शेअर मार्केटची मूलभूत माहिती अनेक लोक मला मागत असतात, त्यामुळे मी हा लेख लिहण्याचा निर्णय घेतला. या लेखामध्ये शेअर मार्केट बद्दल जे मूलभूत प्रश्न विचारले जातात त्यांची उत्तरे मी खाली दिली आहेत. तुमचे काही काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा. फक्त कोणत्या एखाद्या विशिष्ट स्टॉक खरेदी-विक्री बद्दल सल्ला मागू नका.
शेअर म्हणजे काय ?
सोप्या भाषेत शेअर म्हणजे भाग.
संपूर्ण कंपनी एक केक आहे असे समजा. तर केकचा तुकडा शेअर समजा.
आपण अजून एक उदाहरण पाहू.
आपल्या देशात निवडणुका होतात, तेव्हा ज्याला जास्त मत मिळतात तो जिंकतो. आता एक मत म्हणजे एक शेअर असे आपण म्हणू. ज्याच्याकडे जास्त शेअर तो कंपनीचा मालक. ज्याला जास्त मत तो निवडणूक जिंकला.
शेअर म्हणजे भागीदारी, कंपनीचा शेअर असणे म्हणजे त्या व्यवसायाची भागीदारी असणे.
एखादया कंपनीचे शेअर तुमच्याकडे आहेत म्हणजे तुम्ही त्या कंपनीत पार्टनर आहे असे समजा. जेवढे तुमच्याकडे शेअर, तेवढ्या प्रमाणात तुमची मालकी.
शेअर मार्केट म्हणजे काय ?
शेअर मार्केट अशी जागा आहे जिथे शेअर ची खरेदी-विक्री होते.
शेअरची खरेदी विक्री कशी होते ?
शेअरची खरेदी-विक्री करायला आपल्याला ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट लागते. शेअरची खरेदी विक्री स्टॉक एक्सचेंज मध्ये होते. ती आपण ऑनलाईन आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनही करू शकतो. शेअर मार्केटची सुरवात करायला आपल्याकडे ट्रेडिंग आणि डिमॅट खाते असणे आवश्यक आहे.
ट्रेडिंग व डिमॅट खात्यामध्ये फरक काय ?
ट्रेडिंग खाते बंदूकची नळी तर डिमॅट खाते मॅगझीन आहे समजा.
कोणाला गोळी मारायची असली तर आपण जसे गोळी हाताने फेकून मारत नाही, त्यासाठी बंदूक लागते. तसेच शेअर विकायला ट्रेडिंग अकाउंट ची गरज असते आणि गोळ्या ह्या नळीमध्ये जतन करून ठेवलेल्या नसतात, तर त्या मॅगझीन मध्ये असतात. तसेच शेअर हे ट्रेडिंग अकाउंट मध्ये नसून डिमॅट अकाउंट मध्ये असतात.
लक्षात ठेवा नळी आणि मॅगझीन मिळून बंदूक तयार होते, तसेच शेअर मार्केटसाठी ट्रेडिंग आणि डिमॅट दोन्ही खात्यांची गरज असते.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ? शेअर मार्केट सुरवात कशी करावी ?
Upstox आणि Zerodha ह्या चांगल्या कंपनी आहेत. छोट्या रक्कमेने सुरवात करणाऱ्यांसाठी ह्या दोन कंपनी मला योग्य वाटतात. मी स्वतःही ह्या दोन्ही कंपन्यांचे डिमॅट वापरतो. ह्यांचे ऑनलाईन अकाउंट तुम्ही घरबसल्या खालील लिंकवरून उघडू शकता.
तुम्ही इतरही कंपन्यांचे डिमॅट खाते उघडू शकता. स्वतःचा थोडाफार अभ्यास करून तुमच्यासाठी योग्य कंपनी निवडू शकता. सर्व कंपनी सेबी अंतर्गत येतात, त्यामुळे त्या सुरक्षित आहेत. पण नवीन व्यक्तीसाठी मला Upstox व Zerodha ह्या कंपन्या योग्य वाटतात.
