झिंबाब्वे ची अति महागाई. झिंबाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. लोकसंख्या जवळपास १.५ करोड.
काही लोक विचारतात की सरकार खूप नोट छापून गरिबी का मिटवत नाही ? जास्त नोट छापून काय होते ते खाली पाहू.
आओ सिखाऊं तुम्हे अंडे का फंडा
सर्वांकडे जास्त पैसे असतील तर काय होईल ? सर्वच लोक त्या वस्तूची जास्त किंमत द्यायला तयार होतील.
समजा १ अंडे आहे आणि अंडे घेणारे लोक १० आहेत. सर्वांकडे करोडो रुपये आहे. मग त्या अंड्याची किंमत ५ रुपये राहील का ? त्या अंड्याची बोली लागेल. जो अंड्याची किंमत जास्त देईल त्याला अंड मिळेल. अशा प्रकारे अंड्याची किंमत वाढतच जाईल. झिंबाब्वे मध्ये मग अंड्याची किंमत किती झाली हे खाली सांगतोच.
अर्थव्यवस्थेमध्ये तसेच होते. जर सर्वांचे उत्पन्न वाढले तर महागाई वाढेल. कारण प्रत्येकाजवळ पैसे आहेत मग ते वस्तूंची किंमत जास्त द्यायला तयार होतील, आणि सर्वांकडेच पैसे असल्यामुळे किंमत वाढतच जाईल.
तुमच्याकडे जास्त पैसे आले का तुम्ही म्हणाल मी आता Apple चा फोन घेणार. पण Apple चा फोन हा Luxury ब्रँड आहे. तो सर्वांकडे असला तर त्याची किंमत कमी होते. लोक त्यांच्या संपत्तीचा दिखावा करू शकणार नाहीत. म्हणून मग Apple ला त्यांचा फोन अधिक महाग करावा लागेल, जेणेकरून लोक ते श्रीमंत असल्याचा दिखावा करू शकतील.
परत अंड्याचं उदाहरण पाहू. जर लोकांकडे फक्त ६ रुपये असले तर अंड्यांची किंमत जास्त वाढेल का ? कारण लोकांकडे पैसेच नाहीत मग ते जास्त भाव देतील कसे ? मग लोक अंड्याला पर्याय शोधतील किंवा अंड खाण्याची त्यांची इच्छा मारतील.
जुने चित्रपट पाहिले तर त्यात लखपती असणे मोठी गोष्ट होती, हळू हळू ती गोष्ट करोडपती असणे झाली आणि मग आता अब्जोपती. याचे कारण आहे महागाई. महागाईमुळे वस्तूंच्या किंमती वाढत जातात. पण अति महागाई झाली तर मिनिटाला किंमती दुप्पट होतात.
डिसेंबर २०२० मध्ये झिंबाब्वे मध्ये महागाई ४००% एवढी आहे, तर बेरोजगारीचा दर ९०% इतका आहे.
झिंबाब्वे ची अति महागाई
२००६ मध्ये महागाईचा दर ९१४% होता. २००८ ते २००९ हे वर्ष Hyperinflation (अति महागाई) चे वर्ष होते. महागाई एवढी जास्त होती की सरकारने शेवटी आकडे देणे बंद केले.
जानेवारी २००८ मध्ये वार्षिक महागाईचा दर १०००००% पर्यंत पोहचला.
“१०० बिलियन डॉलरच्या नोट मध्ये फक्त ३ अंडी मिळत होती. मिलियन डॉलरच्या नोट तर टॉयलेट पेपर म्हणून वापरण्यात येत होत्या. आग लावण्यासाठी बातमीपत्र जाळण्यापेक्षा कमी किंमतीच्या नोटा जाळणे परवडणारे होते.”
News
या १०० ट्रिलियन डॉलर च्या नोट चे मूल्य २०१५ मध्ये अमेरिकन डॉलर मध्ये फक्त ४० सेन्ट होते.
शेवटी अशी वेळ आली की सरकारने इतर देशातील नोटा वापरण्याची परवानगी दिली.
२०१९ मध्ये झिंबाब्वेने आपल्या नोट जवळजवळ १० वर्षांनी परत चलनात आणल्या.
जुलै २०२० मध्ये महागाई ७३७.३% होती.
१ झिम्बाब्वे डॉलर = २० भारतीय पैसे १६/०१/२०२१ रोजी.
कारण
१९९० च्या उत्तरार्धात, सरकारने जमीन सुधारणा कायदे आणले. ज्यामुळे गोऱ्या जमीनदारांनाकडून जमिनी काळ्या शेतकऱ्यांकडे आल्या. पण बऱ्याच काळ्या शेतकऱ्यांना शेतीचा अनुभव किंवा प्रशिक्षण नव्हते.
१९९९ ते २००९ या कालावधीत देशात अन्नधान्याच्या उत्पादनात आणि इतर सर्व क्षेत्रात, मोठ्या प्रमाणात घट झाली. बँकिंग क्षेत्रही कोलमडले, भांडवल विकासासाठी कर्ज घेण्यास शेतकरी असमर्थ झाले.
“जर्मनी, १९२३ मध्ये महागाई एवढी होती की किंमती एका महिन्यात चौपट होत.”
“पुरेश्या नसतील तर आणखी नोटा छापू.”
Mugabe
एवढी महागाई वाढत असताना देखील झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष अधिक नोटा छापण्याबद्दल बोलत होते.
परिणाम
२००७ साली ८०% लोकांकडे औपचारिक रोजगार नव्हते.
पोलीस, दुकानदारांना कमी दरात विक्री करण्यास भाग पाडत होते. त्यामुळे दुकानदारांना नुकसान सहन करावे लागले.
कारखान्यांना उत्पादन थांबविल्यास ताब्यात घेण्याची धमकी देण्यात आली.
प्रत्येक खाण्याच्या तेलाच्या बाटलीची किंमत शिक्षकांच्या मासिक वेतनाच्या एक तृतीयांश एवढी होती आणि दुकानदारांना प्रत्येकी फक्त दोन बाटल्या खरेदी करण्याची परवानगी होती.
महागाई विलेन आहे का ?
म्हणून फक्त नोटा छापून गरिबी दूर होत नाही. महागाई ही काय फक्त वाईट गोष्ट नाही तर ती विकासाचे प्रतिकही असते. ज्या समाजात महागाई नाही तिथे प्रगती होत आहे का नाही हा विचार करण्याची गोष्ट आहे. काही वस्तूंच्या किंमती वाढत जातात तर काहींच्या किंमती कमी होत जातात. जसे फोनच्या किंमती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे कमी होत जातात. तर जमीन आणि शेअरची किंमत वाढणे चांगले. कारण याचा अर्थ त्यांचे महत्त्व वाढत आहे. आटोक्यात असलेली महागाई आवश्यक आहे.
पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.