाश होईल.”


– SSU-MA FA

“मी लढलो, तर जिंकतो.”
– Confucius

योजना आखणे

“राज्यासाठी युद्धाच्या कलेचे खूप महत्त्व आहे. हा जीवन आणि मृत्यूचा विषय आहे, सुरक्षिततेचा किंवा विनाशाचा मार्ग आहे.” – Sun Tzu

“सर्व युद्ध फसवणूकीवर आधारित असतात. जेव्हा हल्ला करण्यास सक्षम असाल, तेव्हा तुम्ही अक्षम असल्याचे भासवा;  तुमची शक्ती वापरताना, तुम्ही निष्क्रीय वाटले पाहिजे;  जेव्हा तुम्ही जवळ असता, तेव्हा तुम्ही शत्रूला विश्वास दिला पाहिजे की तुम्ही खूप दूर आहात;  जेव्हा तुम्ही खूप दूर असता तेव्हा तुम्ही त्याला विश्वास दिला पाहिजे की तुम्ही जवळ आहात. शत्रूला भुरळ घालण्यासाठी आमिष दाखवा. अव्यवस्थेचे ढोंग करा आणि त्यांना चिरडून टाका. जर तुमचा विरोधक शीघ्रकोपी स्वभावाचा असेल तर त्याला चिडवण्याचा प्रयत्न करा. कमकुवत असल्याचे सोंग घ्या, की त्याचा गर्विष्ठपणा वाढू शकेल.” – Sun Tzu

युद्ध छेडणे

“प्रदीर्घ युद्धाचा फायदा एखाद्या देशाला झाल्याचे उदाहरण नाही.”

“युद्धसामुग्री घरून आना पण अन्न शत्रूकडून मिळवा.”

“युद्धात तुमचे उद्दिष्ट विजय असु द्या, दीर्घ मोहीम नाही.”

रणनीती ने हल्ला करा

“सर्वोच्च उत्कृष्टता, लढा न देता शत्रूचा प्रतिकार मोडीत काढण्यात असते.”

“जर तुम्ही शत्रूला ओळखत असाल आणि स्वत: ला ओळखत असाल तर शंभर युद्धांच्या परिणामाची तुम्हाला भीती वाटण्याची गरज नाही. जर तुम्ही स्वत: ला ओळखत असाल तर पण शत्रूला नाही, तर प्रत्येक विजयामागे तुम्हाला एका पराभवाला सामोरे जावे लागेल. जर तुम्ही शत्रू किंवा स्वत: लाही ओळखत नसाल तर तुम्ही प्रत्येक लढाईत मात खाल.” – Sun Tzu

रणनीति विभागणी

चांगले योद्धे हे सुनिश्चित करतात की ते हरणार नाहीत, नंतर ते शत्रूला हरवण्याच्या संधीची वाट पाहतात.

शत्रूपासून स्वतःला वाचवणे हे आपल्याच हातात आहे, परंतु शत्रूला पराभूत करण्याची संधी स्वयम् शत्रु स्वतःच देतो.

म्हणून चांगला योद्धा हे सुनिश्चित करतो की तो हरणार नाही, पण तो शत्रूला हरवेलच याची शाश्वती देऊ शकत नाही.

“हुशार सैनिक तो आहे जो केवळ जिंकत नाही, तर सहजतेने जिंकण्यात निपुण असतो.”

Thirty Six Stratagems (३६ क्लृपत्या)

“जिथे तो तयार नसेल तिथे हल्ला करा, जिथे अनपेक्षित असेल तिथे प्रकट व्हा.” – Sun Tzu

Thirty Six Stratagems हा एक चिनी निबंध आहे ज्यात राजकारण, युद्ध आणि नागरी सुसंवादात वापरल्या जाणार्‍या क्लृपत्या सांगितल्या आहेत.

उधारीच्या चाकूने मारा.

चीनची पारंपारिक युद्धनीती

प्रतिस्पर्ध्याशी वाद घालण्यासाठी शारीरिक ऊर्जा खर्च करु नका, उलट असे काहीतरी बोला ज्याने त्याला काळजी वाटेल. जेणेकरुन तुम्ही काय बोलला ह्यावर विचार करण्यासाठी तो मौल्यवान वेळ, पैसा आणि प्रयत्न वाया घालवेल.