Disclaimer – मी Upstox आणि Zerodha कंपनीच्या Referral प्रोग्रॅम मध्ये आहे, म्हणून ह्या कंपनी सुचवण्याकरिता मला काही लाभांश मिळतो.
डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे ?
आता डिमॅट खाते पूर्णतः ऑनलाइन सुरू करणे शक्य आहे. या करिता तुम्हाला खालील कागदपत्रांची आवशक्यता असेल.
- पॅन कार्ड
- आधार कार्ड ला मोबाईल नंबर जोडलेला असणे
- बँक ची माहिती
- चेक/ ६ महिन्याचे स्टेटमेंट/ पासबुक ( Optional कमोडिटी, FNO साठी आवश्यक)
- सहीचा फोटो
- कॅमेरा असलेला मोबाईल किंवा लॅपटॉप
Zerodha डिमॅट खाते कसे उघडावे ?
- वरील लिंक वर क्लीक करा
- मग Sign Up वर क्लिक करा.
- मोबाईल आणि ई-मेल टाका.
- पॅन कार्ड जशेच्या तसे टाका
- Payment करा
- Digilocker खाते आधार नंबर टाकून तयार करा
- इतर माहिती भरा
- फोटो मध्ये दाखविल्यापमाणे OTP पेजवर लिहून स्वतःच फोटो काढा.
- E Sign साठी आधार नंबर टाका. OTP द्वारे approve करा.
सविस्तर माहितीसाठी खालील विडिओ पहा
अपस्टॉक्समध्ये डिमॅट खाते कसे उघडावे?
वरील लिंक वर क्लीक करा मग माहिती कशी भरायची याची सविस्तर माहिती देणारा विडिओ खाली आहे.
NSE आणि BSE म्हणजे काय?
NSE – National Stock Exchange.BSE – Bombay Stock Exchange.हे स्टॉक एक्सचेंज आहेत. म्हणजे इथे स्टॉकचे /शेअरचे हस्तांतरण होते, खरेदीदार आणि विक्रेत्या मध्ये. आपण ज्याला शेअर मार्केट, शेअर बाजार बोलतो, जिथे स्टॉक ची खरेदी विक्री होते ते ठिकाण म्हणजे स्टॉक एक्सचेंज.
ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये फरक काय ?
काळ. तुम्ही तुमची गुंतवणूक किती काळाकरिता करता यावर तुम्ही ट्रेडिंग करता की गुंतवणूक हे ठरतं. ट्रेडिंग म्हणजे व्यापार करणे. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. वॉरेन बफेट हे गुंतवणूकदार आहेत कारण ते अनेक वर्षांकरिता शेअर विकत घेतात.
जेव्हा तुमचा गुंतवणूक अवधी अनेक वर्षे नसतो तेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता. गुंतवणूक करायची की ट्रेडिंग ही तुमची इच्छा. डिमॅट खाते काढताना त्यात काही वेगळी पद्धत नाही. तेच डिमॅट खाते तुम्ही ट्रेडिंग आणि गुंतवणुकीसाठी वापरू शकता. एकाच वेळी गुंतवणूक आणि ट्रेडिंग करू शकता. तुम्ही शेअर किती कालावधीसाठी ठेवता, बस यावरच तुम्ही शेअर मध्ये गुंतवणूक केली का व्यापार हे ठरतं.
इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ? डिलिव्हरी म्हणजे काय ?
जेव्हा तुम्ही शेअर विकत घेता व त्याच दिवशी विकता त्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. जर शेअर त्याच दिवशी न विकल्यास त्याला डिलिव्हरी म्हणतात. कारण त्याच दिवशी शेअर न विकल्यास त्याची डिलिव्हरी तुमच्या डिमॅट खात्यात होते. म्हणजे जर शेअर त्याच दिवशी विकत घेतला व विकला तर तो तुमच्या डिमॅट खात्यात जमा न होता सरळ विकला जातो, ट्रेडिंग अकाउंट द्वारे.
