म्युच्युअल फंड शब्दकोश
म्युच्युअल फंड शब्दकोश मध्ये म्युच्युअल फंड क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या शब्दांबद्दल माहिती देण्यात येत आहे. म्युच्युअल फंड म्हणजे काय ?या लेखात म्युच्युअल फंड बद्दल मूलभूत माहिती देण्यात आली आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये नवीन असाल तर तुम्ही आधी तो लेख वाचावा.
Investment Objective
गुंतवणुकीचा उद्देश – हा फंड कोणत्या अवधीकरिता गुंतवणूक करत आहे ? जसे की दीर्घकालीन ( Long Term), अल्पकालीन (Short Term) व मध्यम कालीन ( Mid Term).
हा फंड कुठल्या गुंतवणुकीच्या प्रकारात गुंतवणूक करेल ? जसे की Debt किंवा Equity ? तसेच गुंतवणूक करताना कुठल्या प्रकारच्या कंपनी निवडेल ? अशा गोष्टींची माहिती यात दिलेली असते.
Fund Manager
Fund Manager म्हणजे अशी व्यक्ती जी फंड चे व्यवस्थापन करते, हा फंड हाताळते. अशी व्यक्ती जी फंड ने कुठल्या कंपनीत गुंतवणूक करावी हा निर्णय घेते अथवा कुठल्या बॉण्ड मध्ये गुंतवणूक करावी, हा निर्णय घेते. म्युच्युअल अनुभवी व्यक्तींची फंड मॅनेजर म्हणून नेमणूक करतात. सहसा फंड मॅनेजर्स ना १५-२० वर्षांचा अनुभव असतो.
AUM
Asset Under Management – म्हणजे फंड मध्ये किती रक्कम व्यवस्थापनाखाली आहे. सोप्या भाषेत फंड मॅनेजर किती रक्कम या फंड मध्ये हाताळत आहे.
Benchmark
म्हणजे असा निर्देशांक ज्याच्याशी आपण फंड च्या कामगिरीची तुलना करतो. समजा एखाद्या फंड चा बेंचमार्क सेन्सेक्स असेल तर त्या फंड ने, सेन्सेक्स पेक्षा चांगला परतावा द्यावा अशी अपेक्षा असते. किंवा त्या बेंचमार्कशी मिळती-जुळती कामगिरी करावी अशी अपेक्षा असते.
Exit Load
फंड मधून बाहेर पडताना लागणारा खर्च. सहसा १ वर्षानंतर हा खर्च ०% असतो, आणि १ वर्षाआधी १% असतो. प्रत्येक फंडसाठी हा खर्च वेगळा असतो. तो तपासून घेणे.
Entry Load
फंड मध्ये पैसे टाकताना लागणारा खर्च. सेबी च्या आदेशानुसार हा खर्च सर्व फंड मध्ये ०% करण्यात आला आहे.
Options
Dividend – यामध्ये तुम्हाला काही रक्कम बोनस म्हणून मिळते. ती तुम्ही परत गुंतवू शकता किंवा वापरू शकता. १० लाखापर्यंत मिळणाऱ्या dividend वर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. म्युच्युअल फंड कंपनीच तो टॅक्स भरते. त्याला dividend distribution tax म्हणतात. मधे-मधे बोनस घेत राहिल्यामुळे शेवटी मिळणारी रक्कम कमी होते.
Growth – यामध्ये तुम्हाला मिळणारी बोनसची रक्कम परत फंड मध्ये गुंतवली जाते. त्यामुळे शेवटी मिळणारी तुमची रक्कम मोठी होते.
Minimum Investment
कमीत कमी किती गुंतवणूक करावी लागेल, ते यात सांगितलेले असते.
Standard Deviation
यावरून आपल्याला कळून येत की, सरासरी परताव्या पेक्षा फंड मध्ये किती वेगवेगळा परतावा मिळतो. समजा एखाद्या फंड मध्ये सरासरी १२% परतावा मिळतो आणि Standard Deviation 4% आहे. तर फंड मध्ये येणारा परतावा हा १२ – ४ = ८% ते १२ + ४ = १६% होता. म्हणजेच फंड चा परतावा ८ ते १६ % या श्रेणी मध्ये होता. Standard Deviation फंड च्या परताव्या मध्ये किती अस्थिरता आहे, हे दाखवत. जितके Standard Deviation कमी तितकी परताव्या मध्ये अस्थिरता कमी.
Beta
यावरून फंड benchmark पेक्षा किती वेगळा परतावा देतोय हे कळत.
समजा beta १.५ आहे, याचा अर्थ १०% मार्केट वर खाली झाले तर फंड मध्ये १५% वर खाली बदल होईल.
Beta = १ म्हणजे बेंचमार्क आणि फंड मध्ये सारखा बदल घडून येईल.
