वॉरेन बफेट

वॉरेन बफेट हे माझे आदर्श व्यक्ती आहेत. रिच डॅड पुअर डॅड पुस्तक वाचल्यानंतर वॉरेन बफेट हेच ते व्यक्ती होते ज्यांच्याकडे पाहून, गुंतवणूक क्षेत्रात येण्याची मला इच्छा झाली. ते जगातील ४ थ्या क्रमांचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती 5674087500000 ₹ एवढी आहे. ( Source)

वॉरेन बफेट यांना खूप लोक ओळखतात, पण त्यांच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या लोकांना अजूनही माहीत नाहीत. त्यांना “Oracle of Omaha” असेही संबोधले जाते. त्यांनी ९९% संपत्ती दान करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.

“तुम्हाला वॉरेन बफेट बद्दल काय जाणून घ्यायचे ?” हा प्रश्न मी माझ्या फेसबुक पेजवर विचारला होता. त्याच प्रश्नांची उत्तरे लिहण्याचा प्रयत्न मी इथे करत आहे. तुमच्याही मनात काही प्रश्न असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकता.

वॉरेन बफेट यांनी सुरवात कशी केली ?

1930 साली अमेरिकेत वॉरेन बफेट यांचा जन्म झाला. वॉरेन बफेट यांचे वडील हे स्टॉक ब्रोकर होते. वॉरेन बफेट यांचे म्हणणे आहे की त्यांना जनुकीय लॉटरी लागली आणि ते अमेरिकेत योग्य काळात पुरुष म्हणून जन्माला आले. जर ते त्या काळात स्त्री म्हणून जन्माला आले असते किंवा दुसऱ्या एखाद्या काळात जन्माला आले असते तर ते कदाचित एवढे श्रीमंत नसते. त्यांच्या यशात वॉरेन बफेट नशिबाचा हात मानतात.

लहानपणापासून ते आपल्या वडिलांच्या ऑफिसमध्ये जात होते. वडिलांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर ते तेथील सर्व पुस्तक वाचून काढत. तिथेच त्यांना बेन ग्राहमचे “इंटेलिजंट इन्वेस्टर” हे पुस्तक भेटले.

त्यांनी पहिली गुंतवणूक वयाच्या अकराव्या वर्षी केली. पहिल्या शेयर वर त्यांनी थोडासा नफा कमवला. परंतु नंतर त्यांना पश्चाताप झाला कारण तो शेअर पुढे जाऊन खूप जास्त वाढला होता. तेव्हा त्यांनी गुंतवणुकीचा पहिला धडा संयम हा शिकला.

सहा वर्षाचे असताना ते कोकाकोलाच्या बॉटल विकत होते.

वयाच्या 13 व्या वर्षापर्यंत त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता, बातमीपत्र वाटणे व घोड्याच्या शर्यतीचे टीप पत्रक विकणे. त्याच वर्षी त्यांनी पहिल्यांदा टॅक्स रिटर्न भरला व सायकलवर टॅक्स सूट मिळवली.

माध्यमिक शाळेत असताना त्यांनी पिन बॉल मशीन विकत घेतली आणि न्हाव्याच्या दुकानात ती स्थापन केली. त्यापासून मिळालेल्‍या नफ्यातून त्यांनी आणखी मशीन विकत घेतली. पुढे त्यांनी आपल्या तीन मशीन चा व्यवसाय बाराशे डॉलरमध्ये विकला.

कॉलेजमध्ये न जाता वॉरेन बफेट यांना बिजनेस मध्ये उतरायचे होते. पण वडिलांनी नकार दिल्यामुळे त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

वॉरेन बफेट यांनी गुंतवणुकीचे ज्ञान कसे मिळविले ?

“मी आयुष्यात नेहमी अशा लोकांना वर जाताना पाहतो जे सर्वात हुशार नसतात, कधीकधी सर्वात मेहनती देखील नसतात, परंतु ते शिकण्याची मशीन असतात.”
– चार्ली मंगर

चार्ली मंगर – वॉरेन बफेटचे पार्टनर, ते एवढे महान व्यक्ती आहेत की त्यांच्याबद्दल एक वेगळा लेख लिहावा लागेल.

