झ्युरिक चे पैशांचे १२ नियम. स्विस बँकर्सच्या पिढ्यांद्वारे.

झ्युरिक चे पैशांचे १२ नियम. Max Gunther यांच्या The Zurich Axioms या पुस्तकावर आधारित हा लेख आहे. स्विस बँकर्सच्या पिढ्यांपिढ्या द्वारे वापरण्यात येणारे जोखीम व बक्षिसाचे नियम.

झ्युरिक चे पैशांचे १२ नियम

स्वित्झर्लंडचे सर्वात मोठे शहर तसेच राजधानी म्हणजे झ्युरिक.

जीवन हे जुगार आहे.

पहिला नियम

काळजी करणे म्हणजे आजारपण नाही तर आरोग्याचे लक्षण आहे. तुम्ही काळजी करत नाही म्हणजे तुम्ही पुरेशी जोखीम घेत नाही.

साहस हेच आयुष्याला जगण्यायोग्य बनवते. साहसी होण्याचा मार्ग म्हणजे जोखीम घेणे.

“सर्व गुंतवणूकी ह्या अनुमान असतात. फक्त फरक इतका आहे की काही लोक ते मान्य करतात आणि काहीजण  नाही”.

अशी रक्कम गुंतवा ज्याने तुम्हाला थोडीशी काळजी वाटेल.

विविधीकरणाच्या आकर्षणाचा प्रतिकार करा.

विविधीकरण (Diversification) करून, तुम्ही अशी परिस्थिती निर्माण करता ज्यात नफा-तोटा एकमेकांना रद्द करण्याची शक्यता असते.

पैशांची जोखीम घ्या. थोडे दुखापत होण्यास घाबरू नका.

दुसरा नियम

तुमचा नफा नेहमी लवकर घ्या.

तुमच्या नशिबाची जास्त परीक्षा घेऊ नका.

एखाद्या उद्यमातून तुम्हाला किती फायदा हवा आहे हे आधीच ठरवा आणि जेव्हा तो मिळेल तेव्हा त्यातून बाहेर पडा.

तिसरा नियम

जहाज बुडायला लागल्यावर प्रार्थना करु नका. उडी मारा.

आयुष्याची वस्तुस्थिती म्हणून आनंदाने लहान नुकसान स्वीकारा.

चौथा नियम

मानवी वर्तनाचा अंदाज बांधता येत नाही. भविष्यातील गोष्टी जाणून घेण्याचा दावा करणाऱ्या कोणावरही विश्वास ठेवू नका.

खरं म्हणजे, पुढच्या वर्षी, पुढच्या आठवड्यात किंवा उद्या काय होणार आहे याची कोणालाही फारशी कल्पना नसते. तुम्ही अंदाज ऐकण्याच्या सवयीपासून मुक्त होणे आवश्यक आहे. अर्थशास्त्रज्ञ, बाजाराचे सल्लागार किंवा इतर आर्थिक गुरू यांना कधीही गंभीरपणे घेऊ नका.

या गुरूंच्या प्रसिद्धीमध्ये जे कधी प्रकट होत नाही ते म्हणजे त्यांची चूक.

“तुम्ही पंचवीस भाकीत करता आणि जी खरी ठरतात तुम्ही त्याचबद्दल बोलता.”

तुम्ही योग्य अंदाज लावू शकत नसल्यास, अनेकवेळा अंदाज लावा.

पाचवा नियम

मागील वर्षी कामी आलेले सूत्र यावर्षीही कामी येईल असे आवश्यक नसते.

तुमच्या शेजाऱ्याच्या कामी येणारे सूत्र, तुमच्यासाठी काम करेल हे आवश्यक नसते.

खरं म्हणजे, नशिबाच्या प्रमुख भूमिकेकडे दुर्लक्ष करणार्‍या कोणत्याही सूत्रावर कधीही विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. पाचव्या नियमाचे हे सत्य आहे.

इतिहासकारांच्या सापळ्यापासून सावध रहा.

हे खरं आहे की कधीकधी इतिहासाची पुनरावृत्ती होते, परंतु बर्‍याचदा असे होत नाही. आणि इतिहासाची पुनरावृत्ती झालीच तर ती कोणत्याही परिस्थितीत इतक्या विश्वासार्ह मार्गाने होत नाही की तुम्ही त्यावर पैशांची पैज लावू शकाल.

चार्टिस्टच्या भ्रमापासून सावध रहा.

ग्राफ पेपरवर रेषांनी संख्येचे प्रतिनिधित्व करणे उपयुक्त आणि धोकादायकही असू शकते.

शेअर बाजारात कोणताही पॅटर्न नाही. यात जवळजवळ कधीच पुनरावृत्ती होत नाही आणि विश्वसनीयरित्या अंदाज लावण्याच्या मार्गाने तर कधीच नाही. स्टॉकच्या किंमतींचे चार्ट बनविणे म्हणजे महासागरातील फेस बनविण्यासारखे आहे. प्रत्येक नमुना तुम्हाला एकदा दिसेल आणि मग तो जाईल. केवळ नशीबामुळेच तुम्ही पुन्हा कधी तो पहाल. जर तुम्ही तो पुन्हा पाहिला तरी त्याचे काहीच महत्त्व राहणार नाही, कारण तो भविष्याबद्दल काहीही सांगत नाही.

एक ठोस काळी रेषा, जी धैर्याने ग्रिड पेपरवर रेखाटली आहे, ती कंटाळवाण्या आणि मूलत: अव्यवस्थित संख्येला एका मोठ्या ट्रेंडमध्ये बदलते.

सहसंबंध आणि कार्यकारणतेच्या भ्रमांपासून सावध रहा.

एक मनुष्य शहराच्या मुख्य चौकात रोज हातवारे करत वेगवेगळे आवाज काढत असतो. एक दिवस पोलिसवाला त्याच्याकडे जातो आणि त्याला विचारतो,”तू काय करतोय ?”

त्यावर तो माणूस उत्तर देतो की मी जिराफांना दूर ठेवतोय. “पण आपल्या शहरात तर कधी जिराफ आलेच नाहीत ?” पोलिसवाला त्याला विचारतो.

ह्यावर तो माणूस उत्तर देतो, “म्हणजे मी माझे काम चांगले करतोय.”

जेव्हा दोन किंवा अधिक घटना जवळजवळ घडतात तेव्हा आपण त्यांच्यामध्ये संबंध जोडण्याचा आग्रह धरतो. कारण अव्यवस्था आपल्याला आवडत नाही. त्यात आपल्याला भीती वाटते, म्हणून आपण नसले तरी गोष्टींमध्ये संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो.

मानवी स्वभावाबद्दल अजून जाणून घ्यायचे असेल तर आकलनात्मक पूर्वाग्रह हा लेख वाचा.

झ्युरिक चे पैशांचे १२ नियम तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर हे पुस्तक आताच खाली दिलेल्या लिंक वरून विकत घ्या.

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.