Beta > १ म्हणजे बेंचमार्क पेक्षा जास्त बदल घडून येईल
Beta < १ म्हणजे बेंचमार्क पेक्षा कमी बदल घडून येईल.
Portfolio
म्हणजे फंड मध्ये किती शेयर, किती प्रमाणात घेण्यात आले आहेत. Portfolio आपल्याला फंड नी गुंतवणूक केलेल्या कंपनींची नावे सांगते, तसेच कोणत्या कंपनीमध्ये किती प्रमाणात गुंतवणूक केली आहे ते पण सांगते.
Portfolio Turnover
मागील एका वर्षात खरेदी केलेल्या अथवा विक्री केलेल्या यापैकी ज्याची रक्कम कमी असेल, ती रक्कम, भागीले सरासरी AUM. समजा एका फंड ने २०० करोड चे शेयर विकत घेतले आणि ४०० करोड चे विकले. सरासरी AUM १६०० करोड असेल. तर
Portfolio Turnover = २००/ १६०० = १२.५%
असेल. २००, कारण २०० आणि ४०० मध्ये २०० लहान आहे. Portfolio Turnover आपल्याला दाखवतो की फंड मध्ये असलेल्या शेयर मध्ये किती प्रमाणात फेरबदल केला आहे. शेयर मध्ये जास्त प्रमाणात फेरबदल करण्यात आला तर व्यवहाराच्या खर्चात वाढ होईल. कमी Portfolio Turnover असलेल्या फंड मधल्या शेयर मध्ये जास्त फेरबदल करण्यात येत नाही.
Sharpe Ratio
सरकारी बॉण्ड मधून मिळणारा परतावा धोका विरहित समजला जातो. ह्यामध्ये मिळणारा परतावा सुरक्षित समजला जातो कारण यात सरकार हमी घेते. तर मग ह्या धोका विरहित परताव्या पेक्षा तुमचा फंड किती जास्त परतावा देतो आहे हे आपल्याला Sharpe Ratio सांगतो. Sharpe Ratio मोठा असणे चांगले समजले जाते. Sharpe Ratio चा फायदा दोन फंड मध्ये कोणता फंड कमी धोका पत्करून तेवढाच परतावा देतो हे जाणण्यासाठी होतो. Sharpe Ratio ची एक कमजोरी ही आहे की यात जास्त परतावा मिळत असताना पण जी अस्थिरता असते ती वाईट समजल्या जाते. कारण यात सकारात्मक आणि नकारात्मक अस्थिरता दोन्ही एकच समजल्या जातात.
OTM
One time mandate (OTM) हे काय ? म्युच्युअल फंड मध्ये याच काम काय ? Mandate म्हणजे आदेश, हुकूम आज्ञा. One Time Mandate – म्हणजे एकदाच केलेला आदेश, आज्ञा वा हुकूम. ही आज्ञा, आपण, आपल्या बँकेला एकदाच देतो.
SIP मध्ये आपण, दरमहा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतो. स्वतः दरमहा, अनेक वर्षे असे पैसे टाकणे किंवा तेवढे चेक देणे, हे फार त्रासदायक काम आहे. म्हणून OTM ची सुविधा सुरू करण्यात आली. यात तुम्ही बँकेला एकदाच आदेश देता की, म्युच्युअल फंड कंपनीला तुमच्या खात्यातून दरमहा रक्कम काढू द्या.
मग म्युच्युअल फंड आपल्या खात्यातून कितीही रक्कम काढू शकतात का ?
नाही. आपण OTM देताना कमाल मर्यादा सांगून देतो. त्या मर्यादेपेक्षा म्युच्युअल फंड कंपनी जास्त रक्कम काढू शकत नाही. म्युच्युअल फंड कंपनी नेहमी तुम्ही जेवढी SIP ची रक्कम सांगितली आहे, तेवढीच रक्कम काढते.
मग eOTM काय आहे
नेट बँकिंग वापरून जेव्हा OTM ची परवानगी देतो, त्याला eOTM म्हणतात.
OTM आपण बंद करू शकतो का ?
हो, OTM तुम्ही बंद करू शकता.
Capital Gains Tax
FD मध्ये आपल्याला TDS लागतो. तसा म्युच्युअल फंड मधे Capital Gain Tax असतो. शेयर, बॉंड, जमीन, म्युच्युअल फंड इत्यादी गुंतवणुकीवर हा tax लागतो. तुम्ही जो नफा कमावला आहे त्यावर हा tax लागतो. याचे दोन प्रकार आहेत.