“मी बस माझ्या कार्यालयात बसून दिवसभर वाचतो.”
         – वॉरेन बफेट

“मी बरेच वाचतो: बातमीपत्र, वार्षिक अहवाल,व्यवसाय मासिके इत्यादी.” – वॉरेन बफेट

“रोज थोडे हुशार व्हा.”
  – चार्ली मंगर

वारेन बफेट यांचे विचार काय ?

शेअरच्या फक्त किमती पाहू नका. त्यांच्या मागचे व्यवसाय पहा. शेअर घेताना आपण त्या कंपनीचे / व्यवसायाचे भागीदार होत आहोत, हा विचार करून शेयर विकत घ्या.

अति वैविध्यपूर्णता आणि कमी वैविध्यपूर्णता दोन्ही धोकादायक आहेत. त्या दोन्हींमुळे आपला परतावा कमी होऊ शकतो.

शक्यतांमध्ये विचार करा. बफेटला ब्रिज हा खेळ खेळायला आवडतो त्यातून ते ‘शक्यता’ शिकतात.

गुंतवणूकदाराने आपल्या भावनांवर ताबा ठेवायला शिकले पाहिजे.

“आम्ही बदलाला गुंतवणुकीचा शत्रू म्हणून पाहतो… म्हणून आम्ही बदलाचा अभाव शोधतो. आम्हाला पैसे गमवायला आवडत नाही. भांडवलशाही खूप क्रूर आहे. सर्वांना आवश्यक असणारी सांसारिक उत्पादने आम्ही शोधतो. ” – वॉरेन बफेट

“विकत घेण्याची किंमत तुमची एवढी चांगली असू द्या की एक साधारण विक्री सुद्धा तुम्हाला चांगले परिणाम देईल.” – वॉरेन बफेट

वॉरेन बफेट यांची लोककल्याणाची प्रतिज्ञा.

२००६ मध्ये वॉरेन बफे यांनी लोक कल्याणाकारी संस्थांना हळू हळू बर्कशायर हॅथवे कंपनीचे शेयर दान करण्याची प्रतिज्ञा केली.

माझ्या जीवनभरात किंवा मृत्यूच्या वेळी माझी ९९% पेक्षा अधिक संपत्ती परोपकारात जाईल.

“बुद्धी, हृदयाची सेवा करणारी असावी; परंतु त्याची दास नाही.”

वॉरेन बफेट

वॉरेन बफेट यांची गुंतवणूक कुठे आहे ?

अब्जाधीश वॉरेन बफेटची संपत्ती जवळजवळ संपूर्णपणे त्यांच्या बर्कशायर हॅथवे गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये आहे.

बर्कशायर हॅथवे ही GEICO Insurance, Duracell Batteries आणि See’s Candies यासह अनेक कंपन्या आणि सहाय्यक कंपन्यांचा समावेश असलेली एक होल्डिंग कंपनी आहे.

बर्कशायर हॅथवेच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये Apple, बँक ऑफ अमेरिका आणि कोका-कोला कंपनीसारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

वॉरेन बफेट सोन्यात गुंतवणूक करत नाहीत.

आफ्रिका किंवा कुठेतरी मैदानातून सोनं बाहेर काढलं जातं.  मग आपण ते वितळवून, दुसरा खड्डा खणतो,  आणि ते सोनं पुन्हा गाडतो. त्याच रक्षण करण्यासाठी लोकंही उभे करतो, त्याची काही उपयोगिता नाही.  मंगळावरुन जो कोणी हे पहात असेल तो आपले डोकं खाजवत असेल. – वॉरेन बफेट

वॉरेन बफेट शेयर कसे निवडतात ?