इंट्राडे ट्रेडिंग ला पीटर लिंच घरचा जुगार म्हणतात.
शेअर मार्केटमध्ये तोटा का होतो ?
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक म्हणजे एकप्रकारे व्यवसायात गुंतवणूक. व्यवसायामध्ये ज्या कारणांनी तोटा होऊ शकतो, त्याच कारणांमुळे शेअर मार्केट मध्ये नुकसान होऊ शकतं. कारण शेअर घेणे म्हणजे व्यवसायाची मालकी घेणे.
शेअर विकल्यावर पैसे कधी मिळतात ?
समजा शेअर विकल्यावर तुम्हाला पैसे तुमच्या बँक खात्यात जमा करायचे असतील तर त्याला तीन कामकाजाचे दिवस लागतात. (T+2) T म्हणजे ट्रेडिंग चा दिवस ज्या दिवशी शेअर घेतला. तर अशा प्रकारे तुमच्या डिमॅट खात्यामधून शेअर बाहेर जायला किंवा यायला तीन दिवस (T+2) दिवस लागतात.
निर्देशांक (Index) म्हणजे काय ?
सेन्सेक्स आणि निफ्टी हे निर्देशांक आहेत. आपण शेअर मार्केट समजून घ्यायला भाजीबाजारचे उदाहरण घेऊ.
भाजीबाजारात अनेक भाज्या असतात, पण भाजीपाला सरासरी महाग होतोय का स्वस्त हे सोप्या पद्धतीने जाणण्यासाठी आपण एक निर्देशांक बनवू.
निर्देशांकामध्ये आपण फक्त ५ मुख्य भाज्या घेऊ. टमाटर, गोबी, बटाटा, वांगी, पालक. तसेच शेअर मार्केटच्या निर्देशांकामध्ये होते. सर्व कंपनींचे शेअर त्यात नसतात तर निवडकच असतात.
आता समजा या सर्व भाज्यांच्या दराची आपण बेरीज केली तर ती आपला भाजीपाला निर्देशांक झाली.
टमाटर १५
गोबी १६
बटाटा १८
वांगी १४
पालक २०
१५+ १६+ १८ + १४ + २० = ८३
अशा प्रकारे आपल्या भाजी निर्देशांकाची संख्या झाली ८३.
तसेच सेन्सेक्स आणि निफ्टी चे आहे. सेन्सेक्स मुंबई स्टॉक एक्सचेंज च्या ३० कंपनींचा निर्देशांक आहे, तर निफ्टी दिल्ली एक्सचेंज च्या ५० कंपन्यांचा. निर्देशांकामध्ये चढउतार हा सहसा ठराविक कंपनींमधला चढउतार दर्शवितो.
शेअर मार्केटवर कोणत्या घटकांचा परिणाम होतो ?
सर्वच.
फुलपाखरू प्रभाव (Butterfly Effect)
सुरवातीला होणारे छोटे बदल फार मोठ्या बदलात रूपांतरित होऊ शकतात.
एका फुलपाखराच्या पंख फडफडण्यामुळे कुठे तरी वादळ येतं. याचे उदाहरण आपण खाली पाहू शकतो.
Domino Effect
त्यामुळे शेअर मार्केटवर सर्वच घटकांचा प्रभाव पडतो. आपण असे विचारू शकतो की शेअर मार्केट वर कोणत्या मुख्य घटकांचा प्रभाव पडतो ? पण त्याही पुढे जाऊन तुम्हाला हा विचार करावा लागेल की माझ्या शेअर वर कोणत्या गोष्टीचा प्रभाव पडेल ?
भाजी बाजार चे उदाहरण घ्या, सर्वच भाज्यांच्या भाव एकाचवेळी एकसारखा बदलतो का ? म्हणून कोणत्या घटकांचा शेअर मार्केटवर प्रभाव पडतो, ह्यासोबतच कोणत्या घटकांचा तुमच्या शेअरवर(भाजीवर) प्रभाव पडतो ह्यावरही लक्ष्य ठेवा.
शेअर मार्केटवर प्रभाव पाडणारे काही मुख्य घटक खालील प्रमाणे आहेत.