Short term Capital Gain Tax
Long Term Capital Gain Tax
म्युच्युअल फंड Equity plan मध्ये एक वर्षांनंतर मिळालेल्या नफ्यावर ०% Capital Gain Tax लागतो. आणि एक वर्षाआधी आपण गुंतवणूक काढली तर त्यावर Short Term Capital Gain Tax लागतो. म्हणून Equity फंड मध्ये गुंतवणूक एक वर्ष पेक्षा कमी कालावधी साठी करू नये. म्युच्युअल फंड च्या Equity plan मध्ये बहुतेक कंपनी गुंतवणुकीचे १ वर्ष पूर्ण होण्याआधीच पैसे काढले तर १% Exit Load लावतात. म्हणजे Equity plan मध्ये जी तुमची गुंतवणूक आहे त्याच्या १% रक्कम वजा होवून तुम्हाला पैसे मिळतील.
SWP
Systematic Withdrawal Plan हि अशी सुविधा आहे ज्यात तुम्ही दरमहा गुंतवलेली रक्कम काढू शकता. हि सुविधा तुम्ही Pension सारखी वापरू शकता. यात तुम्ही LumpSump रक्कम गुंतवता आणि मग दरमहा थोडी रक्कम Pension म्हणून अथवा दुसरा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून वापरू शकता.
STP
Systematic Transfer Plan या सुविधेमध्ये तुम्ही एका योजनेमधून दरमहा पैसे दुसऱ्या योजनेमध्ये ट्रान्स्फर करू शकता. तुमच्या कडे जर मोठी रक्कम असेल, तर ती रक्कम कमी धोका असलेल्या plan मधे गुंतवून तुम्ही हळू हळू दरमहा जास्त धोका असलेल्या plan मध्ये ट्रान्स्फर करू शकता. याचा फायदा हा होतो कि तुमची गुंतवणूक NAV ची संख्या जास्त असताना होत नाही. यामुळे धोका कमी होतो.
CAGR
Compounded Annual Growth Rate
(एकत्रित वार्षिक वाढ दर)
म्हणजे सरासरी वार्षिक परतावा किती.
समजा तुमचे 10,000 रु ५ वर्षात २०,००० झाले म्हणजे ५ वर्षात १००% वाढले. तर दरवर्षी चा सरासरी परतावा झाला १५%. म्हणजे दरवर्षी १५% या दराने तुमचे पैसे वाढले.
म्युच्युअल फंड मध्ये दरवर्षी ठराविक परतावा नसतो. तो कधी ५% येतो कधी ४०% तरी कधी -१०% पण येऊ शकतो. त्यामुळे CAGR आपल्याला दरवर्षी चा सरासरी परतावा किती ते सांगतो. म्युच्युअल फंड मध्ये मागील १० वर्षाचा CAGR पाहून तुम्ही अंदाज लावू शकता या फंड मध्ये किती परतावा मिळू शकतो. पण मागील परतावा भविष्यात निश्चितच मिळेल असे सांगता येत नाही. मिळू शकतो अथवा कमी जास्तही होऊ शकतो.
Absolute Returns
वरील उदाहरणात आपण पाहिले की १०,००० चे २०,००० झाले. म्हणजे १०० % वाढले, हे १०० % म्हणजे Absolute Return.
XIRR
Extended Internal Rate of Return जर आपण १०,००० एकत्र न गुंतवता १,००० ची sip केली किंवा आपल्याला काही डिव्हिडंड मिळाला, त्यावेळी जो CAGR काढू त्याला म्हणतात XIRR.
KYC
KYC म्हणजे Know Your Customer, म्युच्युअल फंड घेण्याकारिया आपल्याला २ प्रकारचे पुरावे लागतात. १. ओळखीचा २. राहिवाशीचा आणि Pan कार्ड. जर तुमच्याकडे Pan कार्ड नसेल तर तुम्ही वर्षाला ५०,००० पेक्षा जास्त गुंतवणूक म्युच्युअल फंड मध्ये करू शकणार नाही.
EKYC
ज्या लोकांचा AADHAR कार्ड ला मोबाईल क्रमांक जोडलेला आहे, ते लोक EKYC करू शकतात. त्यांना form भरण्याची आवशक्यता नाही. ते online अर्ज करू शकतात. काही म्युच्युअल फंड NET बँकिंग, ATM कार्ड ने गुंतवणूक करण्याची सुविधा देतात. किंवा तुम्ही CHEQUE अथवा DD ने गुंतवणूक करू शकता. आता Video KYC ही सुविधा देखील सुरू झाली आहे.
इतर लेख तुम्ही इथे वाचू शकता.
आमचे फेसबुक पेज तुम्ही इथे पाहू शकता.
This mutual fund glossary is too valuable, which enhance knowledge about mutual fund investment.
खुपच महत्वाची माहिती तिही सरळ सोप्या मराठीत।धन्यवाद।
गुलाब सहाणे
मो.9552294061