वॉरन बफेट चांगल्या वाढणाऱ्या व नफा जास्त कमावणाऱ्या कंपनींवर लक्ष देतात. ते अशा कंपन्यांवर भर देतात ज्यांचे उत्पादन किंवा सुविधा अद्वितीय आहेत आणि त्यांना स्पर्धेत फायदा होतो. कंपनीची कामगिरी, कंपनीचे कर्ज आणि नफा मार्जिन, इत्यादी गोष्टी बफेट विचारात घेतात.

• ROE = Net Income ÷ Shareholder’s Equity

त्याच उद्योगातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत एखाद्या कंपनीने सातत्याने चांगले कामगिरी केली आहे का हे पाहण्यासाठी बफे नेहमीच ROE कडे पाहतात.

• Debt to Equity ratio (D/E)  = Total Liabilities ÷ Shareholders’ Equity

यावरून कंपनीची वाढ कर्ज घेऊन झाली आहे की प्रगती मधून हे त्यांना कळते.

• Profit Margin = Net income ÷ Net Sales

जास्त प्रॉफिट मार्जिन हे दर्शविते की कंपनी आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे पार पाडत आहे. तसेच मार्जिन वाढत जाणे दर्शविते की कंपनी नियंत्रित करणे अत्यंत कार्यक्षम आणि खर्च नियंत्रित करण्यात यशस्वी आहे.

बफेट विशेषत: केवळ अशा कंपन्यांचा विचार करतात, ज्या किमान 10 वर्षांपासून आहेत.

“मला स्पर्धकांसाठी सोपा व्यवसाय नको आहे. मला असा व्यवसाय हवा आहे ज्याच्या भोवती खंदक आहे. मला आत मध्ये एक मौल्यवान किल्ला हवा आहे आणि मग असा सरदार जो फार प्रामाणिक आणि मेहनती आणि सक्षम आहे. मग मला त्या किल्ल्याभोवती खंदक हवा आहे. खंदक वेगवेगळ्या गोष्टी असू शकते: आमच्या ऑटो विमा व्यवसायाच्या(GEICO) भोवतीचे खंदक आहे, कमी खर्च.” – वॉरेन बफेट

“आम्हाला असे किल्ले घ्यायला आवडतात जिथे लुटारूंना रोखण्यासाठी मोठे खंदक शार्क आणि मगर यांनी भरलेले असतात. लुटारू – पैसा असलेले लाखो लोक ज्यांना आमचा पैसा हवा आहे. आम्हाला असे खंदक हवे आहेत जे पार करण्यास अशक्य आहेत. आम्ही आमच्या व्यवस्थापकांना सांगतो की जरी नफा नाही वाढला तरी खंदकाची रुंदी दरवर्षी वाढवा.” – वॉरेन बफेट

वॉरेन बफेट Intrinsic Value कशी काढतात ?

कोणत्याही संपत्तीची किंमत ती किती पैसा निर्माण करणार आहे यावरून ठरते.

जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर तुमची संपत्ती किती पैसा निर्माण करते यावर तुमचे लक्ष्य असेल. जर तुम्ही सट्टेबाज असाल तर तुमची वस्तू दुसऱ्याला किती मध्ये विकल्या जाईल यावर तुमचा भर असेल. – वॉरेन बफेट

वॉरेन बफेटने कधीच पैसे गमविले नाही का ?

“नियम क्रमांक १: कधीही पैसे गमावू नका. 

नियम क्रमांक 2: नियम क्रमांक 1 विसरू नका.”

वॉरेन बफेटनी त्यांच्या गुंतवणुकीमध्ये पैसे गमावले आहेत. पण त्यांचा हे सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही अशा प्रकारे गुंतवणूक करा की जिथे योग्यप्रकारे अभ्यास करून गुंतवणूक केली असेल. पैसे गमविणे हलक्यात घेऊ नका, हा त्यांचा इथे सांगण्याचा उद्देश आहे.

समजा तुमच्याकडे १०० रु आहेत, तुम्हाला ५०% नुकसान झाल तर तुमच्याकडे आता ५० रु राहतील.

आता समजा हेच ५० रु ५०% वाढले तर काय होईल ? ते ७५ होतील, १०० नाही.