- जागतिक अर्थव्यवस्था
- राष्ट्रीय अर्थव्यवस्था
- विकासाचा दर
- स्थिरता
- संशोधन
- लोकसंख्या वाढ
- गरीब ते श्रीमंत होण्याचे लोकांना स्वातंत्र्य
शेअरवर प्रभाव पाडणारे काही मुख्य घटक खालील प्रमाणे आहेत.
- विक्री
- नफा
- वाढ
- सरकारी नियम
- मागणी
- मालक
शेअर मार्केट मध्ये कमीत कमी किती गुंतवणूक आवश्यक आहे ?
अशी काही मर्यादा नाही. तुम्ही एकही शेअर विकत घेऊ शकता. पण निदान ५-१०,००० पासून सुरवात करा. जेणेकरून तुम्हाला काही परिणाम दिसतील. नाहीतर १०० ₹ लावून परिणामांचा अभ्यास करणे तुम्हाला कठीण जाईल.
शेअर मार्केट मध्ये मी दररोज किती कमावू शकतो ?
कितीही.
पण आपण खाली एक वास्तविक उदाहरण पाहू.
१ लाखाच्या १ % होतात १,०००.
पण दररोज १% परतावा येणे सोपे नाही.
दररोज १% वाढ म्हणजे एका वर्षात ३७ पट.
दररोज १% परतावा आला आणि मार्केट वर्षभर सुट्टी न घेता सुरू राहिले तर १ लाखाचे ३७ लाख म्हणजेच ३७ पट होतील. म्हणून रोज १% परतावा येणे वास्तविक नाही. वार्षिक २०-२५% परतावा दिर्घकालावधी करिता तुम्ही सतत आणू शकत असाल तर तुम्ही फार मोठे आसामी आहात समजा.
एक वर्षात चांगला परतावा आणणे सोपे तर नाही, पण १० वर्ष चांगला परतावा आणणे हे त्याही पेक्षा कठीण आहे. शेअर मार्केटमध्ये लघु अवधी मध्ये येणारे यश जास्त महत्वाचे नसते, तर दीर्घावधी मध्ये येणारे यश महत्वाचे असते.
शेअर बाजारात सोप्या रीतीने पैसे कसे कमविता येतील ?
म्युच्युअल फंड मध्ये पैसे लावून. म्युच्युअल फंड हे शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवतात. शेअर मार्केटमध्ये पैसे लावण्याचा हाच सर्वात सोपा मार्ग आहे. म्युच्युअल फंड बद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर आमचा म्युच्युअल फंड म्हणजे काय ? हा लेख वाचा.
बाकी शेअर विकत घेऊन सोप्या प्रकारे कसे पैसे कमविता येतील जर तुम्ही विचारत असाल तर असा कुठलाच सोपा मार्ग नाही.
शेअर मार्केट टिप्स
पूर्णपणे टाळा. पैसे गमावण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शेअर मार्केट टिप्स. फेसबुक वर, मित्रांमध्ये कोणी तुम्हाला जर शेअर मार्केटच्या टिप्स देत असेल तर त्या पूर्णपणे नजरंदाज करा. कोणाकडूनही टिप्स घेऊन शेअर मार्केटमध्ये काम करू नका.
त्यापेक्षा त्या लोकांनी हा शेअर का निवडला ? हे कारण विचारा. त्या कारणांचा अभ्यास करा, स्वतः शोध घ्या मग गुंतवणूक करा. शेअर मार्केट टिप्स देणे हा बऱ्याच लोकांचा व्यवसाय आहे, त्यामुळे या प्रलोभनाला बळी पडू नका. थोडी मेहनत घ्या आणि स्वतः अभ्यास करा.
उधारीच्या ज्ञानापासून सावध रहा.
शेअर मार्केटची पूर्ण माहिती कुठे मिळेल ? शेअर मार्केट अभ्यास कसा करावा ?