शत्रु मेहनत करत असेल तेव्हा आराम करा.

लढाईसाठी वेळ आणि जागा निवडण्याचा फायदा आहे. तुम्हाला माहित असते की केव्हा आणि कुठे लढाई होईल, तुमच्या शत्रूला नाही. तुमच्या शत्रूला व्यर्थ गोष्टींमध्ये त्याची ऊर्जा नष्ट करायला प्रोत्साहित करा आणि तुमची ऊर्जा जतन करून ठेवा. जेव्हा तुमचा शत्रू दमलेला आणि गोंधळलेला असेल, तेव्हा ऊर्जेने आणि हेतूने आक्रमण करा.

जो कोणी युद्धक्षेत्रात प्रथम येईल आणि शत्रूची येण्याची वाट पाहिलं, तो लढाईसाठी ताजा असेल. जो कोणी दुसर्‍या क्रमांकावर युद्धक्षेत्रात येईल त्याला थकलेले असताना तयारीसाठी घाई करावी लागेल.

जळते घर लुटा

चीनची पारंपारिक युद्धनीती

जेव्हा एखादा देश अंतर्गत संघर्षाने ग्रस्त असतो, जेव्हा रोग आणि दुष्काळ लोकांचा नाश करतात, जेव्हा भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी सर्रासपणे घडते, तेव्हा तो देश बाहेरील धोक्याचा सामना करण्यास अक्षम असेल. हीच वेळ आहे हल्ल्याची.

प्रत्येक संस्कृतीचा मृत्यू तीन घटनांनी घडतो: उपासमार, रोग आणि युद्ध. कोणत्याही दोन घटनांपासून ग्रस्त संस्कृती, तिसर्‍यासाठी लक्ष्य बनते. एक प्राचीन म्हण आहे की जेव्हा वाघ आजारी किंवा जखमी असतो, कुत्रे जवळ जमतात.

‘ज्वलंत घर लुटणे’ म्हणजे तुमचे शत्रू वाईट परिस्थितीला तोंड देत असताना याचा वैयक्तिक फायदा मिळवणे.

जेव्हा तुमचे शत्रू गोंधळलेले आणि अनागोंदीच्या स्थितीत असतात तेव्हा ती एक उत्तम संधी असते, त्यांना पुसून टाकण्यासाठी किंवा जप्त करण्यासाठी. मागण्या शत्रूंकडून सहजपणे पूर्ण केल्या जातील. अंतर्गत आणि बाह्य घडामोडींमुळे कमकुवत झाल्यास शत्रूला पराभूत करणे शक्य आहे. जेव्हा तुमचा शत्रू दुर्बल बनतो त्याला तुमच्या इच्छेनुसार वाकवा.

जेव्हा तुमचा शत्रू अराजकग्रस्त स्थितीत असतो तेव्हा तुम्ही त्याचा नाश करू शकता किंवा त्याच्याकडून तुमच्या हव्या त्या मागण्या पूर्ण करू शकता.

असे काय आहे ज्याची तुमच्या शत्रूंना काळजी वाटते ? आणि असे घडू नये म्हणून कोणती किंमत मोजायला ते तयार आहेत ?

एकदा तुम्हाला इतरांची भीती समजली की तुम्ही त्यांचे सर्वात वाईट स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कार्य करू शकता आणि नंतर फायदा मिळविण्यासाठी परिस्थितीचा फायदा घेऊ शकता.

पूर्वेकडे आवाज करा आणि दक्षिणेकडे वार करा.

तुम्हाला जिथे लढायचे आहे ती जागा शत्रूला कळू देऊ नका, शत्रूला सर्व शक्यतांचा विरूद्ध तयारी करावी लागेल.
वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करा त्यामुळे शत्रूचे सैन्य पसरवले जाईल. अशा प्रकारे जिंकणे सोपे जाईल.

कोणत्याही लढाईमध्ये आश्चर्यचकित करण्याचे जबरदस्त फायदे होऊ शकतात. शत्रूकडून अपेक्षा नसलेल्या ठिकाणी हल्ला करून शत्रूला आश्चर्यचकित केले जाऊ शकते.