कारण ५० ₹ च्या ५०% होतात २५₹.

५०+ २५ = ७५

म्हणजेच जर तुमचे १०० रु ५०% कमी झाले तर ते ५० रु झाले. पण तेच ५० रु ५०% वाढले, तर ते ७५ झाले, १०० नाही.

म्हणून जर तुम्ही तुमचे पैसे गमावले नुकसान झाले, तर तुम्हाला तुम्ही होता तिथेच यायला फार मेहनत घ्याव लागेल. जेवढे % गमावले त्यापेक्षा जास्त % मिळवावे लागतील.

अस का ? तर आधी ते १०० च्या ५० % कमी झाले, आणि नंतर ५० च्या ५०% वाढले.

१०० च्या ५०% होतात ५० आणि ५० च्या ५०% होतात २५. म्हणून कमी होताना ५० ने कमी झाले आणि वाढताना २५ ने वाढले. ५० रु चे १०० तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला ते १०० % ने वाढवावे लागतील.

तर अशी आहे गणिताची मजा. म्हणून साधारण गणित येणे गुंतवणूकदाराला येणे फार आवश्यक आहे.

वॉरेन बफेटचे सुविचार

“जेव्हा इतर लोभी असतात तेव्हा आम्ही भीती बाळगण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा इतर घाबरतात तेव्हाच आम्ही लोभी राहण्याचा.”

“तुम्ही पैसे देता ती किंमत, तुम्हाला पैसे मिळतात ते मूल्य.”

“आज कोणीतरी सावलीत बसले आहे कारण कोणीतरी खूप दिवसांपूर्वी एक झाड लावले होते.”

“जेव्हा आम्ही लोकांना कामावर घेतो, तेव्हा आम्ही तीन गोष्टी शोधतो. आम्ही बुद्धिमत्तेची अपेक्षा करतो, आम्ही ऊर्जा शोधतो आणि आम्ही प्रामाणिकपणाचा शोध घेतो. आणि जर त्यांच्याकडे प्रामाणिकपणा नसेल तर बुद्धीमत्ता आणि ऊर्जा तुम्हाला ठार मारतील, कारण जर तुम्हाला कोणी प्रामाणिकपणाशिवाय हवा असेल तर तो तुम्हाला मूर्ख व आळशी हवा असेल. ”

– वॉरेन बफेट

“लाट गेल्यावरच कळत कोण नग्न पोहत होते.”

“जेव्हा तुम्ही काय करता हे तुम्हाला माहीत नसते तेव्हा धोका येतो.”

“आमचा आवडता होल्डिंग कालावधी कायम आहे.”

“मला नेहमी माहित होतं की मी श्रीमंत होणार आहे. मला असं वाटत नाही की मी याबद्दल एक मिनिटदेखील कधीही शंका घेतली असेल.”

हा या लेखाचा अंत नाही. वॉरेन बफेट बद्दल आणखी बरीच माहिती मी पुढे इथे लिहणार आहे. म्हणून ब्लॉगला भेट देत रहा. पेजच्या संपर्कात रहा.

आमचे इतर लेख इथे वाचू शकता.

आमचे फेसबुक पेजला इथे भेट देऊ शकता.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

हा लेख लिहतांना मला खालील Sources ची मदत झाली.

https://www.biography.com/business-figure/warren-buffett

https://en.m.wikipedia.org/wiki/Warren_Buffett#Personal_life

https://m.facebook.com/story.php?story_fbid=974352152981319&id=243676852715523

https://fs.blog/2012/03/learning-machine/

https://givingpledge.org/Pledger.aspx?id=177

http://buffettfaq.com/#how-do-you-build-your-investment-knowledge

https://www.fool.com/investing/does-warren-buffett-invest-in-gold.aspx

6 thoughts on “वॉरेन बफेट”

  1. Wow….this is nice to read your blogs…

    We found we save our time by reading your blogs since your blog gives us feeling as we “Reading complete book”.

    Reply

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.