शेअर मार्केटची मूलभूत माहिती मिळविणे सोपे आहे, पण शेअर मार्केटची पूर्ण माहिती एकाच जागी कधीही मिळणार नाही. कोणतीच एक वेबसाईट, पुस्तक, गुरू तुम्हाला पूर्ण माहिती देऊ शकणार नाही. तुम्हाला अनेक स्रोतांवरून ही माहिती मिळवावी लागेल.
जर मी तुम्हाला विचारले की या जगाची पूर्ण माहिती कुठे मिळेल ? तर तुम्ही काय उत्तर द्याल ? तसेच शेअर मार्केटचे आहे. याची पूर्ण माहिती एकाच ठिकाणी तुम्हाला कधीच मिळणार नाही. आणि तुम्ही ती एका ठिकाणावरून मिळवली तर समजा तुम्ही फक्त काही अंशच माहिती मिळवली आहे.
शेअर मार्केटची पूर्ण माहिती मिळविणे तुम्हाला आवश्यकही नाही. शेअर मार्केट हे प्रचंड मोठे क्षेत्र आहे, त्यात तुमची उजवी बाजू शोधा आणि तिथे काम करा. शेअर मार्केट कशा प्रकारे काम करते हे जाणून घेणे जास्त कठीण नाही, पण जगातील कोणत्या घटनेचा शेअर मार्केटवर किती आणि कधी परिणाम होईल हे सांगणे कठीण किंवा बऱ्याच वेळा अशक्य आहे.
शेअर मार्केटचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला भरपूर वाचन करावे लागेल, जर तुम्हाला गुंतवणूकदार व्हायचे असेल तर. जर तुम्हाला ट्रेडर व्हायचे असेल तर तुम्हाला चार्ट चा जास्त अभ्यास करावा लागेल.
वॉरेन बफेट यांचे म्हणणे आहे की दिवसाला ५०० पानं वाचून वाचून ज्ञान जमा होत. तुम्ही कंपन्यांचे वार्षिक अहवाल, पुस्तके, मॅगझीन वाचू शकता.
पैसे खर्च न करता शेअर बाजार शिकता येतो का?
पैसे न खर्च करता तुम्हाला शिकता येईल, पण त्याचा दर्जा एवढा चांगला नसेल. पैसे खर्च करून तुम्ही थोड्या चांगल्या प्रकारच्या लोकांपर्यंत पोहचू शकता. तुम्ही क्लास लावण्यापेक्षा पुस्तक विकत घेण्यावर सुरवातीला भर द्या. कारण पुस्तक स्वस्त असतात, ज्ञान भरपूर असतं, तसेच विक्री करणाऱ्यांचे तुम्ही शिकार होणार नाही. मग जसे तुमचे मूलभूत ज्ञान पक्के होईल, तुम्हाला कळेल कोणाचा क्लास लावावा की नाही.
शेअर कसे विकत घ्यावे ? शेअर मार्केटमध्ये पैसे कसे गुंतवावे ?
शेअर मार्केट ट्रेडिंग कशी करावी ?
Zerodha मध्ये इंट्राडे ट्रेडिंग कसे करावे हे खाली विडिओ मध्ये सांगितले आहे.
आजचे शेअर मार्केट
आजचे शेअर मार्केट तुम्हाला पहायचे असेल तर तुम्ही तुमच्या ट्रेडिंग अँप मध्ये पाहू शकता. किंवा गूगल वर sensex किंवा nifty असे search करू शकता. BSE किंवा NSE च्या वेबसाईटवर देखील तुम्ही ते पाहू शकता.
शेअर मार्केट पुस्तके
आपल्या ब्लॉगवर शेअर मार्केटशी संबंधित बऱ्याच पुस्तकांचा सारांश लिहला आहे तो तुम्ही इथे क्लीक करून वाचू शकता.
पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.
Why don’t u give ur account no.All the people are not online friendly.RTS kru shkto na aamhi.plz reply
देणगीकरिता का मॅडम ?
शेअर मार्केट संबंधीत चांगल्या पुस्तकांची नांवे सांगा.
https://www.guntavnuk.com/category/%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a5%87/