दुसर्‍या व्यक्ती (किंवा उत्पादन किंवा सेवा) मध्ये स्वारस्य दर्शवा आणि त्यानंतर, जेव्हा ते चिंतेने प्रतिक्रिया देतील तेव्हा त्यांच्याकडे वळा आणि मग फक्त निष्ठावंत राहण्यासाठी सूट किंवा बक्षीस मागा.

तुम्ही ज्यामागे आहात, त्यामध्ये तुम्हाला स्वारस्य नसल्यासारखे दाखवा. जेव्हा प्रतिस्पर्ध्याला वाटेल तुम्ही पाठलाग सोडला, जेव्हा ते आराम करत असतील, तेव्हा ते मिळवा!

चिनी लोककथा

एक चिनी वयोवृद्ध माणूस रोज आपल्या घराच्या बाहेर बसलेला असतो. एक दिवस त्याला काही लोक रेशीम च्या दुकानाच्या मागे पुढे संशयास्पद रित्या फिरतांना दिसतात.

त्यांच्यापैकी एक येऊन त्या माणसाला भेटतो आणि म्हणतो, “आम्ही चोर आहोत. आम्ही हे रेशीम चे दुकान लुटायला आले आहोत. तुम्ही आम्हाला पाहिले आहे, म्हणून कृपया तुम्ही कोणालाही काही सांगू नका.”

तो वयोवृद्ध व्यक्ती म्हणतो, “त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी कशाला कोणाला सांगेल ?”

चोर त्या वृद्ध व्यक्तीला धन्यवाद बोलतो आणि निघून जातो.

वृद्ध व्यक्ती विचार करतो की चूक रेशीम दुकानदाराचीच आहे. त्याने एवढ्या मोठ्या रस्त्यावर हजारो लोकांसमोर आपले सामान असे का ठेवले ? आणि तो ते चोरी कसे करतात हे पहात बसला.

दिवसभर ते चोर रेशीम दुकानाच्या मागे-पुढे करत राहिले. पण संध्याकाळ झाली, दुकान बंद झाले, तरीही त्यांनी चोरी नाही केली.

वृद्ध व्यक्ती बोलला ते मूर्ख आहेत, त्यांनी माझ्याशी गंमत केली वाटते.

जेव्हा तो काही खायला आणण्यासाठी त्याच्या खोलीत गेला, तेव्हा त्याला कळले की त्याचे सर्व सामान चोरीला गेले आहे.

चीनची पारंपारिक युद्धनीती

वाघाला डोंगर सोडण्यासाठी प्रविष्ट करा.

कधीही अशा विरोधकांवर थेट हल्ला करु नका ज्यांना त्यांच्या स्थानाचा फायदा प्राप्त होतो. त्याऐवजी शत्रूला त्याच्या स्थानापासून दूर नेण्यास प्रवृत्त करा. त्याला त्याच्या सामर्थ्यापासून वेगळे करा. युद्धात जी व्यक्ती वर असेल तिला फायदा असतो, उंचावर असणाऱ्या शत्रूवर हल्ला करू नका, त्याला त्याची जागा सोडण्यास भाग पाडा.

पकडण्यासाठी, सोडणे शिका.

कोपऱ्यात अडकलेली शिकार नेहमी हताशेमध्ये शेवटचा हल्ला करते. हे टाळण्यासाठी तुम्ही शत्रूला असा विश्वास दिला पाहिजे की त्याला अजूनही स्वातंत्र्य मिळण्याची संधी आहे. त्यामुळे लढा देण्याची त्याची इच्छा सुटण्याच्या इच्छेत रूपांतरित होईल. शेवटी जेव्हा स्वातंत्र्य खोटे सिद्ध होईल शत्रूचे मनोबल पराभूत होईल आणि तो लढाईशिवाय आत्मसमर्पण करेल.

शेजारच्या राज्यावर हल्ला करताना दूरच्या राज्याशी मैत्री करा.

शत्रु छतावर चढल्यावर शिडी काढून घ्या.

निसटून जाणे पराभव नाही.

शरण जाणे हा संपूर्ण पराभव आहे, तडजोड करणे हा अर्धा पराभव आहे, परंतु निसटून जाणे पराभव नाही.

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.


Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.